-
परवाच फेसबुकवर एका ग्रुपवर नटनट्यांच्या शिर्डीप्रेमाचा विषय निघाला होता. गप्पा तशा खेळीमेळीत चालू असताना अचानक एक नवा सदस्य अवतीर्ण झाला नि त्याने काही स्टेटस् टाकले ते वाचून अख्खा ग्रुप हादरला. एक-दोघांनी त्याला समजावण्याचा प्रयत्न केला, स्त्री सदस्यांनी त्याच्या विधानाला तीव्र आक्षेप घेतला. परंतु महाराज अजिबात बधले नाहीत. एकामागून एक अशी तिरस्करणीय विधाने करणे चालू होते. यात त्यावर आक्षेप घेणार्या सदस्यांवर वैयक्तिक शेरेबाजीही चालू होती. सारा रोख स्त्रियांच्या – चित्रपटात काम करणार्या अभिनेत्रींच्या – चारित्राबद्दल होता. त्यांची विधाने आठवली तरी अंगावर शहारे येतात. ‘असल्या स्त्रिया जवळून जरी गेल्या तरी इतकी घाण येते, म्हणून तर त्या इतक्या मेकअप करतात नि सेंट लावतात.’ हे त्यांचे सर्वात सभ्य विधान. यावरून इतर विधानांचा तर्क तुम्ही करू … पुढे वाचा »
Indexes Menu_Desktop
| संपूर्ण सूची : |
शनिवार, २५ ऑगस्ट, २०१२
(आपले) स्वातंत्र्य, (इतरांचे) चारित्र्य आणि (तथाकथित) संस्कृती
गुरुवार, २६ जुलै, २०१२
काऽऽय रेऽऽ देवाऽऽ...
-
(कवि संदीप खरे यांची क्षमा मागून...) आता पुन्हा उपोषण होणार मग देश ढवळून निघणार मग बेदींना कंठ फुटणार मग मध्येच मोदी बोलणार मग जुनाच खेळ चालू होणार... काऽऽय रेऽऽ देवाऽऽ... मग जुन्या खेळात जुने खेळाडू पुन्हा एन्ट्री घेणार... मग सारीपाट मांडणार... मग मांडलेला सारीपाट काहींना पसंत नसणार... मग ते कुणीतरी ओरडणार मग अण्णा-मित्र असतील तर रडणार रामदेव बाबा असतील तर चिडणार मग ‘नसतोच खेळलो तर बरं’ असं वाटणार आणि या सगळ्याशी आता प्रणवदांना काहीच घेण-देणं नसणार... काय रेऽऽ देऽऽवा मग त्याचवेळी लोकपाल विधेयकावर चर्चा चालू असणार... मग त्यात बेदी, केजरीवाल नि काँग्रेसचं कुणी असणार... मग त्याला अण्णांनी आपली संमती दिलेली असणार... मग ते केजरीवालांनी लिहिलेलं असणार मग… पुढे वाचा »
गुरुवार, १४ जून, २०१२
शोध तुकारामाचा
-
तुकाराम बोल्होबा आंबिले हे नाव – निदान विशी उलटलेल्या – मराठी माणसाला नवीन नाही. लिखित माध्यम असो, ध्वनि माध्यम असो वा चित्रपट माध्यम असो, यातील कोणतंही माध्यम असं नाही ज्यातून आपण तुकोबाला पाहिलं, अनुभवलं नाही. तुकोबाचे आपले भावबंध इतके अलवार आहेत, की तुकोबाचे नाव घेतले की आपण हळवे होतो. त्यामुळे तुकोबाच्या जीवनचरित्राशी आपण अगदी बांधले गेलेले आहोत. पण या भक्तिभावाची परिणती ही की तुकोबाचे चार निवडक अभंग, त्याची ‘कर्कशा’ पत्नी आवली, त्याचा प्रस्थापित ब्राह्मणी व्यवस्थेशी झालेला संघर्ष, इंद्रायणीतून पुन्हा वर आलेली त्याची गाथा नि त्याच्या सदेह वैकुंठागमनाचे गूढ एवढ्यात तुकोबारायाबद्दलची आपली माहिती – नि रुचीही – संपते. एखाद्या व्यक्तिमत्त्वाचा विकास त्याची जडणघडण यावर प्रभाव पाडणारे अनेक घटक असतात. मानसशास्त्रात माणसाच्या व्यक्तिमत्त्व… पुढे वाचा »
रविवार, १० जून, २०१२
पराभूत थोरवीच्या शोधात
-
कालच पं. विजय कोपरकरांनी या तथाकथित आयडॉल वगैरे स्पर्धांबाबत एक मार्मिक प्रश्न विचारला होता. ‘हे सगळे महागायक वगैरे लोक दुसर्याचे गाणे चोख कॉपी करतात, पण स्वतःची काही भर ते घालू शकतात?’ एका वैतागलेल्या संगीतकारांने त्यांना सांगितले होते, की एका महागायक वगैरे ठरलेल्या गायकाकडून अतिशय साध्या चालीचे गाणे बसवून घेताना त्यांना घाम फुटला होता. त्या संगीतकाराची टिपण्णी अतिशय मार्मिक होती. ते म्हणाले ‘ हे गाणं जर बाबूंजींनी आधीच गाऊन ठेवलं असतं ना तर हा महाभाग लगेच उचलून गायला असता. ’ महागायक झालेल्या या महाभागांचे पुढे काय होते? कदाचित तेच होते जे बहुतेक सार्या शालांत परिक्षेत बोर्डात आलेल्यांचे होते. जी गत गायकांची तीच गायनप्रेमींची. गाण समजून-उमजून ऐकायला वेळ कोणाला आहे? आम्ही पैसे देतो, तुम्ही गा, आम्ही वा:, जै हो. अनेक तथाकथित गायनप्रे… पुढे वाचा »
सोमवार, २१ मे, २०१२
काकस्पर्श: अस्फुट नात्याची कथा
-
सात-आठ वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. शाहरुखचा नवा ‘देवदास’ आला होता. आमच्या ऑफिसमधे जेवणाच्या टेबलवर गप्पाटप्पांमधे अपेक्षेनुसार त्याचा विषय निघालाच. नेहमीप्रमाणे मतमतांतरे होतीच पण चित्रपट न आवडलेल्यांची संख्या अधिक होती. का आवडला, का आवडला नाही, वगैरे मते हिरिरीने मांडली जात होती.‘पण मला तर आवडला बुवा’ एक कन्या म्हणाली. ‘काय आवडले तुला?’ असा प्रश्न विचारताच,‘कॉस्चुम्स काय भारी आहेत नै.’ कन्या उत्तर देती झाली. हे ऐकून त्या टेबलवर आपसात चर्चा करणारे वेगवेगळे गट आपले सारे मुद्दे विसरून अवाक् झाले. काही सेकंद भयाण शांतता होती नि पुन्हा कल्लोळ सुरू झाला. अर्थातच केंद्रस्थानी आता ती कन्या होती. एखादा चित्रपट का आवडावा, का आवडू नये, याचे ज्याचे त्याचे गणित असते, त्याबाबत आक्षेप असायचे काही कारण नाही. जशी आवड कारणमीमांसा घेऊन यायला हवी असे बंधन ना… पुढे वाचा »
मंगळवार, २४ एप्रिल, २०१२
जंगलवाटांवरचे कवडसे - ८ : उपसंहार
-
लाकूडतोड्याची साक्ष << मागील भाग “या तिघांपैकी कोणाची साक्ष अधिक विश्वासार्ह वाटते तुला?” हा तिसर्या माणसाने विचारलेला प्रश्न हा चित्रपटाचा गाभा आहे. मुद्दा आहे तो प्रत्येक साक्ष देणार्याची विश्वासार्हता निश्चित करण्याचा, नि त्या आधारे प्रत्येकाच्या साक्षीतील सत्यांश शोधून त्याच्या आधारे निवाडा करण्याचा. निवाड्यासाठी आधी कळीचे प्रश्न निश्चित करावे लागतील, नि साक्षींच्या, अन्वेषणाच्या आधारे त्यांची उत्तरे शोधण्याचा प्रयत्न करावा लागेल. ताजोमारूने स्त्रीवर केलेला अत्याचार वादातीत आहे. जंगलात त्यावेळी उपस्थित असलेल्या तीनही व्यक्तींनी त्या घटनेला दुजोरा दिलेला आहे. त्यामुळे त्या गुन्ह्याबाबत कायदेशीरदृष्ट्या ताजोमारू दोषी आहेच. नैतिकदृष्ट्या किती दोषी आहे हे मात्र सापेक्ष आहे. ताजोमारू तसेच सामुराईच्या साक्षीनुसार ती स्त्री ताजोम… पुढे वाचा »
सोमवार, २३ एप्रिल, २०१२
जंगलवाटांवरचे कवडसे - ७ : लाकूडतोड्याची साक्ष
-
सामुराईच्या आत्म्याची साक्ष << मागील भाग न्यायालयातील साक्षींचा तपशील तिसर्या माणसाला सांगून संपलेला आहे. राशोमोन द्वारावर लाकूडतोड्या अस्वस्थपणे फेर्या घालतो आहे. भिक्षू नि तो माणूस खाली बसून त्याच्याकडे पाहत आहेत. लाकूडतोड्या अस्वस्थपणे द्वाराच्या आतल्या बाजूला चालत जातो, अचानक वळतो नि म्हणतो “हे खोटं आहे. तिथे खंजीर नव्हताच. त्याची हत्या तलवारीने झाली.” तो माणूस तुच्छपणे हसून ‘आता हे अपेक्षितच होते’ अशा नजरेने भिक्षूकडे पाहतो. लाकूडतोड्या हलके हलके पावले टाकत द्वाराच्या मागच्या बाजूला जातो, तिथे बैठक मारतो नि मान खाली घालून बसतो. शेकोटीजवळ बसलेला तो माणूस उठतो, त्याच्या जवळ जातो, त्याच्या शेजारी बसतो नि म्हणतो, “आता हे सारे मनोरंजक होते आहे. कदाचित तू स्वतः काय घडले ते पाह… पुढे वाचा »
जंगलवाटांवरचे कवडसे - ६ : सामुराईच्या आत्म्याची साक्ष
-
स्त्रीची साक्ष << मागील भाग सामुराईच्या आत्म्याला आवाहन केले जात आहे. माझ्याशी लग्न कर- ताजोमारू स्त्रीला विनवतोय. सामुराईचा आत्मा सांगू लागतो. “तिच्याशी संग केल्यानंतर तो डाकू तिच्याशी लाडीगोडीने बोलू लागला. तो म्हणत होता की ‘जंगलात अशा परपुरुषाबरोबर राहिल्याने तिच्या चारित्र्यावर शिंतोडे उडालेले असल्याने आता ती पतीबरोबर राहू शकत नाहीच. असे असेल तर तिने तिच्या दुबळ्या पतीला सोडून त्याच्याशीच लग्न का करू नये?’ त्याने तिच्यावर अत्याचार केला तो ही त्याच्या मनात तिच्याबद्दल निर्माण झालेल्या प्रेमातूनच. ते दोघेही वृक्षातळी निवांत बसून बोलत होते. “हे ऐकताच माझ्या पत्नीने नजर उचलून त्याच्याकडे पाहिले. ती जणू कोणत्या धुंद… पुढे वाचा »
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पण्या (Atom)







