Vechit Marquee_Both

Indexes Menu_Desktop

संपूर्ण सूची :

रविवार, ३० ऑगस्ट, २०१५

सत्तेचे भोई


  • आठ ऑगस्ट रोजी बंगालमधील ‘काँग्रेस छात्र परिषदे’चा कार्यकर्ता असलेल्या कृष्णप्रसाद जेना या विद्यार्थ्याची प्रतिस्पर्धी ‘तृणमूल छात्र परिषद’ या तृणमूल काँग्रेसशी संलग्न असलेल्या विद्यार्थी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी बेदम मारहाण करत हत्या केली. या मारहाणीचे कारण काय होते तर, तृणमूल काँग्रेसचे मंत्री सौमेन महापात्र यांच्या स्वागतासाठी आला नाही! हे महापात्र महाशय त्यावेळी पूरग्रस्त भागाचा दौरा करण्यासाठी म्हणून आले होते. तरीही त्यांना आदरसत्काराची हौस होती, की नेत्यावर छाप पाडण्यासाठी कार्यकर्तेच अति आक्रमक होते हे सांगता येत नाही. पण इतक्या क्षुल्लक कारणावरून एका विद्यार्थ्याची हत्या करण्याइतके बेभान होण्यात शासन धार्जिणे असण्याचा आधार नक्कीच कामी येत असणार. यावर शासन आणि विद्यापीठ संलग्न व्यक्तींच्या प्रतिक्रिया अतिशय संवेदनशून्य होत्या… पुढे वाचा »

गुरुवार, २७ ऑगस्ट, २०१५

गण्या आणि मी - १ : गण्याचे गणित


  • मी आणि गण्या एकाच हापिसात काम करतो. मी शाळेत गणितात हुशार नि गण्या त्या विषयात ढ. पण इतिहासाने आणि समाजशास्त्राने मला दगा दिला, आणि पाठांतर-प्रवीण गण्याने नेमक्या त्या विषयांत भरपूर मार्क्स काढले नि तो पुढे गेला. आता तो हेडक्लार्क आहे आणि मी त्याच ऑफिसला प्यून आहे. तसं म्हटलं तर आमचं हे दोघांचंच ऑफिस. हे दहा बाय दहाचं ऑफिस आणि बाहेरच्या भिंतीवर पाच बाय पाच आमच्या ऑफिसच्या नावाची पाटी. आमचं हेडऑफिस अमेरिकेला आहे. आमचा बडा साहेबही तिकडेच बसतो. तो तिथून आमच्या दोघांवर नियंत्रण ठेवून आहे. मागच्या वर्षी गण्याला महिन्याला ८३ हजार रुपये होता आणि मला चौदा हजार. यावर्षी बड्या साहेबांनी मला तेहेतीसशे रुपयाची पगारवाढ दिली आणि गण्याला तेरा हजार रुपयांची. आता गण्याचा पगार शहाण्णव हजार झाला आहे तर माझा साडेसतरा हजार. … पुढे वाचा »

बुधवार, १२ ऑगस्ट, २०१५

अन्योक्ती १ - एका ‘जॉन स्नो’चा मृत्यू


  • 'Game of Thrones' नावाच्या एका बहुचर्चित दूरचित्रवाणी मालिकेतला पाचवा सीजन नुकताच संपला. कोण्या काल्पनिक जगातले सात राजे, काही भटक्या टोळ्या नि त्यांचे राजे यांच्यात सतत चालू असलेले सत्तासंघर्ष, त्यासाठी वापरली जाणारी देहापासून पारलौकिकापर्यंत सारी साधने, परस्परद्रोह, हत्या, हिंसाचार, लैंगिकता यांचा विस्तीर्ण पट असलेली ही मालिका जगभरातल्या प्रेक्षकांना बांधून ठेवणारी ठरली आहे. तिचे पुढचे भाग चॅनेलवर येण्याआधीच पहायला मिळावेत यासाठी ते खटपट करू लागले आहेत इतकी उत्सुकता त्याबद्दल निर्माण झालेली आहे. अनेक प्रेक्षक त्यात इतके गुंतले आहेत की नुकत्याच सादर झालेल्या शेवटच्या भागात झालेल्या ‘जॉन स्नो’च्या हत्येने प्रेक्षकांमधे संतापाची लाट उसळली. अनेकांनी ती मालिका दाखवणार्‍या चॅनेलकडे निषेध नोंदवला. फेसबुक, ट्विटरसारख्या सोशल मीडियांतू… पुढे वाचा »

सोमवार, १० ऑगस्ट, २०१५

जग दस्तूरी रे...


  • विषयसंगती ध्यानात घेऊन हा लेख ’ वेचित चाललो... ’ या ब्लॉगवर हलवला आहे. तो इथे वाचता येईल. . - oOo - पुढे वाचा »

रविवार, ९ ऑगस्ट, २०१५

‘ऑल दॅट आय वॉन्ना डू’ : आभासी स्वातंत्र्याचा प्रवास


  • 'Mother died today, or may be yesterday; I can't be sure' कामूच्या ‘द स्ट्रेंजर’च्या सुरुवातीचे हे मर्सोऽचे हे वाक्य म्हणजे साहित्यातील एका नव्या प्रवाहाची नांदी मानलं जातं. अस्तित्ववादी विचारधारेचा प्रभाव असलेल्या साहित्याचा प्रवाह तिथून बळकट होत गेला. वरवर पाहत अब्सर्ड, अर्थहीन जगातील माणसाच्या जगण्यातील तुटलेपणाचा, दिशाहीनतेचा मर्सोऽ प्रतिनिधी दिसतो. जगण्यातील कदाचित सर्वात महत्त्वाचा आधार गमावतानाही त्याबाबत बेफिकीर, खरंतर संवेदनाशून्य कंटाळा असलेल्या, कोणत्याही बंधनातून दूर राहू पाहणार्‍या, गुंतण्याचे टाळणार्‍या व्यक्तींचा प्रतिनिधी बनून राहिला होता. दुसर्‍या महायुद्धानंतर कामूच्या या नायकाची प्रतीरूपे प्रत्यक्ष जगण्यात दिसू लागली आणि साहित्यिकांनीही त्यांचा वेध घेण्यास सुरुवात केली. … पुढे वाचा »