Vechit Marquee_Both

Indexes Menu_Desktop

संपूर्ण सूची :

शनिवार, ३० जुलै, २०२२

भूतकालाचा करावा थाट


  • भूतकालभोगी भारताच्या अगदी सुरुवातीच्या पिढ्यांनी जे निर्माण केले ते मुद्दल गुंतवून मधल्या पिढ्यांनी त्यावर गुजराण केली. अधिक मिळवण्यापेक्षा बचत करुन पोट भरण्याचा हा वारसा आपल्या पुढच्या पिढ्यांना दिला. शेतीकेंद्रित समाजव्यवस्थेचे चिरे निखळायला सुरुवात झाली, उद्योगांचे नि रोजगारांचे इमले उठू लागले नि माणसे अधिकच परावलंबी होत चाकरमानी झाली. त्यांची उरलीसुरली निर्मितीक्षमता लयाला जाऊन त्यांचे एककीकरण होऊ लागले. निर्मितीक्षम आणि निर्मितीशील समाज व त्यातील व्यक्तिंमध्ये असणारा आत्मविश्वास डळमळीत होऊ लागला, की माणूस उसन्या काठ्यांचे आधार घेऊ लागतो. त्यातही डोक्याला फार ताण देता, काहीही गुंतवणूक न करता फुकट मिळणार्‍या अशा काठ्या म्हणजे वारसा आणि भूतकालवैभव. मग भूतकालभोगी पुढच्या पिढ्यांनी डोके भूतकाळात खारवून, मुरवून ठेवले आणि वर्तमानात हातां… पुढे वाचा »

बुधवार, २७ जुलै, २०२२

एक अवघड गणित


  • डिस्ने पिक्चर्सच्या Moana या चित्रपटातील Te Fiti ही निसर्गदेवता. कॅलिफोर्निया ते केरळ, उत्तराखंड ते उरल निसर्गाचा प्रकोप आणि लहर पाहून प्रकृतीमातेला माणसाची दया आली. प्रकट होऊन ती माणसांना म्हणाली, "मी तुम्हाला एक सोपा प्रश्न विचारते. जर कुणीही याचे उत्तर बरोबर दिलेत, तर मी निसर्गाला लगाम घालेन. तुम्हाला अधिक सुखकर आयुष्य देईन." "मला सांगा ’एक अधिक एक किती?’" टोपी सावरत इंग्रज ऐटीत म्हणाला,’ ’We ruled all five continents; obviously the answer is five.' वाईनचा घुटका घेत फ्रेंच म्हणाला, Well, the damn world is a big zero; so zero it is. सॉक्रेटिसला स्मरून ग्रीकाने विचारले, ’Could you please explain to me, what is one?’ बौद्ध डोळे मिट… पुढे वाचा »

सोमवार, २५ जुलै, २०२२

भुभुत्कारुनी पिटवा डंका


  • मी प्रभातफेरीला जातो तो रस्ता चांगला चार-पदरी आहे. रस्त्याचा शेवटचा टप्पा एका वळणापाशी सुरु होतो नि साधारण चारशे मीटर अंतरावर स्टेडियमच्या दारात जाऊन तिथल्या वडाच्या झाडाला टेकून विश्रांती घेतो. त्यामुळे रहदारी नगण्य आणि म्हणून प्रभातफेरीला सोयीचा. सकाळी आमच्यासारखे नव-ज्येष्ठ नागरिक कानटोपी नि स्वेटर घालून, मफलर गुंडाळून काठी टेकत टेकत फिरत असतात. पण हे श्वानवंशीयांचे साम्राज्य आहे. रस्त्याच्या दोन्हीं टोकांना आणि अधेमध्ये पार्क केलेल्या चारचाकी गाड्यांच्या आधाराने यांचे टेहळणी बुरूज आपल्या राज्याचे संरक्षण करण्याचे काम डोळ्यात- आणि नाकांत- तेल घालून करत असतात. याचे उदाहरण म्हणून एक प्रसंग सांगतो. एके दिवशी माझी प्रभातफेरी चालू असताना मी रस्त्याच्या (किंवा भूमितीच्या भाषेत बिनचूकपणे सांगा… पुढे वाचा »

रविवार, २४ जुलै, २०२२

साहित्याचे वांझ(?) अंडे


  • क्रिकेटमध्ये फलंदाजाचा दर्जा ठरवण्यासाठी त्याने आजवर केलेल्या धावांची सरासरी पाहिली जाते, तसे लेखनाच्या दर्जा किती हे ठरवण्यासाठी फेसबुकवर लाईक्सची. त्याबाबतीत माझी कामगिरी म्हणजे कधी ज्याच्या बॅटला बॉल लागला की सत्यनारायण घालावा लागतो अशा महंमद सिराज किंवा जसप्रीत बुमराहच्या दर्जाची. कधीतरी सहज म्हणून खालील परिच्छेदाची फेसबुक पोस्ट केली आणि माझ्या पोस्टना सरासरीने मिळतात त्याच्या दुप्पटीहून अधिक लाईक्स तिने मिळवले. वरील दोघांपैकी एकाने एखाद्या सामन्यात अर्धशतक करुन जावे नि पॅव्हलियनमध्ये जाऊन ’हे कसं काय बुवा झालं’ म्हणून स्वत:च विचारात पडावे तसे माझे झाले. माझी कविता समजण्यासाठी तुम्हाला माझ्या नेणिवेच्या आत डोकावून पहावे लागेल. कविता अशी हमरस्त्याने येऊन भेटत नाही, तिला आडवळणांचे हिरवे स्पर्श लागतात. अर्थांतरन्यासाच्या जाळीतून सरपटणार… पुढे वाचा »

शुक्रवार, २२ जुलै, २०२२

आता घरीच तयार करा एक किलो सोने


  • भारतीयांच्या मनात सोने या धातूच्या हव्यासाबाबत 'Why Indians are obsessed with the yellow metal' या शीर्षकाचा एक लेख मध्यंतरी पाहण्यात आला होता. (इंग्रजी भाषेत असल्याने नुसताच पाहिला, वाचू शकलो नाही.). नोटाबंदी काळात मायबाप सरकारने सोने खरेदीसाठी जुन्या नोटा वापरण्याची परवानगी दिल्यावर जणू काही सोनेच स्वस्त झाले असे समजून ज्यांच्याकडे बदलून घेण्यासाठी जुन्या नोटा नव्हत्या ते लोकही चेकबुक नि क्रेडिट कार्ड घेऊन सोने घेण्यास धावले होते. अशा माणसांच्या अडाणीपणाचे मला वाईट वाटले होते. थोडेसे पैसे खर्च करुन हवे तितके सोने ते घरच्या घरीच तयार करु शकत असताना बाजारातून विकत आणण्याचा गाढवपणा का करावा हे मला उमगले नव्हते. तेव्हाच मला विचारले असते तर ही रेसिपी त्यांना देऊन टाकली असती. असो. निदान आता ही सर्वांसाठी खुली करुन भरपूर सोने निर्माण … पुढे वाचा »

बुधवार, २० जुलै, २०२२

‘तो देव, मी त्याचा प्रेषित’ : मानवी संस्कृतीचा उदयकाळ आणि अर्वाचीन राजकारण


  • या वर्षी मे महिन्यामध्ये ’धर्मवीर’ नावाचा चित्रपट चित्रपटगृहातून प्रदर्शित झाला. विषयाचा विचार करत त्यात हिंदुत्ववादी मंडळींनी त्याला अधिक उचलून धरले हे ओघाने आलेच. त्यांच्यासह इतरांनीही सध्या आलेल्या चरित्रपटांच्या लाटेतील एक चित्रपट इतकेच महत्त्व त्याला दिले. परंतु त्या चित्रपटाचे उद्दिष्ट केवळ मनोरंजन नव्हते किंवा राष्ट्रभक्ती वा धर्मभक्तीच्या प्रचारपटांच्या सध्याच्या प्रवाहाचा तो केवळ एक भागच होता असेही नाही. त्या पलिकडे त्या चित्रपटाला आणखी मोठे उद्दिष्ट साध्य करायचे होते. त्या चित्रपटाचे निर्माते, धर्मवीर आनंद दिघे यांचे शिष्य म्हणवणार्‍या एकनाथ शिंदे यांनी या चित्रपटाद्वारे त्यांच्या नव्या राजकीय प्रवासाचा नारळ फोडला होता हे पुढे स्पष्ट झाले. एखाद्याचा वारसा सांगत आपली वाट सुकर करणे, बस्तान बसवणे याला मानवी इतिहासात खूप मोठी परंपरा… पुढे वाचा »

शनिवार, २ जुलै, २०२२

फडणवीसांची बखर - ४ : मी पुन्हा आलो पण...


  • यापूर्वीचे भाग: फडणवीसांची बखर – १ : भाजप नेतृत्वाचा प्रवास फडणवीसांची बखर – २ : नवा साहेब फडणवीसांची बखर – ३ : मी पुन्हा जाईन --- डिसेंबर २०१९ मध्ये पार पडलेल्या विधानसभा निवडणुकांनंतर सत्तासंघर्ष जोरावर असताना 'द वायर-मराठी’मध्येच तीन दीर्घ भागांत ’फडणवीसांची बखर’ लिहिली होती. २००९ पूर्वी आमदारही नसलेले फडणवीस २०१४ मध्ये मोदींच्या कृपाहस्ताने थेट मुख्यमंत्रीपदावर आरुढ झाले होते. पाच वर्षे यशस्वीपणे मुख्यमंत्री पदावर राहून २०१९ मधील विधानसभा निवडणुकीला सामोरे जात असताना त्यांचा आत्मविश्वास वाढला होता. या पाच वर्षांमध्ये काँग्रेस, राष्ट्रवादी या प्रमुख विरोधी पक्षाला पुरते नामोहरम करतानाच, सहकारी पक्ष असलेल्या सेनेला त्यांच्या आमदारसंख्येच्या तुलनेत संख्येने नि महत्वाने कमी मंत्रिपदे घ्यायला भाग पाडून त्यांनी आपली पकड मजबूत केली हो… पुढे वाचा »