Vechit Marquee

Indexes Menu_Desktop

संपूर्ण सूची :

बुधवार, ३ सप्टेंबर, २०२५

वारसा, जिज्ञासा आणि ज्ञान - २ : पण याचा उपयोग काय?


  • वृद्धत्वाची जेथ प्रचिती... « मागील भाग --- मागील भागाच्या अखेरीस नेहरुंचा उल्लेख आला आहे, तोच धागा पकडून पुढे जाऊ. जिज्ञासा https://www.istockphoto.com/ येथून साभार. फेसबुकवर एके ठिकाणी कुरुंदकरांनी नेहरुंबाबत लिहिलेला एक उतारा पोस्ट केलेला होता. त्याखाली एका तरुणाने “लेखकाला टॅग करता येईल का? त्याच्या प्रोफाईलवर जाता येईल.” अशी कमेंट केलेली होती. समाजमाध्यमांवर बस्तान बसवून असलेल्या ट्रोलिंग मानसिकतेच्या कुणी एकाने त्याचा स्क्रीनशॉट पोस्ट म्हणून टाकला असता, त्यावर सुमारे शंभरेक जणांनी 'हा: हा:’ अशी प्रतिक्रिया दिलेली पाहिली. ( ‘नेहरु’ असा शब्द वाचूनच हा: हा: करणारे काही त्यात असतील. त्यांना वगळून ) इतक्या सार्‍यांना कुरुंदकर ठाऊक आहेत ही आनंदाचीच बाब आहे. कुरुंदकरांचे, त्य… पुढे वाचा »

गुरुवार, २१ ऑगस्ट, २०२५

पौरुषाचा कांगावा


  • महाराष्ट्र देशीचे उत्तर भारतीय जामात श्री. विवेक अग्निहोत्री यांनी मराठी वरणभाताला नाके मुरडताना ‘हे कसलं गरीबाचं खाणं. मी दिल्लीचा आहे. तेलाचा थर असणारं तिखट, मांसाहारी खाणं मला आवडतं’ अशी मुक्ताफळे उधळली आणि महाराष्ट्रदेशी संताप उसळला. तांबडा-पांढरा, अख्खा मसूर, वडा-भात, वांगे-भरीत, शेव-भाजी, चकोल्या वगैरेंनी आपले नेहमीचे वरणभाताशी असलेली ईर्षा तात्पुरती म्यान करुन त्यांस बाहेरून पाठिंबा देऊ केला. आम्हीही लोणच्यापासून पोह्यांपर्यंत सर्वत्र साखरेचा वर्षाव करणार्‍या जमातीशी तात्पुरते जुळवून घेतले. एकुण महाराष्ट्रदेशी दुर्मीळ असा एकोपा दृश्यमान झाला. मुळात अमुक खाणे हे फार शौर्याचे, तमुक खाणे दुय्यम अभिरुचीचे लक्षण वगैरे विनोदी समज नि त्यातून निर्माण झालेल्या अस्मिता हा केवळ महाराष्ट्रदेशीच नव… पुढे वाचा »

बुधवार, १८ जून, २०२५

वारसा, जिज्ञासा आणि ज्ञान - १ : वृद्धत्वाची जेथ प्रचिती...


  • १. वार्धक्याची वाट प्रत्येक माणसाच्या प्रगतीचा आलेख हा दोन टोके धरून थोडे ताणलेल्या इंग्रजी ‘एस’ अक्षरासारखा असतो. लहानपणी परावलंबी काळात ती मंद असते, पौगंडावस्थेपासून ती वेगाने होते आणि एका टप्प्यानंतर, मध्यमवयानंतर तिचा वेग कमी होतो नि माणूस चढण सोडून सपाट रस्त्यावरुन आडव्या दिशेने पुढे सरकत जातो. वृद्धपणी भौतिक नि मानसिक पातळीवर एक स्थैर्यावस्था आलेली असते. पण तरीही भवतालामध्ये, जगण्याच्या बहुतेक पैलूंमध्ये बदल होतच असतात. ते स्वीकारण्यासाठी लागणारी स्वतंत्र बुद्धी आता वृद्धांकडे राहिलेली नसते. त्यांच्याकडची शारीरिक, बौद्धिक पुंजी ही त्यांच्या उदयकाळातील बदलांशी झगडण्यात खर्च झालेली असते. त्यामुळे आता होणारे बदल स्वीकारण्यासाठी गुंतवणूक करावी अशी ऊर्जा त्यांच्याकडे शिल्लक नसते. प्रगतीच… पुढे वाचा »

बुधवार, ११ जून, २०२५

काव्य-मोतीचूर ऊर्फ काही ‘चविष्ट’ प्रेमकविता


  • (मागच्या पोस्टमध्ये ‘खाण्यावरती बोलू काही’ म्हणून जे बोलायचे ते बोलून घेतले. पण आता असे लक्षात आले की अजूनही थोडे बोलायचे राहिले आहे. एखादा पदार्थ आवडला की पोट भरल्यावरही भूक असल्याची भावना शिल्लक राहाते ना, तसे काहीसे. म्हणून ही खाद्यावरची दुसरी पोस्ट, वेगळ्या वाटेवरून जाणारी.) मराठी काव्यक्षेत्र हे निरंतर फळते-फुलते– काहींच्या मते फसफसते (म्हणजे द्रव कमी नि फेस जास्त) असे क्षेत्र आहे. माझ्या फेसबुक वास्तव्या-दरम्यान दररोज किमान दहा मराठी कवितांचे आगमन होते असा अनुभव आहे. पण अशा संपृक्त जगात जी विषमता दिसते, त्याने आमचे मन नेहेमी विषण्ण असते (१) . अगदी रांगोळी टिंबांच्या कहाण्या, हिमालयाची उशी करुन झोपण्याच्या वल्गना करणार्‍या किंवा कवितेची चूळ थुंकून जगाला भस्म करुन टाकू इच्छिणार्‍या महत्त्वाकांक्षा... वगैरे ‘हायर कविते’चे क्षेत्र त… पुढे वाचा »

शनिवार, ७ जून, २०२५

चला दोस्तहो, खाण्यावरती बोलू काही


  • पुणे विद्यापीठ हे ‘गव्हर्नर हाऊस’ असण्याच्या काळात मुख्य इमारतीच्या बरोबर समोर, कुण्या ब्रिटिश साहेबाचा ऐसपैस डायनिंग हॉल होता, भक्कम दगडी बांधकामातला. काही शतकांपूर्वी मी पुणे विद्यापीठात शिकत असताना तिथे ‘ओल्ड कॅन्टिन’ या नावाने ओळखले जाणारे एक कॅन्टिन चालवले जात असे. घरचे जेवण नसेल तर कधीमधी दुपारच्या जेवणासाठी, आणि एरवी चहापानासाठी, तिथे फेरी होत असे. तिथे एक पोरसवदा वेटर होता. तो सदैव घाईत असे. एखाद्या टेबलपाशी ऑर्डर घेण्यास पोहोचला, म्हणून टेबलवरील दोघे-चौघे एकमेकाला विचारून ऑर्डर त्याला सांगेपर्यंत तो लगेच भटारखान्याकडे तरी पळे किंवा दुसर्‍या टेबलकडे तरी. सोशल मीडियावर यथेच्छ टाईमपास करुन काही कामासाठी किंवा ज्येष्ठ नागरिक आई-वडिलांसाठी वेळ द्यायचा म्हटले, हटकून ‘आयॅम किनी सो बिज्जी बाबा. इतरांसोबत इतर कामांना म्हणजे बघा, टाईमंच म… पुढे वाचा »

गुरुवार, २९ मे, २०२५

मूषकान्योक्ती


  • १. सारी धुमश्चक्री संपली. सारे आवाज शांत झाले. थोडा वेळ गेला नि मूषकराज न्हाणीघराच्या बिळातून बाहेर डोकावता झाला. त्याने कानोसा घेतला. घरात शांतता असल्याची खात्री झाल्यावर तो बाहेर आला. तेथून तो माजघरात प्रवेश करता झाला. कानोसा घेऊन घरची स्त्री तिथे नसल्याची खात्री करुन घेतली. मग तो ओट्यावर चढला. त्याच्यासमोरील खिडकीतून बाहेर डोकावला. घरात नि घराबाहेर मघाशी झालेल्या हाणामारीतील जखमी मंडळी परसात नि मागच्या वाडीमध्ये दिसत होती. त्यांची तावातावाने काही चर्चा चालू होती. इतक्या दूरवरुन त्यातील तपशील ऐकू येत नव्हता. मूषकराज वैतागला. त्याने मागचे दार आतून बंद असल्याची खात्री करुन घेतली नि मग तो खिडकीच्या एका गजावर उभा राहिला. त्या सार्‍यांना दरडावणारे एक जोरदार भाषण त्याने ठोकले. पण ख… पुढे वाचा »

शुक्रवार, २३ मे, २०२५

सुजन गवसला जो


  • ‘गाणार्‍याला आधी गाणारं एक मन असावं लागतं, तरच गाणं संभवतं’ असं पुलंनी म्हटलं आहे. त्याचप्रमाणे एखादा काका/आजोबा किंवा मावशी/ताई (मी आजी म्हटलेले नाही, प्लीज नोट) मध्ये आपल्याप्रमाणे मूलपण दिसत असेल, तर बहुधा मुलांना परकाही आपला वाटत असावा. परक्याकडे मूल सहजपणे जाणं हे त्या परक्याच्या व्यक्तिमत्त्वाबद्दलचे एक महत्त्वाचे स्टेटमेंट आहे असे मला वाटते. त्याबाबत मी सुदैवी आहे. बच्चे कंपनीचे नि माझे छान जमत असे. एखाद्या पिल्लाला ‘चल ये’ म्हटले नि ते माझ्याकडे आले नाही असे क्वचितच घडत असे. बहुधा माझ्यातही त्यांना त्यांचे प्रतिबिंब दिसत असावे. ‘असे’ आता म्हणावे लागते, कारण आता मी बराचसा एकांतवादी झाल्याने मोठ्यांचाच फारसा संपर्क येत नाही, नि त्यामुळे मुलांचाही. मध्यंतरी काही काळ मी मॉर्निंग वॉकला ब… पुढे वाचा »

गुरुवार, २२ मे, २०२५

क्रिकेटमधील उपेक्षितास दाद


  • क्रिकेटमध्ये पंच हा प्राणी तेवढाच लोकप्रिय आहे जेवढे निवडणूक प्रक्रियेमध्ये ईव्हीएम ! प्रातिनिधिक स्थिरचित्र. https://www.sportskeeda.com/ येथून साभार. आपण जिंकलो, तर ‘पंचाची कामगिरी नि:पक्ष होती’ असा गौरव करायचा किंवा ‘ते ही शेवटी माणूसच आहेत’ अशी मखलाशी करायची. जर हरलो, तर त्यांचा वापर हुकमी बळी म्हणून खापर फोडण्यास (म्हणजे हिंदुत्ववाद्यांसाठी मुस्लिम, पुरोगाम्यांसाठी मध्यमवर्ग वगैरे वगैरे) त्यांचा वापर करायचा हे ठरलेले असते. त्यातच DRS म्हणजे Digital Review System (त्यालाही मागास भारतीय मानसिकतेच्या बीसीसीआयने बराच काळ ‘बिनचूक नाही’ या बिनडोक तर्कास पुढे करुन रोखून धरले होते.) आल्यापासून पंच हे अधिकच दडपणाखाली काम करु लागले आहेत. त्यांना एखादा निर्णय मिलिसेकंदात घ्यायचा … पुढे वाचा »

रविवार, १८ मे, २०२५

बाबेलचा दुसरा मनोरा


  • फार फार... फार्फारच वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. तेव्हा वर्षाला वर्षही म्हणत नसावेत. तेव्हाची भाषाच वेगळी होती. पृथ्वीवर मोजकीच मनुष्यजात वावरत होती. सारे गुण्यागोविंदाने राहात होते, एकच भाषा बोलत होते. ही जमात अर्थातच भूस्थिर, नागर नव्हती. अन्नापाठी फिरत फिरत ते आजच्या इराकमधील भूभागात पोहोचले. खाणं, जुगणं नि क्वचित यांच्यासाठी लढणं या पलिकडचा विचार करणार्‍या त्यांच्यातील काही सुज्ञांनी नुकताच विटेची यशस्वी चाचणी घेतली होती. तिचा वापर करुन आपण पक्क्या गुहा बांधू शकतो असा त्यांचा दावा होता. The Tower of Babel. पण त्यांचा नेता महत्त्वाकांक्षी होता. त्याला केवळ घर बांधायची नव्हती, त्याला महासत्तेची द्वाही फिरवायची होती. त्याने केवळ जमिनीवरची नव्हे तर एकावर एक अशी चळत स्वरूपात घरे बांधून एक मन… पुढे वाचा »