-
नव्या बातम्या ‘विकसनशील’ नव्हे विकसित भारतातल्या... हे meme कायप्पामार्फत मिळाले असल्याने याचा चतुर कर्ता मात्र ठाऊक नाही. १. वाघांच्या एकादशीच्या उपासासाठी साबुदाणा आणि शेंगदाणे यांच्यासाठी टेंडर मागवण्यात येत आहे. विहित नमुन्यात अर्ज पाठवावेत. २. ‘करवा चौथ’च्या वेळी चाळण्या उपलब्ध करून न दिल्याबद्दल समस्त वाघिणींनी एक दिवसाचे लाक्षणिक उपोषण केले, आणि सायंकाळी पंचगव्य सेवनाने सोडले. ३. कालच्या काकडीच्या कोशिंबीरीत खडे होते म्हणून वाघांनी जेवण आणून देणार्या मदतनीसाला चारही बाजूंनी घेरुन कोपर्यात घेतले आणि..... दहा उठाबशा काढायला लावूनच सोडले. ४. आठवड्याचा मेन्यू ठरवण्याचा लोकशाही हक्क वाघांना मिळाल्यापासून त्यांच्यात रोज भांडणे होताना दिसू लागली आहेत. काल ‘तांदळाची… पुढे वाचा »
Indexes Menu_Desktop
| संपूर्ण सूची : |
मंगळवार, १ नोव्हेंबर, २०१६
‘विकसित’ भारतातील वाघ
गुरुवार, २९ सप्टेंबर, २०१६
आपला देश महान आहे
-
१. ‘कट्यार...’ गाजू लागला की त्याच्याशी संबंधित नसलेला कुणीतरी ‘हे फक्त ब्राह्मणानेच करावे, इतरांचे ते काम नोहे’ असे म्हणतो, आणि अचानक तो चित्रपट ब्राह्मणी ठरून जातो . ब्राह्मण ‘मस्ट वॉच हं’ चे मेसेज एकमेकाला फॉरवर्ड करू लागतात, तर ब्राह्मण आणि ब्राह्मण्यविरोधक त्याच्यावर आगपाखड करू लागतात. ‘अरे हा केवळ चित्रपट आहे, त्यात जातीचे काय?’ म्हणणार्याला ‘तुम्हाला काय कळणार शतकाशतकांच्या शोषणाचे दु:ख’ म्हणून कानाखाली वाजवली जाते. (गाल चोळताना कट्यार आणि शतकाशतकांच्या शोषणाचा नक्की संबंध काय यावर तो विचार करून थकतो .) २. ‘सैराट’ गाजू लागला की, ‘फँड्री’ पाठोपाठ दुसरा यशस्वी चित्रपट देणार्या या दिग्दर्शकाचे त्याच्या कौशल्याचे कौतुक सुरू होते. आता त्याला दलित आयकॉन बनवणारे मेसेजेस नि पोस्टसचा पूर… पुढे वाचा »
शनिवार, २४ सप्टेंबर, २०१६
मी अजून जहाज सोडलेले नाही! - बाबा आमटे
-
कालचा दिवस म्हणजे पर्वणी. बाबा आमटेंचे लेखन आणि अभिवाचक म्हणून चंद्रकांत काळे आणि सचिन खेडेकर हे अभिवाचन गुरु, आमचे आदर्श, एकाच व्यासपीठावर. म्हणजे हल्लीच्या भाषेत काय म्हणतात तसा डब्बल धमाका. ऐंशी मिनिटांचा कार्यक्रम संपला तेव्हा असं वाटलं ‘असा कसा अर्ध्या तासात उरकला यांनी’, पण घड्याळ योग्य वेळ दाखवत होते. एका गोष्टीची गंमत वाटली. ती म्हणजे प्रेक्षकांची उपस्थिती. जेमतेम चाळीस-पन्नास प्रेक्षक. निर्माती असलेल्या सोनाली कुलकर्णीला इवेंट मॅनेजमेंट शिकवायला हवे. आमचे साहित्यिकही गर्दी जमवायला अमिताभ सारखे, अमीर खानसारखे ‘विशेष आकर्षण’ घेऊन येतात, दहीहंडीच्या कार्यक्रमाचे खास आकर्षण ‘सनी लिओन’ असते तेव्हा लाखभराचा समुदाय उपस्थित होतो.... हे आपले उगाचच हो, आमचे आपले नेहमीसारखे. पण बाबांच्या कविता ऐकायला पन्नास माणसे जमतात हेच खरंतर खूप … पुढे वाचा »
शुक्रवार, २३ सप्टेंबर, २०१६
तो कलकलाट होता...
-
काही काळापूर्वी मराठी संस्थळांवर असताना मी आपले लेखन दर्जेदार असल्याचे कसे ठसवावे यावर एक लेख लिहिला होता. ( जिथे लिहिला, त्या संस्थळाबरोबरच तो शहीद झाला .) त्यात एक मुख्य धागा होता, तो असा की अनेक ठिकाणी आपणच वेगवेगळ्या अवतारांनी असावे; नि इथले तिथे, तिथले आणखी कुठे असे संदर्भ देत ते लेखन अनेक ठिकाणी उल्लेखनीय मानले गेल्याचे, एक प्रकारे मान्य झाल्याचे ठसवावे असा होता. निवडणुकांच्या काळात नीती सेन्ट्रल आणि त्यासारख्या अनेक वेबसाईट अचानक निर्माण झाल्या, नि परस्परांच्या हवाल्याने बातम्या पसरवू लागल्या. नीती... च्या अवतारसमाप्तीनंतर स्क्रोलने लिहिलेल्या लेखात यांची एक लहानशी यादीच दिली होती. खोटे अनेक तोंडांनी वदवून खर्याचा आभास निर्माण करणे, हा आता भारतात प्रस्थापित होऊन बसलेला प्रकार … पुढे वाचा »
गुरुवार, २ जून, २०१६
आपलं आपलं दु:ख
-
गालव हा विश्वामित्र ऋषींचा लाडका शिष्य. शिक्षण समाप्तीनंतर कोणतीही गुरुदक्षिणा न मागता गुरुंनी त्याला घरी परत जाण्यास अनुमती दिली. पण गुरुदक्षिणा देण्यास गालव हटून बसला. संतापलेल्या गुरुंनी मग ‘ज्यांचा एकच कान काळा आहे, असे आठशे पांढरेशुभ्र घोडे’ गुरुदक्षिणा म्हणून मागितले. असली विचित्र गुरुदक्षिणा ऐकून गालव स्तंभित झाला नि त्याने विपुल शोक केला. मग असे घोडे मिळवण्यासाठी मदत मागायला तो सम्राट ययातीकडे आला. त्याच्याकडे असे घोडे नव्हते, पण आलेल्या अतिथीला विन्मुख पाठवणे हे त्याच्या राजेपणाला न शोभणारे. मग तो आपल्या राजेपणाला शोभेसा(?) तोडगा त्यावर काढला. ‘रुपगुणाची खाण’ अशी ख्याती असलेली आपली कन्या ‘माधवी’ त्याने गालवाला दिली नि ‘तिच्या सहाय्याने तू घोडे मिळवू शकशील’ असा सल्ला त्याला दिला. पण हे करतानाच ययातीने अशी अट घातली होती की, ‘ति… पुढे वाचा »
गुरुवार, २६ मे, २०१६
वादे वादे जायते वादंग:
-
( एका – बहुधा तथाकथित सवर्ण वर्गात मोडणार्या – फेसबुक-मित्राने एका पोस्टमध्ये असा मुद्दा मांडला होता, की ‘सवर्ण असलेल्या माणसांना आपण आंबेडकरांचे विचार मानतो किंवा घटनेला प्रमाण मानतो किंवा आंबेडकरवादी आहोत हे पटवून द्याव लागतं, तेही वारंवार.’ एरवी जात या विषयावर न लिहिण्याचा माझा दंडक मोडून त्यावर दिलेली ही प्रतिक्रिया आहे. ) --- अगदी नेमका मुद्दा मांडला आहेस. पण अलिकडे याबाबत मी काहीसा हताश आहे. याबाबत सांगून काही होत नसतं. ‘इतकी वर्ष आम्ही सहन कसं केलं असेल’ हे उत्तर देऊन तोंड बंद केलं जात आहे. एक महत्त्वाचं ध्यानात घेतलं पाहिजे की प्रत्येक समाजात, जातीत, भाषिक गटात, धर्मात असेही लोक आहेत, तसेही लोक आहेत. त्यातल्या टीकेच्या सोयीचे प्रकारचे लोक हे ‘प्रातिनिधिक’ समजून वागत गेलो तर धागे जुळणारच नाही. एक नक्की की, द्वेषाचे पेरणी अ… पुढे वाचा »
शुक्रवार, ८ एप्रिल, २०१६
ऐलपैल - ४ : जमिनीलगतची उंच माणसे
-
रानिया - एक मॉडर्न आणि मॉडेल राज्ञी << मागील भाग दरवर्षी ‘पद्म’ पुरस्कारांची घोषणा झाली की वार्षिक वादंगांचे फड रंगतात. कुणाला शासनाची हांजी हांजी करण्याबद्दल पुरस्कार मिळाला, कुणाची लायकीच नव्हती, दुसरेच कुणी लायक कसे होते, याची हिरिरीने चर्चा सुरू होते. माध्यमांतून दिसणार्या लोकांभोवती ही चर्चा बहुधा फिरत राहते. पण या यादीत दरवर्षी काही अपरिचित नावेही दिसतात. ते कोण याचा शोध घेण्याची तसदी आपण बहुधा घेत नाही. विशेष म्हणजे ही नावे बहुधा पर्यावरण, जलसंधारण, मूलभूत वा शाश्वत विकास या सर्वसामान्य माणसाच्या जगण्याला पायाभूत असूनही, तुम्हा आम्हाला काडीचा रस नसलेल्या क्षेत्रातील असतात असा अनुभव आहे. यांच्याकडे फारसे लक्ष द्यावे असे माध्यमांना वाटत नाही याचे कारण म्हणजे यात ‘ब्रेकिंग न्यूज’ नसते; सर्वसामान्यांना वाटत नाही कारण आ… पुढे वाचा »
Labels:
‘पुरोगामी जनगर्जना’,
ऐलपैल,
प्रासंगिक,
व्यक्तिमत्व,
समाज
सोमवार, २१ मार्च, २०१६
एवरीबडी लव्ज् रेमंड...
-
विषयसंगती ध्यानात घेऊन ही पोस्ट विस्तारासह ‘ बोर्डचाट्याच्या शोधात ’ या शीर्षकाखाली ‘ वेचित चाललो... ’ या ब्लॉगवर हलवली आहे. - oOo - पुढे वाचा »
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पण्या (Atom)







