-
Source: https://www.entertales.com/ . He killed a stray dog, you raised an eyebrow 'It was rabid.' he told you You thanked him. He killed neighbor's dog, you looked surprised 'It was rabid too.' he said 'It must be', you thought Then he killed your dog, You were stunned, but remained silent... ... he was holding the gun! 'It must be rabid' you said... sheepishly! - Ramataram - oOo - पुढे वाचा »
Indexes Menu_Desktop
| संपूर्ण सूची : |
शुक्रवार, ६ डिसेंबर, २०१९
A Rabid Dog
हैद्राबाद येथील व्यवस्थापुरस्कृत हत्या आणि माथेफिरु समाज
-
हैदराबाद एन्काउंटर खरे की फेक, एकुणातच एन्काउंटर हा प्रकार योग्य की अयोग्य, हे दोनही मुद्दे मी जरा बाजूला ठेवतो. माझा मुद्दा जे घडले त्याबद्दल आनंद व्यक्त करणार्यांबद्दल, त्याचे ’सेलेब्रेशन’ करणार्यांबद्दलचा आहे. गुन्हा घडलाय हे निर्विवाद. एका स्त्रीवर अत्याचार झाला आहे आणि तिचा अत्यंत नृशंस पद्धतीने खून झाला आहे हे ही उघड आहे. याचा अर्थ कुणीतरी हा गुन्हा केला आहे हे ही नक्की. प्रश्न असा की हे गुन्हेगार कोण? १. जे मारले गेले त्यांनीच तो गुन्हा केला होता याची तथाकथित एन्काउंटरचे फेसबुकवर समर्थन करणार्यांनी नक्की कशी खात्री करुन घेतली होती? म्हणजे 'हे गुन्हेगार नव्हते' असा दावा मी करतो आहे, असा अपलाप करुन कांगावा करत येणार्यांना सीनियर के.जी.त जाण्यासाठी शुभेच्छा. याची दोन का… पुढे वाचा »
बुधवार, ४ डिसेंबर, २०१९
काळे, तुम्ही स्वत:ला काय समजता?
-
" माझ्याकडे फक्त प्रश्नच आहेत आणि आसपास सोयीच्या उत्तराभोवती प्रश्न गुंडाळणारी बहुसंख्या" अशी एक ओळीची पोस्ट फेसबुकवर लिहिली. आणि झटक्यात "’काळे, तुम्ही स्वत:ला काय समजता?’ अशी पृच्छा झाली. तशी ती होणार हे माहित होतेच, फक्त ती इतक्या झटपट येईल असे वाटले नव्हते. पण फेसबुक आणि एकुणच देश नि जगातही (बहुधा) स्वत:ची मांडणी करण्यापेक्षा दुसर्याला चॅलेंज करणे, मोडीत काढणे याला प्राधान्य असते हे विसरलोच. त्यातून आपण बरोबर असल्याचे समाधान करुन घेता येते. ज्यांना ही एकोळी पोस्ट आक्षेपार्ह वा अहंपणाची वाटली त्यांनी हे करुन पाहा. आपल्याला असे प्रश्न कधी पडले होते, किंवा आपण असे निकष कधी लावले होते ज्यातून आपला गट, जात, धर्म, नेता, गाव, गल्ली योग्य ठरली नव्हती, अन्य पर्याय अधिक योग्य असे उत्तर मिळाले होते? जेव्हा असे प्रश्न, असे निकष आ… पुढे वाचा »
राजकारणातील सोबतीचे करार : वर्तमान
-
राजकारणातील सोबतीचे करार : इतिहास « मागील भाग --- महाराष्ट्रात सेना-भाजप युती आणि काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी या दोन जोड्या गेली काही दशके बस्तान बसवून आहेत. राष्ट्रवादी हा तर काँग्रेसमधून फुटून निघालेला पक्ष असल्याने त्याची नाळ काँग्रेसशी जोडलेली आहेच. तर सेना आणि भाजप हे हिंदुत्वाच्या मुद्द्यावर परस्परांचे सोबती आहेत. असे असूनही काहीवेळा युती अथवा आघाडी मोडून निवडणुका लढल्या गेल्या आहेत. त्यात जागावाटपाचे घोडे चार-दोन जागांवर अडले हे केवळ वरवरचे कारण असते. सोबत निवडणुका लढवण्याबरोबरच विरोधात निवडणुका लढवणेही आपापली ताकद अजमावण्यासाठी, वाटपाचे दान नव्याने पाडण्यासाठी हे केले जात असते. सोबत राहूनही जोवर त्या जोडीला सत्ता बरीच दूर राहते, तोवर शक्य त्या सार्या तडजोडी करत सोबत कायम राहते. कारण यात सत्तेच्या वर्तुळात मिळवण्याजोगे एक विरोध… पुढे वाचा »
Labels:
‘अक्षरनामा’,
जिज्ञासानंद,
राजकारण,
विश्लेषण,
सत्ताकारण
मंगळवार, ३ डिसेंबर, २०१९
फडणवीसांची बखर - ३ : मी पुन्हा जाईन
-
नवा साहेब « मागील भाग --- मागील लेखांकात मांडलेल्या मुद्द्यांचा विचार करता फडणवीस २०१९च्या विधानसभा निवडणुकीला सामोरे जात असताना, त्यांच्यासोबत पक्षातील मागची पिढी नव्हती, सेना नव्हती आणि केंद्रातील नेतृत्वही नसावे असे म्हणावे लागेल. जर फडणवीस पुरेसे चाणाक्ष असतील, आणि त्यांना हे सर्व जाणवले असूनही त्यांनी ज्या पद्धतीने प्रचार केला ते पाहता त्यांचा स्वबळाबद्दलचा अहंकार चरमसीमेला पोहोचला होता असे म्हणायला हवे. कारण एकीकडे दोनशेवीस जागा जागा मिळवून ’मी पुन्हा येईन’ चा गजर करत होते. तर दुसरीकडे ते आणि मोदींसह अन्य भाजपेयी विरोधकांना दहा वीस जागांतच समाधान मानावे लागेल म्हणून लागले होते. १६४ पैकी १४४ जागा मिळवून कदाचित स्वबळावरच भाजपचे सरकार स्थापन होईल असे स्वप्नही ’युतीचे २५० आमदार निवडून आणू’ म्हणणार्या चंद्रकांत पाटील यांना पडू लागले … पुढे वाचा »
Labels:
‘द वायर मराठी’,
भाष्य,
राजकारण,
विश्लेषण,
सत्ताकारण
सोमवार, २ डिसेंबर, २०१९
राजकारणातील सोबतीचे करार : इतिहास
-
भारतीय राजकारणात आघाडीचे, युतीचे राजकारण नवीन नाही. स्वबळावर सत्ताधारी झालेल्या सरकारांची संख्या दोन वा त्याहून अधिक पक्षांच्या आघाडी/युती/फ्रंट सरकारांच्या संख्येहून फारच कमी दिसते. केंद्रात तर १९८४ नंतर थेट तीस वर्षांनी २०१४ साली- जेमतेम का होईना, पण पूर्ण बहुमत असलेल्या पक्षाचे सरकार प्रथमच स्थापन झाले. उरलेला बहुतेक सर्व काळ देशात विविध पक्षांच्या आघाडीचे सरकारच सत्ताधारी होते. १९७१ सालापर्यंत स्वबळावर सरकार स्थापन करणार्या काँग्रेसला टक्कर देण्यासाठी विरोधी पक्षाच्या काही नेत्यांनी अॅंटी-काँग्रेसिझमचा विचार मांडायला सुरुवात केली. जयप्रकाश नारायण यांच्या नेतृत्वाखाली १९७७ मध्ये स्थापन झालेले जनता पक्षाचे सरकार हा या राजकारणाचा पहिला विजय होता. हे सरकार तांत्रिकदृष्ट्या जरी… पुढे वाचा »
Labels:
‘अक्षरनामा’,
जिज्ञासानंद,
राजकारण,
विश्लेषण,
सत्ताकारण
फडणवीसांची बखर - २ : नवा साहेब
-
भाजप नेतृत्वाचा प्रवास « मागील भाग --- मोदींच्या कृपेने मागच्या पिढीतील नेत्यांना मागे सारून फडणवीस मुख्यमंत्री झाले खरे, पण या नव्या साहेबाला अजूनही काही जुन्यांशी संघर्ष करावा लागणार होता. खडसे यांच्या बोलभांडपणामुळे त्यांचा काटा फडणवीस यांनी सहजपणे दूर केला. पण विनोद तावडेंसारखा मुंबईस्थित नेता महाजन-मुंडेंच्या काळापासून महाराष्ट्रात सक्रीय होता, फडणवीस यांना सीनियर होता. महाजनांची पुढची पिढी राजकारणात फारशी सक्रीय नसल्याने त्यांचा धोका नसला, तरी मुंडेंची पुढची पिढी मात्र चांगलीच आक्रमक होती. महाजन यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या समर्थकांची फळीही - साहजिकच - महाराष्ट्र भाजपचा चेहरा म्हणून उभ्या असलेल्या मुंडेंच्या पाठीशी एकवटली होती. त्याशिवाय मातोश्रीबरोबर संपर्क संबंध राखण्याचा महाजन यांचा वारसा मुंडे यांनीही सांभाळला होता. या द… पुढे वाचा »
Labels:
‘द वायर मराठी’,
भाष्य,
राजकारण,
विश्लेषण,
सत्ताकारण
रविवार, १ डिसेंबर, २०१९
फडणवीसांची बखर - १ : भाजप नेतृत्वाचा प्रवास
-
वसंतराव नाईक यांच्यानंतर महाराष्ट्रात पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण केलेले केवळ दुसरेच मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस २०१९च्या निवडणुकींना सामोरे जात होते. खडसे, तावडे यांसारख्या पक्षांतर्गत स्पर्धकांचा पत्ता उमेदवारीतच कट करुन त्यांनी आपला दुसर्यांदा मुख्यमंत्री होण्याचा मार्ग आणखी सुकर केला होता. डोक्यावर मोदींचा हात होता, विरोधक पुरे निष्प्रभ झाले होते. प्रचंड बहुमत मिळणार हे ही नक्की होते, प्रश्न ’किती जागा मिळणार?’ इतकाच उरला होता... २४ तारखेच्या निकालांनंतर परिस्थिती अशी बदलली की भाजप विधिमंडळ पक्षाचे नेते म्हणून निवडले गेलेल्या फडणवीसांना राज्यपालांकडे गेलेल्या भाजप शिष्टमंडळात स्थान नव्हते. त्यानंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी मागे सारलेल्या स्पर्धकातील एकुण एक व्यक्ती हजर होती, पण खुद्द फडणवीस यांचा त्यात समावेश नव्हता.… पुढे वाचा »
Labels:
‘द वायर मराठी’,
भाष्य,
राजकारण,
विश्लेषण,
सत्ताकारण
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पण्या (Atom)







