Vechit Marquee

Indexes Menu_Desktop

संपूर्ण सूची :

बुधवार, १४ जुलै, २०२१

भोपळे


  • pngwing.com येथून साभार. मोठ्ठ्या कलादालनात मोठ्ठ्या कलाकाराचे मोठ्ठे प्रदर्शन चालू आग्नेयेला एक चित्र माणसाचं वाटणारं बिनधडाचं मुंडकं नैऋत्येला एक शिल्प एक लोभस स्नोमॅन सनबाथ घेणारा ईशान्येला एक कॅनव्हास कचर्‍यातून कलेचा उभा एक डोलारा वायव्येला फक्त एक टेबल त्यावर मधोमध ठेवलेला भोपळा... ...एक दाढीवाला म्हणाला, परीक्षा व्यवस्थेवरचे केवढे मौलिक भाष्य एक झोळीवाला म्हणाला हॅलोविनच्या पोकळतेचा केवढा मार्मिक निषेध एक जाड-भिंगवाला म्हणाला अंतर्बाह्य रंगसंगतीचा देखणा आविष्कार एक बोकड-दाढी म्हणाली आईन्स्टाईनच्या मेंदूचे लक्ष्यवेधी इन्स्टॉलेशन इतक्यात... कुणी एक आला, तिथे पाण्याच्या बाटल्या ठेवून भोपळा घरी घेवोनि गेला - oOo - पुढे वाचा »

रविवार, ११ जुलै, २०२१

विम्बल्डनचा पावित्र्यभंग


  • टेनिसच्या चाहत्यांच्या दृष्टीने ऑस्ट्रेलियन, फ्रेंच, विम्बल्डन आणि अमेरिकन ही चारी धाम यात्रा. प्रत्येक धामी तयार केलेल्या कोर्टनुसार कुठे कुठल्या प्रकारचा खेळ पाहायला जावे याचा अंदाज त्यांना असतो. फ्रेंच स्पर्धेसाठी मातीची कोर्ट वापरली जात असल्याने वेगापेक्षा चौफेर खेळाला (territorial play) अधिक महत्व असते. खेळणारी खेळाडू चतुरस्र नसेल तर तिचीची डाळ तिथे शिजत नाही. त्याच्या उलट विम्बल्डनचे. इथे हिरवळीची कोर्ट असतात. त्यामुळे इथे सर्व्ह अ‍ॅंड व्हॉली प्रकारचा खेळ अधिक होतो. यात चौफेर खेळापेक्षा अनेकदा बिनतोड (Ace) सर्व्हिस करणारी खेळाडू अधिक प्रभाव पाडत असते. त्याचबरोबर फ्रेंचमध्ये बेसलाईन (म्हणजे कोर्टाची कड) अधिक महत्वाची तर विम्बल्डनमध्ये नेटजवळ वर्चस्व गाजवू शकणार्‍या खेळाडूच्याला यशाची शक्यता अधिक असते. अमेरिकन स्पर्धेत कृत्रिम हार्डको… पुढे वाचा »

शनिवार, १० जुलै, २०२१

माध्यमे - ३: मनोरंजन - जुने आणि नवे


  • ‘प्रॉफिट ही भगवान है’ « मागील भाग --- माध्यमांवरील या लेखमालेच्या पहिल्या भागात लिहिलेले एक वाक्य इथे संदर्भासाठी पुन्हा उद्धृत करतो आहे दूरदर्शनच्या काळात अतिशय व्यापक असलेले मनोरंजनाचे क्षेत्र ’खपेल ते विकेल’ बाण्याच्या खासगी वाहिन्यांनी ऐतिहासिक-पौराणिक, विनोदी, कौटुंबिक आणि पोलिसी-कथा या चार विषयांत बंदिस्त करुन ठेवले. खरंतर जेव्हा हे ध्यानात आले तेव्हापासूनच मी माध्यमांच्या वाटचालीकडे अधिक बारकाईने पाहू लागलो. पण या निरीक्षणाबाबत थोडे विस्ताराने लिहायला हवे. या चार विषयांपलिकडे असतेच काय?’ असा प्रश्न कदाचित या मनोरंजनाच्या आहारी गेलेल्यांना पडू शकेल. त्यासाठी थोडे मागे जाऊन ’दूरदर्शन’ या सरकारी माध्यमाकडे पाहता येईल. खासगी माध्यमे नव्हती तेव्हा टेलिव्हिजन मनोरंजनावर दूरदर्शनची एकहाती सत्ता होती. त्या वेळी त्यावरुन सादर झालेल्… पुढे वाचा »

बुधवार, ७ जुलै, २०२१

माध्यमे - २: प्रॉफिट ही भगवान है


  • 'खपते ते विकते' « मागील भाग --- मागील लेखात इंडियन आयडॉल या कार्यक्रमाच्या निमित्ताने चॅनेल-माध्यमांवरील कार्यक्रमांच्या विषय नि स्वरुपासंदर्भातील धंदेवाईकतेवर भाष्य केले होते. टीआरपीच्या स्पर्धेत शक्यतो जे खपते तेच विकण्याचे त्यांचे धोरण असते. पण हा काही केवळ दृश्य-माध्यमांचा दृष्टिकोन आहे असे म्हणता येणार नाही. अन्य माध्यमांचे धोरणही याच्याशी मिळतेजुळतेच असते. काही काळापूर्वी एका वेबसाईटवर मी ’चेकर्स’ हा खेळ खेळत असे. अगदी ’तज्ज्ञ पातळीवरून’ खेळणार्‍या संगणकालाही आपण सहज हरवत आहोत असे काही सामन्यांतच लक्षात आले. संख्याशास्त्रीय दृष्टीने पाहू लागल्यावर ध्यानात आले, की प्रत्येक सामन्याच सरासरी वेळ हा तीन ते चार मिनिटे इतकाच आहे. इंटरनेटवर या प्रकारचा खेळ खेळणार्‍यांच्या करणार्‍यांच्या सहनशक्तीचा हा खेळ उपलब्ध करुन देणार्‍या … पुढे वाचा »

रविवार, ४ जुलै, २०२१

माध्यमे - १: खपते ते विकते


  • ’इंडियन आयडॉल’ या तथाकथित गुणवत्ता-शोध स्पर्धेबाबत सध्या बरीच उलटसुलट चर्चा चालू आहे. मे महिन्यामध्ये त्यात स्व. किशोरकुमार यांना आदरांजली वाहणारा विशेष भाग सादर झाला. त्यात किशोरकुमार यांचे चिरंजीव आणि गायक अमितकुमार यांना खास पाहुणे म्हणून आमंत्रित करण्यात आले होते. त्यांनी या कार्यक्रमातील गायकांचे कौतुक केले होते. पण हा कार्यक्रम संपल्यावर अनेक किशोरप्रेमींनी त्या कार्यक्रमावर टीकेची झोड उठवली. या कार्यक्रमात किशोरदांच्या गाण्यांची पार वाट लावली असा सूर अनेक किशोरप्रेमींनी लावला. परीक्षक म्हणून बसलेल्या नेहा कक्कर, हिमेश रेशमिया आणि अनु मलिक यांच्यावर टीकेची झोड उठली. स्वत: अमितकुमार तिथे उपस्थित असून त्यांनी याबाबत स्पष्टपणे न बोलता, उलट सुमार गायन नि गायकांची प्रशंसा केल्याबद्दल लोकांनी त्य… पुढे वाचा »

शनिवार, २६ जून, २०२१

आपले गिर्‍हाईक कोण?


  • पूर्वी पुण्याच्या कर्वेनगर भागात राहात असतानाची गोष्ट आहे. चौकात एक कळकट हॉटेल होते. जेमतेम चार बाकडी बसतील इतकी जागा पुढे, आत एक माणूस कसाबसा उभा राहील नि बाजूला एक लहानसे टेबल बसेल इतपत जागा ’किचन’ म्हणून. हॉटेल नावालाच, कारण सतत उकळणारा चहा, आदल्या दिवशी संध्याकाळी केलेले वडे, मिसळ, दगड झालेली इडली आणि सांबार असे अक्षरश: एका हाताच्या बोटावर मोजण्याइतके पदार्थ तिथे मिळत. आमच्या ’बिडी’वाल्या मित्रांना शेजारच्या पानवाल्याकडे सिगारेट मिळे. मग त्यांची सिगारेट नि आम्हा 'फुंकसंप्रदायी' नसलेल्यांसाठी हॉटेलातून मागवलेला चहा यावर तिथे चकाट्या पिटणे चालत असे. हॉटेलचा मालक एक पैलवान होता ( अगदी सुरुवातीच्या काळात होटेलच्या नावाखाली ’पैलवानाचे हॉटेल’ अशी ठसठशीत टॅगलाईनही होती. ) नि त्याच्याहून नि… पुढे वाचा »

सोमवार, २४ मे, २०२१

व्हॉट्सअ‍ॅपपे आया था


  • चार पाच वर्षांपूर्वी एक चॅनेल पत्रकार लोकांमध्ये फिरुन त्यांच्याशी संवाद साधत होता. त्यातील अतीव गुळगुळीत मेंदूच्या बाईने ’नेहरु मुस्लिम होते’ असा दावा केला.' कशावरुन’ असा प्रश्न पत्रकाराने केला असता, ’व्हॉट्सअ‍ॅपपे आया था’ असे उत्तर दिले होते. त्यावरुन हे सुचले. त्या बाईप्रमाणेच गुळगुळीत मेंदू असलेल्या सर्वांना ही कविता सादर अर्पण. भाष्यचित्रकार: सतीश आचार्य. नेहरु असलमें मुस्लिम थे... ...व्हॉट्सअ‍ॅपपे आया था । ’चले जाव’ आंदोलन मोदीजीने किया था... ...व्हॉट्सअ‍ॅपपे आया था । दूसरा विश्वयुद्ध संघ ने जीता था... ...व्हॉट्सअ‍ॅपपे आया था । अगले दो सालमें सब अरबपती होंगे... ...व्हॉट्सअ‍ॅपपे आया था । मंगलवासी संस्कृतम… पुढे वाचा »

शुक्रवार, २१ मे, २०२१

जैत रे जैत : I couldn't go home again


  • मराठी चित्रपटसृष्टीत वेगळ्या वाटेने जात एक मानदंड निर्माण करणारे जे चित्रपट आहेत त्यात दोन-तीन दशकांहून अधिक काळ ज्याचा बोलबाला टिकून राहिला असे मोजकेच. गाव-पाटील आणि त्याने केलेला अन्याय, त्याविरोधात बंड करुन उठलेला कुणी तरुण, या दोन्हीवर लावणी आणि लावणीवालीचा तडका; सोशिक शेतकरी; प्रेमस्वरुप आई; फुलाला फूल धडकून ज्यांच्या प्रेमाचा इजहारे इश्क पडद्यावर होतो असे माफक प्रणयपटू नि त्यांची कथा; हसण्या-हसवण्याच्या वाटेने गल्ला जमा करत गेलेले चित्रपट आणि अर्थातच महाराष्ट्राचं दैवत असलेल्या शिवाजी महाराजांच्या काळातील कथानकांच्या आधारे मांडलेले कथानक... हे मराठी चित्रपटाचे ढोबळ प्रवाह. राजकारणातल्या डावपेचांचा आणि त्यावर परिणाम घडवणार्‍या समाजकारणाचा वेध घेणारा एखादा सिंहासन (१९७९), आपल्या एका प्रश्नानेच गावच्या सत्ताधार्‍याच्या मनात द्वंद्व … पुढे वाचा »