-
( प्रसिद्ध लेखक जी.ए. कुलकर्णी यांच्या ‘बखर बिम्मची’ या छोटेखानी पुस्तकाचे बोट धरून केलेला हा प्रवास. ) अभिव्यक्ती, माध्यम आणि साधन « मागील भाग --- सध्या पाऊस देशातून माघार घेण्याच्या टप्प्यात पोहोचला आहे. भारतासारख्या उष्णकटिबंधीय प्रदेशात जीवनदायी पाण्याचा मुख्य स्रोत हा मोसमी पाऊसच असतो. अगदी गेल्या शतकाअखेरपर्यंत भारतीय अर्थव्यवस्थेचा कणा असलेली शेती ही सर्वस्वी पावसावर अवलंबून. त्यामुळे पाण्याबरोबरच अन्नाचा पुरवठाही त्याच्यावरच अवलंबून. या टप्प्यावर ‘या वर्षी पावसाने काय दिले?’ याचा आढावा घेतला जात असतो. पाऊस पुरेसा पडला की अधिक पडला, ओला दुष्काळ की कोरडा दुष्काळ, याबाबतचे आडाखे घेण्यास आता सुरुवात होईल. कारण पाऊस हा ‘पुरेसा’ कधीच होत नाही. कधी– वा कुठे, तो जेमतेम तहान भागवण्याइतक्या पाण्यासाठी चातकासारखी वाट पाहायला लावतो,… पुढे वाचा »
Indexes Menu_Desktop
| संपूर्ण सूची : |
शुक्रवार, २२ सप्टेंबर, २०२३
बिम्मच्या पतंगावरून - ८: पाऊस
गुरुवार, ७ सप्टेंबर, २०२३
बिम्मच्या पतंगावरून - ७: अभिव्यक्ती, माध्यम आणि साधन
-
( प्रसिद्ध लेखक जी.ए. कुलकर्णी यांच्या ‘बखर बिम्मची’ या छोटेखानी पुस्तकाचे बोट धरून केलेला हा प्रवास ) रंगांचे कोडे « मागील भाग --- बिम्मच्या पतंगावरून आतापावेतो झालेल्या प्रवासामध्ये त्याने प्रतिबिंब, सावली, पक्षी, रंग, फळे यांच्या संदर्भात निरीक्षण-शक्तीचा उपयोग केला आहे. त्याद्वारे भवतालाचे आकलन करण्याचा त्याचा प्रयत्न असतो. या सर्व टप्प्यांमध्ये तो केवळ निरीक्षक आहे, जिज्ञासू आहे. त्याची भूमिका अकर्मक आहे. भवतालावर परिणाम घडवणारी कोणतीही कृती त्याने अद्याप केलेली नाही. निरीक्षणांकडून अनुकरणाकडे जाण्याची, अकर्मकता झाडून सकर्मक होण्याची, कृतीप्रवण होण्याची वेळ आता आलेली असते. आयुष्याचा प्रवास बिम्म जेव्हा सुरु करतो, तेव्हा स्वत:हून केलेली पहिली कृती असते ती पहुडल्या ठिकाणी पालथे पडणे. ही पहिली कृती घरच्या मोठ्यांकडून नावाजली गेली… पुढे वाचा »
गुरुवार, २४ ऑगस्ट, २०२३
बिम्मच्या पतंगावरून - ६ : रंगांचे कोडे
-
( प्रसिद्ध लेखक जी.ए. कुलकर्णी यांच्या ’बखर बिम्मची’ या छोटेखानी पुस्तकाचे बोट धरून केलेला हा प्रवास ) खेळ सावल्यांचा « मागील भाग --- एकदा कपाट आवरत असताना बिम्मच्या आईने त्यातून एक लहानसा पिंजरा बाहेर काढला. ही वस्तू बिम्मने प्रथमच पाहिली. ‘ते काय आहे नि त्याचा उपयोग काय?’ असा प्रश्न चौकस बिम्मला पडला नसल्यासच नवल. ‘तो एक पिंजरा आहे नि ते एका पिवळ्या(!) पक्ष्याचे घर आहे.’ असे आईने त्याला सांगितले. मागच्या आवारात वा बागेत खेळताना त्याने अनेक पक्षी पाहिले होते, त्यामुळे त्याला पक्षी ठाऊक होते. पण आईने वापरलेला ‘पिवळा’ हा शब्द, ही गोष्ट काय असावी असा प्रश्न त्याला पडला असेल. त्यातून वस्तू वा जीवमात्रांमध्ये दिसणारे रंग हे त्याच्या कुतूहलाच्या कक्षेत येऊ लागले असतील. बिम्मच्या वयाचं मूल घरात रांगू लागतं, भिरभिर फिरु लागतं, घराबा… पुढे वाचा »
रविवार, ६ ऑगस्ट, २०२३
बिम्मच्या पतंगावरून - ५ : खेळ सावल्यांचा
-
( प्रसिद्ध लेखक जी.ए. कुलकर्णी यांच्या ‘बखर बिम्मची’ या छोटेखानी पुस्तकाचे बोट धरून केलेला हा प्रवास ) आपल्या पक्ष्याचा शोध « मागील भाग --- माणसाचे मूल जन्मत: परावलंबी असते. सुरुवातीचे काही महिने ते पूर्णपणे आई-वडिलांच्या निर्णयांच्या नि कृतीच्या अधीन असते. काय खावे, केव्हा खावे, काय परिधान करावे वगैरे किमान निर्णयही पालकांच्या अधीन असतात. पुढे मूल बसते, चालते झाले की त्याला स्वत:च्या निर्णयाने जागा बदलता येते– पण तरीही त्या निवडीला घराचे भौतिक बंधन असतेच. त्यातून बाहेर पडण्याचा निर्णय त्याहून अधिक काळ पालकांच्या अधीन असतो. या टप्प्यातच त्याचा घराबाहेरील सजीव निर्जीव गोष्टींशी परिचय होत जातो. परिचय दृढ झाला की त्यातून त्यांच्याशी बंध वा नाते प्रस्थापित होत जातात. आणि असे बंध स्मरणांच्या स्वरूपात त्याच्यासोबत मनात नि घरात प्रवेश … पुढे वाचा »
मंगळवार, १ ऑगस्ट, २०२३
काका सांगा कुणाचे...?
-
महारठ्ठदेशी दुसरे बंड होई. राष्ट्रवादी नामे महाराष्ट्रवादी पक्षाचे दहा लोक शिंदे सरकारांच्या दरबारी रुजू होती. इतर अनेकांनी सरकारपक्षाकडे प्रयाण केल्याचे ऐकू येई. परंतु अध्यक्ष कानावर हात ठेवी. म्हणे आम्हांसी काई ठाऊक नाही. परंतु ठोस कारवाई ना करी. चेले सारे अधिवेशनाला दांडी मारिती. कुणाचा कोण काही कळेना होई. कार्यकर्ता संभ्रमित होई. दादांना पुसे, ’काका कोणाचे?’ दादा गालातल्या गालात हसे नि गुणगुणू लागे... ( शान्ताबाईंची क्षमा मागून.) ल ल्ला लला ललला, ल ल्ला लला ललला काका सांगा कुणाचे? काका माझ्या मोदींचे ! मोदी सांगा कुणाचे? मोदी माझ्या काकांचे ! चवल्यापावल्या (१) चळतात, सत्तेच्या रिंगणी धावतात नाना संगे दादा अन् भवती, सेनेचे शिंदेही धडपडती ! आभाळ हेपले वरचेवरी, का… पुढे वाचा »
सोमवार, ३१ जुलै, २०२३
बा कपिल देवा,
-
बा कपिल देवा, तुम्हांसि नव्या पिढीतील खेळाडूंचे पैसे पाहून पोटात दुखते हे बरे नव्हे. उठसूठ आयपीएलच्या नावे खडे फोडताना या प्रकारच्या बाजारू खेळाचे उद्गाते आपणच आहोत हे विसरु नये. आयपीएलपूर्वी ’झी’च्या सुभाष चंद्रा यांनी चालू केलेल्या ’इंडियन क्रिकेट लीग’चे (ICL) पहिले सूत्रधार आपणच होतात हे लोक विसरले असतील असे समजू नये. आयपीएल वा पैशाच्या मागे लागणारे खेळाडू ही वाईट गोष्ट असेल तर त्याची पायाभरणी दस्तुरखुद्द आपणच केलेली आहे. वृथा नैतिकतेचा आव आणू नये. याच आयपीएलमधून उभ्या केलेल्या पैशातून बीसीसीआयने घसघशीत पैशांची थैली आपल्या ओटीत घातली होती, तेव्हा दर्जेदार क्रिकेटचे रक्त आपल्या हाती लागले आहे असे तुम्हाला वाटले नसावे. २००७ साली ICL चे विजेतेपद मिळवणार्या चेन्नई सुपरस्टार्सचा कर्णधार स्टुअर्ट लॉ. सोब… पुढे वाचा »
रविवार, ३० जुलै, २०२३
आंब्याचे सुकले बाग
-
( कवि अनिल यांची क्षमा मागून.) आंब्याचे सुकले बाग, नासली सारी अढी बरळली छपरी मिशी, मु.पोस्ट सबनीसवाडी मनी तिच्या जळे आग, नेहरु नामे अंग भाजे गांधी नामे वणवा पेटे, ठणाठणा तोंड वाजे या दो नावांची लागे, झळ आतल्या जीवा गाभ्यातील जीवनरस, सुकत ओलावा किती जरी केला शंख, बोंबाबोंब केली आंब्याचे सुकले बाग, चारलोकी शोभा झाली - कवि स्वप्निल - oOo - पुढे वाचा »
शुक्रवार, २८ जुलै, २०२३
उंबरठ्यावरून
-
’ कुण्या एकाची सत्तागाथा ’ आणि 'ह्याला भाजप आवडत नाही...' या ’राजकीय विरहगीता’नंतर त्याच दोन मित्रांच्या राजकीय जीवनातील एक टप्पा. ( संदीप खरे यांची क्षमा मागून.) मन तळ्यात, मळ्यात… ताईच्या खळ्यात (१) ॥ध्रु.॥ सत्ता साजुकसा तूपभात त्याच्या नि तुझ्या ताटात ॥१॥ मनी खुर्चीचे मृगजळ तुझ्या हाकेची साद कानात ॥२॥ इथे काकाला सांगतो काही... काही बाही... तुझी-माझी गट्टी मनात ॥३॥ उतू जाई उर्मी चित्तातून तुझा सारथी (२) उभा दारात ॥४॥ माझ्या नयनी सत्ता-चांदवा आणि गूज तुझ्या डोळ्यात ॥५॥ - बोलिन खरे --- (१). शेतातील खळे. (२).ड् रायव्हर. - oOo - (‘बंडूची फुले’ या आगामी काव्यसंग्रहातील ‘दादा-नानांच्या कविता’ या विभागातून.) पुढे वाचा »
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पण्या (Atom)







