Vechit Marquee

Indexes Menu_Desktop

संपूर्ण सूची :

मंगळवार, ३० जुलै, २०१३

काही नि:शब्दकथा


  • ( कथा, प्रसंग आणि पात्रे काल्पनिक. परंतु तरीही कोण्या जिवंत वा मृत व्यक्तीशी, घटनांशी साधर्म्य आढळल्यास लेखकाला ताबडतोब सूचना द्यावी. जेणेकरून त्या कल्पित-वास्तवाच्या तौलनिक अभ्यासासाठी शिष्यवृत्तीची मागणी नोंदवणारा अर्ज करता येईल. ) प्राचीन: https://steemit.com/ येथून साभार. एकदा एक लांडगा नदीवर पाणी पीत होता. पाणी पिता पिता त्याच्या लक्षात आले की प्रवाहाच्या खालच्या बाजूला एक लहानसे कोकरूही पाणी पीत होते. “तू माझ्या पाण्याला तोंड लावून ते उष्टे करत आहेस.” लांडगा कोकरावर खेकसला. “असं कसं होईल वृकराज. मी तर प्रवाहाच्या खालच्या बाजूला पाणी पीत आहे, इकडून पाणी उलट तुमच्या दिशेने कसे जाईल.” “तू तर भलताच उद्धट दिसतोस, वर्षभरापूर्वीही तू माझ्याशी असेच उद्धट वर्तन केले होतेस.” ला… पुढे वाचा »

रविवार, ७ जुलै, २०१३

आडाडता आयुष्य - गिरीश कार्नाड


  • आयुष्यात असा एखादा कालखंड येतो की अचानक बर्‍याचशा अनपेक्षित पण स्वागतार्ह (खरंतर इथे मला इंग्रजीतल्या most welcome – आनंदाने स्वीकाराव्यात अशा – ची छटा अपेक्षित आहे, पण काहीवेळा परभाषेपेक्षाही मातृभाषेत नेमकेपणा आणणे अवघड जाते ते हे असे) अशा बर्‍याचशा गोष्टी एकापाठोपाठ एक आपल्याकडे चालत येतात. आपल्या जगण्यातला तो एक तुकडा पूर्णपणे एखाद्या आवडत्या गोष्टीच्या नावेच होऊन जातो. गेल्या महिन्याभरात असाच काहीसा अनुभव आला तो नाटकांबाबत. अचानक दोन चार सुरेख नाटके पहायला मिळाली. त्याच वेळी रंगभूमीशी, रंगकर्मींशी संबंधित चार पाच पुस्तके एकदम हाती लागली. हाती घबाड गवसल्याचा किंवा भर उन्हाळ्यात कुणीतरी कलिंगडाच्या गराड्यात नेऊन बसवल्याचीच भावना झाली. सुदैवाने रमतगमत का होईना त्यातल्या दोन पुस्तकांची ‘नैया पार’ झाली. योगायोग असा की ही दोन्ही आत्मचरित… पुढे वाचा »

रविवार, २३ डिसेंबर, २०१२

‘कट्टा... On The Rocks’: संक्रमणावस्थेतील पिढीचा आत्मशोध


  • ‘कट्टा’ हा शब्द ऐकला की डोळ्यासमोर येतो, तो कॉलेजजवळील चहाच्या टपरीवर जमलेला विद्यार्थ्यांचा घोळका. चहाची टपरी नसेल तर कधी कॉलेजच्या आवारातील एखाद्या वृक्षाचा पार असेल, कॉलेजच्या दाराजवळील कुंपणाचा पट्टा असेल. जिथे जिथे चार टाळकी बसतात, नि कुटाळक्या करतात तो कट्टा. कटिंग चहा नि क्रीमरोलच्या साथीने मॅथ्स-थ्री मधे झालेल्या काशीपासून अमीर खानच्या टूथब्रश मिशीपर्यंत, कुठल्याशा चित्रपटातील गाजलेल्या किस् पासून आपापल्या आवडत्या मिस पर्यंत वाट्टेल त्या विषयावर तासन् तास काथ्याकूट करत बसण्याची जागा. त्यात मग एखाद्या उदयोन्मुख कवीच्या कवितांबद्दल चर्चा होईल, क्वचित ‘या वेळी पुरुषोत्तमला कोणतं नाटक घ्यायचं’ याच्यावर उहापोह होईल पण बहुतेक वेळ निव्वळ टैमपास. तेव्हा ‘कट्टा ऑन द रॉक्स’ असे शीर्षक घेऊन … पुढे वाचा »

मंगळवार, ९ ऑक्टोबर, २०१२

‘रोश विरुद्ध अॅडम्स’च्या निमित्ताने - १०: न्यायालयांचा ‘न्याय’ आणि आयोगाचे ‘सहकार्य’


  • युरपिय संसदेत रोश आणि अ‍ॅडम्स   << मागील भाग न्यायालयांचा ‘न्याय’: अॅडम्सचे अपील स्विस सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्यानंतर (१९७८-७९ च्या सुमारास) जॉन प्रेस्कॉट यांच्या सल्ल्यावरून एक प्रसिद्ध वकील डायफेनबाकर हे अॅडम्सला भेटले नि त्यांनी त्याचा खटला बारकाईने अभ्यासला. त्यांच्या मते अॅडम्सने दोन गोष्टी करायला हव्या होत्या. पहिली म्हणजे त्याने त्याच्याविरुद्ध स्विस सरकारने केलेल्या अन्यायाचे प्रकरण मानवी हक्क न्यायालयाकडे न्यायला हवे होते, नि दुसरे स्विस खटल्यात त्याने स्विस कायद्याच्या ११३व्या कलमाचा आधार घ्यायला हवा होता. या कलमात असा स्पष्ट उल्लेख आहे की ‘आंतरराष्ट्रीय कायद्याचे स्थान हे स्वित्झर्लंडच्या अंतर्गत कायद्यापेक्षा वरचे मानण्यात यावे’. ज्यांच्या मार्फत अॅडम्स आयोगाच्या सातत्याने संपर्कात होता, ते विली श्लीडर हे स्व… पुढे वाचा »

सोमवार, ८ ऑक्टोबर, २०१२

‘रोश विरुद्ध अॅडम्स’च्या निमित्ताने - ९: युरपिय संसदेत रोश आणि अ‍ॅडम्स


  • सुपर पॉयजन   << मागील भाग याच सुमारास या रंगमंचावर राजकारण्यांचा प्रवेश झाला. युरपिय संसदेतील ब्रिटिश प्रतिनिधी मि. जॉन प्रेस्कॉट ( हे सुमारे तीन दशके ब्रिटिश संसदेत लोक-प्रतिनिधी म्हणून काम करत होते नि पुढे १९९७ ते २००७ दरम्यान - टोनी ब्लेअर यांच्या पंतप्रधानपदाच्या कारकिर्दीत - ब्रिटनचे उपपंतप्रधानही झाले. ) यांनी अॅडम्सची भेट घेतली. हा सगळा प्रकार संतापजनक असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले नि हा प्रश्न युरपिय संसदेत उचलून धरण्याचा आपला निर्णय त्यांनी अॅडम्सच्या कानावर घातला. या निमित्ताने संसदेतीला समाजवादी गट अॅडम्सच्या पाठीशी भक्कमपणे उभा राहिला. अॅडम्सवरील अन्यायाचा त्यांनी पुढे सातत्याने पाठपुरावा केला नि युरपियन आयोगाला अॅडम्सला किमान प्रत्यक्ष मदत देण्यास भाग पाडले. जॉन प्रेस्कॉट यांनी युरपिय संसदेमधे हा प्रश्न उपस्थित क… पुढे वाचा »

मंगळवार, २५ सप्टेंबर, २०१२

‘रोश विरुद्ध अॅडम्स’च्या निमित्ताने - ८: सुपर पॉयजन


  • खटले आणि निकालांची बारी   << मागील भाग रोशच्या व्यावसायिक नीतीला उघडं पाडणारी आणखी एक घटना याच सुमारास घडली (१० जुलै १९७६). उत्तर इटलीमधे ‘सेवेसो’ नावाच्या छोट्या गावात असलेल्या ‘इक्मेसा’(Industrie Chimiche Meda Società Azionaria) नावाच्या कॉस्मेटिक्स उत्पादक कंपनीत एक भीषण स्फोट झाला. काही क्षणापूर्वी नितळ निळं असलेलं आकाश पांढर्‍या धुराच्या ढगांनी भरून गेलं. या ढगात ‘डायॉक्सिन’ नावाच्या विषारी द्रव्याचं प्रमाण अतिशय जास्त होतं. हे डायॉक्सिन सायनाईडपेक्षा सुमारे १०,००० पट अधिक विषारी द्रव्य आहे [10] . (हे प्रमाण अ‍ॅडम्सचा दाव्यानुसार ७०००० पट एवढे होते.) सेवेसोच्या परिसरातील वनस्पती कोमेजून, कोळपून गेल्या; ढगाच्या संपर्कात आलेले पक्षी उडता उडता बाण लागल्यागत टपकन पडून मेले. कित्येक घरट्यांखाली असे मेलेले पक्षी पडलेले दिसून आले… पुढे वाचा »