Vechit Marquee

Indexes Menu_Desktop

संपूर्ण सूची :

मंगळवार, ४ एप्रिल, २०२३

बिम्मच्या पतंगावरून - ३ : प्रतिबिंबांचा प्रश्न


  • ( प्रसिद्ध लेखक जी.ए. कुलकर्णी यांच्या ‘बखर बिम्मची’ या छोटेखानी पुस्तकाचे बोट धरून केलेला हा प्रवास ) हा बिम्म आहे « मागील भाग --- बेम्म आणि बिम्म ( https://www.nenko.com/ येथून साभार.) एकदा एका कापडाच्या दुकानात बिम्मला दोन आरसे दिसले. एकात डोकावून पाहिले तर त्यात उंचच उंच काठीसारखा बिम्म दिसला, तर दुसर्‍यात तो हवा भरलेल्या फुग्यासारखा जाडजूड दिसला. आता हे दोघे कोण बुवा? असा प्रश्न निर्माण होणे अपरिहार्य होतेच. मग घरी परत येईतो त्याच्या कल्पनेचा वारू उधळतो. त्यापैकी उंच माणसाचे नाव बेम्म आणि फुग्यासारख्याचे नाव बूम्म आहे असे निश्चित केले जाते. घरी आल्यावर तो आईला हे सारे सांगून त्याच्या मते अवघड प्रश्न विचारतो, ' यातला खरा बिम्म कोण… पुढे वाचा »

शनिवार, १ एप्रिल, २०२३

पदवीधरा...


  • (एका राज्याच्या मुख्यमंत्र्याने खुद्द पंतप्रधानांची पदवी दाखवावी अशी मागणी केली. त्यावर पंतप्रधानांच्या राज्यातील न्यायालयाने त्या मुख्यमंत्र्याला २५,०००/- चा दंड केला. या अनुभवावरून संगीताचार्य गो. ल. माल यांनी अशा प्रकारची मागणी करणार्‍यांना इशारा देणारे हे पद रचले.) ( देवल मास्तरांची क्षमा मागून...) पदवीधरा हा बोध खरा जिज्ञासा कबरीं पुरा ॥ संशय खट झोटिंग महा देऊ नका त्या, ठाव जरा ॥ ईडीपिडा त्राटिका जशी । कवटाळिल ती, भीती धरा ॥ छिन्नमस्ता* ती बलशाली । आव मानितां, घाव पुरा ॥ --- * पूर्ण जीभ बाहेर काढलेलं महाकालीचं एक रूप. - oOo - गीत/संगीत गो. ल. माल नाटक: संशयलोळ चाल: चल झूठे कैसी... पुढे वाचा »

बुधवार, २९ मार्च, २०२३

बिम्मच्या पतंगावरून - २ : हा बिम्म आहे


  • ( प्रसिद्ध लेखक जी.ए. कुलकर्णी यांच्या ‘बखर बिम्मची’ या छोटेखानी पुस्तकाचे बोट धरून केलेला हा प्रवास ) पहिले पाऊल « मागील भाग --- हा बिम्म आहे( https://riseandshine.childrensnational.org/ येथून साभार.) ‘बखर बिम्मची’ हाती घेतल्या घेतल्या ‘बिम्म’ हे कथानायकाचे नाव ऐकूनच वाचक प्रथम बुचकळ्यात पडतो. वाटतं ‘अरे, हे काय नावं आहे?’ पण तुम्हा-आम्हालाच का, बिम्मलाही हाच प्रश्न पडायचा ना, ‘आपले नाव बिम्म का आहे?’ असा. त्यावरचे उत्तर भलतेच मासलेवाईक आहे. त्याच्या आईच्या म्हणण्यानुसार ‘बब्बीने – त्याच्या बहिणीने – प्रथम आपल्या या भावाला पाहिले तेव्हा ती म्हणाली, ‘हा बिम्म आहे!’ म्हणून त्याचे नाव बिम्म.’ हे पुस्तक वाचायला घेतले आणि या तिसर्‍याच वाक्याने मला खिशात टाकले होते. लहान मुला… पुढे वाचा »

रविवार, २६ मार्च, २०२३

राजसा, किती दिसांत...


  • उशीरा केलेल्या आंघोळीदरम्यान पकडलेला Eureka moment... ( लग्नापूर्वी प्रियेसाठी चंद्रावर जाण्यास सिद्ध असलेला प्रियकर नवरा नि बाप झाला की स्नानासाठी मोरीपर्यंत जाण्यासही उत्सुक नसतो. अति झालं म्हणजे त्याची पूर्वीची प्रिया नि आताचं खटलं त्याला निर्वाणीचा इशारा देते.) ( कविवर्य सुरेश भट यांची क्षमा मागून.. .) आंघोळून टाक आज, विसळून अंग अंग राजसा किती दिसांत न्हायला नाहीस सांग त्या तिथे जुन्या खणात, पेंगतो तव गंजिफ्रॉक हाय रे नको तयाचे, झोपेतच होणे दुभंग दूर दूर राहतो बघ, रुसला तुझाच लेक साहवेना त्या जराही, प्राचीन तव देहगंध गार गार या हवेत घेऊनी पंचा समेत मोकळे करून टाक एकवार सर्व अंग काय हा तुझा रे श्वास, दर्प हा इथे भकास बोलावण्यास तुला, उठला पाण्यावरी त… पुढे वाचा »

गुरुवार, २३ मार्च, २०२३

बिम्मच्या पतंगावरून - १ : पहिले पाऊल


  • (प्रसिद्ध लेखक जी.ए. कुलकर्णी यांच्या ‘बखर बिम्मची’ या छोटेखानी पुस्तकाचे बोट धरून केलेला हा प्रवास) रांगते लहान मूल जेव्हा प्रथम एखाद्या गोष्टीला धरून दोन पावले टाकते, तेव्हा त्याला ‘चालणे’ या क्रियेचा वा हालचालीचा शोध लागतो. यात त्याने ज्या जड गोष्टीचा आधार घेतलेला असतो अशा– भिंत, टेबल, खुर्ची, पलंग वगैरे वस्तूंना पकडले, की आपण केवळ उभेच राहू शकतो असे नव्हे, तर पायांची हालचाल केल्यावरही पडत नाही इतका आधार मिळतो, याचे भान त्याला येत असते. परंतु याने आधाराचे भान आले तरी ‘खोली’चे येत नाही. म्हणून मग पलंगावर उभे राहून चालता चालता पलंगाच्या वा सोफ्याच्या कडेपाशी पोचते तेव्हा थांबावे हे त्याला समजत नाही. जेव्हा ते पायाखालची जमीन संपून धाडकन पडते, तेव्हाच त्याला पायाखाली नेहमीच आधार असतो असे नाही याचे भान येते. मग ते एक एक पाऊल टाकताना जमि… पुढे वाचा »

सोमवार, १३ मार्च, २०२३

जम्प-कट - ३ : टोळी ते समाज आणि माणूस


  • अन्नं वै प्राणिनां प्राणा « मागील भाग --- कळपातील सुरक्षितता हरण काळवीटासारखे शाकाहारी प्राणी कळपाच्या स्वरूपात राहतात. असे असूनही त्यांच्यामध्ये परस्पर-सहकार्य असे फारसे नसते. कळपातील प्रत्येक प्राणी आपापले अन्न स्वतंत्रपणे मिळवत असतो. यांचे कळप करून राहाणे हे प्रामुख्याने कळपातील सुरक्षिततता (safety in numbers) मिळवण्याच्या हेतूनेच असते. एकाच ठिकाणी अनेक भक्ष्यांचे पर्याय उपलब्ध झाल्याने शिकारी प्राण्याकडून त्यातील एका विशिष्ट प्राण्याची शिकार करण्याची संभाव्यता (probability) घटते. त्याचबरोबर काहीवेळा कळपातील प्राणी नेट धरून एकत्रितरित्या शिकार्‍याचा मुकाबला करु शकतात. कमी श्रमांत शिकार मिळवण्याच्या दृष्टिने शिकार्‍याचा रोख सामान्यत: कळपातील दुबळ्या भक्ष्याकडे अधिक जातो. त्यामुळे त्यातील सक्षम प्राणी निसटून जाऊ शकतात. यातून नैसर्ग… पुढे वाचा »

रविवार, ५ मार्च, २०२३

‘देस’: वैचारिक गोंधळाच्या कृतिशून्यतेचे नाटक


  • गेल्या दशका-दोन दशकांमध्ये राष्ट्रभक्ती, राष्ट्र, देश, देशभक्ती वगैरे विचार नि भावनांचे चलनात रुपांतर झाले आहे, आणि आर्थिक अरिष्टात सापडलेल्या एखाद्या देशाच्या चलनाप्रमाणे त्याचे अवमूल्यनही. साधारण २०१४ ते १९ दरम्यान यांचा वापर अक्षरश: सुट्या पैशांसारखा अरत्र-परत्र सर्वत्र होत होता. पण देशभक्ती म्हणजे काय? ती केवळ एक भावना आहे, की तिला कृतीची जोडही हवी? की त्याहून पुढचे पाऊल म्हणजे कुण्या ‘गुरुजीं’च्या आदेशानुसार केलेली ‘डायरेक्ट अ‍ॅक्शन’? त्याहीपूर्वीचे प्रश्न ‘देश म्हणजे काय?’, ‘माझा देश कोणता? या दोनही प्रश्नांचे उत्तर सैद्धांतिक, बौद्धिक पातळीवर द्यायचे की केवळ अनुसरणाच्या, हा ज्याच्या त्याचा निर्णय असतो. बहुसंख्या ही अर्थातच अनुसरणाचा मार्ग निवडते. पण पुढचा प्रश्न असा असतो की ज्यांना… पुढे वाचा »

सोमवार, २७ फेब्रुवारी, २०२३

सत्तेचे सोपान


  • कधी पापा, पाठीवर थापा कधी हपापा, कधी गपापा कधी थट्टा, कधी रट्टा कधी सत्ता, कधी बट्टा कधी चंदन, कधी भंजन कधी खंडन, कधी भांडण कधी झेंडा, कधी दंडा कधी चंदा, कधी गुंडा कधी थाप, कधी व्हॉट्स-अॅप कधी चाप, कधी मार-काप कधी खांदा, कधी फंदा नाही मंदा, कधी धंदा - रमताराम पुढे वाचा »