-
साडेतीन-चार वर्षांपासून महाराष्ट्राने पक्षांतराच्या राजकारणात तळ गाठून आजवर हिणवलेल्या उत्तर भारतासमोर आपली लाज घालवली आहे. सध्या जवळजवळ नऊ वर्षांनी महाराष्ट्रामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची धामधूम सुरु आहे. इतकी वर्षे तुंबलेली अनेकांची राजकीय लालसा फसफसून वाहू लागलेली आहे. निलाजर्या राजकारणाचा हा चिखल शरम येईल इतका चिवडला जातो आहे. याची ना राजकारण्यांना लाज आहे ना ‘आपला पक्ष जिंकला ना, मग बास’ या मानसिकतेच्या मतदारांनाही. या सार्या विषण्ण करणार्या परिस्थितीवर कडवट हसून पुढे सरकण्याखेरीज सुज्ञांच्या हाती काही उरलेले नाही. काही दिवसांपूर्वी संगणकावरील इमेजेस पाहाताना एक-दोन चित्रांत निवडणूक-भाष्य चमकून गेले. पाहाता पाहात चोवीस तासांत तीस-एक मीम्स तयार झाली. त्यांची संगतवार मांडणी करताना दिसलेली छिद्रे भरून काढणार्य… पुढे वाचा »
Indexes Menu_Desktop
| संपूर्ण सूची : |
सोमवार, १२ जानेवारी, २०२६
me me me me meme(१), इलेक्शन वाले meme
मंगळवार, २३ डिसेंबर, २०२५
आळशांच्या बहुमता...
-
प्राचीन काळी मी संगणक-क्षेत्रामध्ये काम करत असताना आम्ही स्वयंसिद्ध (stand-alone) (१) स्वरूपाची प्रणाली (software) सॉफ्टवेअर तयार करत असू. तिचा आराखडा आमचाच नि तयार करणारे आम्हीच. त्यात काय काय असावे, कसे असावे हे निश्चित करणारा पहिला planning टप्पा असे. त्यानंतर त्याचा डोलारा (skeleton) तयार केले जाई. मग प्रत्यक्ष कार्य करणारे विभाग एक-एक करुन भरले जात. आता याचा पुढचा महत्त्वाचा टप्पा सुरु होई. यात त्याची प्राथमिक वैधता-चाचणी (testing) आणि/किंवा QA अर्थात गुणवत्ता-तपासणी केली जाई. त्यानंतर यात सापडलेल्या ढोबळ चुका दुरुस्त करुन ही प्रणाली अधिक भक्कम केली जाई. यात अपेक्षित निकाल मिळतो आहे ना हे तपासण्याबरोबरच अनपेक्षित निकाल येत नाही ना या दिशेनेही चाचणीचे टप्पे पार पडत. ते पार पडल्यानंतर हे कंपनीच्या बाहेरील काही तज्ज्ञांना Beta-tester … पुढे वाचा »
शुक्रवार, ७ नोव्हेंबर, २०२५
निवडणुका, प्रातिनिधित्व: अमेरिका आणि भारत
-
मागील आठवडाभर आमच्यासारख्या मूठभरांचं लक्ष न्यूयॉर्कच्या महापौरपदाच्या निवडणुकीकडे होते. आपण ‘डेमोक्रॅटिक सोशलिस्ट’ असल्याचा दावा करणारे जोहराम ममदानी मोठ्या फरकाने निवडून आले. कुणी त्याला भारतीय वंशाचा म्हणवत ताट-वाटी घेऊन त्याने रांधलेल्या यशाचा एक तुकडा आपल्या पदरी पाडून घेण्याचा प्रयत्न केला. कुणी ‘डेमोक्रॅटिक’ का होईना सोशलिस्ट आहे ना’ म्हणत विळा-कोयता उंच केला. मोकाट भांडवलशाहीचे आगर असलेल्या अमेरिकेच्या आर्थिक राजधानीमध्ये तिचे नाक कापल्याचा आसुरी आनंद आमच्यासारख्यां रिकामटेकड्यांना झाला... इस्रायलने मध्यपूर्वेत एक मुस्लिम मारला की आपल्याकडे काहींना होतो अगदी तसा. कुणी नुसताच आनंद व्यक्त केला, कुणी ‘तेव्हा कसे... आता का...’ हा भारताचा राष्ट्रीय तर्क वापरुन आपली हिणवत्ता सिद्ध केली. पण या सगळ्या कल्लोळामध्ये काही तपशील पाहायचे आपण … पुढे वाचा »
रविवार, २ नोव्हेंबर, २०२५
ट्रम्प, अमेरिका आणि जागतिक बदलाचे वारे - २ : ट्रम्प आणि इस्रायल
-
भाग - १ « मागील भाग --- व्यवसायातील नफा वाढवायचा असेल, तर ‘वेतन-खर्च कमी करणे’ हा भांडवलशाहीतील हुकमी मार्ग आहे. आठ वर्षांत आपल्या कर्मचार्यांना जेमतेम एक टक्का वेतनवाढ दिल्याबद्दल बोईंगच्या सीईओला अमेरिकन सेनेट कमिटी सदस्यांनी धारेवर धरल्याचा एक व्हिडिओ यू-ट्यूबवर सापडेल. याचबरोबर इतर सुरक्षा नियम धाब्यावर बसवून, प्रवासी नि कर्मचारी यांचा जीवही धोक्यात घालून, कंपनीचा नफा वाढवण्याचे नव-नवे मार्ग त्याने शोधले. याबद्दल बक्षीस म्हणून त्याला एकाच वर्षांत ४५% इतकी घसघशीत वाढ देऊन, ३.३ कोटी डॉलर्स(!) इतके वार्षिक वेतन कंपनीच्या संचालक मंडळाने देऊ केले. कट्टर भांडवलशाहीसमर्थक अमेरिकेत अजिबात न शोभणारे याचे निदान त्याची झाडाझडती घेणार्यांपैकी एका सेनेटरने केले. तो म्हणाला, ‘मि. सीईओ, तुम्हाला कंपनीच्या हिताच्या आड येणारी समस्या शोधायची… पुढे वाचा »
गुरुवार, ३० ऑक्टोबर, २०२५
ट्रम्प, अमेरिका आणि जागतिक बदलाचे वारे - १ : अमेरिकेमध्ये ट्रम्प
-
बहुप्रतीक्षित नोबेल शांतता पुरस्कार अखेर जाहीर झाला. सत्ताधारी समाजवादी पक्षाच्या विरोधक असलेल्या, ‘आपल्या देशात अमेरिकेने लष्करी हस्तक्षेप करावा’ अशी मागणी करणार्या आणि जगभरात सर्वाधिक खनिज तेलाचे साठे असलेल्या त्या देशातील ते साठे भांडवलदारांच्या ओटीत टाकण्यास उत्सुक असणार्या, व्हेनेझुएलाच्या मारिया मच्याडो यांच्या पदरात हा पुरस्कार पडला. मच्याडो यांचा राजकीय दृष्टीकोन शांततावादी मुळीच नाही. नोबेल शांतता कमिटीने बहुधा ‘समाजवाद नि समाजवादी विरोधक = शांततावादी’ ही सोपी व्याख्या स्वीकारली असावी. विध्वंसाचे हत्यार असलेल्या डायनामाईटच्या विक्रीतून अमाप पैसा केलेल्या नोबेलने हा पुरस्कार ठेवलेला असल्याने अंतर्विरोध हा त्याचा स्थायीभाव असा पुन्हा-पुन्हा दिसतो. पण मच्याडोंना हा पुरस्कार मिळाला यापेक्षा, ‘मी आठ युद्ध थांबवली, मला नोबेल शांतता… पुढे वाचा »
गुरुवार, ११ सप्टेंबर, २०२५
अर्ध्यावरती डाव मोडला...
-
(कविवर्य मंगेश पाडगांवकर यांच्या चरणी हे विडंबन सादर...) भातुकलीच्या खेळामधलीं तात्या आणिक कोणी अर्ध्यावरती डाव मोडला, अधुरी एक कहाणी ॥धृ॥ तात्या वदला, “मला न कळली, शब्दांविण तव-भाषा घरी पोचतां, पुसिन तेथील, धुरकटलेल्या कोषा (१) ” का कमळीच्या डोळां तेव्हा दाटुनि आले पाणी ? ॥१॥ कमळी वदली बघत एकटक लाल-लाल तो तारा “उद्या पहाटे दुसर्या वाटा, तिज्या गावचा वारा” पण तात्याला उशिरा कळली, गूढ अटळ ही वाणी ॥२॥ तिला विचारी तात्या, “का हे हात असे सोडावे ? त्या दैत्याने माझ्याआधी, तूंस असे कवळावे ?” या प्रश्नाला उत्तर नव… पुढे वाचा »
बुधवार, ३ सप्टेंबर, २०२५
वारसा, जिज्ञासा आणि ज्ञान - २ : पण याचा उपयोग काय?
-
वृद्धत्वाची जेथ प्रचिती... « मागील भाग --- मागील भागाच्या अखेरीस नेहरुंचा उल्लेख आला आहे, तोच धागा पकडून पुढे जाऊ. जिज्ञासा https://www.istockphoto.com/ येथून साभार. फेसबुकवर एके ठिकाणी कुरुंदकरांनी नेहरुंबाबत लिहिलेला एक उतारा पोस्ट केलेला होता. त्याखाली एका तरुणाने “लेखकाला टॅग करता येईल का? त्याच्या प्रोफाईलवर जाता येईल.” अशी कमेंट केलेली होती. समाजमाध्यमांवर बस्तान बसवून असलेल्या ट्रोलिंग मानसिकतेच्या कुणी एकाने त्याचा स्क्रीनशॉट पोस्ट म्हणून टाकला असता, त्यावर सुमारे शंभरेक जणांनी 'हा: हा:’ अशी प्रतिक्रिया दिलेली पाहिली. ( ‘नेहरु’ असा शब्द वाचूनच हा: हा: करणारे काही त्यात असतील. त्यांना वगळून ) इतक्या सार्यांना कुरुंदकर ठाऊक आहेत ही आनंदाचीच बाब आहे. कुरुंदकरांचे, त्य… पुढे वाचा »
Labels:
आकलन,
इतिहास,
जिज्ञासानंद,
तत्त्वविचार,
भाष्य,
समाज
गुरुवार, २१ ऑगस्ट, २०२५
पौरुषाचा कांगावा
-
महाराष्ट्र देशीचे उत्तर भारतीय जामात श्री. विवेक अग्निहोत्री यांनी मराठी वरणभाताला नाके मुरडताना ‘हे कसलं गरीबाचं खाणं. मी दिल्लीचा आहे. तेलाचा थर असणारं तिखट, मांसाहारी खाणं मला आवडतं’ अशी मुक्ताफळे उधळली आणि महाराष्ट्रदेशी संताप उसळला. तांबडा-पांढरा, अख्खा मसूर, वडा-भात, वांगे-भरीत, शेव-भाजी, चकोल्या वगैरेंनी वरणभाताशी असलेली आपली नेहमीची ईर्षा तात्पुरती म्यान करुन त्यांस बाहेरून पाठिंबा देऊ केला. आम्हीही लोणच्यापासून पोह्यांपर्यंत सर्वत्र साखरेचा वर्षाव करणार्या जमातीशी तात्पुरते जुळवून घेतले. एकुण महाराष्ट्रदेशी दुर्मीळ असा एकोपा दृश्यमान झाला. मुळात अमुक खाणे हे फार शौर्याचे, तमुक खाणे दुय्यम अभिरुचीचे लक्षण वगैरे विनोदी समज नि त्यातून निर्माण झालेल्या अस्मिता हा केवळ महाराष्ट्रदेशीच नव… पुढे वाचा »
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पण्या (Atom)







