-
एखाद्या चित्रपटाने डोके भणाणून गेले किंवा व्यापून राहिले की काहीतरी खरडण्याची माझी जुनीच खोड आहे. पण एखाद्या चित्रपटाने झोप उडवल्याने गद्याऐवजी कवितेच्या माध्यमाची निवड केली अशी ही एकच घटना. अनेक चित्रपट, चरित्रे असोत कि कथानके, त्यात एकच प्रसंग वा तुकडा असतो ज्याच्या भोवती सारा भवताल फिरतो. ‘फँड्री’मधला शेवटाकडचा विहिरीचा प्रसंग असाच. त्या भोवतीच उगवून आलेली ही कविता. डोक्यातला सारा संताप, सारं वैफल्य तिने शोषून घेतलं न मला मोकळं केलं. काल संध्याकाळी फँड्री पाहिला त्यानंतर घरी आलो ते हे तुफान डोक्यात घेऊनच. शेवटच्या डुकराच्या पाठलागात त्या डुकराच्या जागी जब्या दिसू लागला नि डोकं सुन्न झालं. त्यातच चित्रपट पाहताना आणि पाहून बाहेर पडताना असंवेदनशील प्रेक्षकांनी केलेली शेरेबाजी नि मतप्रदर्शन ऐकून डोकं आणखीनच आउट झालेलं. घरी येऊन ते डोक… पुढे वाचा »
Indexes Menu_Desktop
| संपूर्ण सूची : |
रविवार, १६ फेब्रुवारी, २०१४
जब्याऽऽ, एऽ फँऽऽन्ड्री, पकड साला
सोमवार, ३० सप्टेंबर, २०१३
न भावलेला ‘आषाढातील एक दिवस’
-
कविकुलगुरु कालिदास हा भरतखंडातील कविश्रेष्ठांचाही मेरुमणि. त्याच्या मेघदूताने देशकालाच्या, भाषेच्या सीमा ओलांडून अनेकांना भुरळ घातली, आकर्षित केले. अनेक अभ्यासकांनी आपापल्या परीने एकेक दृष्टिकोन घेऊन त्यातील सौंदर्य, त्यातील छंदशास्त्र, त्यातील भूगोल उलगडण्याच्या यथामती प्रयत्न केला, काही कविंनी आपल्यापुरते आपले ‘मेघदूत’ लिहून काव्यक्षेत्रात आपला ठसा उमटवण्याचा प्रयत्न केला. मराठी भाषेत गदिमांनी या विरहाला चिरविरहाच्या पातळीवर नेऊन एक अजोड कविता लिहिली. अनेकांनी त्याचे आपापल्या भाषांतून कुठे स्वैर, कुठे समश्लोकी अनुवाद करून त्याला कवेत घेण्याचा प्रयत्न करून पाहिला. तर काहींनी याही पुढे जाऊन या सार्या अनुवादांच्या तौलनिक अभ्यासातून ‘कुणाला किती कालिदास सापडतो?’ याचे विश्लेषण करण्याचाही प्रयत्न केला. थोडक्यात सांगायचे तर भारतीय साहित्य… पुढे वाचा »
मंगळवार, ३० जुलै, २०१३
काही नि:शब्दकथा
-
( कथा, प्रसंग आणि पात्रे काल्पनिक. परंतु तरीही कोण्या जिवंत वा मृत व्यक्तीशी, घटनांशी साधर्म्य आढळल्यास लेखकाला ताबडतोब सूचना द्यावी. जेणेकरून त्या कल्पित-वास्तवाच्या तौलनिक अभ्यासासाठी शिष्यवृत्तीची मागणी नोंदवणारा अर्ज करता येईल. ) प्राचीन: https://steemit.com/ येथून साभार. एकदा एक लांडगा नदीवर पाणी पीत होता. पाणी पिता पिता त्याच्या लक्षात आले की प्रवाहाच्या खालच्या बाजूला एक लहानसे कोकरूही पाणी पीत होते. “तू माझ्या पाण्याला तोंड लावून ते उष्टे करत आहेस.” लांडगा कोकरावर खेकसला. “असं कसं होईल वृकराज. मी तर प्रवाहाच्या खालच्या बाजूला पाणी पीत आहे, इकडून पाणी उलट तुमच्या दिशेने कसे जाईल.” “तू तर भलताच उद्धट दिसतोस, वर्षभरापूर्वीही तू माझ्याशी असेच उद्धट वर्तन केले होतेस.” ला… पुढे वाचा »
Labels:
अन्योक्ती,
जिज्ञासानंद,
ललित,
समाज,
साहित्य-कला
रविवार, ७ जुलै, २०१३
आडाडता आयुष्य - गिरीश कार्नाड
-
आयुष्यात असा एखादा कालखंड येतो की अचानक बर्याचशा अनपेक्षित पण स्वागतार्ह (खरंतर इथे मला इंग्रजीतल्या most welcome – आनंदाने स्वीकाराव्यात अशा – ची छटा अपेक्षित आहे, पण काहीवेळा परभाषेपेक्षाही मातृभाषेत नेमकेपणा आणणे अवघड जाते ते हे असे) अशा बर्याचशा गोष्टी एकापाठोपाठ एक आपल्याकडे चालत येतात. आपल्या जगण्यातला तो एक तुकडा पूर्णपणे एखाद्या आवडत्या गोष्टीच्या नावेच होऊन जातो. गेल्या महिन्याभरात असाच काहीसा अनुभव आला तो नाटकांबाबत. अचानक दोन चार सुरेख नाटके पहायला मिळाली. त्याच वेळी रंगभूमीशी, रंगकर्मींशी संबंधित चार पाच पुस्तके एकदम हाती लागली. हाती घबाड गवसल्याचा किंवा भर उन्हाळ्यात कुणीतरी कलिंगडाच्या गराड्यात नेऊन बसवल्याचीच भावना झाली. सुदैवाने रमतगमत का होईना त्यातल्या दोन पुस्तकांची ‘नैया पार’ झाली. योगायोग असा की ही दोन्ही आत्मचरित… पुढे वाचा »
रविवार, २३ डिसेंबर, २०१२
‘कट्टा... On The Rocks’: संक्रमणावस्थेतील पिढीचा आत्मशोध
-
‘कट्टा’ हा शब्द ऐकला की डोळ्यासमोर येतो, तो कॉलेजजवळील चहाच्या टपरीवर जमलेला विद्यार्थ्यांचा घोळका. चहाची टपरी नसेल तर कधी कॉलेजच्या आवारातील एखाद्या वृक्षाचा पार असेल, कॉलेजच्या दाराजवळील कुंपणाचा पट्टा असेल. जिथे जिथे चार टाळकी बसतात, नि कुटाळक्या करतात तो कट्टा. कटिंग चहा नि क्रीमरोलच्या साथीने मॅथ्स-थ्री मधे झालेल्या काशीपासून अमीर खानच्या टूथब्रश मिशीपर्यंत, कुठल्याशा चित्रपटातील गाजलेल्या किस् पासून आपापल्या आवडत्या मिस पर्यंत वाट्टेल त्या विषयावर तासन् तास काथ्याकूट करत बसण्याची जागा. त्यात मग एखाद्या उदयोन्मुख कवीच्या कवितांबद्दल चर्चा होईल, क्वचित ‘या वेळी पुरुषोत्तमला कोणतं नाटक घ्यायचं’ याच्यावर उहापोह होईल पण बहुतेक वेळ निव्वळ टैमपास. तेव्हा ‘कट्टा ऑन द रॉक्स’ असे शीर्षक घेऊन … पुढे वाचा »
मंगळवार, ९ ऑक्टोबर, २०१२
‘रोश विरुद्ध अॅडम्स’च्या निमित्ताने - १०: न्यायालयांचा ‘न्याय’ आणि आयोगाचे ‘सहकार्य’
-
युरपिय संसदेत रोश आणि अॅडम्स << मागील भाग न्यायालयांचा ‘न्याय’: अॅडम्सचे अपील स्विस सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्यानंतर (१९७८-७९ च्या सुमारास) जॉन प्रेस्कॉट यांच्या सल्ल्यावरून एक प्रसिद्ध वकील डायफेनबाकर हे अॅडम्सला भेटले नि त्यांनी त्याचा खटला बारकाईने अभ्यासला. त्यांच्या मते अॅडम्सने दोन गोष्टी करायला हव्या होत्या. पहिली म्हणजे त्याने त्याच्याविरुद्ध स्विस सरकारने केलेल्या अन्यायाचे प्रकरण मानवी हक्क न्यायालयाकडे न्यायला हवे होते, नि दुसरे स्विस खटल्यात त्याने स्विस कायद्याच्या ११३व्या कलमाचा आधार घ्यायला हवा होता. या कलमात असा स्पष्ट उल्लेख आहे की ‘आंतरराष्ट्रीय कायद्याचे स्थान हे स्वित्झर्लंडच्या अंतर्गत कायद्यापेक्षा वरचे मानण्यात यावे’. ज्यांच्या मार्फत अॅडम्स आयोगाच्या सातत्याने संपर्कात होता, ते विली श्लीडर हे स्व… पुढे वाचा »
सोमवार, ८ ऑक्टोबर, २०१२
‘रोश विरुद्ध अॅडम्स’च्या निमित्ताने - ९: युरपिय संसदेत रोश आणि अॅडम्स
-
सुपर पॉयजन << मागील भाग याच सुमारास या रंगमंचावर राजकारण्यांचा प्रवेश झाला. युरपिय संसदेतील ब्रिटिश प्रतिनिधी मि. जॉन प्रेस्कॉट ( हे सुमारे तीन दशके ब्रिटिश संसदेत लोक-प्रतिनिधी म्हणून काम करत होते नि पुढे १९९७ ते २००७ दरम्यान - टोनी ब्लेअर यांच्या पंतप्रधानपदाच्या कारकिर्दीत - ब्रिटनचे उपपंतप्रधानही झाले. ) यांनी अॅडम्सची भेट घेतली. हा सगळा प्रकार संतापजनक असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले नि हा प्रश्न युरपिय संसदेत उचलून धरण्याचा आपला निर्णय त्यांनी अॅडम्सच्या कानावर घातला. या निमित्ताने संसदेतीला समाजवादी गट अॅडम्सच्या पाठीशी भक्कमपणे उभा राहिला. अॅडम्सवरील अन्यायाचा त्यांनी पुढे सातत्याने पाठपुरावा केला नि युरपियन आयोगाला अॅडम्सला किमान प्रत्यक्ष मदत देण्यास भाग पाडले. जॉन प्रेस्कॉट यांनी युरपिय संसदेमधे हा प्रश्न उपस्थित क… पुढे वाचा »
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पण्या (Atom)




