Vechit Marquee

Indexes Menu_Desktop

संपूर्ण सूची :

शुक्रवार, २४ नोव्हेंबर, २०१७

‘कट्यार काळजात घुसली’ - एक दृष्टिक्षेप (पूर्वार्ध) : सेरिपी


  • अन्न-वस्त्र-निवारा या मूलभूत गरजा भागवण्यासाठी आवश्यक असणार्‍या कौशल्यांनंतर माणसाने सर्वप्रथम विकसित केलेले कौशल्य असावे ते गाण्याचे. मनोरंजनाचे दालन माणसाने सर्वप्रथम खुले केले ते गाण्याचे दार उघडूनच. एखादे आवडते गाणे, आवडती धून गुणगुणला नाही असा माणूस सापडणे दुर्मिळ. अगदी आपला आवाज बेसूर आहे हे पक्के ठाऊक असलेली माणसेही, निदान बाथरुममध्ये तरी – जिथे समोर कुणी नसल्याने भिडस्तपणा आड येत नाही – अधेमधे आपला गळा तासून पाहतात. असा सुरांचा मोहक दंश जर योग्य वयात झाला, तर त्या डसण्यातून जी बाधा होते, ती अलौकिक अशीच असते. ‘कट्यार काळजात घुसली’ या नाटकातल्या सदाशिवला तो सूर सापडतो ‘पंडित भानुशंकरां’च्या गाण्यातून. त्या सुरांनी वेड लावलेला तो दहा-बारा वर्षांचा मुलगा, त्यांच्या अनुपस्थितीतही अनेक वर्षे सांभाळून ठेवतो, आणि अखेर घरच्या जबाबदारी… पुढे वाचा »

सोमवार, २० नोव्हेंबर, २०१७

उठवळांचे आत्मरंग


  • पश्चिमेत लॉरेन्स ऑलिव्हिए किंवा लिव उलमनसारख्या प्रथितयश कलावंतांच्या आत्मचरित्रांची जशी परंपरा आहे, तशी ती आपल्याकडे नाही. पण म्हणून दिग्गज कलावंतांची अगदीच टाकाऊ वा उथळ स्वरूपाची आत्मचरित्रंही आजवर प्रकाशित झालेली नव्हती. मात्र, अलीकडे बॉलीवूडमधील नट-नट्यांच्या प्रकाशित आत्मचरित्रांनी ती पायरीसुद्धा ओलांडली आहे. त्यातल्या नवाजुद्दीनने उठवळ स्वरूपाचं आत्मचरित्र लिहून त्या बदलौकिकात भर घातली आहे इतकेच... अष्टपैलू अभिनेता अशी ज्याची ओळख झाली, ज्याच्या संघर्षाच्या मिथक कथा मोठ्या प्रेमाने पसरवल्या गेल्या, त्या नवाजुद्दीन सिद्दिकीवर उथळ आणि उठवळ मांडणीमुळे आत्मचरित्र (अ‍ॅन ऑर्डिनरी लाइफ - ए मेमॉयर) मागे घेण्याची नुकतीच वेळ आली. नवाजुद्दीनच्या आधी करण जोहर, ऋषी कपूर, आशा पारेख, अनू अगरवा… पुढे वाचा »

मंगळवार, २५ जुलै, २०१७

एका धबधब्याचे विधिलिखित


  • स्थळः कुण्या एका घाटातील एक अनामिक, पण नयनरम्य धबधबा काळः ऐन पावसाळ्याचा प्रसंग १: दिवसः आठवड्याअखेरचा वेळः ऐन दुपारची ऐन धुवांधार पावसात धबधब्याची मजा लुटण्यासाठी आलेले उत्साही पर्यटक. दोन चार मिनीबसेस, पाच सहा ‘कॉर्पिओ’ आणि आठ दहा मध्यमवर्गीय गाड्या घाटरस्ता अडेल, वाहनांना, वाहतुकीला अडथळा होईल, याची फिकीर न करता उभ्या केलेल्या. एका स्कॉर्पिओवर थोरल्या आबासाहेबांचा फोटो/स्टिकर, मध्यमवर्गीय गाड्यांवर मागच्या काचेतून डोकावणार्‍या मांजरीचे, कुत्र्याचे किंवा वाघाचे चित्र... आणि हो, गाडी पार्क करताना ऐकू येणारी ‘सारे जहाँसे अच्छा’ ही रिवर्स इन्डिकेटर ट्यून. आसपास चहा, वडापाव, मक्याची भाजलेली कणसे यापासून थेट ‘टू मिनिट नूडल्स’ तयार करून देणारी टपरीवजा दुकाने नि हातगाड्या. एक रोमँटिक जोडी ध… पुढे वाचा »

गुरुवार, १३ जुलै, २०१७

अरे सेन्सॉर सेन्सॉर...


  • (बहिणाईची क्षमा मागून...) अरे सेन्सॉर सेन्सॉर, जसा उभा दारावर, आधी करावा सलाम, तेव्हा मियते मोटर । अरे सेन्सॉर सेन्सॉर, म्होटा कधी म्हनू नही अरे उदाच्या काडीला, सोटा कधी म्हनू नही । अरे सेन्सॉर सेन्सॉर, नाही सोचनं बिचनं येड्या पायातली व्हान, म्हनू नको रे तोरन । अरे सेन्सॉर सेन्सॉर, जसा कारल्याचा येल एक खुळं म्हनं गोड, बाकी सार्‍याले अकाल । अरे सेन्सॉर सेन्सॉर, म्हनू नको रे बहावा, त्याले नही पान फूल, वाजि होयबाचा पावा । देखा सेन्सॉर सेन्सॉर, शेंग वरतून काटे, अरे वरतून काटे, मधी मठ्ठ सागर गोटे । ऐका सेन्सॉर सेन्सॉर, निर्‍हा पदाचा इचार, देते खोट्याले होकार, अन् खर्‍याले नकार । देखा सेन्सॉर सेन्सॉर, म्हनं फिल्लम सुधार आधी अक्कल उधार, त्यात पदाचा तेगार । अरे सेन्स… पुढे वाचा »

सोमवार, २९ मे, २०१७

गीता कपूर, ‘हल्लीची पिढी...’ वगैरे


  • आज गीता कपूर यांच्या मुलाने त्यांना हॉस्पिटलमधे सोडून नाहीसे होण्याबद्दल एका चॅनेलने – नेहमीप्रमाणे सनसनाटी – बातमी केली आहे. त्यावर लगेच नेहेमीप्रमाणे ‘हल्लीची पिढी...’ या शब्दाने सुरू होणारी रडगाणी ऐकायला मिळू लागली आहेत. एकतर आपली मानसिकताच ‘एकाची चूक ही त्याच्या गटाची चूक किंवा खरंतर त्याची एकुण प्रवृत्तीच’ अशी कोटीच्या कोटी उड्डाणे गाठण्याची आहे. ‘अमुक एक असा आहे म्हणजे त्याची अख्खी जात अशीच आहे म्हणून तो असा आहे’ किंवा ‘तो असा आहे म्हणजे त्याची अख्खी जात अशी आहे’ हे अर्थनिर्णयन सर्रास वापरले जाणारे (जात काढून धर्म, शहर/गांव, देश, भाषा, रोजगार-क्षेत्र, एकाच गावातील उपनगरे/वस्ती हे टाकले तरी हे विधान तितकेच खरे ठरते.) त्यातलाच हा एक नमुना. आईबाप नेहेमी बिच्चारे वगैरे असतात, मुलं वैट्टं वै… पुढे वाचा »

बुधवार, ४ जानेवारी, २०१७

आपण निषेध विशिष्ट घटनेचा करतो की प्रवृत्तीचा...?


  • ( प्रसिद्ध समीक्षक हरिश्चंद्र थोरात यांनी फेसबुकवर << हे भलतंच काय झालंय आपलं? >> असा प्रश्न उपस्थित केला. त्याच्या अनुषंगाने मांडलेला हा विचार, एकाच वेळी सर्व बाजूंचा मार खाण्याबद्दल ख्याती असणार्‍या रमतारामांचा .) ...हे आपल्यापुरतं प्रत्येकाने तपासून पहायला हवं. ज्यांचा “माझ्या गटाच्या हितासाठी केलेला कायदेभंग समर्थनीय आहे, पण ‘त्यांच्या’ गटाच्या हितासाठी केलेला कायदेभंग मात्र समर्थनीय नाही ” असे उघड विषमतावादी, वर्चस्ववादी मत आहे, त्यांचा मुद्दा मी सोडून देतो. निदान ते आपल्या एकांगी भूमिकेशी प्रामाणिक तरी आहेत. पण जे अभिव्यक्ती स्वातंत्र्य वगैरेचा उद्घोष करतात, आपली न्यायबुद्धी जिवंत असल्याचा किंवा आपण समतोल विचाराचे असल्याचा दावा करतात, त्यांच्यासाठी हा वरचा प्रश्न आहे . प्रश्न अगदी वाजवी आहे. ‘आपण’ बदललो, आपण वाहव… पुढे वाचा »

सोमवार, १९ डिसेंबर, २०१६

चलनमुक्त समाज आणि इतिहास (सहलेखक: अ‍ॅड. राज कुलकर्णी)


  • चलनातून पाचशे नि हजार रुपयांच्या जुन्या नोटा बाद करत ‘कॅशलेस’ अर्थव्यवस्था हे आपले अंतिम उद्दिष्ट असल्याचे पंतप्रधान मोदी यांनी नुकतेच जाहीर केले आहे. अशा प्रकारच्या व्यवस्थेच्या नागरिकांच्या अर्थव्यवहारावर होऊ शकणार्‍या संभाव्य परिणामांबाबत चर्चाही सुरू झाल्या आहेत. परंतु अशा प्रकारची व्यवस्था सामाजिक पातळीवर काही बदल घडवू शकेल का, हे पाहणेही आवश्यक ठरेल. हा मुद्दा उपस्थित करण्याला ऐतिहासिक आधार आहेत, आणि इथे त्यातील एका पैलूचा वेध घेण्याचा प्रयत्न आहे. जगभरात मानवी संस्कृती जसजशी विकसीत होवू लागली तसतशी अन्न, वस्त्र आणि निवारा या मूलभूत गरजांपलिकडे माणसाच्या गरजांची संख्या वाढू लागली. आपल्या गरजेच्या सर्वच वस्तू आपापल्या निर्माण करण्याऐवजी, एकेका उत्पादनाची जबाबदारी एका व्यक्तीला वा समू… पुढे वाचा »

रविवार, ४ डिसेंबर, २०१६

सर्वेक्षणांचे गौडबंगाल


  • कार्ल मार्क्सचा सहाध्यायी फ्रेडरिक एंगल्सने एकोणिसाव्या शतकाच्या मध्यावर इंग्लंडमधील कामगार वर्गाच्या दारुण अवस्थेवर प्रकाशझोत टाकणारा अहवाल लिहून समाजनिर्मितीत सर्वेक्षणावर आधारित मूल्यमापन पद्धतीचे महत्त्व अधोरेखित केले. आजची प्रस्थापित व्यवस्था संख्याशास्त्राचे नियम आणि मूल्यमापन पद्धती धुडकावत, जनमत स्वत:च्या बाजूने वळवण्याचे डावपेच रचत आहे. नोटाबंदीनंतर सर्वेक्षणांतून झालेले फसव्या जगाचे दर्शन हे त्याचेच द्योतक आहे... --- वृत्तपत्रे, चॅनेल्स, इन्टरनेट पोर्टल्स यांच्यामार्फत अनेक सर्व्हे घेण्यात येतात. उदा. ‘सलमान खान दोषी आहे असे तुम्हाला वाटते का?’ किंवा ‘अमीर खान असहिष्णुतेबद्दल जे म्हणाला त्याच्याशी तुम्ही सहमत आहात का?’ वगैरे. त्याचे निकालही लगेच लाईव्ह दिसत असल्याने, आपले मत बहुसंख्येबरोबर गेले किंवा नाही हे ही लगेच तपासता येते… पुढे वाचा »