-
देशाच्या विधानसभांमधून भाजप कसा आता हद्दपार झाला आहे म्हणून ’मोदी लाट हटली’ किंवा ’मोदींची कामगिरी पाहा’ म्हणणार्यांनो जरा थांबा. मोदींचे मूल्यमापन मोदी ज्या भूमीवर लढतात तिथेच व्हायला हवे. पोटनिवडणुकांमध्ये अगदी उ.प्र.च्या मुख्यमंत्री नि उपमुख्यमंत्र्यांच्या मतदारसंघात भाजप पराभूत झाला होता, पण २०१९ च्या मध्यावधी निवडणुकांत उ.प्र. मध्ये पुन्हा भाजपने ९०% जागा जिंकल्या. राजस्थान, म.प्र., छत्तीसगड मध्येही विधानसभा गमावूनही मोदींच्या भूमीवर म्हणजे लोकसभा निवडणुकीत जवळजवळ १००% यश मिळवले आहे. गंमत म्हणजे महाराष्ट्राचे हे नाट्य रंगलेले असताना राजस्थानातील स्थानिक स्वराज्य संस्थातून काँग्रेसने प्रचंड मुसंडी मारत २३ ठिकाणी आपले वर्चस्व स्थापन केले, तर भाजप फक्त सहा ठिकाणी सत्ताधारी झाला.… पुढे वाचा »
Indexes Menu_Desktop
| संपूर्ण सूची : |
बुधवार, २७ नोव्हेंबर, २०१९
राज्यांतील निवडणुका आणि मोदीलाट
शोले पुन्हा पाहिल्यानंतर
-
विषयसंगतीमुळे हा लेख ’ वेचित चाललो... ’ या ब्लॉगवर हलवला आहे. तो इथे वाचता येईल. - oOo - पुढे वाचा »
मंगळवार, २६ नोव्हेंबर, २०१९
विचार आणि सत्ता
-
विचार नि विश्लेषण कितीही दर्जेदार, व्यापक हितकारी वगैरे असले, तरी जोवर त्यांची अंमलबजावणी होत नाही, तोवर त्यांना सुविचाराच्या वहीत लिहून ठेवलेल्या संदर्भहीन सुविचाराइतकेच महत्व असते ... किंवा ज्यावर कधीही प्रश्न न विचारता त्यातील मजकूर शिरोधार्य मानायचा असतो अशा धर्मग्रंथांसारखे! अंमलबजावणी करायची तर सत्ता हवी, आणि सत्ता हवी असेल तर आपले सोवळे उतरवून थोड्या तडजोडीला तयार असावे लागते. हे शहाणपण ’काँग्रेस, भाजप दोघेही वैट्टं वैट्टं’ हा जप करत बसलेल्या आणि राजकीय ताकद शून्य झालेल्या समाजवाद्यांना किंवा बुद्ध्यामैथुन करत बसलेल्या समाजवादी आणि कम्युनिस्टांना यायला हवे. जिवंत राहिला तर माणूस बळ वाढवून नंतर शत्रूशी लढू शकेल. त्यासाठी प्रतिस्पर्ध्यांपैकी एकच प्रचंड ताकदवान होऊ नये यासाठी प्रसंगी … पुढे वाचा »
Labels:
जिज्ञासानंद,
तत्त्वविचार,
पुरोगामित्व,
भाष्य,
भूमिका,
सत्ताकारण
रविवार, २४ नोव्हेंबर, २०१९
गिव एव्हरी डेविल हर ड्यू
-
मला राजकीय मते आहेत हे उघडच आहे. ती मी कधीच लपवली नाहीत. पण याचा अर्थ मी एक बाजू घेऊन ती बाजू पवित्र नि योग्य, त्या बाजूच्या माणसाने, पक्षाने, नेत्याने म्हटले ते तंतोतंत खरे असे म्हणत तलवारी घेऊन कुणावर हल्ले केले नाहीत. शाब्दिक हल्ले नक्कीच केले आणि करतही राहीन, पण ते माझ्या स्वत:च्या मतांसाठी, इतर कुणाच्या मला मनातून न पटलेल्या मुद्द्यावर समर्थन करण्यासाठी नाही. अमुक मत माझ्या बाजूच्या बहुसंख्येचे, जातीचे, धर्माचे, पक्षाचे, नेत्याचे आहे ’म्हणून’ माझे असायला हवे, नि मला पटत नसून खाली डोके वर पाय करुन, एक डोळा मुडपून, एक तिरळा करुन, नाकपुड्या फेंदारून अष्टवक्रासनात बसून कसे बरोबर दिसते, अशा मखलाशा करणे यात काही शहाणपणा आहे असे मला वाटत नाही. मी माझीच मते मांडतो. ती इतर कुण्या व्यक्तीच्या, गटाच्या, गावच्या, गल्लीतल्या, पेठेतल्या, ओसाडग… पुढे वाचा »
पर्यायाचा विचार, सिंहासनाचा खेळ आणि सेनेचा वाघ
-
एखादी जुनी व्यवस्था, जुनी निवड ही ’कालबाह्य झाली आहे, घातक आहे, बदलली पाहिजे’ म्हणून ओरड सुरु झाली की सर्वप्रथम ’पर्याय काय?’ या प्रश्नाचे उत्तर शोधायला हवे. अन्यथा आगीतून फुफाट्यात पडण्याचा अनुभव अनेकदा येतो. ‘आहे हे इतके वाईट नि घातक आहे की पर्याय म्हणजे इतर काहीही चालेल' किंवा' हे आधी जाऊ तर द्या, पर्याय आपोआप उभा राहील’ हे उत्तर पर्यायाचा विचारच न केल्याचे निदर्शक असते. ते वैचारिक आळशीपणाचे किंवा विद्रोहाचा विचार करता थकलेल्या मेंदूकडे रचनात्मक विचारासाठी, योग्य निरासाचा विचार करण्यासाठी पुरेशी ऊर्जाच शिल्लक न राहिल्याचे लक्षणही असते. जुन्या विचाराला, व्यवस्थेला नाकारून नवा विचार, नवी व्यवस्था स्वीकारताना त्यालाही मूल्यमापनाच्या, विश्लेषणाच्या माध्यमातून तावून-सुलाखून बाहेर पडणे आवश्यक असते. जुन्यातले काही दोष हा नवा पर्याय … पुढे वाचा »
ऑनलाईन शॉपिंग आणि स्थानिक विक्रेते
-
--- फेसबुकवर सचिन डांगे यांनी केलेली पोस्ट: दहा वर्षांपूर्वी फ्रीज विकत घ्यायला एका इलेक्ट्रोनिकच्या दुकानात गेलो होतो. काहीतरी 5-स्टार असणारा फ्रीज पसंत केला आणि पैसे देऊन विकत घेतला. पण त्या दुकानदाराने घरी पाठवलेला फ्रीज 4-स्टार चा होता... तडक दुकान गाठले, त्याला पावती दाखवली आणि तक्रार केली तर वस्तू घेईपर्यंत जी-हुजुरी करून गोडगोड बोलणारा दुकानदार आता नीट वागत नव्हता. झालेली चूक मान्यही केली नाही.. 5-स्टार वाला फ्रीज नव्हता म्हणून 4वाला पाठवला, त्याला काय होतेय..इत्यादी.. त्याची किंमत पाचशे रुपये कमी होती, तेवढे परत दिले. वागणूक अशी की जसा मी त्या दुकानात हजर आहे की नाही.. फ्रीज घेतला, डिलिवरी झाली आणि हम आपके है कौन... अशा प्रकारचे अनुभव भरपूर लोकांनी घेतले असतील... डिलिवरी झाल… पुढे वाचा »
शुक्रवार, २२ नोव्हेंबर, २०१९
पवारांच्या अंतस्थ हेतूचे प्रतिबिंब दाखवणार्या दोन शक्यता
-
( सेना-राष्ट्रवादी काँग्रेस-काँग्रेस आघाडीचे सरकार येण्याचे आदल्याच दिवशी नक्की झालेले असताना, रात्रीतून चक्रे फिरुन अजित पवार यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत सरकार स्थापन केले. विधानसभेत अध्यक्षाची निवड अथवा विश्वासदर्शक ठराव यांच्या संदर्भात शरद पवार यांची भूमिका आणि त्यांच्यासमोर असलेले पर्याय यांचा थोडा उहापोह. ) महाराष्ट्रातील सत्तेच्या खेळात आपण सार्यांनी तर्काचे, विनोदबुद्धीचे वारु मोकाट सोडले आहेत. ते जरा बांधून ठेवू. घटनाक्रम हा सर्वस्वी परावलंबी असल्याने आणि रंगमंचावरील पात्रे लेखकाला न जुमानता आप-आपली स्क्रिप्ट्स स्वत:च लिहित असल्याने स्थिती कशी वळण घेईल, या पुढचा भाग केव्हा कालबाह्य होईल हे सांगणे अवघड आहे. तेव्हा तो ही मुद्दा क्षणभर बाजूला ठेवू. सार्यांचे लक्ष दोन पवारांवर केंद्रीत झालेले असताना भाजपवाले सेना, काँग्रेस … पुढे वाचा »
गुरुवार, २१ नोव्हेंबर, २०१९
मी पण टॅक्सपेअर
-
जेएनयू चा प्रश्न आला की मोदी-भक्तांचे पित्त उसळून येते नि आपल्या टॅक्स-पेअर्स मनीचे काय करु नये याची पोपटपंची ते करु लागतात. मग मीच का मागे राहू? १. कोणाचाही पुतळा अथवा स्मारक उभारले जाऊ नये आणि मुख्य म्हणजे या नियमाला अपवाद अजिबात असू नयेत. २. कुंभमेळ्यापासून हजयात्रेपर्यंत कोणत्याही धार्मिक कार्यक्रमावर खर्च करु नये. मंदिर, मशीद, बुद्धविहार, गुरुद्वारा, चर्चेस, जिनालये इत्यादि धर्मस्थळे बांधून नयेत वा त्यांना अनुदान देऊ नये. ३. सरकारी कामांच्या जाहिराती करू नयेत. ४. गावे, शहरे, स्टेडियम, इन्स्टिट्यूट्स, हॉस्पिटल इत्यादिंसह कुठल्याही गोष्टींच्या नामांतरावर खर्च करु नये. ५. कोणत्याही बुडत्या खासगी उद्योगांना मदत देऊ नये. ६. स्मार्ट सिटी नावाखाली फुटपाथ सुशोभीकरण करु नये. ७. लो… पुढे वाचा »
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पण्या (Atom)







