-
नवा साहेब « मागील भाग --- मागील लेखांकात मांडलेल्या मुद्द्यांचा विचार करता फडणवीस २०१९च्या विधानसभा निवडणुकीला सामोरे जात असताना, त्यांच्यासोबत पक्षातील मागची पिढी नव्हती, सेना नव्हती आणि केंद्रातील नेतृत्वही नसावे असे म्हणावे लागेल. जर फडणवीस पुरेसे चाणाक्ष असतील, आणि त्यांना हे सर्व जाणवले असूनही त्यांनी ज्या पद्धतीने प्रचार केला ते पाहता त्यांचा स्वबळाबद्दलचा अहंकार चरमसीमेला पोहोचला होता असे म्हणायला हवे. कारण एकीकडे दोनशेवीस जागा जागा मिळवून ’मी पुन्हा येईन’ चा गजर करत होते. तर दुसरीकडे ते आणि मोदींसह अन्य भाजपेयी विरोधकांना दहा वीस जागांतच समाधान मानावे लागेल म्हणून लागले होते. १६४ पैकी १४४ जागा मिळवून कदाचित स्वबळावरच भाजपचे सरकार स्थापन होईल असे स्वप्नही ’युतीचे २५० आमदार निवडून आणू’ म्हणणार्या चंद्रकांत पाटील यांना पडू लागले … पुढे वाचा »
Indexes Menu_Desktop
| संपूर्ण सूची : |
मंगळवार, ३ डिसेंबर, २०१९
फडणवीसांची बखर - ३ : मी पुन्हा जाईन
Labels:
‘द वायर मराठी’,
भाष्य,
राजकारण,
विश्लेषण,
सत्ताकारण
सोमवार, २ डिसेंबर, २०१९
राजकारणातील सोबतीचे करार : इतिहास
-
भारतीय राजकारणात आघाडीचे, युतीचे राजकारण नवीन नाही. स्वबळावर सत्ताधारी झालेल्या सरकारांची संख्या दोन वा त्याहून अधिक पक्षांच्या आघाडी/युती/फ्रंट सरकारांच्या संख्येहून फारच कमी दिसते. केंद्रात तर १९८४ नंतर थेट तीस वर्षांनी २०१४ साली- जेमतेम का होईना, पण पूर्ण बहुमत असलेल्या पक्षाचे सरकार प्रथमच स्थापन झाले. उरलेला बहुतेक सर्व काळ देशात विविध पक्षांच्या आघाडीचे सरकारच सत्ताधारी होते. १९७१ सालापर्यंत स्वबळावर सरकार स्थापन करणार्या काँग्रेसला टक्कर देण्यासाठी विरोधी पक्षाच्या काही नेत्यांनी अॅंटी-काँग्रेसिझमचा विचार मांडायला सुरुवात केली. जयप्रकाश नारायण यांच्या नेतृत्वाखाली १९७७ मध्ये स्थापन झालेले जनता पक्षाचे सरकार हा या राजकारणाचा पहिला विजय होता. हे सरकार तांत्रिकदृष्ट्या जरी… पुढे वाचा »
Labels:
‘अक्षरनामा’,
जिज्ञासानंद,
राजकारण,
विश्लेषण,
सत्ताकारण
फडणवीसांची बखर - २ : नवा साहेब
-
भाजप नेतृत्वाचा प्रवास « मागील भाग --- मोदींच्या कृपेने मागच्या पिढीतील नेत्यांना मागे सारून फडणवीस मुख्यमंत्री झाले खरे, पण या नव्या साहेबाला अजूनही काही जुन्यांशी संघर्ष करावा लागणार होता. खडसे यांच्या बोलभांडपणामुळे त्यांचा काटा फडणवीस यांनी सहजपणे दूर केला. पण विनोद तावडेंसारखा मुंबईस्थित नेता महाजन-मुंडेंच्या काळापासून महाराष्ट्रात सक्रीय होता, फडणवीस यांना सीनियर होता. महाजनांची पुढची पिढी राजकारणात फारशी सक्रीय नसल्याने त्यांचा धोका नसला, तरी मुंडेंची पुढची पिढी मात्र चांगलीच आक्रमक होती. महाजन यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या समर्थकांची फळीही - साहजिकच - महाराष्ट्र भाजपचा चेहरा म्हणून उभ्या असलेल्या मुंडेंच्या पाठीशी एकवटली होती. त्याशिवाय मातोश्रीबरोबर संपर्क संबंध राखण्याचा महाजन यांचा वारसा मुंडे यांनीही सांभाळला होता. या द… पुढे वाचा »
Labels:
‘द वायर मराठी’,
भाष्य,
राजकारण,
विश्लेषण,
सत्ताकारण
रविवार, १ डिसेंबर, २०१९
फडणवीसांची बखर - १ : भाजप नेतृत्वाचा प्रवास
-
वसंतराव नाईक यांच्यानंतर महाराष्ट्रात पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण केलेले केवळ दुसरेच मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस २०१९च्या निवडणुकींना सामोरे जात होते. खडसे, तावडे यांसारख्या पक्षांतर्गत स्पर्धकांचा पत्ता उमेदवारीतच कट करुन त्यांनी आपला दुसर्यांदा मुख्यमंत्री होण्याचा मार्ग आणखी सुकर केला होता. डोक्यावर मोदींचा हात होता, विरोधक पुरे निष्प्रभ झाले होते. प्रचंड बहुमत मिळणार हे ही नक्की होते, प्रश्न ’किती जागा मिळणार?’ इतकाच उरला होता... २४ तारखेच्या निकालांनंतर परिस्थिती अशी बदलली की भाजप विधिमंडळ पक्षाचे नेते म्हणून निवडले गेलेल्या फडणवीसांना राज्यपालांकडे गेलेल्या भाजप शिष्टमंडळात स्थान नव्हते. त्यानंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी मागे सारलेल्या स्पर्धकातील एकुण एक व्यक्ती हजर होती, पण खुद्द फडणवीस यांचा त्यात समावेश नव्हता.… पुढे वाचा »
Labels:
‘द वायर मराठी’,
भाष्य,
राजकारण,
विश्लेषण,
सत्ताकारण
बुधवार, २७ नोव्हेंबर, २०१९
राज्यांतील निवडणुका आणि मोदीलाट
-
देशाच्या विधानसभांमधून भाजप कसा आता हद्दपार झाला आहे म्हणून ’मोदी लाट हटली’ किंवा ’मोदींची कामगिरी पाहा’ म्हणणार्यांनो जरा थांबा. मोदींचे मूल्यमापन मोदी ज्या भूमीवर लढतात तिथेच व्हायला हवे. पोटनिवडणुकांमध्ये अगदी उ.प्र.च्या मुख्यमंत्री नि उपमुख्यमंत्र्यांच्या मतदारसंघात भाजप पराभूत झाला होता, पण २०१९ च्या मध्यावधी निवडणुकांत उ.प्र. मध्ये पुन्हा भाजपने ९०% जागा जिंकल्या. राजस्थान, म.प्र., छत्तीसगड मध्येही विधानसभा गमावूनही मोदींच्या भूमीवर म्हणजे लोकसभा निवडणुकीत जवळजवळ १००% यश मिळवले आहे. गंमत म्हणजे महाराष्ट्राचे हे नाट्य रंगलेले असताना राजस्थानातील स्थानिक स्वराज्य संस्थातून काँग्रेसने प्रचंड मुसंडी मारत २३ ठिकाणी आपले वर्चस्व स्थापन केले, तर भाजप फक्त सहा ठिकाणी सत्ताधारी झाला.… पुढे वाचा »
शोले पुन्हा पाहिल्यानंतर
-
विषयसंगतीमुळे हा लेख ’ वेचित चाललो... ’ या ब्लॉगवर हलवला आहे. तो इथे वाचता येईल. - oOo - पुढे वाचा »
मंगळवार, २६ नोव्हेंबर, २०१९
विचार आणि सत्ता
-
विचार नि विश्लेषण कितीही दर्जेदार, व्यापक हितकारी वगैरे असले, तरी जोवर त्यांची अंमलबजावणी होत नाही, तोवर त्यांना सुविचाराच्या वहीत लिहून ठेवलेल्या संदर्भहीन सुविचाराइतकेच महत्व असते ... किंवा ज्यावर कधीही प्रश्न न विचारता त्यातील मजकूर शिरोधार्य मानायचा असतो अशा धर्मग्रंथांसारखे! अंमलबजावणी करायची तर सत्ता हवी, आणि सत्ता हवी असेल तर आपले सोवळे उतरवून थोड्या तडजोडीला तयार असावे लागते. हे शहाणपण ’काँग्रेस, भाजप दोघेही वैट्टं वैट्टं’ हा जप करत बसलेल्या आणि राजकीय ताकद शून्य झालेल्या समाजवाद्यांना किंवा बुद्ध्यामैथुन करत बसलेल्या समाजवादी आणि कम्युनिस्टांना यायला हवे. जिवंत राहिला तर माणूस बळ वाढवून नंतर शत्रूशी लढू शकेल. त्यासाठी प्रतिस्पर्ध्यांपैकी एकच प्रचंड ताकदवान होऊ नये यासाठी प्रसंगी … पुढे वाचा »
Labels:
जिज्ञासानंद,
तत्त्वविचार,
पुरोगामित्व,
भाष्य,
भूमिका,
सत्ताकारण
रविवार, २४ नोव्हेंबर, २०१९
गिव एव्हरी डेविल हर ड्यू
-
मला राजकीय मते आहेत हे उघडच आहे. ती मी कधीच लपवली नाहीत. पण याचा अर्थ मी एक बाजू घेऊन ती बाजू पवित्र नि योग्य, त्या बाजूच्या माणसाने, पक्षाने, नेत्याने म्हटले ते तंतोतंत खरे असे म्हणत तलवारी घेऊन कुणावर हल्ले केले नाहीत. शाब्दिक हल्ले नक्कीच केले आणि करतही राहीन, पण ते माझ्या स्वत:च्या मतांसाठी, इतर कुणाच्या मला मनातून न पटलेल्या मुद्द्यावर समर्थन करण्यासाठी नाही. अमुक मत माझ्या बाजूच्या बहुसंख्येचे, जातीचे, धर्माचे, पक्षाचे, नेत्याचे आहे ’म्हणून’ माझे असायला हवे, नि मला पटत नसून खाली डोके वर पाय करुन, एक डोळा मुडपून, एक तिरळा करुन, नाकपुड्या फेंदारून अष्टवक्रासनात बसून कसे बरोबर दिसते, अशा मखलाशा करणे यात काही शहाणपणा आहे असे मला वाटत नाही. मी माझीच मते मांडतो. ती इतर कुण्या व्यक्तीच्या, गटाच्या, गावच्या, गल्लीतल्या, पेठेतल्या, ओसाडग… पुढे वाचा »
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पण्या (Atom)







