-
राज्य सरकार मुस्लिमांसाठी ५% आरक्षण देणार अशी बातमी वाचली. तीन पायांच्या सरकारचा हा निर्णय अनेक अर्थांनी ‘बुडत्याचा पाय खोलात’ नेणारा आहे. पहिला मुद्दा आहे तो राजकीय आरोपाचा, मुस्लिम लांगुलचालनाचा. भाजपचे माथेफिरू हिंदुत्व याचा फायदा उठवणार हे तर उघड आहे. तीन पायांच्या सरकारमधली सेना आपले हिंदुत्व पुरेसे सिद्ध करून बसलेली असल्याने भाजपच्या हातात कोलित मिळाले तरी त्याची झळ सोसण्यास दोन काँग्रेस सोबत असल्याने, आणि शिक्षणखाते सेनेच्या वाट्याला आलेले नसल्याने, सहजपणे हात वर करू शकेल. राष्ट्रवादीचे धोरण ‘गंगा गए गंगादास, जमना गए जमनादास’ असे असल्याने भाजप त्यांनाही फार टोचणार नाही. पण काँग्रेस मात्र यात साऱ्याला अंगावर घेऊन आणखी खोल गर्तेत जाणार आहे. याला एकाहून अधिक कारणे आहेत. पहिले म्हणजे सध्या चालू असलेल्या सीएएविरोधी आंदोलनाच्या बाजूल… पुढे वाचा »
Indexes Menu_Desktop
| संपूर्ण सूची : |
मंगळवार, ३ मार्च, २०२०
महाराष्ट्र काँग्रेसला अटक करा…
सोमवार, २ मार्च, २०२०
सावरकरांना भारतरत्न का मिळत नाही?
-
अलीकडच्या काळात सावरकर हा अतिशय ज्वलंत विषय होऊन राहिला आहे. कुणाच्या दृष्टीने ते स्वातंत्र्यवीर असतात, तर कुणाच्या दृष्टीने ते माफीवीर असतात. कुणाच्या दृष्टीने पन्नास वर्षे शिक्षा झालेले एकमेव स्वातंत्र्यसैनिक असतात, तर दुसर्यांच्या दृष्टीने ते ब्रिटिशांच्या पेन्शनवर जगणारे परजीवी असतात. या सावरकरांना भारतातील सर्वोच्च बहुमान, ’भारतरत्न’ द्यावा अशी मागणी अधूनमधून होत असते. अलीकडे हिंदुत्ववाद्यांची राजकीय घोडदौड सुरु झाल्यापासून ती अधिक जोरकसपणे मांडली जाऊ लागली आहे. हा बहुमान त्यांना द्यावा की देऊ नये यावरील वादात न पडता, "सहा वर्षे केंद्रात हिंदुत्ववादी सरकार असूनही तो का दिला जात नसावा?" या मर्यादित प्रश्नाचा वेध घेऊ . सेल्युलर जेल, अंदमान येथे पंतप्रधान मोदी सावरकरांना वंदन करताना (२०१८) फोटो… पुढे वाचा »
रविवार, १ मार्च, २०२०
केजरीवालांच्या नेतृत्वाखाली तिसरी आघाडी...?
-
( 'केजरीवालांच्या नेतृत्वाखाली तिसरी आघाडी हा पर्याय असेल का?' या प्रश्नाच्या अनुषंगाने केलेला विचार... ) तिसरी आघाडी हे नेहमीच स्वार्थलोलुप, परस्परविरोधी आणि मुख्य म्हणजे संकुचित वर्तुळाची आकांक्षा असलेल्या पक्षांचे कडबोळे असते. ते एकाच वेळी इन्क्लुझिव आणि एक्स्लुझिव असते. त्याचे कम्पोझिशनही स्थानिक स्वार्थांच्या रेट्यामुळे बदलते राहते. हा काही टिकाऊ पर्याय नव्हे. केजरीवाल देशव्यापी पक्षाचा विचार करतील तर ठीक अन्यथा ते ही त्या कडबोळ्यातले एक होऊन बसतील. या कडबोळ्याला नेता कधीच नसतो, त्यामुळॆ 'केजरीवालांच्या नेतृत्वाखाली तिसरी आघाडी’ असे म्हणण्याला अर्थच नाही . तिथे सारेच स्वयंभू असतात. त्यामुळॆ समाजवाद्यांमध्ये जसे द. शुक्रवार पेठेतले समाजवादी आणि पू. शुक्रवार पेठ समाजवादी असे भेद राहून रस्सीखेच चालू असते तसेच तिसरी आघाडी … पुढे वाचा »
बुधवार, १२ फेब्रुवारी, २०२०
‘आप’च्या विजयानंतर...
-
’आप’च्या विजयाने देशाचे राजकारण बदलेल, आप आता भाजपचा (काहीजणांच्या मते एकमेव) पर्याय आहे, मोदींची घसरण चालू झाली वगैरे कोटीच्या कोटी उड्डाणे ऐकून थोडेसे लिहिले आहे. कन्हैया भरात होता तेव्हा लिहिले त्याच चालीवर... --- ‘आप’चा विजय स्वागतार्ह आहेच. पण लगेच हुरळून जाण्यात अर्थ नाही. राजकारणात असा भाबडेपणा उपयोगी ठरत नाही. तिथे चोख धूर्तपणा आवश्यक असतो. प्रथम ‘आप’चे मॉडेल स्केलेबल आहे की नाही हे तपासावे लागेल. इतर राज्यांसमोर अनेक मुद्दे असतात जे दिल्लीत अस्तित्वात नाहीत. उदा. पोलिस यंत्रणा अधिपत्याखाली नसल्याचा किती फायदा असतो हे लक्षात घ्या. दिल्लीतील सर्व लॉ अँड ऑर्डर प्रॉब्लेमसबाबत केजरीवाल उत्तरदायी नव्हते. दिल्ली हे महानगर आहे, तिथे मोठ्या राज्यात असलेल्या ग्रामीण समस्या अस्तित्वात नस… पुढे वाचा »
मंगळवार, ११ फेब्रुवारी, २०२०
जरा डावे, जरा उजवे, कांद्यावरती बोलू काही
-
( फेसबुकवर एका मित्राच्या ’कांदा निर्यातबंदी हा समाजवादी पर्याय म्हणावा की भांडवलशाही?' या प्रश्नाला उत्तर म्हणून लिहिलेली पोस्ट. त्यात आणखी एका मुद्द्याची भर घालून इथे पोस्ट केली आहे. ) मला नेहमीच, आणि जगण्याशी निगडित सर्वच मुद्द्यांबाबत असे वाटते की ’हे की ते’ ही द्विपर्यायी मांडणी बहुधा बाळबोध असते. तसे करुच नये. ज्यांना एका विचारसरणी वा मॉडेलवर आपली निष्ठा मिरवायची असते, तेच असा अगोचरपणा वारंवार करतात. अवघड प्रश्नांची सोपी उत्तरे त्यांना हवी असतात म्हणून समस्येचे असे सुलभीकरण ते करत असतात. कांदे (अथवा कोणताही शेतमाल) महागला की ’बजेट कोलमडले’ म्हणून ओरड करणारे जितके चूक तितकेच ’या पुण्या-मुंबईकडच्या मध्यमवर्गीयांच्या सोयीसाठी सरकार भाव पाडते’ असा बाळबोध विचार करणारेही तितकेच चूक असतात, कारण ते समस्येचे संपूर्ण आकलन करुन न घेता … पुढे वाचा »
रविवार, ९ फेब्रुवारी, २०२०
जग जागल्यांचे ०३ - जिन्हे नाज़ था हिंद पर... : सत्येंद्र दुबे
-
रोशचा रोष: स्टॅन्ले अॅडम्स « मागील भाग --- देशातील चार महानगरांसह अनेक प्रमुख शहरांना जोडणार्या ’स्वर्णिम चतुर्भुज (Golder Quadrilateral) या भारतातील महत्वाकांक्षी प्रोजेक्टची पायाभरणी १९९९ मध्ये करण्यात आली. प्रकल्पाची व्याप्ती आणि महत्व लक्षात घेता अशा प्रकारच्या कामांचा दीर्घ पूर्वानुभव, आवश्यक तंत्रज्ञान, अत्याधुनिक साधनसामुग्री आवश्यक होते. त्यासाठी आंतरराष्ट्रीय निविदा मागवण्यात आल्या होत्या. राष्ट्रीय महामार्ग क्र. २ (’ग्रॅंड ट्रंक रोड’ ) हा या जाळ्याचा भाग होणार होता. जुलै २००२ मध्ये या महामार्गावरील औरंगाबाद-बाराचेट्टी विभागात सत्येंद्र दुबे या अभियंत्याची प्रकल्प संचालक म्हणून नेमणूक झाली. सत्येंद्र हे पहिल्यापासूनच अतिशय आदर्शवादी होते असे त्यांचे बंधू सांगतात. कामावर रुजू झाल… पुढे वाचा »
Labels:
‘दिव्य मराठी’,
जग जागल्यांचे,
जिज्ञासानंद,
पायाभूत सुविधा
शुक्रवार, ७ फेब्रुवारी, २०२०
फेसबुक फुटकळांचा फळा
-
फेसबुक फुटकळांचा फळा काहीही खरडा आणि पळा म्हणती आम्हां कळवळा सकलांचा बालकांपायी घुंगुरवाळा माकडांहाती खुळखुळा पोस्ट-धार सोडे फळफळा खरासम विरेचक होई सकळां जरी बुद्धीने पांगळा तुंबला असे, मोकळा सहजची बुद्धिमांद्याची कळा कळकटांची चित्कळा घेई तज्ज्ञाचीही शाळा मूढ बाळ ररा म्हणे, हा वगळा विखारबुद्धी बावळा उच्छिष्टावरी कावळा भासतसे - रमताराम - oOo - पुढे वाचा »
रविवार, २६ जानेवारी, २०२०
जग जागल्यांचे ०२ - रोशचा रोष : स्टॅन्ले अॅडम्स
-
व्यवस्था आणि माणूस « मागील भाग --- २००९ मध्ये भारतात ’स्वाईन फ्लू’चा उद्रेक झाला. या आजाराने झालेल्या मृत्यूंची संख्या हजारांत पोचली. यावर परिणामकारक ठरणारे एकच औषध होते, त्याचे नाव ’टॅमिफ्लू’. हे औषध १९९९ साली बाजारात आणले गेले, आणि उत्पादकाचा त्यावरील एकाधिकार संपण्याच्या सुमारास या आजाराचा जगभर उद्रेक झाला. या योगायोगाबद्दल अनेकांनी संशय व्यक्त केला होता. या औषधाची निर्माती होती स्वित्झर्लंड-स्थित ’हॉफमान-ला-रोश’, जिच्याबद्दल असा संशय घेण्यास पुरेसा इतिहास होता. संशोधन-खर्च भरून येण्यासाठी औषध निर्मिती कंपन्यांना औषध बाजारात आल्यावर काही काळ एकाधिकार दिलेला असतो. ब्रिटनमध्ये व्हॅलियम आणि लिब्रियम या उपशामक (tranquilizers ) औषधांचे रोशकडे असलेले एकाधिकार संपल्यावरही रोशने अन्य उत्पादकांना त्याचे उत्पादन-अधिकार देण्याच्या ब्रिटिश … पुढे वाचा »
Labels:
‘दिव्य मराठी’,
आरोग्यव्यवस्था,
जग जागल्यांचे,
जिज्ञासानंद,
भांडवलशाही
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पण्या (Atom)







