Vechit Marquee

Indexes Menu_Desktop

संपूर्ण सूची :

गुरुवार, २७ ऑगस्ट, २०२०

सामूहिक नेतृत्वाची पिपाणी आणि त्रात्याचा शंख


  • नोटाबंदीसह अनेक निर्णयांचे फटके खाऊनही भारतीय जनतेने मोदींना पुन्हा भरघोस मतांनी का निवडून दिले याचे कोडे भारतीय बुद्धिजीवींना अजूनही उलगडलेले नाही. याचे कारण ’काय योग्य नि काय अयोग्य’ या मूल्यमापनातून, विचारांच्या व्यूहातून बाहेर येऊन, निकषांआधारे विचार करण्याऐवजी, जमिनीवरच्या वास्तवाची - भले ते त्यांच्या दृष्टीने तर्कसंगत नसेल त्याची - दखल घेऊन, त्याआधारे भारतीय राजकारणाचा विचार करत नाहीत ही त्यांची समस्या आहे . कोरोनाच्या साथीमुळे जगण्याची सारी उलथापालथ होऊनही जनतेचा मोदींवरील विश्वास अद्यापही कमी झालेला नाही, असे अहवाल अलिकडेच प्रसिद्ध झाले आहेत. भाट माध्यमांचे म्हणून भले ते खोडून टाकता येतील, पण आसपास कानोसा घेतला तर या पडत्या काळाचा ज्यांना फटका बसला आहे, ते ही यातून बाहेर पडण… पुढे वाचा »

रविवार, ९ ऑगस्ट, २०२०

जग जागल्यांचे ११ - ग्रीनहाऊस माफियांचा कर्दनकाळ: गाय पीअर्स


  • पर्यावरणाचा पहारेकरी: विल्यम सँजुअर « मागील भाग --- मागच्या वर्षी नोव्हेंबर महिन्यात ऑस्ट्रेलियामध्ये भडकलेल्या वणव्याने प्रचंड वनसंपत्ती, लक्षावधी वन्यजीवांचा संहार केला. मानवी संपत्तीलाही उध्वस्त करत हा वणवा तब्बल तीन महिने धुमसत होता. त्याहीपूर्वी अमेझॉनच्या जंगलात दहा महिने थैमान घातलेल्या वणव्याने नऊ हजार स्क्वेअर कि.मी. चे क्षेत्र जाळून भस्म केले होते. ब्राझीलच्या अध्यक्षाने हा वणवा आटोक्यात आणण्यात हेळसांड तर केलीच, पण अन्य देशांची मदत नाकारुन एक प्रकारे हा वणवा पसरण्यास मदतही केली. याची झळ बोलिव्हिया, पेरु, पॅराग्वे या देशांतही पसरली. त्या तुलनेत ऑस्ट्रेलियाचा प्रतिसाद अधिक नेमका होता... याचे कारण त्यांनी अनुभवलेला हा पहिलाच वणवा नव्हता. एकोणीसाव्या शतकापासून अशा व्यापक वणव्यांचा सामना त्यांना करावा लागलेला आहे. विसाव्या शतकाच… पुढे वाचा »

शुक्रवार, ७ ऑगस्ट, २०२०

बुद्धिबळातील मार्शल-आर्ट


  • विषयसंगतीमुळे हा लेख ’ वेचित चाललो... ’ या ब्लॉगवर हलवला आहे. तो इथे वाचता येईल. - oOo - पुढे वाचा »

शुक्रवार, २४ जुलै, २०२०

त्याला खुर्ची आवडते


  • https://seenpng.com/ येथून साभार. ( कवी सौमित्र यांची क्षमा मागून) ह्याला खुर्ची आवडते, त्याला खुर्ची आवडते आघाडीत विसंवाद झाला की मन म्हणते, ’आधीच खुर्ची माझ्यापासून फार दूर नाही, सत्तेचं ह्याचं गणित खरंच मला कळत नाही.’ खुर्ची म्हणजे ऊब सारी, खुर्ची म्हणजे परिमळ खुर्चीविना राहायचे म्हणजे व्हायची नुसती परवड म्हणे- खुर्ची नियत खराब करते, खुर्ची जबाबदारी पण खुर्चीसोबत मिळते ना चोख जहागिरदारी खुर्ची करी आपली कामे, खुर्ची म्हणजे सर्व सुखात गुपचुप निसटुन मन जाऊन बसतं केंद्रात. दरमहा संधी येते, दरमहा असं होतं खुर्चीवरुन निसटून पडून लोकांमध्ये हसं होतं हा आवडत नसला तरी खुर्ची त्याला आवडते ह्याने लवकर सोडावी म्हणून तो ही झगडतो रूसू… पुढे वाचा »

गुरुवार, १६ जुलै, २०२०

इतिहासाचे अवजड ओझे (‘मॅन इन द आयर्न मास्क’च्या निमित्ताने)


  • विषयसंगतीमुळे हा लेख ’ वेचित चाललो... ’ या ब्लॉगवर हलवला आहे. तो इथे वाचता येईल. - oOo - पुढे वाचा »

शनिवार, ११ जुलै, २०२०

कला, कलाकार आणि माध्यमे


  • विषयसंगतीमुळे हा लेख ’ वेचित चाललो... ’ या ब्लॉगवर हलवला आहे. तो इथे वाचता येईल. - oOo - पुढे वाचा »

गुरुवार, ९ जुलै, २०२०

खुनी सुरा


  • ( प्रेरणा: कुसुमाग्रजांची `खुनशी सुरे’ ही कविता ) भरचौकात एका सुर्‍याने एका माणसाची हत्या केली पोलिसाच्या हाताने मग त्या सुर्‍याला अटक केली. सुरा धरणारा हात म्हणे, ’खून करणारा सुराच, त्याच्यावर माझे काहीच नियंत्रण राहिले नाही*.’ कलम धरलेल्या हाताने सुरा धरलेल्या हाताचा युक्तिवाद मान्य करत त्याला निर्दोष मुक्त केला. दशकांनंतर निकाल आला सुरा संपूर्ण दोषी ठरला ’मरेपर्यंत वितळवण्याची शिक्षा हवी’ जमाव गर्जला. ’असे समाजविघातक सुरे अशांतीचे दूत असतात.’ म्हणत कलमवाल्या हाताने त्यावर शिक्का उमटवला. सुर्‍याच्या शिक्षेसाठी मग सुरा बनवणारा हात आला ’नव्यांसाठी हा कच्चा माल’ म्हणून जुना घेऊन गेला समारंभपूर्वक त्याने मग सुरा भट्टीत झोकून दिला ’शांतिदूत हा’ बघ्यांनी- त्यावर पुष्पवर… पुढे वाचा »

रविवार, ५ जुलै, २०२०

जग जागल्यांचे १० - पर्यावरणाचा पहारेकरी: विल्यम सँजुअर


  • मोर्देशाय वानुनू: एक चिरंतन संघर्ष « मागील भाग --- १९७४ सालच्या मे महिन्यात इलिनॉय राज्यात तीन गायी अचानक मृतावस्थेत आढळून आल्या. पोस्टमॉर्टेममध्ये त्यांचा मृत्यू सायनाइडच्या विषबाधेने झाल्याचे स्पष्ट झाले. सायनाइड हे नैसर्गिक वातावरणात आढळून येणारे रसायन नव्हे. तपासाअंती असे दिसून आले की तेथील जमिनीमध्ये मोठ्या प्रमाणावर सायनाइड, कॅडमिअम, शिसे, निकेल, जस्त वगैरे घातक द्र्व्ये मुरलेली आहेत. यांचा उगम होता जवळच असलेल्या ’बायरन सॅल्वेज यार्ड’मध्ये. ’बायरन सॅल्वेज यार्ड’ ही कचरा-डेपो (landfill) म्हणजे जमिनीवर कचरा जिरवण्याची जागा होती. बहुतेक उत्पादनप्रक्रियांदरम्यान निसर्गाला नि मानवालाही घातक अशी टाकाऊ द्रव्ये वा कचरा तयार होतो. अशा अनेक उद्योगांची उत्सर्जिते जिरवण्याची सेवा ही कंपनी पुरवीत होती. त्यांच्या ग्राहकांमध्ये तेलशुद्धिकरण कं… पुढे वाचा »