Vechit Marquee

Indexes Menu_Desktop

संपूर्ण सूची :

रविवार, ६ ऑगस्ट, २०२३

बिम्मच्या पतंगावरून - ५ : खेळ सावल्यांचा


  • ( प्रसिद्ध लेखक जी.ए. कुलकर्णी यांच्या ‘बखर बिम्मची’ या छोटेखानी पुस्तकाचे बोट धरून केलेला हा प्रवास ) आपल्या पक्ष्याचा शोध « मागील भाग --- माणसाचे मूल जन्मत: परावलंबी असते. सुरुवातीचे काही महिने ते पूर्णपणे आई-वडिलांच्या निर्णयांच्या नि कृतीच्या अधीन असते. काय खावे, केव्हा खावे, काय परिधान करावे वगैरे किमान निर्णयही पालकांच्या अधीन असतात. पुढे मूल बसते, चालते झाले की त्याला स्वत:च्या निर्णयाने जागा बदलता येते– पण तरीही त्या निवडीला घराचे भौतिक बंधन असतेच. त्यातून बाहेर पडण्याचा निर्णय त्याहून अधिक काळ पालकांच्या अधीन असतो. या टप्प्यातच त्याचा घराबाहेरील सजीव निर्जीव गोष्टींशी परिचय होत जातो. परिचय दृढ झाला की त्यातून त्यांच्याशी बंध वा नाते प्रस्थापित होत जातात. आणि असे बंध स्मरणांच्या स्वरूपात त्याच्यासोबत मनात नि घरात प्रवेश … पुढे वाचा »

मंगळवार, १ ऑगस्ट, २०२३

काका सांगा कुणाचे...?


  • महारठ्ठदेशी दुसरे बंड होई. राष्ट्रवादी नामे महाराष्ट्रवादी पक्षाचे दहा लोक शिंदे सरकारांच्या दरबारी रुजू होती. इतर अनेकांनी सरकारपक्षाकडे प्रयाण केल्याचे ऐकू येई. परंतु अध्यक्ष कानावर हात ठेवी. म्हणे आम्हांसी काई ठाऊक नाही. परंतु ठोस कारवाई ना करी. चेले सारे अधिवेशनाला दांडी मारिती. कुणाचा कोण काही कळेना होई. कार्यकर्ता संभ्रमित होई. दादांना पुसे, ’काका कोणाचे?’ दादा गालातल्या गालात हसे नि गुणगुणू लागे... ( शान्ताबाईंची क्षमा मागून.) ल ल्ला लला ललला, ल ल्ला लला ललला काका सांगा कुणाचे? काका माझ्या मोदींचे ! मोदी सांगा कुणाचे? मोदी माझ्या काकांचे ! चवल्यापावल्या (१) चळतात, सत्तेच्या रिंगणी धावतात नाना संगे दादा अन्‌ भवती, सेनेचे शिंदेही धडपडती ! आभाळ हेपले वरचेवरी, का… पुढे वाचा »

सोमवार, ३१ जुलै, २०२३

बा कपिल देवा,


  • बा कपिल देवा, तुम्हांसि नव्या पिढीतील खेळाडूंचे पैसे पाहून पोटात दुखते हे बरे नव्हे. उठसूठ आयपीएलच्या नावे खडे फोडताना या प्रकारच्या बाजारू खेळाचे उद्गाते आपणच आहोत हे विसरु नये. आयपीएलपूर्वी ’झी’च्या सुभाष चंद्रा यांनी चालू केलेल्या ’इंडियन क्रिकेट लीग’चे (ICL) पहिले सूत्रधार आपणच होतात हे लोक विसरले असतील असे समजू नये. आयपीएल वा पैशाच्या मागे लागणारे खेळाडू ही वाईट गोष्ट असेल तर त्याची पायाभरणी दस्तुरखुद्द आपणच केलेली आहे. वृथा नैतिकतेचा आव आणू नये. याच आयपीएलमधून उभ्या केलेल्या पैशातून बीसीसीआयने घसघशीत पैशांची थैली आपल्या ओटीत घातली होती, तेव्हा दर्जेदार क्रिकेटचे रक्त आपल्या हाती लागले आहे असे तुम्हाला वाटले नसावे. २००७ साली ICL चे विजेतेपद मिळवणार्‍या चेन्नई सुपरस्टार्सचा कर्णधार स्टुअर्ट लॉ. सोब… पुढे वाचा »

रविवार, ३० जुलै, २०२३

आंब्याचे सुकले बाग


  • ( कवि अनिल यांची क्षमा मागून.) आंब्याचे सुकले बाग, नासली सारी अढी बरळली छपरी मिशी, मु.पोस्ट सबनीसवाडी मनी तिच्या जळे आग, नेहरु नामे अंग भाजे गांधी नामे वणवा पेटे, ठणाठणा तोंड वाजे या दो नावांची लागे, झळ आतल्या जीवा गाभ्यातील जीवनरस, सुकत ओलावा किती जरी केला शंख, बोंबाबोंब केली आंब्याचे सुकले बाग, चारलोकी शोभा झाली - कवि स्वप्निल - oOo - पुढे वाचा »

शुक्रवार, २८ जुलै, २०२३

उंबरठ्यावरून


  • ’ कुण्या एकाची सत्तागाथा ’ आणि 'ह्याला भाजप आवडत नाही...' या ’राजकीय विरहगीता’नंतर त्याच दोन मित्रांच्या राजकीय जीवनातील एक टप्पा. ( संदीप खरे यांची क्षमा मागून.) मन तळ्यात, मळ्यात… ताईच्या खळ्यात (१) ॥ध्रु.॥ सत्ता साजुकसा तूपभात त्याच्या नि तुझ्या ताटात ॥१॥ मनी खुर्चीचे मृगजळ तुझ्या हाकेची साद कानात ॥२॥ इथे काकाला सांगतो काही... काही बाही... तुझी-माझी गट्टी मनात ॥३॥ उतू जाई उर्मी चित्तातून तुझा सारथी (२) उभा दारात ॥४॥ माझ्या नयनी सत्ता-चांदवा आणि गूज तुझ्या डोळ्यात ॥५॥ - बोलिन खरे --- (१). शेतातील खळे. (२).ड् रायव्हर. - oOo - (‘बंडूची फुले’ या आगामी काव्यसंग्रहातील ‘दादा-नानांच्या कविता’ या विभागातून.) पुढे वाचा »

सोमवार, १७ जुलै, २०२३

जम्प-कट - ७ : एकाधिकार ते विनिमय-व्यवहार


  • अजन्मा जन्मासि आला (उत्तरार्ध) « मागील भाग --- एकाधिकार नागर आयुष्यामध्ये भटक्या कुत्र्यांच्या टोळ्या हा माणसाचा शेजार आहे. आपल्या मालकाबरोबर फिरायला आलेल्या पाळीव कुत्र्याने आपल्या अधिकारक्षेत्रात अतिक्रमण केल्याच्या भावनेतून त्याच्यावर खच्चून भुंकणार्‍या या टोळ्यांसोबत सहजीवन माणसाने स्वीकारले आहे. दोन प्रतिस्पर्धी शेजारी टोळ्यांमध्ये रात्री-अपरात्री भडकणार्‍या हद्दीच्या लढायांचे आपण जागृत(!) साक्षीदार असतो. लांडग्यांचा समूहघोष अधिकारक्षेत्राची निश्चिती आणि संरक्षण हा अतिप्राचीन काळापासून प्राणिजीवनाचा अविभाज्य भाग आहे. कुत्र्यांप्रमाणेच माकडांच्या, लांडग्यांच्या वा जंगली कुत्र्यांच्या टोळ्यांचे प्रदेश त्यांनी आखून घेतलेले असतात. वाघ-सिंहादी मार्जारकुलातील प्राण्यांमध्येही ही हद्द… पुढे वाचा »

शनिवार, ८ जुलै, २०२३

बॉटासुराचा उदयास्त


  • दर महिन्याच्या अखेरीस मी ब्लॉगचा आढावा घेत असतो. पोस्ट, ड्राफ्ट्स वगैरेसह मी तिथे वाचक-राबता कसा आहे हे ही पाहात असतो. मागील महिन्यात माझ्या ‘वेचित चाललो...’( vechitchaalalo.blogspot.com ) या ब्लॉगवर वाचक-राबता प्रचंड वाढला आहे असे दिसून आले. पहिली प्रतिक्रिया ‘व्वा: आपला ब्लॉग बरेच लोक वाचू लागलेले दिसतात.’ अशी होती. पण नंतर असे दिसले की एरवी सरासरी मासिक वाचनांच्या जवळजवळ दहापट वाचने झाली आहेत. हे अजिबात संभाव्य नाही असे माझे मत आहे. कारण एकतर ब्लॉग मराठीमधून, त्यात जेमतेम दीड-एकशे पोस्ट्स. इतक्या वेगाने वाचायचे म्हणजे काही हजारात लोक इकडे वळायला हवेत. हे अशक्यच आहे. थोडे खणल्यावर लक्षात आले अगदी दर तीन ते पाच मिनिटाला एक या वेगाने हिट्स मिळत आहेत. मग डोक्यात प्रकाश पडला, की कुणीतरी बॉट(BOT) लावून ठेवलेला दिसतो. … पुढे वाचा »

बुधवार, १४ जून, २०२३

जम्प-कट - ६ : अजन्मा जन्मासि आला (उत्तरार्ध)


  • अजन्मा जन्मासि आला (पूर्वार्ध) « मागील भाग --- Pope Francis addresses the crowd before delivering his Easter message from the main balcony of St. Peter’s Basilica at the Vatican on 16th April 2017 . जगभरातील प्रत्येक माणसांत एक संभ्रमित जनावर दडलेले असते. जनावरांच्या तुलनेत माणसाची ग्रहणशक्ती जितकी वाढली आहे त्या मानाने आकलनशक्ती अजून बरीच मागे आहे. त्यामुळे अनेकदा माणसाला अनेक प्रश्नांना, माहितीला, समस्यांना सामोरे जावे लागते ज्याच्याबाबत काय करायचे हे त्याला/तिला उमगत नाही. समस्या समोर असते पण तिच्या कारणांचे आकलन त्याला/तिला झालेले नसते. अशा वेळी एकतर कुणाला तरी ते झाले आहे आणि त्या समस्यांचे उत्तर त्याच्याकडे आहे असे गृहित धरणे सोयीचे असते. काळाच्या त्या प्राचीन तुकड्यात… पुढे वाचा »