-
Game of Thrones या मालिकेतील The House of Black and White (Season 5, Episode 2) या भागातील एक स्थिरचित्र. ते होतं शहर गुलामांचं... तिथे मूठभर मालक नि ढीगभर गुलाम. ती, एक परागंदा राणी... अवतरली तिथे, त्यांची मसीहा म्हणून तिने तोडल्या त्यांच्या शृंखला तिच्या एकनिष्ठ सैनिकांच्या मदतीने त्यांच्या हाती तिने दिली त्यांना दुर्मिळ अशा स्वातंत्र्याची सनद! ते ‘स्वतंत्र गुलाम’ म्हणाले, ही तर आमची ‘मिसा’, साक्षात माता ! ती निघाली पुढल्या शहरी, द्यायला आणखी स्वातंत्र्याच्या सनदा पण इकडे ते माजी गुलाम, आता रुतले स्वार्थ नि परस्पर तंट्यात जेंव्हा ते सारे गुलाम झाले तेव्हाच गहाण पडले त्या… पुढे वाचा »
Indexes Menu_Desktop
संपूर्ण सूची : |
शनिवार, २७ जून, २०१५
कलेवर
रविवार, २१ जून, २०१५
एका शापित नगरीची कहाणी
-
‘ऋषीचं कूळ आणि नदीचं मूळ शोधू नये’ अशी आपल्याकडे एक म्हण आहे. तरीही माणसं आपला इतिहास धुंडाळतात, हजारो वर्षांपूर्वीच्या कुण्या श्रेष्ठ व्यक्तीशी आपले नाते जोडून त्याला आपल्या वर्तमानातल्या अस्तित्वाचा आधार बनवू पाहतात. अनेक वर्षांच्या परंपरा असलेला समाज यात आपल्या अस्मितांची स्थानेही शोधत असतो. ज्यू, ख्रिश्चन आणि इस्लाम या तीन ‘बिब्लिकल’ धर्मांचे आणि त्यांच्या असंख्य पंथोपपंथांचे श्रद्धास्थान असलेल्या ‘जेरुसलेम’ नगरीला या सार्या परंपरांमधे अनन्यसाधारण महत्त्व आहे. एकाच नगरीचे अस्तित्व आणि महत्त्व इतका दीर्घकाळ टिकून राहिल्याचे दुसरे उदाहरण इतिहासात नाही. त्यामुळे जेरुसलेमचा इतिहास हा श्रद्धाळूंच्या दृष्टीने जितका महत्त्वाचा, तितकाच अभ्यासकांच्या दृष्टीनेही. पण जिथे श्रद्धांचा प्रश्न असतो, तिथे त्या अभ्यासात वस्तुनिष्ठता येणे बव… पुढे वाचा »
Labels:
‘मीमराठीLive’,
इतिहास,
जिज्ञासानंद,
पुस्तक,
संस्कृती,
समाज
आम्ही सारे स्टँप-कलेक्टर
-
मागच्या वर्षी २ ऑक्टोबरला नव्यानेच अधिकारारुढ झालेल्या सरकारने ‘स्वच्छ भारत अभियान’ची सुरुवात केली. गावात, खेड्यांपाड्यांत, शहरातील गल्लोगल्ली, स्वच्छ भारत अभियानाचा बोलबाला सुरू झाला. सर्व वृत्तपत्रांतून मोदींचा पूर्ण पानभर फोटो असलेल्या जाहिराती झळकू लागल्या. सारा सोहळा एकुणच वाजतगाजत पार पडला. वृत्तपत्रांतून, सोशल मीडियांतून आपण 'साजरा केलेल्या' स्वच्छता दिनाचे फोटो आणि रसभरीत वर्णने वाचायला मिळू लागली. दीर्घकाळ वेतन न मिळाल्यामुळे, भाजपाशासित पूर्व-दिल्ली महानगरपालिकेतील सफाई कामगारांनी प्रथम मार्च महिन्यात, आणि आता जून मधे तब्बल बारा दिवस संप केला. या काळात सार्या दिल्लीचा कचरा डेपो झालेला दिसला. ऑक्टोबरमधे हाती झाडू घेतलेले ते स्वयंसेवक, कार्यकर्ते या काळात कुठे सफाई करताना दिसले नाहीत. तसे मार्चमधे जेव्हा योगेन्द्र यादव … पुढे वाचा »
Labels:
‘लोकसत्ता’,
जिज्ञासानंद,
प्रासंगिक,
भाष्य,
राजकारण,
समाज
शनिवार, १३ जून, २०१५
चाले वाचाळांची दिंडी
-
४ जूनला मणिपूरमधल्या डोग्रा रेजिमेंटच्या जवानांच्या झालेल्या हत्येला जबाबदार असलेल्या दहशतवादी गटांच्या दोन तळांवर ९ तारखेला पहाटे भारतीय लष्कराने आणि वायुदलाने हल्ला करून ते उध्वस्त केले. या ऑपरेशनची माहिती ‘आर्मी हेडक्वार्टर्स’ तर्फे मे.ज. रणबीर सिंग यांनी माध्यमांना दिली. त्यानुसार भारतीय सैन्याने ‘म्यानमारच्या सहकार्याने’, ‘सीमेलगत’ दोन तळांवर हल्ला करून ते उध्वस्त केले. ‘वॉल स्ट्रीट जर्नल’ने भारतीय लष्कराने ‘म्यानमारच्या भूमीवर’ येऊन कारवाई केली असल्याचा, पण म्यानमारचे लष्कर यात प्रत्यक्ष सहभागी नसल्याचा, दावा म्यानमारच्या अध्यक्षांच्या कार्यालयाचे संचालक झॉ-ताय यांच्या हवाल्याने केला होता. परंतु AFP या वृत्तसंस्थेला दिलेल्या अधिकृत निवेदनात झॉ-ताय यांनी केवळ ‘सहमती नि सहकार्या’चा, यात म्यानमारचे लष्कर प्रत्यक्ष सहभागी झाले नसल्याचा… पुढे वाचा »
Labels:
‘दिव्य मराठी’,
आकलन,
जिज्ञासानंद,
राजकारण,
समाज
गुरुवार, ९ एप्रिल, २०१५
‘सायलेंट मोडमधल्या कविता’: नव्या जाणिवांची विचक्षण कविता
-
गेल्या पंचवीस-एक वर्षांचा काळ हा आपल्या जीवनात अनेक आमूलाग्र बदल घडवणारा ठरला. नव्वदीच्या दशकात बंदिस्त व्यवस्थेच्या काही खिडक्या उघडल्या जाऊन ‘जागतिकीकरण’ या नव्याच व्यवस्थेने या देशात हातपाय पसरायला सुरुवात केली. या बदलाचा एक मोठा भाग व्यापला तो तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात झालेल्या क्रांतीने. गेल्या शतकाच्या अखेरच्या दशकात आपल्या दारी आलेल्या संगणकाने, आणि या शतकाच्या सुरुवातीपासून आपल्या हाताला जणू सहावे बोट असावे असा चिकटून राहू लागलेला ‘मोबाईल’ या दोन महत्त्वाच्या आयुधांनी आपल्या जगण्याचे आयाम बदलले, व्याप्ती बदलली. जुन्या व्यवस्थेच्या पाईक असलेल्यांना हे बदल कुठे रुचेनासे झाले, ‘माणसे -मोबाईल नि संगणकावर - खूप बोलू लागली आणि संवाद कमी झाला’ असा आक्षेप या नव्या जीवनपद्धतीवर घेतला जाऊ लागला. पण या पलिकडे जाऊन तंत्रज्ञानाने माणसाच्या … पुढे वाचा »
Labels:
‘परिवर्तनाचा वाटसरु’,
आस्वाद,
पुस्तक,
साहित्य-कला
रविवार, ८ मार्च, २०१५
नागालँडमधील घटनेची परिमाणे आणि अन्वयार्थ
-
या आठवड्यातील गुरुवारी नागालँडमधे एका तथाकथित बलात्कार्याला संतप्त जमावाने तुरुंगातून खेचून बाहेर काढले, आणि मरेस्तोवर मारले. त्या मारहाणीने मृत्यू झाल्यावर त्याच्या मृतदेहाला भर चौकात फाशी दिल्याप्रमाणे टांगून ठेवले. जमावातील लोकांची संख्या आणि त्यांचा आवेश पाहता तुरुंगावर नेमलेले अधिकारी नि पोलिस यांना जमावाला विरोध करण्याची हिंमत झालीच नाही. या घटनेवरून सुमारे दहा वर्षांपूर्वी नागपुरात दोनेकशे स्त्रियांच्या जमावाने अक्कू यादव नावाच्या बलात्कार्याला, सराईत गुंडाला, भर रस्त्यावर दगडांनी ठेचून मारल्याची आठवण होणे अपरिहार्य होते. प्रथम संघटना उभी करून, तिच्या सहाय्याने स्वार्थी हेतू मनात ठेवून, हिंसक घटना घडवून आणल्याची उदाहरणे आपल्या देशात पैशाला पासरी मिळतात. पण मुळातच समाजातील एक असंघटित भाग एखाद्या आरोपीविरुद्ध वा गुन्हेगाराविरुद्ध… पुढे वाचा »
बुधवार, ११ फेब्रुवारी, २०१५
एफ-१, वन झीरो फाईव: तंबूत शिरू पाहणार्या उंटाची गोष्ट
-
लहानपणी आपण सार्यांनीच तंबूत शिरलेल्या उंटाची गोष्ट ऐकली असेल. थोडे डोके तंबूत आणू का, पोटाला थंडी वाजते आहे ते आत घेऊ का, शेपटावर माशा बसून चावताहेत ते आत घेऊ का, असे करत हळूहळू पुरा तंबूत शिरलेला नि अखेर मालकालाच हाकलून तंबूच बळकावून बसलेल्या उंटाची गोष्ट! मुळात मालकाने उंट पाळला, तो त्याची कामे करण्यासाठी पण अखेर तो मालकाचेच काही हिरावून घेऊ लागला. माणसाच्या जगण्यात असे अनेक अदृष्य उंट त्याच्या हक्काचे बरेच काही बळकावून बसलेले असतात, आधी डोके, मग पोट असे करत संपूर्णपणे तंबूत घुसून तो तंबूच ताब्यात घेतात. यात माणसाने स्वतःच निर्माण केलेल्या व्यवस्था फार मोठा वाटा बळकावताना दिसतात. काहीवेळा हे उंट जन्मतःच आपल्या बोकांडी बसलेले असतात, त्यांच्यापासून सुटका नसते. ‘या उंटांपासून आपले तंबू कसे वाचवायचे?’ असा वरकरणी साधा वाटणारा प्रश्न, सं… पुढे वाचा »
मंगळवार, १० फेब्रुवारी, २०१५
AAPtard मित्रांना अनावृत पत्र
-
माझ्या AAPtard मित्रांनो, या संबोधनाने तुम्ही मुळीच विचलित होणार नाही याची खात्री आहे. कारण तुमच्या नेत्याला त्याच्या आजारावरून, गळ्यातील मफलरवरून झालेल्या हिणकस शेरेबाजीला भीक न घालता तुम्ही त्याचा ‘मफरलमॅन’ बनवून चोख प्रत्युत्तर दिले होते. तसेच ‘रिटार्ड’शी साधर्म्य सांगणारे हे हिणकस संबोधनही तुम्ही मनावर न घेता गल्ली बोळातून आपले काम निष्ठेने चालू ठेवले नि दिल्लीत विजयश्री खेचून आणली. त्याबद्दल तुमचे मनापासून अभिनंदन. हे संबोधन देणारे स्वतःला तुमच्यापेक्षा बरेच बुद्धिमान वगैरे समजत असावेत. एखाद्या मंदबुद्धी समजल्या गेलेल्या भावाने, स्वतःला कुशाग्र बुद्धिमान समजणार्या भावाला दिलेली ही मात आहे, नुसती मातच नव्हे तर काही सेकंदात अस्मान दाखवणे आहे. तेव्हा आता हे संबोधनही तुम्ही अभिमानाने मिरवायला हरकत नाही. राज्याराज्यातून जमवलेली फौ… पुढे वाचा »
याची सदस्यत्व घ्या:
पोस्ट (Atom)