-
१. भारताला स्वातंत्र्य मिळाले तेव्हा सरदार पटेल ७२ वर्षांचे होते. २. त्यावेळी ते तीव्र मधुमेहाने आजारी होते. ३. डिसेंबर १९५० मध्ये त्यांच्या त्यांचा मृत्यू झाला. तेव्हा... ३अ. भारत स्वतंत्र होऊन तेव्हा जेमतेम तीन वर्षे झाली होती. म्हणजे तेव्हा पुन्हा ‘भारताचा शाप’(!) असलेले नेहरु पंतप्रधान झालेच असते. ३ब. अजून भारतातील पहिल्या निवडणुकाही पार पडल्या नव्हत्या. ४. ते स्वतंत्र भारताचे पहिले गृहमंत्री आणि भारतीय सेनेचे पहिले ‘कमांडर-इन-चीफ’ होते. आणि ज्या अर्थी संस्थानांचे विलीनीकरण करण्याचा निर्णय ते ‘एकट्याने’ घेऊ शकत होते, आणि तो ‘एकट्याने’ अंमलातही आणू शकत होते त्या अर्थी त्यांना शासनात भरपूर निर्णयस्वातंत्र्य नि अधिकार होते असे म्हणावे लागेल. ज्या अर्थी नेहरुंनी त्यांना यात स्वातंत्र्… पुढे वाचा »
Indexes Menu_Desktop
| संपूर्ण सूची : |
गुरुवार, ८ फेब्रुवारी, २०१८
नेहरु आणि पटेल: बाता आणि वास्तव
मंगळवार, २३ जानेवारी, २०१८
काही भारतीय माझे बांधव नाहीत
-
डार्विनची थिअरी सिद्ध झालेली नाही... आणि म्हणून आमचे ‘वेदवाक्य’च बरोबर आहे असे सत्यपालसिंग म्हणतात. एखादा कम्युनिस्ट हातभर लेख लिहून समाजवाद्यांचे पसाभर दोष दाखवतो... आणि म्हणून आमची मार्क्सची पोथी स्वीकारा म्हणतो. एखादा वाचाळ नेता प्रतिस्पर्धी पक्षाचे खरे खोटे दोष सातत्याने उगाळत बसतो... आणि मी असा नाही म्हणून मला निवडा म्हणतो. एखादा सरकारपुरस्कृत व्यवसाय करणारा प्रतिस्पर्धी उत्पादनांत ‘हानिकारक केमिकल’ आहेत असे सांगत बसतो... आणि म्हणून आमची उत्पादने खरेदी करा म्हणतो. एखादा धर्माभिमानी ज्या धर्मावर दांत धरुन असतो त्या धर्मातील खर्या खोट्या दोषांची सतत उजळणी करत बसतो... आणि म्हणून आमचा धर्म श्रेष्ठ आहे म्हणतो. एखादा जात्याभिमानी अन्य जातींच्या स्वार्थीपणाचे, लायकीहून अधिक मिळवत अस… पुढे वाचा »
गुरुवार, १८ जानेवारी, २०१८
कोटीच्या कोटी उड्डाणे*...
-
(‘अ.भा. छद्मविज्ञान काँग्रेस’च्या एक हजार आठशे तेराव्या वार्षिक अधिवेशनात सादर केलेला शोधनिबंध) जर्मनीत अठराव्या शतकात जन्मलेला सॅम्युअल हनिमान भारतीय वंशातला होता. हनिमान हे त्याचे कुलनाम ‘हनुमान’ याचे जर्मन रूप. हा रामायणकालीन हनुमानाचा वंशज होता. आफ्रिकेत जसे प्रत्येक वंशाचे जमातीचे एक झाड असते. तो वंश त्या झाडाच्या नावे ओळखला जातो. तसे भारतात मूळ पुरुषाच्या नावाने हे तर जगजाहीर आहेच. (त्यातून पुढे गोत्र संकल्पना आली.) खरा इतिहास हा की हनुमान हा वन्यज होता, पण तो वानर नव्हता. हिंदू नि हिंदुस्तानद्वेष्ट्या पाश्चात्त्य लोकांनी रामायणात प्रक्षेप करुन तसे लिहिले नि त्याचे महत्व कमी केले. पण हे करतानाच त्याचे कार्य, त्याचे ग्रंथ चोरुन नेऊन त्यातील ज्ञान, शोध, माहिती आपल्या नावावर खपवली. दु… पुढे वाचा »
Labels:
आरोग्यव्यवस्था,
जिज्ञासानंद,
मनोरंजन,
ललित,
वक्रोक्ती
रविवार, १४ जानेवारी, २०१८
आयुर्वेदाच्या नावे गोरखधंदा
-
‘आयुर्वेद ही स्वदेशी चिकित्सापद्धती आहे’ या एकाच मुद्द्याला धरून, तिला राष्ट्रप्रेमाशी जोडून घेऊन आणि ‘त्यातील औषधांचे साईड इफेक्ट्स नसतात’ या भंपक दाव्याची पुंगी सदोदित वाजवत अनेक तथाकथित औषधे ‘आयुर्वेदिक आहेत’ – खरंतर आयुर्वेदिय म्हणायला हवे– असा दावा करत खपवली जातात. ज्यांची ना कुठली क्लिनिकल ट्रायल होते ना कुठला अभ्यास. पुन्हा काही साईड इफेक्ट्स दिसून आलेच तर ‘हे आयुर्वेदिक आहे, साईड इफेक्ट्स नसतात. तुमचे ते त्रास दुसर्याच कशामुळे झाले असणार’ असे म्हणत हात वर करता येतात. अलीकडे राष्ट्रभक्तीच्या पेहरावात नटून थटून वावरणारी आयुर्वेदाची ही नवी ब्रँच आरोग्याशी – अर्थात अडाणी रुग्णांच्या – खेळत असते. एका क्लिनिकल ट्रायलला किती काळ लागतो, किती पैसा लागतो, किती अद्ययावत यंत्रणा लागते याची क… पुढे वाचा »
शनिवार, २३ डिसेंबर, २०१७
छद्म पर्यावरणवाद्यांचा धोका
-
‘ काही जमाती अधिक भ्रष्ट आहेत का? ’ या मागील लेखात उल्लेख केल्याप्रमाणे, आमच्या कंपनीच्या सॉफ्टवेअरच्या सहाय्याने एक महत्त्वाचा प्रश्न धसास लावण्यात आल्यामुळे कंपनीला समाजाच्या एका गटात प्रतिष्ठा मिळाली. पण तलवारीला दोन्ही बाजूंनी धार असते हे लवकरच कंपनीला दिसून आले. काही काळानंतर एका (बहुधा ग्रीन-पीस) पर्यावरणवादी संघटनेचे लोक कंपनीसमोरच्या फुटपाथवर जमले, आणि कंपनीच्या नि विशेष करुन आमच्या चेअरमनच्या नावे निषेधाच्या घोषणा देऊ लागले. हे आंदोलन बराच काळ चालले होते. त्यांनी चेअरमनच्या नावे लिहिलेल्या बॅनरवर त्याला चक्क प्राणी-द्वेष्टा ठरवून टाकले होते. मागच्या लेखात उल्लेख केलेले तेच सॉफ्टवेअर हे सॉफ्टवेअर एकाच स्वरुपाच्या मूल्यमापनासाठी नव्हते. त्यातील संख्याशास्त्रीय तंत्रे ही अनेक क्षेत्रात… पुढे वाचा »
शुक्रवार, २२ डिसेंबर, २०१७
काही जमाती अधिक भ्रष्ट आहेत का?
-
(शेखर गुप्ता यांचा लेख: Are Leaders from 'lower' casts and subaltern groups more corrupt? ) --- काही काळापूर्वी माझ्या पहिल्या आयटी कंपनीत काम करत असताना त्यांच्या एका सॉफ्टवेअरबाबत एक इंटरेस्टिंग टेस्ट केस वाचली होती. अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांमध्ये गोर्या व्यक्तींपेक्षा कातडीचा रंग काळा असलेल्या – आफ्रिकन-अमेरिकन – लोकांना शिक्षा होण्याचे प्रमाण आणि तीव्रता अधिक आहे अशी तक्रार मानवाधिकार संघटना बराच काळ करीत होत्या. परंतु नुसता दावा पुरेसा नसतो. कारण परस्परविरोधी दावे, आरोप-प्रत्यारोप हे होतच असतात नि प्रत्येक बाजूला आपले मत हे वास्तवच आहे असा ठाम विश्वास असतोच. अशा वेळी वस्तुनिष्ठ दृष्टिकोन स्वीकारावा लागतो, नि निष्कर्षाला अधिक विश्वासार्ह दावा म्हणून समोर ठेवावे लाग… पुढे वाचा »
Labels:
अनुभव,
आंतरराष्ट्रीय,
जिज्ञासानंद,
भूमिका,
विश्लेषण,
समाज
शनिवार, २५ नोव्हेंबर, २०१७
ओझ्मा आणि वेदनेची वाट
-
विषयसंगती ध्यानात घेऊन, काही अधिक भर घालून, हा लेख ‘ परीकथा आणि वेदनेची वाट ’ या शीर्षकासह ‘ वेचित चाललो... ’ या ब्लॉगवर हलवला आहे. - oOo - पुढे वाचा »
शुक्रवार, २४ नोव्हेंबर, २०१७
‘कट्यार काळजात घुसली’ - एक दृष्टिक्षेप (उत्तरार्ध) : रत्नजडित पण बिनधारेची कट्यार
-
सेरिपी « मागील भाग --- ‘कट्यार...’ नाटकाबद्दल बाबत बोलताना प्रामुख्याने त्यातील व्यक्तिरेखांचा विचार मागील भागात केला आहे. आता याच व्यक्तिरेखा चित्रपटात कशा येतात ते पाहणे रोचक ठरेल. पण सुरुवातीलाच हे स्पष्ट केले पाहिजे, चित्रपटाचे नाव नि कथानकाचा गाभा तोच असला, तरी चित्रपट ही एक स्वतंत्र कलाकृती आहे हे अमान्य करता येणार नाही. तेव्हा ‘नाटकात जे आहे ते इथे का नाही, किंवा चित्रपटात नव्याने जे आले आहे ते का आले आहे?’ हे दोन प्रश्न गैरलागू आहेत. ते चित्रपटकथा-लेखकाचे स्वातंत्र्य मान्य करायला हवे. परंतु दोन्हींमध्ये जे सामायिक आहे, त्याची तुलना मात्र करणे शक्य आहे नि न्याय्यही. चित्रपटात सामान्य प्रेक्षकासाठी बरेच रंग गडद करावे लागतात हे मान्य. पण चित्रपटात गडदच काय पण भडक करून, वर पात्रांची नि कथानकांची संपूर्ण मोडतोड केली आहे. इतकी की … पुढे वाचा »
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पण्या (Atom)







