-
इंदिराजींच्या काळात पहिली अणुचाचणी झाली त्या दिवशी ‘भारत हा इच्छा असेल तेव्हा अण्वस्त्रसज्ज होऊ शकतो’ हा संदेश भारताला लष्करीदृष्ट्या बळकट करुन गेला. त्यामुळे इतिहासात तो दिवस कधीच विसरता न येण्याजोगा. त्याचप्रमाणे आजचा दिवसही कधीच विसरता न येण्याजोगा! जसे अण्वस्त्र हे लष्करीदृष्ट्या अमोघ अस्त्र तसेच ‘छद्म’ किंवा सोप्या भाषेत अफवा हे सामाजिक/राजकीय दृष्ट्या अमोघ अस्त्र. याची पहिली व्यापक चाचणी आजच्याच दिवशी १९९५ साली झाली. ती कमालीची यशस्वी झाली. ‘गणपती दूध पितो आहे.’ अशी भुमका नव्यानेच प्रचलित होऊ लागलेल्या इंटरनेटजन्य माहिती-माध्यमांतून उठली. जो उठतो तो आपल्या घरचा गणपती कसा दूध प्याला, याचे रसभरीत वर्णन समाजमाध्यमांवर करु लागला. कुणी फोटो टाकले. नवीनच हाती आलेल्या मोबाईलच्या माध्यमांतू… पुढे वाचा »
Indexes Menu_Desktop
| संपूर्ण सूची : |
शुक्रवार, २१ सप्टेंबर, २०१८
अफवेच्या प्रसाराची साधने
शनिवार, १५ सप्टेंबर, २०१८
हे चित्र... आणि ते चित्र!
-
आमच्या एका जुन्या मित्राने पुण्याच्या ‘महात्मा फुले मंडई’बाबतच्या काही आठवणी तीन-चार दिवसांपूर्वी शेअर केल्या होत्या. त्यात त्याने ‘मंडई विद्यापीठ’ असा शब्द वापरला, आणि आमच्याही आठवणी जाग्या झाल्या. वढाय वढाय असलेल्या मनाने एकावरुन दुसर्या अशा उड्या घेत वर्तमानापर्यंत आणून पोचवल्या. माझे शालेय शिक्षण ज्या शाळेत झाले तिला मंडई विद्यापीठ म्हटले जाई. कारण मंडईतील बहुतेक गाळेवाले, मजूर, हळद-कुंकू आदी विकणारे छोटे दुकानदार, असे मंडईच्या परिसरातील मंडळींची मुले या शाळेत शिकत. कारण सोपे होते. मंडईपासून चालत वट्ट तीन मिनिटांच्या अंतरावर शाळा. सकाळी पोरगं गाळ्यावर बसलेलं असे. मग बाजार करून बाप साडेदहा-पावणेअकराच्या सुमारास परतून गाळा ताब्यात घेई, पोरगं धोकटी उचलून शाळेत. त्यामुळे शाळेत अठरा पगड जाती-पातींची मुले. ‘कांबळेच्या घरी खेकड्याची … पुढे वाचा »
बुधवार, २९ ऑगस्ट, २०१८
व्हेअर इज वॉली
-
‘मार्टिन हँडफर्ड’ नावाच्या एका ब्रिटिश रेखाचित्रकाराने ‘व्हेअर इज वॉली’ किंवा ‘चित्रात लपलेला वॉली शोधा’ असा एक खेळ त्याच्या ग्राफिक्सच्या सहाय्याने सुरू केला. त्याच्या पुस्तकाच्या पानावर अनेक पात्रे नि चित्रे असत. त्यात कुठेतरी लाल-पांढर्या पट्ट्यांचा टी-शर्ट, गोंड्याची गोल नि लाल टोपी आणि गोल फ्रेमचा चष्मा असलेली ही ‘वॉली’ नावाची व्यक्ती लपलेली असे. तुमची दिशाभूल करण्यासाठी, यातील एक-दोन वैशिष्ट्यांसह दुसरे एखादे पात्र चित्रांतील पात्रांच्या भाऊगर्दीत मिसळून देणे, वगैरे क्लृप्त्या चित्रकाराने वापरलेल्या असत. वरवर पाहता जरी हा लहान मुलांचा खेळ असला तरी, मोठेही तो आनंदाने खेळत असत. हाच खेळ अमेरिकेत ‘व्हेअर इज वाल्डो’ या नावाने प्रसिद्ध झाला. (‘द बिग बँग थिअरी’ या टेलिविजन सीरिजच्या चाहत्यांना एका एपिसोडमध्ये सस्पेन्ड झालेला शेल्डन… पुढे वाचा »
सोमवार, २७ ऑगस्ट, २०१८
कन्हैया कुमार, कम्युनिस्ट आणि मी
-
मी कम्युनिस्ट विचारसरणीचा सहानुभूतीदार नक्की आहे. त्यांच्यातील – सर्वच इझम आणि राजकीय पक्षांत असतात, त्यानुसारच असलेल्या – त्रुटींसह मी त्यांना सत्ताधारी म्हणून स्वीकारायला तयार आहे; नव्हे तसं घडावं अशी माझी इच्छा आहे. कारणांबद्दल आता विस्ताराने बोलत नाही. पण हे घडण्याची शक्यता निदान माझा आयुष्यात धूसरच दिसते. याचे मुख्य कारण तत्त्वज्ञानावरची अतिरेकी निष्ठाच त्यांना सत्तेपासून दूर ठेवते आहे. सत्ताकारणातला व्यवहारवाद नाकारल्याने त्यांना सत्ता मिळणे दुरापास्त झाले आहे. ‘ज्योतिबाबूंना मिळू शकणारे पंतप्रधानपद नाकारून त्यांनी घोडचूक केली’ असे माझे प्रामाणिक मत आहे. एकदा सत्ता हाती आली की सर्वत्र ‘आपले’ लोक रुजवून यंत्रणा/व्यवस्था कब्जात घेता येते , हे ते विसरले आहेत. सर्वसामान्यांसाठी कल्याणकारी राज्य निर्माण करण्यासाठी त्यांच्या रशियन आणि … पुढे वाचा »
सोमवार, ६ ऑगस्ट, २०१८
खुला कोष आणि माहितीची ऐशीतैशी
-
विकिपीडीया हा खुला माहितीकोश आणि भारत देशाची संकल्पना यात विलक्षण साम्य आहे. दोन्हींची निर्मिती ज्यांच्या भल्यासाठी झाली होती, त्यांनीच त्यांची पुरी वाट लावण्याचा आटोकाट प्रयत्न केला आहे. मी बहुमताच्या राजकीय लोकशाहीचा कट्टर पुरस्कर्ता असलो, तरी ज्ञानाच्या क्षेत्रात विकिपीडिया जितका खुलेपणा दाखवतो, तो सर्वस्वी मारक ठरतो असे माझे मत आहे. लोकांच्या संदर्भातील नीतिनियम, शासनव्यवस्था, संपत्तीवाटप आदी सामायिक हिताच्या गोष्टींपुरतीच लोकशाहीचा पल्ला मर्यादित ठेवावा लागतो. पृथ्वी गोल आहे की सपाट याचा निर्णय कुठल्याशा वृत्तपत्रात किंवा न्यूज-पोर्टल वर सर्व्हे घेऊन करता येत नसतो. त्याला भूगोल-खगोलाचे ज्ञानच आवश्यक आहे. तिथे “मूठभरांचे मत आम्ही का मानावे. बहुसंख्य लोकांना पृथ्वी त्रिकोणी आह… पुढे वाचा »
रविवार, ५ ऑगस्ट, २०१८
बँकांचा सावकारी पाश
-
(News: In 2017-18 depositors lost 5,000 crores in minimum balance penalties .) या बातमीच्या अनुषंगाने मागे एकदा झालेली चर्चा आणि त्या दरम्यान एका मित्राने उपस्थित केलेल्या मार्मिक प्रश्नाने पुन्हा डोके वर काढले. प्रश्न असा आहे की बँक आणि माझ्यासारखे त्यांचे ग्राहक यांचा परस्पर-संबंध समान व्यापाराचे तत्व पाळतो का? आता हेच पहा. मी बँकेमध्ये ठेव म्हणून ठेवलेल्या पैशावर मला ६ ते ९ टक्के या रेंजमध्ये मला व्याज दिले जाते. उलट मी बँकेकडून कर्ज घेतो, तेव्हा त्याची रेंज ८ ते १४ टक्के इतकी असते. (पर्सनल लोन्स तर १६ ते २४ टक्क्यांपर्यंत जातात. पण ते अन्सिक्युअर लोन सध्याच्या मुद्द्याला सुसंगत नाही, तेव्हा ते सोडून देऊ.) मी जेव्हा बँकेत पैसे ठेवतो, तेव्हा व्याजाव्यतिरिक्त इतर कोणताही लाभ मला मिळत नसतो. सिक्युरिटीचा विचार कराल, तर जेमतेम १ लाखांपर्… पुढे वाचा »
गुरुवार, २६ जुलै, २०१८
फुकट ते पौष्टिक...?
-
मोबाईलवर आपल्या पासवर्डसची फाईल तयार करून ठेवणार एक महान सीए मला ठाऊक आहे. आपल्या नातेवाईकांचे, मित्रांचे वाढदिवस, कौटुंबिक नाती, इत्यादि सारी माहिती हौसेने फेसबुक, तसंच Google contacts मध्ये भरून, आपल्या सोबत इतरांचाही बाजार उठवणारे महाभाग अनेक आहेत. एवढं पुरेसं नाही म्हणून आपली शाळा, बँक, आता या क्षणी कुठे आहोत, वगैरे कौतुकाने शेअर करुन आपल्या पायावर धोंडा मारून घेणारे, तर वारूळातील मुंग्यांप्रमाणे अगणित आहेत. त्यांच्यासाठी हे दोन अनुभव. --- गुगलची घुसखोरी : काही महिन्यांपूर्वी ‘अमेजन फायर टीव्ही’ स्टिक आणली. अलीकडेच ‘यंग शेल्डन’ या मालिकेचा सीझन संपल्यामुळे तिच्या ऐवजी पाहण्यासाठी म्हणून ‘अमेजन प्राईम’वर एखाद्या विनोदी मालिकेचा शोध घेत होतो. त्यातून ‘सिटीजन खान’ (इंटरनॅशनल चित्रपट पा… पुढे वाचा »
Labels:
अनुभव,
जिज्ञासानंद,
माहिती तंत्रज्ञान,
विश्लेषण,
समाज,
Business
गुरुवार, ५ जुलै, २०१८
...तेव्हा तुम्ही काय करता?
-
Rosario Dawson यांच्या ट्विटमधून एका देहाच्या कुडीत वास्तव्यास असणारी विविधरंगी व्यक्तिमत्वे, तिच्यावर संपूर्ण ताबा मिळवण्यासाठी झटू लागतात... ...तेव्हा तुम्ही काय करता? त्या कुडीत वास्तव्यास असलेला तत्त्वज्ञ व्यक्ती-समष्टीचे कोडे उलगडून सांगताना मध्येच थकून झोपी जातो... ...तेव्हा तुम्ही काय करता? त्या निद्रिस्त तत्त्वज्ञाची प्रतारणा करत एखाद्या वारयोषितेसारखी तुमची प्रवृत्ती तुमच्यातल्याच विदूषकाचा हात धरते... ...तेव्हा तुम्ही काय करता? अजरामर अशा ‘हॅम्लेट’च्या भूमिकेऐवजी तुमच्यातला नट, रंगमंचावरील निश्चल ठोकळ्याची भूमिका स्वीकारू इच्छितो... ...तेव्हा तुम्ही काय करता? तुमच्यातील सुरेल-सूर-मग्न संगीत-प्रेमी षड्ज-पंचमांच्या आधार स्वरांना त्याग… पुढे वाचा »
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पण्या (Atom)







