Vechit Marquee

Indexes Menu_Desktop

संपूर्ण सूची :

रविवार, २२ डिसेंबर, २०१९

देशासमोरील समस्या सोडवण्यासाठी मॉडेल्स


  • ’देशासमोरील समस्या, अडचणी सोडवण्यासाठी अल्गोरिदम अथवा मॉडेल सुचवा’ असा दहा मार्काचा प्रश्न ’बी.ए. इन लोकप्रतिनिधीशाही’ या भावी लोकप्रतिनिधींसाठी सुरु केलेल्या अभ्यासक्रमाच्या परीक्षेत विचारला होता. त्यात मिळालेली उत्तरे: topuniversities.com येथून साभार. १. ’ठंडा करके खाओ’ अर्थात काँग्रेस मॉडेल: एक आयोग अथवा कमिटी नेमा, त्याचा अहवाल कधीकाळी आलाच तर एक सर्वपक्षीय समिती नेमून तिच्याकडे सोपवून द्या. काही वर्षे डोक्याला ताप नाही. तोवर समस्या नाहीशी होऊन जाईल. २. ’लोहा लोहेको काटता है’ अर्थात भाजप मॉडेल ताबडतोब त्याहून मोठी अडचण निर्माण करा. लोक जुनी विसरुन नवीशी संघर्ष करु लागतील. ३. ’ब्लेम इट ऑन रिओ’ अर्थात पुरोगामी मॉडेल हे सारं ईवीएममुळे आणि धनदांडग्यांच्या स्वार्थामुळे… पुढे वाचा »

शनिवार, २१ डिसेंबर, २०१९

NRC आणि CAAचे आर्थिक गणित


  • NRC: National Register of Citizens. CAA or CAB: Citizens Amendment Act/Bill. NPR: National Peoples Register. --- धार्मिक असोत, राष्ट्रवादी असोत, समाजवादी असोत, कम्युनिस्ट असोत की 'आप’सारखे नवे लोक असोत. यातील सार्‍यांशी बोलताना माझा भर अंमलबजावणीबाबतच्या प्रश्नांवर असतो . त्यामुळे तात्त्विक पातळीवर त्यांचे तत्त्वज्ञान ’जग्गात भारी आहे’ हे गृहित धरुन चालायची माझी तयारी असते. प्रश्न असतात या तत्त्वांना अनुसरणारी तुमची व्यवस्था माझ्यासारख्या त्यातला नागरिकाला काय देते, काय बंधने घालते आणि काय हिरावून घेते याबाबत. जुन्या व्यवस्थेच्या तुलनेत नव्या व्यवस्थेमध्ये मला - म्हणजे एखाद्या नागरिकाला व्यक्तिश: कोणती अधिकची बंधने स्वीकारावी लागणार आहेत? त्या बदल्यात ही नवी व्यवस्था मला व्यक्तिश: आणि एकुणात समाजाला काय अधिकचे देऊ करणार आहे?त… पुढे वाचा »

बुधवार, १८ डिसेंबर, २०१९

कुण्या देशीचा लेखक


  • clipart.world येथून साभार. जुलमी राजाने पाचपंचवीस नागरिकांना बडवून काढले तेव्हा कुण्या देशीच्या लेखकाने त्रिखंडी ऐतिहासिक कादंबरीचा श्रीगणेशा केला ... कुण्या देशीच्या लेखकाचा पहिला खंड लिहून संपला तेव्हा राजाने हजारो नागरिकांची तुरुंगामध्ये रवानगी केली होती. कुण्या देशीच्या लेखकाने दुसर्‍या खंडानंतर हुश्श केले तेव्हा देशांतील बुद्धिमंतांचे शिरकाण पुरे झाले होते कुण्या देशीच्या लेखकाने तिसरा खंड पुरा केला तेव्हा राजाने शिक्षणसंस्था मोडून लष्करी संस्था उभ्या केल्या होत्या इतके झाल्यावर राजाने त्या कुण्या लेखकाचा गौरव केला लेखकाने राजाला ’त्रिखंडभूषण’ पदवीने गौरवत त्याचा परतावा दिला काही संघर्षरतांचे बळी पडले बरेच काही उध्वस्त झाले त्यातून राजाची सत्ता हट… पुढे वाचा »

गुड बाय डॉक्टर


  • नेहरु म्हणजे केवळ ’एडविना’ नव्हे सावरकर म्हणजे केवळ ’माफी’ नव्हे पाडगांवकर म्हणजे केवळ ’सलाम’ नव्हे लागू म्हणजे केवळ ’देवाला रिटायर करा’ नव्हे खरंतर या चौघांच्या आयुष्यातील या चार गोष्टी हे खरेतर त्यांच्या व्यक्तिमत्वाचे व्यवच्छेदक लक्षण नाहीत, उलट अपवाद अथवा प्रासंगिक मुद्दे आहेत. देशाच्या इतिहासातील नेहरुंच्या अजोड स्थानाऐवजी ज्यांना एडविना आठवते ते बिचारे नेहरुंच्या शिरापर्यंत पाहू शकत नाहीत इतके खुजे असतात. सावरकर म्हणजे माफी अथवा हिंदुत्ववादीच म्हणणारे त्यांचा द्वेष करायचा हे आधी ठरवून त्यानुसार पाहात असतात. पाडगांवकरांसारख्या अस्सल सौंदर्यवादी कवीची ओळख ’सलाम’ या कृत्रिमपणे रचलेल्या, तद्दन प्रचारकी कवितेने होते हे त्यांचे दुर्दैव. समांतर चित्रपटांपासून मेनस्ट्रीम चित्रपट, नाटक असा व्यापक पैस असणार्‍या लागूंवर स्तुतीवर… पुढे वाचा »

मंगळवार, १७ डिसेंबर, २०१९

‘यशस्वी माघार’ की ‘पलायन’


  • ( ’माफीवीर सावरकर’ या उल्लेखाला प्रतिवाद म्हणून ’माफी नव्हे , राजनीती : शिवछत्रपती आणि सावरकर’ या प्रसिद्ध इतिहाससंशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचा लेख फेसबुकवर शेअर करण्यात आला. त्याला दिलेले हे उत्तर. ) ’यशस्वी माघार’ म्हणायचे की ’पलायन’ हे भविष्यातील यशावर अवलंबून असते. तात्पुरती माघार घेऊन नंतर यशाची जुळणी करणॆ शक्य झाले तर त्या पलायनालाही यशस्वी माघार म्हणता येते. नाहीतर प्रत्येक पळपुटा आपल्या पलायनाला ’स्ट्रॅटेजिक रिट्रीट’ म्हणूच शकतो. ते आपण मान्य करत जाणार आहोत का? की आपल्या बाब्याचा दावा खरा नि विरोधकाचा खोटा इतके सरधोपट निकष लावणार आहोत? इतरांसाठी अतर्क्य भविष्यवाणी करणारा द्रष्टा तेव्हाच म्हणवला जातो जेव्हा त्याची भविष्यवाणी खरी होते. (खरंतर त्या भविष्यवाणीलाही तर्काचा, संगतीचा, वारंवारतेचा आधार हवा. पण तो मुद्द्या सध्या सो… पुढे वाचा »

सोमवार, १६ डिसेंबर, २०१९

कथा विकासाच्या कांद्याची


  • परवा सकाळी एका मित्राबरोबर चुलत-मित्राकडे (त्याचा मित्र) जाण्याचा योग आला. घरी पोचलो तेव्हा त्याच्या पत्नीने सांगितले की साहेब पूजाघरात आहेत. इतक्यात आतून ’आतच या’ असा निरोप आला. आत पोचलो तेव्हा साहेब हात जोडोनि देव्हार्‍यासमोर बसले होते. ’घ्या दर्शन घ्या’ अशी ऑफर आली. मित्राने हात जोडून नमस्कार केला. मी आपला आपद्धर्म म्हणून हात जोडण्यापूर्वी देव्हार्‍यात डोकावले नि दचकलोच. तिथे चक्क एक अंडे ठेवले होते. मी बुचकळ्यात पडलो. माझी अवस्था पाहून "मला वाटलेच होते, तुम्हाला आश्चर्य वाटणार म्हणून." चुलत-मित्र विजयी मुद्रेने म्हणाला. "अंड्याची पूजा? कशासाठी?" मी शंकेखोरपणे विचारले. "मी ज्युरासिक पार्क उभे करणार आहे." चुलत-मित्र सिक्रेट सांगताना वापरतात तशा मंद्रसप्तकातील षड्जाला आधारस्वर करुन बोलिला. माझी अवस्था तेल… पुढे वाचा »

सोमवार, ९ डिसेंबर, २०१९

बूट आणि झेंडे


  • कोणे एके काळी, सगळी माणसे खुजी होती. कुण्या एका माणसाने, देवळाचा झेंडा खांद्यावर घेतला, स्वत:ची उंची टाचेपासून झेंड्याच्या टोकापर्यंत मोजून, आपण उंच झाल्याची द्वाही त्याने सर्वत्र फिरवली. कुण्या एका माणसाने, उंच टाचेचे बूट चढवले, स्वत:ची उंची डोक्यापासून बुटाच्या तळापर्यंत मोजून, आपण उंच झाल्याची द्वाही त्यानेही सर्वत्र फिरवली. कुण्या 'अनवाणी' माणसाने त्या दाव्याला आक्षेप घेतला. ’त्याला सांग की’ असे म्हणत, दोघांनीही मोडीत काढला. कुण्या एका बुटाची उंच टाच, कुण्या एका खांद्यावरचा उंच झेंडा, झाला अंगापेक्षा मोठा बोंगा, माणसांचा सुरु धांगडधिंगा उकिरड्यावरचा कुणी एक गाढव, कुण्या एका डुकराला म्हणाला, माणसापेक्षा आपण बरे, उसनवारीचे नाही खरे. पोट आहे, भूक लागते, अन्न-श… पुढे वाचा »

शुक्रवार, ६ डिसेंबर, २०१९

पिसाळलेला कुत्रा


  • https://www.entertales.com/ येथून साभार. त्याने रस्त्यावरच्या कुत्र्याला गोळी घातली तुमच्या भिवया उंचावल्या, "पिसाळला होता" तो म्हणाला तुम्ही त्याला धन्यवाद दिलेत. त्याने शेजार्‍याच्या कुत्र्याला ठार मारले, तुम्ही आश्चर्यचकित झालात "हा ही पिसाळला होता" तो म्हणाला "हो. असेलच." तुम्ही मनात म्हणालात. आता त्याने तुमच्या कुत्र्याची हत्या केली तुम्ही स्तंभित आणि हतबुद्ध झालात. पण काही बोलू शकला नाहीत... ... त्याच्या हाती बंदूक होती! मग कसनुसे हसत त्याला म्हणालात, ’पिसाळलाच होता तो" - रमताराम - oOo - पुढे वाचा »