Vechit Marquee

Indexes Menu_Desktop

संपूर्ण सूची :

शनिवार, २१ मे, २०२२

तांत्रिक आप्पा


  • आप्पा भिंगार्डे (१) एक सत्शील, पापभीरू माणूस. त्यांची बाबा आडवळणीनाथांवर नितांत श्रद्धा. देवघरात बाबांची मानसमूर्ती होती. तिची सकाळ-संध्याकाळ षोडशोपचारे पूजा होत असे. वर्षांतून दोनदा घरी बाबांचा सत्संग असे. आप्पा भिंगार्डे पिढीजात कारकून. त्यामुळे ऑफिसमधून आणलेल्या स्टेशनरीवर दररोज शंभर वेळा बाबांचा जप लिहिला जात असे. पुढे ऑफिस स्टेशनरीच्या अपहाराबद्दल मेमो मिळाले, सस्पेंड झाले, पण त्यांनी आपला नेम सोडला नाही. मागच्या चाळीतील बाबूने सायक्लोस्टाईल का काहीतरी मशीन आणले. त्यावर खते, दस्त यांच्या प्रती काढून देण्याचा व्यवसाय सुरू केला. आप्पांनी ही संधी साधली आणि बाबांच्या एकपानी चरित्राच्या प्रती काढून नाक्यावर उभे राहून येणार्‍या-जाणार्‍याला वाटून ते आपली सेवा बाबांच्या चरणी रुजू करु लागले. सामान्यांच्या पत्रसंवादाच्या सोयीसाठी सरकारन… पुढे वाचा »

मंगळवार, १७ मे, २०२२

उंदीर-श्रद्धा आणि इलेक्ट्रॉन-श्रद्धा


  • आपल्या घरातील एक बटण दाबले की दिवा प्रकाशित होतो किंवा पंखा सुरु होतो असा आपला अनुभव असतो. वारंवार अनुभवल्यानंतर कार्य-कारणभाव स्पष्ट होतो. आता त्यामागचे विज्ञान सांगितले तर इलेक्ट्रॉन, इलेक्ट्रिसिटी, वगैरे बाबी येतील. पण श्रद्धावान मंडळी म्हणतील, ‘तुम्ही म्हणता देव दिसत नाही तसेच हा तुमचा इलेक्ट्रॉन, ती वीज तरी कुठे दिसते? न पाहता त्यांचे अस्तित्व कसे मान्य करतोस?’ हा मुद्दा बरोबर आहे. पण मी इलेक्ट्रॉनचे अस्तित्व मान्य करणे वा न करणे याचा माझ्या जगण्याशी थेट संबंध नसतो. पृथ्वी सपाट आहे असे म्हणणारे लोक भूगोलाच्या एका तुकड्यावर जगतच असतात. कारण ती सपाट आहे की दीर्घगोल याचा त्यांच्या जगण्याशी थेट संबंध येत नाही. त्याच धर्तीवर माझा इलेक्ट्रॉनशी कधी समोरासमोर सामना न होताही माझे जगणे त्या आधारे सिद्ध केलेल्या अनुभवावर बेतलेले असते. त्या सार… पुढे वाचा »

रविवार, १५ मे, २०२२

लेखक याचक आणि राजा वाचक ?


  • ( बरेच दिवस लिहून ठेवलेले काही मुद्दे आज मित्रवर्य प्रकाश घाटपांडे यांच्याशी झालेल्या चर्चेमुळे एकदाचे पार लागले. ) आकलनाची, उकल करण्याची खाज हा माझा जुना आजार. त्यातच गणित नि शक्यताविज्ञान (Statistics) या विषयांत झालेले शिक्षण यांमुळे जगण्यातले प्रत्येक गणित सोडवण्याचा आटापिटा वाढीसच लागला. मग कालानुरूप आपल्या विचारांत, आकलनात, विश्लेषण पद्धतीमध्ये बदल होतो का, कसा होतो नि का होतो... हे जास्तीचे प्रश्न वाढत्या वयाबरोबर सोबत आले. अनुभवसिद्धता हा शक्यताविज्ञानाचा गाभा, त्यातून निर्माण होणारी माहिती व डेटा, त्याचे मूल्यमापन आणि निष्कर्ष ही आकलनपद्धती मी स्वीकारलेली. काही काळानंतर त्याच समस्येला, गणिताला सामोरे जातात उत्तर वेगळे येते का, का वेगळे येते याचा वेध घेणे भलतेच रोमांचक असते, असे लक्षात आल्यावर त्या त्या वेळचे आकलन, विचारव्यूह न… पुढे वाचा »

मंगळवार, ३ मे, २०२२

मांजराचे काय, माणसाचे काय


  • आपण लहान असताना सोडाच, पण मोठे झाल्यावरही एखादे मांजर दिसले तर त्याला उचलून घ्यावे त्याच्या मखमली शरीरावरुन हळूच हात फिरवून पाहावा असं वाटत नसणारे विरळाच. शिवाय कुत्र्यापेक्षा मांजर आणखी एका दृष्टीने बरे. कुत्रे बिचारे जीव लावून बसते. त्याचा माणूस-मित्र त्याच्याकडे लक्ष देईना झाला तर उदास होऊन बसते, खाणे दिले नाही तर उपाशी राहते. याउलट तुम्ही भाव दिला नाहीत तर मांजर ’गेलास उडत’ म्हणून चालते होते. घरचे खाणे मिळाले नाही तर बाहेर जाऊन होटेलमधून किंवा स्विग्गीवरून एखादा उंदीर, एखादा पक्षी मागवून आपले पोट भरते. माणूस-मित्राची इच्छा म्हणून भुके राहण्याचा वेडगळपणा वगैरे करत नाही. त्यामुळे त्याला पालक-मित्रालाही त्याबाबत फार टेन्शन घेण्याची गरज नसते कालच आमचा एक मित्र सांगत होता (बहुधा हिचिन्सचे … पुढे वाचा »

सोमवार, २ मे, २०२२

प्रकाश नावाची प्रत्येक व्यक्ती वैज्ञानिक असते


  • मी महाविद्यालयात शिकत असताना एका मित्राने एक गंमतशीर सिद्धांत मांडून त्याची सिद्धताही दिली होती. ही गंमत महाविद्यालयीन प्रवृत्तीला अनुसरुनच होती. परंतु काळ जातो तसे आपली दृष्टी नि विचार व्यापक होत जातात आणि ’साध्याही विषयात आशय मोठा किती आढळे’ असा अनुभव येतो. या सिद्धांताबाबतही मला असाच काहीसा अनुभव आला. --- त्याचा सिद्धांत असा होता: प्रकाश नावाची प्रत्येक व्यक्ती वैज्ञानिक असते. www.thealternativedaily.com येथून साभार. त्याची सिद्धता त्याने अशी दिली होती: प्रकाश म्हणजे पक्या, पक्या म्हणजे क्याप, क्याप म्हणजे टोपी, टोपी म्हणजे पीटो, पीटो म्हणजे मारा, मारा म्हणजे रामा, रामा म्हणजे देव, देव म्हणजे वदे, वदे म्हणजे बोले, बोले म्हणजे लेबो... आणि लेबो हा एक वैज्ञानिक होता म्ह… पुढे वाचा »

गुरुवार, २८ एप्रिल, २०२२

शून्य, आकार आणि अनंताची वाटचाल


  • हे चित्र पाहा. तुम्ही म्हणाल या चित्र काय , दोन बिंदू तर आहेत. ठीक तर. मग असं म्हणतो की ’A आणि B हे दोन बिंदू पाहा.’ ’प्रत्येक बिंदू हा बिंदू स्वयंभू असतो ’ हे आपण भूमितीमध्ये फार वर्षांपूर्वी शिकलो. तो शून्य मिती, शून्य लांबी व क्षेत्रफळ असलेला मानलेला आहे. (असल्या सुरुवातीनंतर गणित अप्रिय झाले नाही तरच नवल. :) ) आता माझ्याकडे एक नव्हे, दोन बिंदू आहेत. आता यांच्याबद्दल एकत्रितपणे काय म्हणता येईल? मग ’दोन भिन्न बिंदूंतून एक आणि एकच रेषा जाते’ हा पुढच्या सिद्धांत आपल्याला आठवेल. तर हे घ्या, दोन बिंदूंना जोडून मी ही रेषा- रेषाखंड A-B मी तयार केला. आता मी द्विमितीमध्ये* प्रवेश केला आहे. आता द्विमितीमध्ये मला फक्त रेषाखंडच नव्हे तर इतर अनेक आकार … पुढे वाचा »

रविवार, २४ एप्रिल, २०२२

माझी ब्लॉगयात्रा - ८ : केल्याने प्रसिद्धी


  • मोबाईल-विशेष « मागील भाग --- इतरांकडून शिकावे आपल्या लेखनाची, ब्लॉगची, वेबसाईटची जाहिरात कशा तर्‍हेने करावी, वाचकांना कसे खेचून आणावे, त्यांना पकडून कसे ठेवावे, याची उदाहरणे विविध वेबसाईट्सवर दिसत असतात. बारकाईने लक्ष दिले तर, आपणही ती वापरु शकतो का, आपल्या ब्लॉगसाठी ती उपयुक्त ठरु शकतात का, याची चाचपणी करुन पाहता येते. एक 'केस-स्टडी' म्हणून maharashtratimes.com वेबसाईट पाहता येईल. वेबसाईट ओपन केल्यावर सर्वात वरच्या बाजूला महाराष्ट्र टाईम्सच्या लोगोच्या बरोबर खाली ’ट्रेडिंग’ची पट्टी दिसते. पॉप्युलर- म्हणजे सर्वाधिक वाचल्या जाणार्‍या लेखांकडे जाण्यासाठी वाचकाला दिलेला शॉर्टकट आहे. त्याच्या विरुद्ध दिशेला उजवीकडे वर ’रीड अ‍ॅंड अर्न’ची (Read and Earn) लिंक दिसते. इथे वाचकांना लॉगिन कर… पुढे वाचा »

माझी ब्लॉगयात्रा - ७ : मोबाईल-विशेष


  • अनुक्रमणिका आणि सूची « मागील भाग --- ( मागील भागाच्या शेवटी या भागाचे जे नाव दिले होते ते ’काही अनुभव’ असे होते. माझ्या वैय्यक्तिक, व्यावसायिक आयुष्यात उत्पादक/सेवादाते-ग्राहक संबंधांबाबत मला जे अनुभव आले, त्यातून जे आकलन झाले त्यांच्या आधारे तो भाग लिहिण्याचे नियोजन होते. त्या आकलनाच्या आधारेच ब्लॉगलेखनाच्या शिफारस व प्रसिद्धीसाठी काही तंत्र वापरले आहे. परंतु तो भाग अपेक्षेहून खूप मोठा झाल्याने आणि एक स्वतंत्र लेख म्हणून विकसित झाल्याने या मालिकेतून गाळून टाकला आहे. तो जेव्हा प्रसिद्ध होईल तेव्हा त्याची लिंक इथे समाविष्ट करेन. ) मोबाईलवर लेखनसूची? मागील भागाच्या शेवटी म्हटल्याप्रमाणे ’सूची देण्याचा जो श्रम केला, तो मोबाईल थीमवर वृथा गेला’ असल्याने आता मोबाईल थीमची ही मर्यादा कशी दूर करता येईल याचा विचार करु लागलो. मोबाईल थीम्स या … पुढे वाचा »