-
‘गोमा गणेश, पितळी दरवाजा’ हा किस्सा कोणाकोणाला माहित आहे? कुणी म्हणतात पेशवाईत सवाई माधवरावांच्या काळातील, ( अल्पवयीन राजा, आणि केवळ आढाव असलेला त्याचा सल्लागार यामुळे प्रशासनात आलेल्या ढिलाईचा फायदा घेऊन कदाचित ) तर कुणी राष्ट्रकूट, कुणी कृष्णदेवरायाच्या काळातला. ‘पराया माल अपना’ ही काही केवळ अर्वाचीन हिंदुत्ववाद्यांचीच मक्तेदारी आहे असे नाही. पंचतंत्र, इसापनीती, मुल्ला नसरुद्दिन, तेनाली राम, बीरबल आदिंच्या कथांमध्ये देवाणघेवाण होतच असते. त्यात एखादी कथा, एखादा किस्सा नक्की कुठून कुठे गेला, हे अस्मितेचा दंश झालेल्याखेरीज इतर कुणीच ठामपणॆ सांगू शकत नाही. तो किस्सा असा होता. एका चतुर व्यक्तीने ‘पितळी दरवाजा’ म्हणून ओळखल्या जाणार्या वेशीवर ठाण मांडले. जणू ‘राजानेच जकात वसुली वा मालाच्या वाहतु… पुढे वाचा »
Indexes Menu_Desktop
| संपूर्ण सूची : |
गुरुवार, २९ नोव्हेंबर, २०१८
गोमा गणेश, पितळी दरवाजा
सोमवार, २६ नोव्हेंबर, २०१८
फितूर सेनापतीचे सैनिक
-
(’लोकसत्ता’चा ’ कडकलक्ष्मीच्या गुदगुल्या ’ हा अग्रलेख वाचून झाल्यावर...) सेनेचे रामंदिर राजकारण हे भाजपच्याच पथ्यावर पडणारे, कदाचित त्यांच्याच संगनमताने चालले आहे . भाजपने गेली तीसेक वर्षे राममंदिराचा मुद्दा हा ‘हर मर्ज की दवा’ म्हणून वापरला. ते अडचणीत असले, निवडणुका जड जाणार असे दिसले, की हटकून संघ परिवारातील कुणीतरी- बहुधा सरसंघचालक, राममंदिरावर भाष्य करतो. एखादा खूप प्रभावी विरोधी मुद्दा असला की विहिंप गुरगुर करू लागते. छायाचित्र लोकसत्ताच्या लेखातून. पण आता त्यांच्या तोंडून तो मुद्दा ऐकला की ‘हां, आले हे तोच मुद्दा दळायला घेऊन. करायला काही नको. नुस्ते भकत बसतात.’ अशी तीव्र प्रतिक्रिया हिंदुत्ववादी असलेल्या नि नसलेल्या अशा दोन्ही प्रकारच्या मंडळींकडून ऐकू येऊ लागली आहे. तिचा आवाज फार… पुढे वाचा »
शनिवार, २४ नोव्हेंबर, २०१८
वर्ड-क्लाऊड सिंड्रोम
-
‘वर्ड-क्लाऊड सिंड्रोम’ नावाचा एक नवा आजार सोशल मीडिया मुळे उद्भवला आहे. लेखकाचा सूर, मुद्दा, भर कशावर आहे, त्याला काय सांगायचे आहे याकडे साफ दुर्लक्ष करुन, लोक पोस्टमधील आपल्याला बोलता येईल असे शब्द फक्त उचलतात (हे पाहून मला ‘ब्युटिफुल माईंड’ मधला डॉ. नॅश आठवतो!) नि त्यावर चर्चा वा प्रतिसाद करतात. कालच मी ‘स्टार ट्रेक’ या मालिकेतील एक – माझ्या मते– मननीय संवाद शेअर केला. हा संवाद अवगुण मानल्या गेलेल्या वा नकारात्मक गुण मानल्या गेलेल्या व्यक्तिवैशिष्ट्यांच्या संभाव्य उपयुक्ततेबद्दल होता. १९६६ ची मालिका कदाचित अनेकांना ठाऊक नसेल म्हणून ‘ही कुठली? तर सध्या चालू असलेल्या यंग शेल्डन’मध्ये उल्लेख झालेली.’ असा संदर्भ दिला. झाले, तेवढेच वाचून शाळेत निबंधात जसे ‘... आणि म्हणून मला माझी आई फार्फार आवड… पुढे वाचा »
सोमवार, १२ नोव्हेंबर, २०१८
Punchतंत्र: बेडकांचा राजा
-
एकदा बेडकांना आपल्याला राजा हवा असे वाटू लागले... ते देवबाप्पाकडे गेले. ते म्हणाले, ‘आम्हाला राजा हवा.’ देवबाप्पाने त्यांना एक लाकडाचा ओंडका दिला. त्याला मिरवणुकीने आणून त्यांनी राजा बनवले. हा राजा काही न करता एका जागी पडून असे. थोडक्यात, बेडकांना आपले आहार-भय-निद्रा-मैथुन लिप्त आयुष्य जगण्याची मोकळीक त्याने दिली होती. पण मग बेडकांना वाटू लागले की ‘ह्यॅ: हा कसला राजा. याच्या राज्यात काहीच ‘हॅपनिंग’ नाही.’ मग त्यांनी ठरवले की, पुन्हा देवबाप्पाकडे जाऊन नवा राजा मागायचा. ते म्हणाले, ‘आता आम्हाला असा बाहेरुन आणलेला राजा नको. आमच्या तळ्यातला किंवा निदान आमच्यासारखाच जलजीवी असा एखादा राजा द्या.’ देवबाप्पाने त्यांचे म्हणणे ऐकले. त्याने एका बगळ्याला त्यांचा राजा म्हणून पाठवले. हिरवट-मळकट रंगांच्या बेडकांना त्याचा पांढराशुभ्र रंग पाहून ‘आपला … पुढे वाचा »
शुक्रवार, ९ नोव्हेंबर, २०१८
कप के बिछडे हम आज...
-
एखादा सुरेखसा चित्रपट नुकताच मिळालेला असतो. रात्री जेवणानंतर किचनची कामे पटापट उरकून तुम्ही चित्रपट पाहायला जाऊ, असे मनचे मांडे खात असता. सफाई करत असताना नुकत्याच आणलेल्या सहा कपांच्या सेट मधला एक कप तुमच्या हातून निसटतो, सुमारे तीन-साडेतीन फुटावरुन सरळ जमिनीवर आदळतो. आणि दोन तीन भक्कम टप्पे खात पाचेक फुटावर जाऊन विसावतो. इतका मार खाऊन त्या कपाचा कानच फक्त तुटतो. आता तुमच्यासमोर ‘याचे काय करावे?’ हा यक्षप्रश्न उभा राहतो. alittlechange.com.au येथून साभार. हा कप आता बाद झाला म्हणून टाकून द्यावा, तर त्याची एक बाजू पाहता ते अवघड दिसते. एकतर नवा आहे, त्यात कानाचा गेलेला बळी वगळता, इतका मार खाऊनही टवकाही न उडालेली बॉडी भक्कम असल्याचा पुरावा देत असते. त्याचबरोबर तो बहिरा कप चहाखेरीज अ… पुढे वाचा »
रविवार, २१ ऑक्टोबर, २०१८
वारसदारांचा अपकर्ष!
-
कर्जाच्या विळख्यात अडकलेले अनिल अंबानी यांची ‘रिलायन्स एनर्जी’ ही कंपनी, अखेर अदानींच्या छावणीत दाखल झाली. ग्राहक विजेची बिलं भरायला रांगेत उभे राहिले, ‘रिलायन्स’च्या जागी ‘अदानी’ हे नाव त्यांना दिसले! दुसरीकडे केवळ कागदोपत्री अस्तित्वात असलेल्या त्यांच्या कंपनीला, सरकारी आशीर्वादाने राफेल विमानांच्या उत्पादनाचे मिळालेले कॉन्ट्रॅक्ट हा राजकीय वर्तुळात सर्वाधिक वादग्रस्त (अगदी बोफोर्सपेक्षाही) प्रश्न बनला. धीरूभाईंच्या मृत्यूनंतर ज्यांच्याकडे त्यांचा खरा वारस म्हणून पाहिले गेले, त्यांचीच उतरती भाजणी सुरू झाली. राजकारणात असो की व्यावसायिक क्षेत्रात, एका पार्टीच्या दोन पार्ट्या झाल्या की, नकळत आपण म्हणजे समाज एका बाजूला झुकतो. अमुक एक हाच खरा वारसदार, असे आपण समजू लागतो. पुढे हाच प्रगती करेल नि दुसऱ्या बाजूला माघार घ्यावी लागेल, असा काहीसा… पुढे वाचा »
Labels:
‘दिव्य मराठी’,
अर्थकारण,
जिज्ञासानंद,
प्रासंगिक,
राजकारण
भेकड नेते आणि शेंदाड शिपाई
-
ज्या लोकांना वाटतं किंवा वाटत होतं की महात्मा गांधीजींना मारलंच पाहिजे होतं, त्यांना ‘जिना आणि माऊंटबॅटन (किंवा त्यांचे पूर्वसुरी) यांना का मारलं नाही?’ असा प्रश्न पडत नाही. याचं एक कारण म्हणजे विचार करणे त्यांच्या रक्तात नसते, हे तर आहेच पण त्या पलीकडे मुळात गांधींबद्दल द्वेष असणार्यांच्या प्रचाराला बळी पडलेले असतात. या प्रचारकांच्या द्वेषामध्ये एका बनियाने आपल्या सारख्या जन्मजात श्रेष्ठींऐवजी देशातील जनतेचे नेतृत्व करावे, ही अहंकाराला बसलेली मोठी ठेच मुख्यत: कारणीभूत असते . आता ज्यांना जिना किंवा एखादा ब्रिटिश अधिकारी ठार मारण्याऐवजी गांधींवर हत्यार चालवणे, त्यांची हत्या करणे अधिक महत्वाचे का वाटत असावे? याचे एक कारण म्हणजे त्यांना परिणामापेक्षा श्रेयाची अधिक आस होती हे नंतर दिसून आले आहे . ज्यांना असं वाटत होतं किंवा वाटतं, ते प्रा… पुढे वाचा »
रविवार, ७ ऑक्टोबर, २०१८
शर्विलकाचा प्रतिशंखनाद आणि जमाव
-
Travor Noah यांच्या ’The Daily Show’ या कार्यक्रमातील ’Trump Weaponizes Victimhood' हा एपिसोड ‘आपले सब्जेक्ट्स* कुठेतरी एक पायरी वर चढताहेत, यातून कदाचित आपल्या स्थानाला धक्का बसू शकतो’ याची जाणीव झालेल्या वर्चस्ववाद्यांच्या चलाख मांडणीचे ट्रम्प यांनी उत्तम उदाहरणच सादर केले आहे. संख्याशास्त्राचा विद्यार्थी म्हणून मी नेहमीच आकडेवारी ला प्राधान्य देतो. तिच्या अभावी केलेली विधाने, काढलेले निष्कर्ष, केलेले आरोप हे केवळ पूर्वग्रहांचे नि स्वार्थाचे अपत्य असतात. (अर्थात अलीकडे खोटे आकडेही तोंडावर फेकण्याची अहमहमिका सुरु झालेली दिसते. त्यामुळे त्या आकड्यांची विश्वासार्हता हा ही एक कळीचा मुद्दा ठरतो. ) ‘आमच्या गटावर झालेला एक अन्याय हा आमच्यावरील नि… पुढे वाचा »
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पण्या (Atom)







