-
( सेना-राष्ट्रवादी काँग्रेस-काँग्रेस आघाडीचे सरकार येण्याचे आदल्याच दिवशी नक्की झालेले असताना, रात्रीतून चक्रे फिरुन अजित पवार यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत सरकार स्थापन केले. विधानसभेत अध्यक्षाची निवड अथवा विश्वासदर्शक ठराव यांच्या संदर्भात शरद पवार यांची भूमिका आणि त्यांच्यासमोर असलेले पर्याय यांचा थोडा उहापोह. ) महाराष्ट्रातील सत्तेच्या खेळात आपण सार्यांनी तर्काचे, विनोदबुद्धीचे वारु मोकाट सोडले आहेत. ते जरा बांधून ठेवू. घटनाक्रम हा सर्वस्वी परावलंबी असल्याने आणि रंगमंचावरील पात्रे लेखकाला न जुमानता आप-आपली स्क्रिप्ट्स स्वत:च लिहित असल्याने स्थिती कशी वळण घेईल, या पुढचा भाग केव्हा कालबाह्य होईल हे सांगणे अवघड आहे. तेव्हा तो ही मुद्दा क्षणभर बाजूला ठेवू. सार्यांचे लक्ष दोन पवारांवर केंद्रीत झालेले असताना भाजपवाले सेना, काँग्रेस … पुढे वाचा »
Indexes Menu_Desktop
| संपूर्ण सूची : |
शुक्रवार, २२ नोव्हेंबर, २०१९
पवारांच्या अंतस्थ हेतूचे प्रतिबिंब दाखवणार्या दोन शक्यता
गुरुवार, २१ नोव्हेंबर, २०१९
मी पण टॅक्सपेअर
-
जेएनयू चा प्रश्न आला की मोदी-भक्तांचे पित्त उसळून येते नि आपल्या टॅक्स-पेअर्स मनीचे काय करु नये याची पोपटपंची ते करु लागतात. मग मीच का मागे राहू? १. कोणाचाही पुतळा अथवा स्मारक उभारले जाऊ नये आणि मुख्य म्हणजे या नियमाला अपवाद अजिबात असू नयेत. २. कुंभमेळ्यापासून हजयात्रेपर्यंत कोणत्याही धार्मिक कार्यक्रमावर खर्च करु नये. मंदिर, मशीद, बुद्धविहार, गुरुद्वारा, चर्चेस, जिनालये इत्यादि धर्मस्थळे बांधून नयेत वा त्यांना अनुदान देऊ नये. ३. सरकारी कामांच्या जाहिराती करू नयेत. ४. गावे, शहरे, स्टेडियम, इन्स्टिट्यूट्स, हॉस्पिटल इत्यादिंसह कुठल्याही गोष्टींच्या नामांतरावर खर्च करु नये. ५. कोणत्याही बुडत्या खासगी उद्योगांना मदत देऊ नये. ६. स्मार्ट सिटी नावाखाली फुटपाथ सुशोभीकरण करु नये. ७. लो… पुढे वाचा »
रविवार, १७ नोव्हेंबर, २०१९
टीआरपीची पैठणी
-
एक शहाणी-सुरती, शिकली-कमावती पोरगी होती. उपवर झाली. स्थळ सांगून आले. दाखवण्याचा कार्यक्रम झाला. पोरीला पोरगं काही पसंत नव्हतं. शिकलेलं असून बुरसटलेल्या विचाराचं, आई-बापाचा नंदीबैल असावा असं वाटत होतं. पण बोहोल्याच्या घाईला आलेल्या आत्या-मावशा-साळकाया-माळकाया-आज्या-काकवा सगळ्यांनी कलकलाट सुरु केला. ’त्यात काय पाहायचं. हाती पायी धड असलं म्हणजे झालं’ - आजी ’इतका विचार काय करायचा. थोडं डाव-उजवं होत असतंच. आम्ही नाही निभावून नेलं’ - काकू ’तुम्ही आजकालच्या पोरींना स्वातंत्र्य दिलंय त्याचा गैरफायदा घेताय. बापाने स्थळ आणलं ते त्याला समजत नाही म्हणून?’ एक मावशी करवादली ’अगं, असं विचार करत बसशील तर जन्मभर बिनलग्नाची राहशील.’ - एक साळकाई या आणि अशा कलकलाटाने गोंधळून जात पोरीने लग्नाला रुक… पुढे वाचा »
गुरुवार, १४ नोव्हेंबर, २०१९
ड्रायविंग सीट
-
निवडणुका संपल्या होत्या... सरकार-स्थापनेची दंगल सुरु होण्यापूर्वी, निवडणुकीतील आरोप-प्रत्यारोपाने निर्माण झालेली कटुता पुसून काढावी, भाषणे करुन आणि प्रचारातील दगदगीतून थोडा विसावा मिळावा, म्हणून काही सर्वपक्षीय नेते एका एअर-कंडिशन्ड मिनी-बसने के.डी. शिवकुमार यांच्या रिसॉर्टकडे निघाले होते. मुंबईहून पुणे, सातारा, कोल्हापूर, मग वळून कोकण असे करत एक एक नेत्याला घेत हा ’गरीब-रथ’ पुढे चालला होता. तेवढ्यात या ’श्रमपरिहार-यात्रे’त सहभागी होऊ न शकलेल्या विदर्भ नि मराठवाड्यातल्या एक-दोन नेत्यांचे, ’तुम्ही पुण्या-मुंबईवाल्यांचे नेहमी असेच असते. आम्हाला मुंबईला यायला लावता. आम्हाला डावलता.’ अशा तक्रारी करणारे फोन आले होते. उजवीकडील सर्वात पुढच्या बाकावर भाजपच्या नेत्याशेजारी सेनेचा नेता बसला हो… पुढे वाचा »
Labels:
‘द वायर मराठी’,
अन्योक्ती,
कथा,
जिज्ञासानंद,
मनोरंजन,
साहित्य-कला
शनिवार, ९ नोव्हेंबर, २०१९
अयोध्या-विवाद, निकाल आणि मी
-
* मी अयोध्या-विवादाला कधीच बारकाईने अभ्यासलेले नाही. * भारतीय प्रसारमाध्यमे ही माध्यमे म्हणून केव्हाच निरुपयोगी झालेली आहेत. बातम्या हाच प्रपोगंडा, नाटक, चित्रपट आणि प्रवचन असलेल्या माध्यमांतून मिळालेल्या माहितीच्या आधारे मत व्यक्त करणॆ हा मूर्खपणा आहे असे माझे मत आहे. * त्यामुळे झाल्या निर्णयावर माझी प्रतिक्रिया आनंद वा दु:ख दोन्हीची असू शकत नाही. * मी टोळीच्या मानसिकतेचा नसल्याने विचारशून्य होत जन्मदत्त जातीय, धार्मिक, वांशिक, प्रादेशिक गटाची बाजू घ्यायला हवी असे मला वाटत नाही. * सोयीचा निकाल आला की ’न्यायालयाचा निर्णय अंतिम असतो. तो मानायला हवा.’ आणि गैरसोयीचा आला तर, ’हा आमच्या श्रद्धेचा प्रश्न आहे, त्यात निवाडा करण्याचा अधिकार न्यायालयाला नाही’ असे म्हणणार्यांच्या निरपेक्ष वृत्तीबद्दल मला अतीव आदर आहे. … पुढे वाचा »
शुक्रवार, ८ नोव्हेंबर, २०१९
पुलं जन्मशताब्दी
-
ज्यांचे नाव न घेता फक्त ’भाई’ म्हणून कानाच्या पाळीला हात लावणार्यांपासून, नाव उच्चारताच पोटशूळापासून मस्तकशूळापर्यंत सारे आजार उसळून येणार्यांपर्यंत सर्वांच्या आयुष्याचा भाग झालेला 'हशिवनारा बाबा’ आज शंभरीत पोचला. विदूषक, नाटक्या, लेखक, परफॉर्मर, गायक; भीमण्णा, मन्सूरअण्णा, कुमार, वसंतखाँ पासून आरती प्रभू, बोरकरांपर्यंत अनेक ’उत्तम गुणांची मंडळी’ जमवून जगण्याचा उत्सव करणारा, हसता हसवता जगण्यातील विरुपतेवर बोट ठेवणारा, दांभिकतेची यथेच्छ खेचणारा आणि गाता, हसवता अचानक अंतर्मुखही करणार्या आजोबाला सेंचुरीच्या शुभेच्छा. --- भारतीय इतिहासात हे सदैव असेच चालत आले आहे का? आत्मवंचना करत जगत राहण्याखेरीज काही इलाज नाही का? बालवयात, तरुण वयात, मनाच्या तुलनेने अधिक अपरिपक्व अवस्थेत ज्याला आपण सं… पुढे वाचा »
गुरुवार, ७ नोव्हेंबर, २०१९
देवळे आणि दांभिकता
-
गोव्यातील प्रसिद्ध शांतादुर्गा मंदिराबाहेरील हा फलक काल कुणीतरी शेअर केला त्यावरुन हा जुना अनुभव आठवला. काही वर्षांपूर्वी एका कॉन्फरन्सच्या निमित्ताने तिरुनेलवेलीला गेलो होतो. आमचे चार प्राध्यापक आणि मी नव-प्राध्यापक अशी टीम होती. आता आलोच आहे तर कन्याकुमारी, शुचीन्द्रम मंदिर वगैरे करावे असा बूट निघाला. मी भाविक वगैरे नसलो तरी इतरांबरोबर मंदिरात जाण्यास माझी ना नव्हती... आजही नसते. मंदिराच्या प्रवेशद्वारापाशी उत्तरीय पांघरून मंदिरात प्रवेश करु नये वगैरे सूचना होत्या. ( आमच्या एका चावट प्राध्यापकाने, ’हा नियम स्त्रियांनाही लागू आहे का?’ असा प्रश्न विचारला. प्रश्न चावटपणे विचारला असला, तरी माझ्या मते वाजवी आहे. ) पण काढलेले शर्ट्स ठेवण्याची व्यवस्था कुठेही दिसत नव्हती. तिथल्या कर्मचार्याला विचारले, तर तो म्हणाला ’हातावर टाकून घेऊन जा… पुढे वाचा »
बुधवार, ६ नोव्हेंबर, २०१९
पुलं, पुरस्कार आणि पोंक्षे
-
( ’अक्षरनामा’ या पोर्टलवर जयवंत डोळे यांनी लिहिलेल्या ’गांधीवादी पुलंच्या नावचा पुरस्कार ’नथुराम’ पोंक्षे यांना?’ या लेखावरील प्रतिक्रिया. ) --- पहिला महत्वाचा हरकतीचा मुद्दा हा की पुलंना ’गांधीवादी’ हे लेबल लावणे चुकीचे आहे. माझ्या मते पोंक्षे नामक महाभागाची विचारधारा आणि पुलंची विचारधारा यात टोकाचा फरक आहे इतके नोंदवून थांबता आले असते. एक पुलंप्रेमी म्हणून आणि पुलंनी विविध व्यासपीठांवरुन, लेखनातून मांडलेल्या विचारांशी बव्हंशी सहमत असलेली एक व्यक्ती म्हणून मला डोळे यांचा आक्षेप पटला आहे हे नमूद करतो. पण... पुलंच्या नावाचा पुरस्कार पुलं परिवार, आशय सांस्कृतिक आणि स्क्वेअर वन या तिघांतर्फे देण्यात येतो आहे हे मी विसरत नाही. पुरस्कार देणारे जेव्हा एखाद्या दिवंगत व्यक्तीच्या नावे पुरस्कार देऊ करतात तेव्हा त्यात त्यांचा स्वार्थ, द… पुढे वाचा »
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पण्या (Atom)







