-
विषयसंगती ध्यानात घेऊन हा लेख ’ वेचित चाललो... ’ या ब्लॉगवर हलवला आहे. तो इथे वाचता येईल. . - oOo - पुढे वाचा »
Indexes Menu_Desktop
| संपूर्ण सूची : |
सोमवार, १० ऑगस्ट, २०१५
जग दस्तूरी रे...
रविवार, ९ ऑगस्ट, २०१५
‘ऑल दॅट आय वॉन्ना डू’ : आभासी स्वातंत्र्याचा प्रवास
-
'Mother died today, or may be yesterday; I can't be sure' कामूच्या ‘द स्ट्रेंजर’च्या सुरुवातीचे हे मर्सोऽचे हे वाक्य म्हणजे साहित्यातील एका नव्या प्रवाहाची नांदी मानलं जातं. अस्तित्ववादी विचारधारेचा प्रभाव असलेल्या साहित्याचा प्रवाह तिथून बळकट होत गेला. वरवर पाहत अब्सर्ड, अर्थहीन जगातील माणसाच्या जगण्यातील तुटलेपणाचा, दिशाहीनतेचा मर्सोऽ प्रतिनिधी दिसतो. जगण्यातील कदाचित सर्वात महत्त्वाचा आधार गमावतानाही त्याबाबत बेफिकीर, खरंतर संवेदनाशून्य कंटाळा असलेल्या, कोणत्याही बंधनातून दूर राहू पाहणार्या, गुंतण्याचे टाळणार्या व्यक्तींचा प्रतिनिधी बनून राहिला होता. दुसर्या महायुद्धानंतर कामूच्या या नायकाची प्रतीरूपे प्रत्यक्ष जगण्यात दिसू लागली आणि साहित्यिकांनीही त्यांचा वेध घेण्यास सुरुवात केली. … पुढे वाचा »
गुरुवार, ३० जुलै, २०१५
जावडेकरांची ‘गेम’
-
विषयसंगती ध्यानात घेऊन हा लेख ‘ वेचित चाललो... ’ या ब्लॉगवर हलवला आहे. तो इथे वाचता येईल. - oOo - पुढे वाचा »
रविवार, १९ जुलै, २०१५
...आणि संस्थेत गजेंद्र!
-
गजेंद्र चौहान यांची पुण्यातील फिल्म इन्स्टिट्यूटच्या अध्यक्षपदावर वर्णी लावण्याच्या निर्णयाच्या विरोधात, त्या संस्थेतील विद्यार्थ्यांनी पुकारलेला संप एक महिना उलटून गेला तरी चालूच आहे. काहीही झाले तरी ही नेमणूक रद्द न करण्याची भूमिका सरकारने घेतली आहे. दोन दिवसांपूर्वी ‘वर्गात हजर व्हा नाहीतर निलंबित’ करण्याचा इशारा देऊन संस्थेच्या नव्या अध्यक्षांनी आपण मागे हटणार नसल्याचे दाखवून दिले आहे. चौहान यांच्या बरोबरच संचालक मंडळावर नियुक्त केलेल्या जाह्नु बरुआ, संतोष सिवन, पल्लवी जोशी वगैरे मंडळींनी ती जबाबदारी स्वीकारण्यास नकार दिलेला आहे. चौहान ज्या ‘एन्टरटेनमेंट इन्डस्ट्री’चे प्रातिनिधित्व करतात, त्यातूनच त्यांना बराच विरोध असल्याचे, त्यांच्या पात्रतेबद्दल अनेकांना शंका असल्याचेही उघड झाले आहे. … पुढे वाचा »
Labels:
‘दिव्य मराठी’,
जिज्ञासानंद,
प्रासंगिक,
राजकारण
शनिवार, २७ जून, २०१५
कलेवर
-
Game of Thrones या मालिकेतील The House of Black and White (Season 5, Episode 2) या भागातील एक स्थिरचित्र. ते होतं शहर गुलामांचं... तिथे मूठभर मालक नि ढीगभर गुलाम. ती, एक परागंदा राणी... अवतरली तिथे, त्यांची मसीहा म्हणून तिने तोडल्या त्यांच्या शृंखला तिच्या एकनिष्ठ सैनिकांच्या मदतीने त्यांच्या हाती तिने दिली त्यांना दुर्मिळ अशा स्वातंत्र्याची सनद! ते ‘स्वतंत्र गुलाम’ म्हणाले, ही तर आमची ‘मिसा’, साक्षात माता ! ती निघाली पुढल्या शहरी, द्यायला आणखी स्वातंत्र्याच्या सनदा पण इकडे ते माजी गुलाम, आता रुतले स्वार्थ नि परस्पर तंट्यात जेंव्हा ते सारे गुलाम झाले तेव्हाच गहाण पडले त्या… पुढे वाचा »
रविवार, २१ जून, २०१५
एका शापित नगरीची कहाणी
-
‘ऋषीचं कूळ आणि नदीचं मूळ शोधू नये’ अशी आपल्याकडे एक म्हण आहे. तरीही माणसं आपला इतिहास धुंडाळतात, हजारो वर्षांपूर्वीच्या कुण्या श्रेष्ठ व्यक्तीशी आपले नाते जोडून त्याला आपल्या वर्तमानातल्या अस्तित्वाचा आधार बनवू पाहतात. अनेक वर्षांच्या परंपरा असलेला समाज यात आपल्या अस्मितांची स्थानेही शोधत असतो. ज्यू, ख्रिश्चन आणि इस्लाम या तीन ‘बिब्लिकल’ धर्मांचे आणि त्यांच्या असंख्य पंथोपपंथांचे श्रद्धास्थान असलेल्या ‘जेरुसलेम’ नगरीला या सार्या परंपरांमधे अनन्यसाधारण महत्त्व आहे. एकाच नगरीचे अस्तित्व आणि महत्त्व इतका दीर्घकाळ टिकून राहिल्याचे दुसरे उदाहरण इतिहासात नाही. त्यामुळे जेरुसलेमचा इतिहास हा श्रद्धाळूंच्या दृष्टीने जितका महत्त्वाचा, तितकाच अभ्यासकांच्या दृष्टीनेही. पण जिथे श्रद्धांचा प्रश्न असतो, तिथे त्या अभ्यासात वस्तुनिष्ठता येणे बव… पुढे वाचा »
Labels:
‘मीमराठीLive’,
इतिहास,
जिज्ञासानंद,
पुस्तक,
संस्कृती,
समाज
आम्ही सारे स्टँप-कलेक्टर
-
मागच्या वर्षी २ ऑक्टोबरला नव्यानेच अधिकारारुढ झालेल्या सरकारने ‘स्वच्छ भारत अभियान’ची सुरुवात केली. गावात, खेड्यांपाड्यांत, शहरातील गल्लोगल्ली, स्वच्छ भारत अभियानाचा बोलबाला सुरू झाला. सर्व वृत्तपत्रांतून मोदींचा पूर्ण पानभर फोटो असलेल्या जाहिराती झळकू लागल्या. सारा सोहळा एकुणच वाजतगाजत पार पडला. वृत्तपत्रांतून, सोशल मीडियांतून आपण 'साजरा केलेल्या' स्वच्छता दिनाचे फोटो आणि रसभरीत वर्णने वाचायला मिळू लागली. दीर्घकाळ वेतन न मिळाल्यामुळे, भाजपाशासित पूर्व-दिल्ली महानगरपालिकेतील सफाई कामगारांनी प्रथम मार्च महिन्यात, आणि आता जून मधे तब्बल बारा दिवस संप केला. या काळात सार्या दिल्लीचा कचरा डेपो झालेला दिसला. ऑक्टोबरमधे हाती झाडू घेतलेले ते स्वयंसेवक, कार्यकर्ते या काळात कुठे सफाई करताना दिसले नाहीत. तसे मार्चमधे जेव्हा योगेन्द्र यादव … पुढे वाचा »
Labels:
‘लोकसत्ता’,
जिज्ञासानंद,
प्रासंगिक,
भाष्य,
राजकारण,
समाज
शनिवार, १३ जून, २०१५
चाले वाचाळांची दिंडी
-
४ जूनला मणिपूरमधल्या डोग्रा रेजिमेंटच्या जवानांच्या झालेल्या हत्येला जबाबदार असलेल्या दहशतवादी गटांच्या दोन तळांवर ९ तारखेला पहाटे भारतीय लष्कराने आणि वायुदलाने हल्ला करून ते उध्वस्त केले. या ऑपरेशनची माहिती ‘आर्मी हेडक्वार्टर्स’ तर्फे मे.ज. रणबीर सिंग यांनी माध्यमांना दिली. त्यानुसार भारतीय सैन्याने ‘म्यानमारच्या सहकार्याने’, ‘सीमेलगत’ दोन तळांवर हल्ला करून ते उध्वस्त केले. ‘वॉल स्ट्रीट जर्नल’ने भारतीय लष्कराने ‘म्यानमारच्या भूमीवर’ येऊन कारवाई केली असल्याचा, पण म्यानमारचे लष्कर यात प्रत्यक्ष सहभागी नसल्याचा, दावा म्यानमारच्या अध्यक्षांच्या कार्यालयाचे संचालक झॉ-ताय यांच्या हवाल्याने केला होता. परंतु AFP या वृत्तसंस्थेला दिलेल्या अधिकृत निवेदनात झॉ-ताय यांनी केवळ ‘सहमती नि सहकार्या’चा, यात म्यानमारचे लष्कर प्रत्यक्ष सहभागी झाले नसल्याचा… पुढे वाचा »
Labels:
‘दिव्य मराठी’,
आकलन,
जिज्ञासानंद,
राजकारण,
समाज
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पण्या (Atom)







