-
क्यूबा: जागतिक आरोग्यसेवेचे रोल मॉडेल << मागील भाग जानेवारी महिन्यात फ्रेंच नियतकालिक ‘चार्ली हेब्दो’ने एक व्यंगचित्र प्रकाशित केले. त्यात त्यांनी ‘अलान कुर्दी’ या भूमध्य समुद्रात जलसमाधी मिळालेल्या तीन वर्षाच्या सीरियन निर्वासिताबद्दल अश्लाघ्य टिपणी केली होती. हा तोच अलान होता, ज्याच्या समुद्रकिनारी वाळूत विसावलेल्या मृतदेहाचे छायाचित्र गेल्या सप्टेंबर महिन्यात जगभर पसरले आणि देशोदेशीच्या शांततावाद्यांना झडझडून जागे केले होते. हे ‘चार्ली हेब्दो’ तेच होते ज्याच्या कार्यालयावर इस्लामी माथेफिरुंनी हल्ला करून त्यांच्या अकरा सदस्यांना ठार मारले होते. त्यावेळी अभिव्यक्ती स्वातंत्र्याची बाजू घेत त्यांच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहिलेल्या शांततावादी समाजाला या निमित्ताने त्यांनी तोंडघशी पाडले आणि जगात शांततावादी, स्वातंत्र्यवादी कि… पुढे वाचा »
Indexes Menu_Desktop
| संपूर्ण सूची : |
मंगळवार, ८ मार्च, २०१६
ऐलपैल - ३ : रानिया - एक मॉडर्न आणि मॉडेल राज्ञी
Labels:
‘पुरोगामी जनगर्जना’,
आंतरराष्ट्रीय,
जिज्ञासानंद,
राजकारण,
व्यक्तिमत्व,
समाज
सोमवार, २९ फेब्रुवारी, २०१६
विनोद दोशी नाट्य महोत्सव - २: मै हूँ युसुफ और ये है मेरा भाई
-
त्या लहानशा गावात लोक अनेक पिढ्यांपासून राहात आहेत. गावाने अनेक उंबर्यांच्या अनेक पिढ्या पाहिल्या आहेत. गावातल्या प्रत्येकाला केवळ तिथे जन्मलेल्याच नव्हे, तर लग्न करून गावात आलेल्या सासुरवाशिणीच्याही चार पिढ्यांचा इतिहास ज्ञात आहे. केस पिकलेल्या, दातांचं बोळकं झालेल्या गावच्या वृद्धांना, गावाच्या रस्त्यांवर नि मैदानावर बागडणार्या सार्या पोरासोरांच्या जन्माची गाणी अजून याद आहेत. इथे जन्मलेल्या आणि मातीस मिळालेल्या समवयस्कांच्या मजारीवर त्यांनी आपल्या हाताने मूठ मूठ माती टाकली आहे. गावात भांडणतंटे, रुसवेफुगवे आहेत, तसेच त्यात मध्यस्थी करून तड लावणारे बुजुर्गही आहेत. ‘अशा तर्हेने ते सुखासमाधानाने नांदत होते’ असे परीकथेतले वास्तव नसले, तरी नांदत्या उंबर्यांचे ते गाव ही एक जिवंत परिसंस्था आहे. अचानक एक दिवस बातमी आली. गावाशी काडीचा संबं… पुढे वाचा »
Labels:
आंतरराष्ट्रीय,
आस्वाद,
जिज्ञासानंद,
नाटक,
राजकारण,
समाज,
साहित्य-कला
मंगळवार, २३ फेब्रुवारी, २०१६
विनोद दोशी नाट्य महोत्सव - १: शब्देविण संवादु...
-
नाटक किंवा एकुणच सादरीकरणाची कला ही शब्दाधारितच असते असा आपला बहुतेकांचा समज असतो, तो बव्हंशी खराही आहे. अगदी अलिकडे वास्तववादी शैलीशी फटकून राहात ‘एकदिश कथनशैली’ (Linear Narrative) नाकारून, घाट अथवा मांडणीचे (form) अनेक प्रयोग करण्याचे स्वातंत्र्य घेत असतानाही शब्दांचे महत्त्व तसेच राहते. पाश्चात्त्यांच्या ‘ऑपेरा’ सारख्या प्रकारात असेल, की आपल्याकडे ज्यांना ‘खेळे’ म्हणून ओळखतात तशा दशावतारी किंवा त्या त्या प्रदेशातील पारंपारिक नाट्यप्रकारातही शब्दांचे वर्चस्व वादातीत असते. शब्दांचे महत्त्व नाकारून, केवळ विभ्रम आणि शारीर हालचालीतून कथा जिवंत करण्याचे काम, आजवर कथकली सारख्या नृत्यप्रकाराने केले आहे. तरीही यात मुद्राभिनयाबरोबरच (expression) मानवी शरीराचा वापर पुरेपूर केला आहे. प्रश्न असा आहे, की आता तो ही किमान पातळीवर आणून सादरीकरण शक्य… पुढे वाचा »
Labels:
अनुभव,
आस्वाद,
जिज्ञासानंद,
नाटक,
संगीत,
साहित्य-कला
सोमवार, १५ फेब्रुवारी, २०१६
मोनॅको आणि तुरुंग...
-
फार वर्षांपूर्वी तोलस्तोयची* एक छोटीशी गोष्ट वाचण्यात आली होती*. --- मोनॅको नावाचे एक छोटेसे सुखी समाधानी राज्य होते. प्रजेची पुरेपूर काळजी करणारा राजा लाभल्यामुळे राज्यात सर्वांच्या गरजा भागवल्या जात होत्या. तेथील लोकही सद्विचारी, सद्वर्तनी आणि सदाचारी असल्याने देशात गुन्हे घडत नव्हते. त्यामुळे देशात पोलिस, न्यायाधीश, हे नावापुरतेच होते आणि त्यांना बहुधा काही काम नसे. अशा सुखी समाधानी देशात, एके दिवशी आक्रीत घडले. एका नागरिकाने रागाच्या भरात आपल्या पत्नीची हत्या केली. राज्यात खळबळ उडाली. अशा प्रकारचा गुन्हा प्रथमच घडल्यामुळे, पोलिस आणि न्यायव्यवस्था खडबडून जागी झाली. निवाडा झाला, आणि त्या गुन्हेगाराला गिलोटिनखाली शिरच्छेदाची शिक्षा फर्मावण्यात आली. पण शिक्षेच्या प्रत्यक्ष अंमलबज… पुढे वाचा »
शनिवार, १३ फेब्रुवारी, २०१६
ऐलपैल - २ : क्यूबा: जागतिक आरोग्यसेवेचे रोल मॉडेल
-
आइसलँडः जागतिकीकरण, एक बेट आणि एक धडा << मागील भाग ‘आईकडून गर्भाकडे होणारे एचआयव्ही आणि सिफिलिस संक्रमण यशस्वीपणे रोखणारा क्यूबा हा जगातील पहिला देश’ ठरल्याचे जागतिक आरोग्य संघटनेने मागच्या वर्षी (२०१५) जाहीर केले, आणि कॅरेबियन समुद्रातील हे लहानसे बेट अचानक प्रकाशझोतात आले. इतर काही देश जरी हे उद्दिष्ट गाठलेले– वा गाठण्याचा स्थितीत असले, तरी अमेरिकेच्या परसात असलेला आणि सातत्याने अमेरिकेची वक्रदृष्टी सहन करत आलेला, कम्युनिस्ट एकाधिकारशाही असलेला देश हे साधतो, हा अनेकांच्या दृष्टिने मोठा धक्का होता. सनसनाटी बातम्यांच्या शोधात असणार्या इलेक्ट्रॉनिक माध्यमांची दृष्टी, जरी या निमित्ताने प्रथमच या देशाकडे वळली असली, तरी आरोग्यसेवेच्या क्षेत्रात क्यूबाचे नाव त्यापूर्वी एक दोन दशकांपासूनच ऐकू येऊ लागले होते. कॅरॅबियन समुद्रात बहा… पुढे वाचा »
Labels:
‘पुरोगामी जनगर्जना’,
आंतरराष्ट्रीय,
आरोग्यव्यवस्था,
ऐलपैल,
जिज्ञासानंद
रविवार, ७ फेब्रुवारी, २०१६
निधर्मीवादाचे अर्वाचीन जागतिक संदर्भ
-
सेक्युलॅरिजम या इंग्रजी शब्दाच्या ढोबळमानाने तीन छटा वास्तवात पहायला मिळतात. एक म्हणजे धर्मनिरपेक्षता, सर्वधर्मसमभाव आणि तिसरी निधर्मीवाद. या परंतु या लेखात ढोबळमानाने ‘निधर्मीवाद’ हा एकच शब्द वापरला आहे, कारण लेखाचा विषय आणि विवेचन हे तीनपैकी कोणत्याही संदर्भात घेतले तरी पुरेसे सुसंगत राहील अशी अपेक्षा आहे. https://gulfnews.com/ येथून साभार. सध्या निधर्मीवाद ही धूसर, प्रतिक्रियास्वरूप अशी चौकट असल्याने बराच गोंधळ दिसतो. एखाद्या ‘इजम’कडून अपेक्षित असलेली व्यापक, कृतीशील मांडणी इथे नाही, आहेत ती निवडक अशी मार्गदर्शक तत्त्वे किंवा गाईडलाइन्स. ज्याला त्याला आपल्या धर्माचे पालन करण्याची मुभा ‘परस्पर हिताला बाध न आणण्याच्या’ वा तत्सम अटींवर ‘धर्मनिरपेक्षते’ने दिलेले स्वातंत्र्य असो, वा सर्… पुढे वाचा »
Labels:
‘आंदोलन’,
आंतरराष्ट्रीय,
जिज्ञासानंद,
तत्त्वविचार,
राजकारण,
समाज
गुरुवार, १४ जानेवारी, २०१६
ऐलपैल - १ : आइसलँडः जागतिकीकरण, एक बेट आणि एक धडा
-
इंग्लंड आणि ग्रीनलंडच्या यांच्या मधोमध उत्तर अटलांटिक आणि आर्क्टिक समुद्राच्या सीमेवर वसलेले आईसलँड हे एक बेट. महाराष्ट्राच्या सुमारे एक-तृतीयांश इतके क्षेत्रफळ, आणि जेमतेम तीन लाख लोकसंख्येचा देश. युनोच्या ‘ह्यूमन डेवलपमेंट इंडेक्स’नुसार १३ वा, तर दरडोई उत्पन्नाच्या दृष्टीने जगात १६व्या क्रमांकाचा देश! या देशाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हटले तर तो आपली ऊर्जेची जवळजवळ संपूर्ण गरज ही केवळ जलविद्युत आणि भू-ऊर्जा या दोन पर्यावरणपूरक ऊर्जांच्या माध्यमातून भागवतो . आर्थिकदृष्ट्या सुस्थिर असलेल्या या देशाने नव्वदीच्या दशकात खुल्या अर्थव्यवस्थेचा स्वीकार केला. याचाच एक भाग म्हणून बँकांवरील सरकारी नियंत्रण पूर्णपणे उठवण्यात आले. आईसलँडचा आर्थिक व्यवहार बव्हंशी ज्यांमध्ये एकवटला होता, त्या ग्लिटनर, लँड्सबँ… पुढे वाचा »
Labels:
‘पुरोगामी जनगर्जना’,
अर्थकारण,
आंतरराष्ट्रीय,
ऐलपैल,
जिज्ञासानंद,
राजकारण,
समाज
शनिवार, १९ डिसेंबर, २०१५
व्यवस्थांची वर्तुळे
-
आपल्या देशात ‘धर्म मोठा की देश?’ हा मिलियन डॉलर नव्हे, बिलियन-ट्रिलियन डॉलर प्रश्न आहे. समाजातील काही गट हा प्रश्न आपल्या विरोधकांना वारंवार विचारत असतात, कारण तो त्यांना अडचणीचा असतो, निरुत्तर करणारा असा यांचा समज असतो. पण जे हा प्रश्न विचारतात, त्यांना स्वतःलाही अनेकदा याच प्रश्नाला सामोरे जावे लागते. अशा अडचणीच्या वेळी ते हमखास ‘त्यांनी तसे मान्य केले तर आम्ही मान्य करू’ असे म्हणत आपली शेपूट सोडवून घेताना दिसतात. पण याचाच एक अर्थ असा की आपल्या नि ‘त्यांच्या’ कृतीत गुणात्मकदृष्ट्या काहीही फरक नाही याची कबुलीच देत असतात! दोनही बाजूंनी एकमेकांच्या आड लपण्याचा कितीही प्रयत्न केला तरी, काहीवेळा श्रद्धा, काहीवेळा कुटुंब, काहीवेळा भौगोलिकदृष्ट्या जोडलेल्या (देश माझा, देशातील नागरिक माझे, इतर देशाच्या नागरिकांपेक्षा अधिक जवळचे; हाच नियम द… पुढे वाचा »
Labels:
‘पुरोगामी जनगर्जना’,
जिज्ञासानंद,
तत्त्वविचार,
भूमिका,
संस्कृती,
समाज
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पण्या (Atom)







