Vechit Marquee

Indexes Menu_Desktop

संपूर्ण सूची :

मंगळवार, १० एप्रिल, २०१८

सीसल आणि ससुल्या


  • तुम्ही कार्टुन्स पाहता की नाही ठाऊक नाही. ‘वॉर्नर ब्रदर्स’च्या प्रसिद्ध बग्स बनी या पात्राचा सर्वात पहिल्या एपिसोडमध्ये ससा-कासवाच्या त्या प्रसिद्ध शर्यतीची कथा सांगितली होती. ‘बग्स बनी’ला मूळ कथा आधीच माहीत असल्याने, कुठेही विश्रांती घ्यायची नाही असे ठाम ठरवून, ते साध्यही करतो. पण तरीही बिचारा ती शर्यत हरतोच ... ...त्याचे कारण असतो तो सीसल नावाचा चलाख टर्टल, ज्याच्याशी बग्सने शर्यत लावलेली असते. या सशाला दोन कासवांमध्ये काही फरक चटकन दिसत नसल्याचा फायदा घेत, शर्यतीच्या वाटेवर एकुण दहा कासवे उभी केलेली असतात. ‘कितीही वेगाने धावलो, कासवाला मागे टाकले तरी, पुढे जावे तो कासव पुन्हा आपल्या पुढेच’ पाहून बग्सला हे कसे घडते ते कळत नाही. शक्य तितका वेग वाढवत तो अंतिम रेषा पार करतो. बघतो तर सीसल … पुढे वाचा »

शुक्रवार, ३० मार्च, २०१८

‘माझा’ धर्म आणि मी


  • धर्म ही स्वीकारण्याची, अनुसरण्याची गोष्ट आहे, लादण्याची नव्हे. माझा धर्म कोणता हे मीच ठरवणार, अन्य कुणी ठरवून कसे चालेल? जर मी ‘पास्ताफारियन’ आहे आणि मी ‘फ्लाईंग स्पागेती मॉन्स्टर’ या देवाची पूजा करणार आहे, तर इतर कुणी त्यावर कसे काय आक्षेप घेऊ शकतील? जन्मजात मिळालेला धर्म हाच तुमचा धर्म असला पाहिजे, असे बंधन जगाच्या पाठीवर कुठेही नाही . पण बहुतेक माणसे आळशी असतात. वारशाने, अनायासे जे मिळाले तेच श्रेष्ठ मानून चालतात. इथवर ठीक असते. पण इथेच न थांबता, पुढे इतरांनीही ते मानावे म्हणून आग्रह धरतात, इतरांचा धर्म मोडून काढायचा प्रयत्न करतात. हा मूर्खपणा तर आहेच, पण इतरांच्या अधिकारांचे उल्लंघनही आहे. आम्ही बहुसंख्य आहोत म्हणजे आम्ही म्हणू तसे नियम, हे बहुमताच्या राजकीय व्यवस्थेबाबत खरे आहे. पण… पुढे वाचा »

बुधवार, २८ मार्च, २०१८

मास्तरकीचे दिवस


  • मी गणिताचा मास्तर होतो. राजकारण्याला जशा निवडणुका चुकत नाहीत, तशा मास्तरला परीक्षांचे पेपर सेट करणे नि तपासणे हे भोग टळत नाहीत. अशाच एका पेपरमध्ये एका टॉपरच्या पेपरमध्ये एका प्रश्नाच्या उत्तराला – जे पूर्ण चूक होते – मी शून्य मार्क दिले. ती माझ्याकडे विचारणा करायला आली. मी ते गणित कसे सोडवायचे ते दाखवून, रीत आणि उत्तर दोन्ही समजावून दिले, आणि तुमचे दोनही चुकले हे पटवून दिले. ते मान्य करुनही तिचा तर्क होता, ‘पण इतके लिहूनही शून्य मार्क कसे काय देऊ शकता तुम्ही?’ मी म्हटलं, ‘अहो तुम्हाला गीतेतले श्लोक लिहायला सांगितले, तुम्ही मनाचे श्लोक लिहून ठेवले... कसे मार्क देणार?’ आपल्या परीक्षा व्यवस्थेत विद्यार्थ्यांनी मास्तरांना चांगलेच जोखून ठेवले आहे. कोणत्याही प्रश्नाचे उत्तर माहीत नसले, तरी पा… पुढे वाचा »

शुक्रवार, २३ मार्च, २०१८

देवबाप्पा, डार्विन आणि शेल्डन


  • विषयसंगतीमुळे हा लेख ‘ वेचित चाललो... ’ वर हलवला आहे. हा लेख इथे वाचता येईल. - oOo - पुढे वाचा »

बुधवार, २१ मार्च, २०१८

‘नर्मदासे सीख’ च्या निमित्ताने...


  • समाजाचा मोठा भाग हा दुसर्‍या भागातील लोकांच्या दुरवस्थेबद्दल बहुधा उदासीन असतो. एकतर समाज म्हणून आपण आधीच नियतीवादी आणि त्यामुळे अक्रियाशील. स्वत:च्या उन्नतीसाठी वा समस्या-निवारणासाठी आपण फारसे नेमके काही न करता, बुवा-बाबांचे मठ आणि कुठल्या कुठल्या देवळांची वाट धरणारे, त्यातून आपल्या कुठल्याही समस्येचे निवारण होते असे समजणारे. अशा समाजात परदु:ख फारसे त्रास देत नाही. तिथे मग त्याच्या निवारणासाठी धडपड करणारे ( भले तुमच्या मते चुकीच्या वा परिणामकतेच्या बाबतीत उणा असलेल्या मार्गाने का होईना ) हे मूर्ख असतात असे समजणारे, अमेरिकन मॉडेल आदर्श मानणारे लोक आता ‘सामाजिक बांधिलकी’ या शब्दालाही चॅलेंज देऊ लागले आहेत. ‘माझे हित साधले की समाजाचे हित आपोआप साधले जाते’ असले कुण्या खांद्यावर घेऊन प्रसिद्ध केलेल्या तथाकथित विचारवंताचे विधान आपापल्या झें… पुढे वाचा »

रविवार, ११ मार्च, २०१८

स्ट्रँड, पॉप्युलर आणि पुस्तक-व्यवहार


  • मुंबईच्या प्रसिद्ध ‘स्ट्रँड’ पाठोपाठ पुण्यातील ‘पॉप्युलर बुक हाऊस’ बंद होत असल्याची बातमी वाचायला मिळाली*. मी मुंबईकर नसल्याने स्ट्रँडचा अनुभव नाही, पण जे वाचायला मिळते आहे, त्यावरुन पारंपरिक पुस्तकविक्रीचे मॉडेल कालबाह्य झाल्याने अव्यवहार्य होऊन ते बंद करावे लागले असे दिसते. आता ‘पॉप्युलर’च्या सुनील गाडगीळांनीही हाच सूर आळवला आहे. स्ट्रॅण्ड बंद होण्याची दिलेली कारणे कितपत खरी हे तपासून पाहण्यासाठी माझ्याकडे पुरेसा डेटा नाही. पण ‘पॉप्युलर’ बाबत मी थोडेफार बोलू शकतो. दोन वेळचे अन्न मिळवण्याची भ्रांत होती, तोवर पुस्तक विकत घेणे हा प्रकार संभवत नव्हता. खासगी क्लासेसमधून काही वर्ग घेणे सुरु केले, त्यांचे पेपर तपासून देण्यातून काही प्राप्ती होऊ लागली, तेव्हा दोन-तीन महिन्यांतून एखादे पुस्तक… पुढे वाचा »

शनिवार, १० मार्च, २०१८

राजकीय मिथकांची निर्मिती आणि संघर्ष


  • दुसर्‍या महायुद्धात जर्मन सेनेची रशियात वेगाने सरशी होत होती. लवकरच त्या स्टालिनग्राडवर येऊन धडकतील अशी चिन्हे दिसू लागली होती. ‘स्टालिनग्राड पडणे म्हणजे रशियाची निर्णायक पराभवाच्या दिशेने वाटचाल सुरु होणे’ असाच अर्थ काढला जात होता. मेजर कुऽनिग नावाच्या जर्मन स्नायपरची दहशत रशियन सैन्याने घेतली होती. फासे पलटायचे तर काही चमत्काराची गरज होती. पण कम्युनिस्ट रशियामध्ये चमत्कारांच्या अपेक्षेला स्थान नव्हते. आपल्या आजोबांनी शिकवलेल्या अजोड नेमबाजीच्या बळावर शिकार करणार्‍या ‘वासिली झाईत्सेव’ या एका मेंढपाळाला कोमिसार दानिलोव हा अधिकारी हेरतो, त्याला लाल सैन्यात दाखल करुन घेतो. इथून पुढे वासिलीने मारलेल्या प्रत्येक जर्मन सैनिकासाठी एक एक हेल्मेट वाढवत स्टालिनग्राड मध्ये पोस्टर्स लावली जातात. त्या पोस्टरवरील दररोज वाढत जाणारी हेल्मेट्सची संख्या … पुढे वाचा »

मंगळवार, ६ मार्च, २०१८

नक्षलवादी उजवे आणि सनातनी डावे


  • लेनिनच्या रशियाने भारताला केलेली मदत उल्लेखून ‘लेनिनचा’ पुतळा पाडला म्हणून निषेध करणारे, आणि लेनिनने कित्ती लोक मारले, त्याचा पुतळा फोडला म्हणून काय झालं? हा प्रश्न विचारणारे दोघेही चकले आहेत. कदाचित हेतुत: तसे करत असतील तर संकुचित आहेत, स्वार्थी आहेत असे म्हणावे लागेल. पुतळा फोडणे ही कृती फोडणार्‍याच्या मनातील हिंसेची अभिव्यक्ती आहे. ‘आम्हाला न पटणारे सगळे आम्ही हिंसेने उखडून टाकू, हा आमचा अधिकार आहे', असे ते मानतात, असा याचा अर्थ असतो. इथे नक्षलवाद्यांची आठवण होते. आम्हाला मान्य नसलेली व्यवस्था आम्ही हिंसक मार्गानेही उलथून टाकू, त्यात त्या व्यवस्थेशी निगडित असलेल्या कुणाचीही हत्या करणे समर्थनीय आहे, तो आमच्या दृष्टिने स्वीकारार्ह मार्ग आहे असे ते मानतात. लेनिनचा पुतळा उखडणारे वैचारिकतेच्या दुसर्‍या टोकाला असूनही तोच डीएनए शेअर करता… पुढे वाचा »