-
सामाजिक बहिष्कार किंवा प्राकृतात ‘वाळीत टाकणे’ ही एक सामाजिक विकृती मानली जाते. केवळ या ब्रह्मास्त्रामुळे अनेक निरपराधांना जातपंचायतीच्या अन्यायकारक निर्णयांपुढे मान तुकवावी लागत असे/लागते. यातून जातपंचायत ही एक शोषक व्यवस्था म्हणून उदयाला आली. त्यामुळे न्यायव्यवस्थेच्या विकेंद्रीकरणाचे प्रारूप असलेली जातपंचायत, आज विसर्जित करण्यासाठी चळवळ करण्याची वेळ आली आहे. या जुनाट परंपरेचा आविष्कार नव्या स्वरूपात होतो आहे. जे फेसबुकवरून अमुक कंपनीची उत्पादने घेऊ नका. तमुक अभिनेता वा अभिनेत्रीचे चित्रपट पाहू नका. अमके अॅप ताबडतोब अन-इन्स्टॉल करा... असे वाळीत टाकण्याचे आदेश आपल्या ‘जाती’च्या माणसांना देत असतात. उपभोगाची, प्रचार-प्रसाराची आणि उपभोगाची साधने बदलली तरी मानसिकता तशीच मध्ययुगीन, संख्याबळावर ए… पुढे वाचा »
Indexes Menu_Desktop
| संपूर्ण सूची : |
मंगळवार, २४ एप्रिल, २०१८
समाजमाध्यमातले गुंड
गुरुवार, १९ एप्रिल, २०१८
पांचामुखी...
-
( कोणतीही चौकशी, कोणताही तपास न होता, केवळ चार न्यायाधीशांच्या ‘मता’नुसार जस्टिस लोयांचा मृत्यू संशयास्पद नाही, एवढे त्या मृत्यूची चौकशी करण्यासही नकार देण्यास पुरेसे आहे, असा अनाकलनीय निर्णय सर्वोच्च न्यायालयाच्या खंडपीठाने दिला .) आपल्याकडे ‘पांचामुखी परमेश्वर’ अशी म्हण आहे. चार शहाण्या माणसांचं जसं म्हणणं पडेल, ते योग्य समजून पुढे जावे असा ढोबळ अर्थ घेऊ या. त्यातूनच मग पंचायत ही संकल्पना आली. समाजातील पाच प्रतिष्ठित नि सुज्ञ माणसे पंच म्हणून एकत्र बसत, नि समाजातील समाजातील समस्यांचा निवाडा करत. पुढे जातींचे समाज बनले आणि जातपंचायत उदयाला आली. अर्थात कुणाला सुज्ञ म्हणायचे, शहाणा म्हणायचे हा प्रश्न होताच. पण तरीही काही काळ कदाचित ही व्यवस्था परिणामकारक ठरली असेल. बरं या पंचांना निवाडा करण्यासाठी कोणत्याही वस्तुनिष्ठ पुराव्याची गरज, वा… पुढे वाचा »
शुक्रवार, १३ एप्रिल, २०१८
शेणकिड्यांचा समाज माझा
-
अनेक दिवसांनी फेसबुकवर काल थोडा वेळ घालवला नि पश्चात्ताप झाला. आपण किती क्षुद्र, नृशंस, किळसवाणे लोक आहोत याचे पुरेपूर दर्शन घडले. आपले संस्कार किडके आहेत, माणसे किडकी आहेत. आपण माणसाकडे माणूस म्हणून पाहायला शिकवत नाही. त्याच्याकडे हिंदू किंवा मुस्लिम, ब्राह्मण किंवा दलित, आमच्या ग्रेट ओसाडवाडी पेक्षा दुय्यम असलेल्या उकिरडावाडीचा माणूस, स्त्री नव्हे मादी– मग ती आठ वर्षांची असो वा सत्तर वर्षांची, असे पाहायला शिकवतो. आपल्या बिनअकली सुमारपणाचे खापर आपण अन्य गटांवर फोडून कांगावा करतो. आठ वर्षांच्या पोरीवर झालेल्या बलात्काराची बातमी ऐकूनही, आमची पहिली चिंता असते ती आमचा नेता, आमचा धर्म, आमचा दगडी देवबाप्पा वाचवण्याची. असल्या किळसवाण्या मानसिकतेला धारण करणार्या कुडीला माणूस तर सोडा, जनावर म्हणणे हा जनावराचा घोर अपमान आहे. आमची संस्कृती म… पुढे वाचा »
मंगळवार, १० एप्रिल, २०१८
सीसल आणि ससुल्या
-
तुम्ही कार्टुन्स पाहता की नाही ठाऊक नाही. ‘वॉर्नर ब्रदर्स’च्या प्रसिद्ध बग्स बनी या पात्राचा सर्वात पहिल्या एपिसोडमध्ये ससा-कासवाच्या त्या प्रसिद्ध शर्यतीची कथा सांगितली होती. ‘बग्स बनी’ला मूळ कथा आधीच माहीत असल्याने, कुठेही विश्रांती घ्यायची नाही असे ठाम ठरवून, ते साध्यही करतो. पण तरीही बिचारा ती शर्यत हरतोच ... ...त्याचे कारण असतो तो सीसल नावाचा चलाख टर्टल, ज्याच्याशी बग्सने शर्यत लावलेली असते. या सशाला दोन कासवांमध्ये काही फरक चटकन दिसत नसल्याचा फायदा घेत, शर्यतीच्या वाटेवर एकुण दहा कासवे उभी केलेली असतात. ‘कितीही वेगाने धावलो, कासवाला मागे टाकले तरी, पुढे जावे तो कासव पुन्हा आपल्या पुढेच’ पाहून बग्सला हे कसे घडते ते कळत नाही. शक्य तितका वेग वाढवत तो अंतिम रेषा पार करतो. बघतो तर सीसल … पुढे वाचा »
Labels:
आस्वाद,
चलच्चित्रे,
जिज्ञासानंद,
संस्कृती,
समाज
शुक्रवार, ३० मार्च, २०१८
‘माझा’ धर्म आणि मी
-
धर्म ही स्वीकारण्याची, अनुसरण्याची गोष्ट आहे, लादण्याची नव्हे. माझा धर्म कोणता हे मीच ठरवणार, अन्य कुणी ठरवून कसे चालेल? जर मी ‘पास्ताफारियन’ आहे आणि मी ‘फ्लाईंग स्पागेती मॉन्स्टर’ या देवाची पूजा करणार आहे, तर इतर कुणी त्यावर कसे काय आक्षेप घेऊ शकतील? जन्मजात मिळालेला धर्म हाच तुमचा धर्म असला पाहिजे, असे बंधन जगाच्या पाठीवर कुठेही नाही . पण बहुतेक माणसे आळशी असतात. वारशाने, अनायासे जे मिळाले तेच श्रेष्ठ मानून चालतात. इथवर ठीक असते. पण इथेच न थांबता, पुढे इतरांनीही ते मानावे म्हणून आग्रह धरतात, इतरांचा धर्म मोडून काढायचा प्रयत्न करतात. हा मूर्खपणा तर आहेच, पण इतरांच्या अधिकारांचे उल्लंघनही आहे. आम्ही बहुसंख्य आहोत म्हणजे आम्ही म्हणू तसे नियम, हे बहुमताच्या राजकीय व्यवस्थेबाबत खरे आहे. पण… पुढे वाचा »
Labels:
जिज्ञासानंद,
धर्मव्यवस्था,
भाष्य,
भूमिका,
समाज
बुधवार, २८ मार्च, २०१८
मास्तरकीचे दिवस
-
मी गणिताचा मास्तर होतो. राजकारण्याला जशा निवडणुका चुकत नाहीत, तशा मास्तरला परीक्षांचे पेपर सेट करणे नि तपासणे हे भोग टळत नाहीत. अशाच एका पेपरमध्ये एका टॉपरच्या पेपरमध्ये एका प्रश्नाच्या उत्तराला – जे पूर्ण चूक होते – मी शून्य मार्क दिले. ती माझ्याकडे विचारणा करायला आली. मी ते गणित कसे सोडवायचे ते दाखवून, रीत आणि उत्तर दोन्ही समजावून दिले, आणि तुमचे दोनही चुकले हे पटवून दिले. ते मान्य करुनही तिचा तर्क होता, ‘पण इतके लिहूनही शून्य मार्क कसे काय देऊ शकता तुम्ही?’ मी म्हटलं, ‘अहो तुम्हाला गीतेतले श्लोक लिहायला सांगितले, तुम्ही मनाचे श्लोक लिहून ठेवले... कसे मार्क देणार?’ आपल्या परीक्षा व्यवस्थेत विद्यार्थ्यांनी मास्तरांना चांगलेच जोखून ठेवले आहे. कोणत्याही प्रश्नाचे उत्तर माहीत नसले, तरी पा… पुढे वाचा »
शुक्रवार, २३ मार्च, २०१८
देवबाप्पा, डार्विन आणि शेल्डन
-
विषयसंगतीमुळे हा लेख ‘ वेचित चाललो... ’ वर हलवला आहे. हा लेख इथे वाचता येईल. - oOo - पुढे वाचा »
बुधवार, २१ मार्च, २०१८
‘नर्मदासे सीख’ च्या निमित्ताने...
-
समाजाचा मोठा भाग हा दुसर्या भागातील लोकांच्या दुरवस्थेबद्दल बहुधा उदासीन असतो. एकतर समाज म्हणून आपण आधीच नियतीवादी आणि त्यामुळे अक्रियाशील. स्वत:च्या उन्नतीसाठी वा समस्या-निवारणासाठी आपण फारसे नेमके काही न करता, बुवा-बाबांचे मठ आणि कुठल्या कुठल्या देवळांची वाट धरणारे, त्यातून आपल्या कुठल्याही समस्येचे निवारण होते असे समजणारे. अशा समाजात परदु:ख फारसे त्रास देत नाही. तिथे मग त्याच्या निवारणासाठी धडपड करणारे ( भले तुमच्या मते चुकीच्या वा परिणामकतेच्या बाबतीत उणा असलेल्या मार्गाने का होईना ) हे मूर्ख असतात असे समजणारे, अमेरिकन मॉडेल आदर्श मानणारे लोक आता ‘सामाजिक बांधिलकी’ या शब्दालाही चॅलेंज देऊ लागले आहेत. ‘माझे हित साधले की समाजाचे हित आपोआप साधले जाते’ असले कुण्या खांद्यावर घेऊन प्रसिद्ध केलेल्या तथाकथित विचारवंताचे विधान आपापल्या झें… पुढे वाचा »
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पण्या (Atom)







