Vechit Marquee

Indexes Menu_Desktop

संपूर्ण सूची :

मंगळवार, २६ फेब्रुवारी, २०१९

हे ही असेच होते... ते ही तसेच होते - १


  • https://www.shutterstock.com/ येथून आभार. विचाराचे वावडे नि माणसांची ड्रांव ड्रांव कळत्या वयापासून मी कोणतेही कर्मकांड, उपासना करणे बंद केले. अर्थात घरच्यांनी ते करण्यास माझा विरोध नव्हता/नाही. तो त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे असे मी मानतो. इतकेच काय त्याला लागणारे साहित्यही आणून देत असे. पण त्यामुळे आमचे तीर्थरूप आमच्यावर उखडून होते. म्हणजे ते स्वत: काही करत/करतात असे मुळीच नाही. अस्सल भारतीय मानसिकतेप्रमाणे जे काय करायचे ते काटेकोर करायचे नि ते इतरांनी - म्हणजे आईने - करायचे असा त्यांचा बाणा होता. आपण नाही का ज्ञानेश्वर जन्मावेत पण इतरांच्या घरी, तुकोबा जन्मावा पण तो आमचा जावई म्हणून नको, शिवाजी जन्मावा तो फार लांब नको म्हणून शेजारच्या घरी... अलीकडचे पाहिले तर ’हौं जौं द्या … पुढे वाचा »

सोमवार, २५ फेब्रुवारी, २०१९

भ्रमनिरास आणि अहंकाराची निरगाठ


  • माणूस आयुष्याच्या एका टप्प्यावर एखाद्या संकल्पनेने, एखाद्या विचारव्यूहाने, एखाद्या व्यक्तीच्या प्रभावामुळे इतका झपाटून जातो की’ ’बस्स, हेच काय ते एक सत्य’, ’हाच काय तो अंतिम सत्याचा/विकासाचा मार्ग’, ’हाच काय तो देवबाप्पाने आमच्या उत्थानार्थ पाठवलेला प्रेषित’ म्हणून भारावलेपणे तो त्याची पाठराखण करत राहतो. पण - माझ्या मते- जगातील कोणतीही विचाराची चौकट, व्यवस्था, व्यक्ती ही सर्वस्वी निर्दोष असू शकत नाही, ती कायमच यशस्वी होईल अशी खात्री देता येत नाही . माणूस भानावर असेल, डोळस असेल, तर हे सहज दिसूनही येते. देव-असुर, बरोबर-चूक, पवित्र-अपवित्र, तारक-मारक अशा द्विभाजित जगात राहणार्‍यांना हे बहुधा ध्यानात येत नाही. त्याला अर्थातच एका कळपात राहण्याची, एकट्याने उभे राहण्याच्या भीतीची जोडही असतेच. पण ड… पुढे वाचा »

रविवार, २४ फेब्रुवारी, २०१९

काँग्रेस आणि पर्यायांच्या मर्यादा


  • ( एका चर्चेत विरोधकांच्या वा चॅनेल्सच्या मते ’काँग्रेसने स्वीकारलेला ’सॉफ्ट हिंदुत्वाचा’ आणि काँग्रेसच्या मते 'हिंदुत्वाच्या राजकीय बाजूला वगळून स्वीकारलेल्या हिंदुपणाचा' प्रवास राजकीयदृष्ट्या लाभ देईलही पण वैचारीकदृष्ट्या मागे घेऊन जाणारा नाही का?’ असा एक प्रश्न उपस्थित झाला. त्याला दिलेला हा प्रतिसाद .) --- अगदी बरोबर. याच कारणासाठी मला तो पटलेला नाही. पण... राजकीय पक्षाला राजकीय सत्ता हवी असते आणि ती वैचारिकतेवर कधीच मिळत नाही हे ढळढळीत सत्य आहे. वैचारिक मंडळींमध्ये आपसातच इतका अंतर्विरोध असतो, की कितीही नेमकी वैचारिक भूमिका घेतली तरी वैचारिक मंडळी सर्व एक होऊन मतदान करत नसतात. वैचारिक मंडळी नेहमीच मूठभर असतात, आणि ही मंडळी कायम काँग्रेसच्या विरोधातच उभी राहिली आहेत. मग सत्ताही नाही नि वैचारिक मंडळींत स्थानही नाही … पुढे वाचा »

गुरुवार, २९ नोव्हेंबर, २०१८

गोमा गणेश, पितळी दरवाजा


  • ‘गोमा गणेश, पितळी दरवाजा’ हा किस्सा कोणाकोणाला माहित आहे? कुणी म्हणतात पेशवाईत सवाई माधवरावांच्या काळातील, ( अल्पवयीन राजा, आणि केवळ आढाव असलेला त्याचा सल्लागार यामुळे प्रशासनात आलेल्या ढिलाईचा फायदा घेऊन कदाचित ) तर कुणी राष्ट्रकूट, कुणी कृष्णदेवरायाच्या काळातला. ‘पराया माल अपना’ ही काही केवळ अर्वाचीन हिंदुत्ववाद्यांचीच मक्तेदारी आहे असे नाही. पंचतंत्र, इसापनीती, मुल्ला नसरुद्दिन, तेनाली राम, बीरबल आदिंच्या कथांमध्ये देवाणघेवाण होतच असते. त्यात एखादी कथा, एखादा किस्सा नक्की कुठून कुठे गेला, हे अस्मितेचा दंश झालेल्याखेरीज इतर कुणीच ठामपणॆ सांगू शकत नाही. तो किस्सा असा होता. एका चतुर व्यक्तीने ‘पितळी दरवाजा’ म्हणून ओळखल्या जाणार्‍या वेशीवर ठाण मांडले. जणू ‘राजानेच जकात वसुली वा मालाच्या वाहतु… पुढे वाचा »

सोमवार, २६ नोव्हेंबर, २०१८

फितूर सेनापतीचे सैनिक


  • (’लोकसत्ता’चा ’ कडकलक्ष्मीच्या गुदगुल्या ’ हा अग्रलेख वाचून झाल्यावर...) सेनेचे रामंदिर राजकारण हे भाजपच्याच पथ्यावर पडणारे, कदाचित त्यांच्याच संगनमताने चालले आहे . भाजपने गेली तीसेक वर्षे राममंदिराचा मुद्दा हा ‘हर मर्ज की दवा’ म्हणून वापरला. ते अडचणीत असले, निवडणुका जड जाणार असे दिसले, की हटकून संघ परिवारातील कुणीतरी- बहुधा सरसंघचालक, राममंदिरावर भाष्य करतो. एखादा खूप प्रभावी विरोधी मुद्दा असला की विहिंप गुरगुर करू लागते. छायाचित्र लोकसत्ताच्या लेखातून. पण आता त्यांच्या तोंडून तो मुद्दा ऐकला की ‘हां, आले हे तोच मुद्दा दळायला घेऊन. करायला काही नको. नुस्ते भकत बसतात.’ अशी तीव्र प्रतिक्रिया हिंदुत्ववादी असलेल्या नि नसलेल्या अशा दोन्ही प्रकारच्या मंडळींकडून ऐकू येऊ लागली आहे. तिचा आवाज फार… पुढे वाचा »

शनिवार, २४ नोव्हेंबर, २०१८

वर्ड-क्लाऊड सिंड्रोम


  • ‘वर्ड-क्लाऊड सिंड्रोम’ नावाचा एक नवा आजार सोशल मीडिया मुळे उद्भवला आहे. लेखकाचा सूर, मुद्दा, भर कशावर आहे, त्याला काय सांगायचे आहे याकडे साफ दुर्लक्ष करुन, लोक पोस्टमधील आपल्याला बोलता येईल असे शब्द फक्त उचलतात (हे पाहून मला ‘ब्युटिफुल माईंड’ मधला डॉ. नॅश आठवतो!) नि त्यावर चर्चा वा प्रतिसाद करतात. कालच मी ‘स्टार ट्रेक’ या मालिकेतील एक – माझ्या मते– मननीय संवाद शेअर केला. हा संवाद अवगुण मानल्या गेलेल्या वा नकारात्मक गुण मानल्या गेलेल्या व्यक्तिवैशिष्ट्यांच्या संभाव्य उपयुक्ततेबद्दल होता. १९६६ ची मालिका कदाचित अनेकांना ठाऊक नसेल म्हणून ‘ही कुठली? तर सध्या चालू असलेल्या यंग शेल्डन’मध्ये उल्लेख झालेली.’ असा संदर्भ दिला.  झाले, तेवढेच वाचून शाळेत निबंधात जसे ‘... आणि म्हणून मला माझी आई फार्फार आवड… पुढे वाचा »

सोमवार, १२ नोव्हेंबर, २०१८

Punchतंत्र: बेडकांचा राजा


  • एकदा बेडकांना आपल्याला राजा हवा असे वाटू लागले... ते देवबाप्पाकडे गेले. ते म्हणाले, ‘आम्हाला राजा हवा.’ देवबाप्पाने त्यांना एक लाकडाचा ओंडका दिला. त्याला मिरवणुकीने आणून त्यांनी राजा बनवले. हा राजा काही न करता एका जागी पडून असे. थोडक्यात, बेडकांना आपले आहार-भय-निद्रा-मैथुन लिप्त आयुष्य जगण्याची मोकळीक त्याने दिली होती. पण मग बेडकांना वाटू लागले की ‘ह्यॅ: हा कसला राजा. याच्या राज्यात काहीच ‘हॅपनिंग’ नाही.’ मग त्यांनी ठरवले की, पुन्हा देवबाप्पाकडे जाऊन नवा राजा मागायचा. ते म्हणाले, ‘आता आम्हाला असा बाहेरुन आणलेला राजा नको. आमच्या तळ्यातला किंवा निदान आमच्यासारखाच जलजीवी असा एखादा राजा द्या.’ देवबाप्पाने त्यांचे म्हणणे ऐकले. त्याने एका बगळ्याला त्यांचा राजा म्हणून पाठवले. हिरवट-मळकट रंगांच्या बेडकांना त्याचा पांढराशुभ्र रंग पाहून ‘आपला … पुढे वाचा »

शुक्रवार, ९ नोव्हेंबर, २०१८

कप के बिछडे हम आज...


  • एखादा सुरेखसा चित्रपट नुकताच मिळालेला असतो. रात्री जेवणानंतर किचनची कामे पटापट उरकून तुम्ही चित्रपट पाहायला जाऊ, असे मनचे मांडे खात असता. सफाई करत असताना नुकत्याच आणलेल्या सहा कपांच्या सेट मधला एक कप तुमच्या हातून निसटतो, सुमारे तीन-साडेतीन फुटावरुन सरळ जमिनीवर आदळतो. आणि दोन तीन भक्कम टप्पे खात पाचेक फुटावर जाऊन विसावतो. इतका मार खाऊन त्या कपाचा कानच फक्त तुटतो. आता तुमच्यासमोर ‘याचे काय करावे?’ हा यक्षप्रश्न उभा राहतो. alittlechange.com.au येथून साभार. हा कप आता बाद झाला म्हणून टाकून द्यावा, तर त्याची एक बाजू पाहता ते अवघड दिसते. एकतर नवा आहे, त्यात कानाचा गेलेला बळी वगळता, इतका मार खाऊनही टवकाही न उडालेली बॉडी भक्कम असल्याचा पुरावा देत असते. त्याचबरोबर तो बहिरा कप चहाखेरीज अ… पुढे वाचा »