Vechit Marquee

Indexes Menu_Desktop

संपूर्ण सूची :

रविवार, ५ एप्रिल, २०२०

जग जागल्यांचे ०६ - कोरोनाचा क्रूसेडर: ली वेनलियांग


  • नैतिक तंत्रभेदी : सॅमी कामकार « मागील भाग --- मागील वर्षाच्या अखेरीस चीनमधील वुहान शहरातील एका रुग्णालयात फ्लू अथवा सामान्य तापावर उपचार घेत असलेल्या एका रुग्णाच्या प्रकृतीला बराच काळ उतार पडताना दिसत नव्हता. एरवी एक-दोन आठवड्यात बरा होणारा आजार दीर्घकाळ हटेना, तेव्हा त्याच्या घशातील स्रावाचे नमुने प्रयोगशाळेकडे पाठवण्यात आले. त्याचा रिपोर्ट आरोग्य सेवेच्या संचालिका असलेल्या डॉ. अई फेन यांच्या नजरेस पडला. या रिपोर्टमध्ये ’सार्स कोरोनाव्हायरस’ ची शक्यता अधोरेखित करण्यात आली होती. २००२ ते २००४ या दोन वर्षांत जगात धुमाकूळ घालून घेलेल्या आणि सुमारे आठशे बळी घेतलेल्या आजाराचे नाव पाहून अई यांनी सार्स (Severe Acute Respratory Syndrome) या शब्दाला अधोरेखित करुन वुहानमधील एका अन्य रुग्णालयातील व… पुढे वाचा »

‘प्रिन्सेस डायमंड’च्या डायरीतून ‘कोविड-१९’


  • ‘जॉन्स हॉपकिन्स युनिवर्सिटी’चा कोविड-१९ संबंधी माहिती देणारा डॅशबोर्ड पाहात होतो. कोणत्या देशांत किती रुग्ण आहेत हे पाहताना त्या यादीत अचानक ’डायमंड प्रिन्सेस’ हे नाव पाहिले की बुचकळ्यात पडलो. या देशाचे नावही कधी ऐकले नव्हते. अधिक शोध घेता हा देश नव्हे तर खासगी क्रूझ आहे असे समजले. जेमतेम एक हजारच्या आसपास कर्मचारी आणि सुमारे २७०० उतारू असलेल्या या क्रूझवर तब्बल ७१२ लोकांना लागण झालेली होती. त्यातले ५१२ विषाणूमुक्त झाले तर १० जण दगावले असे हॉपकिन्सचा डॅशबोर्ड सांगतो. इतक्या मोठ्या प्रमाणावर लागण झाल्यानेच त्या क्रूझचे नाव देशांच्या यादीत समाविष्ट करावे लागले. हा एक अनोखा अपवाद आहे. पण इतक्या मोठ्या प्रमाणावर झालेली लागण हे एकच कारण आहे असे मात्र नाही. असा अपवाद समोर असलेल्या समस्येबद्दल काही इनसाईट देऊन जातो आहे. एखाद्या मोठ्या भूभागावर … पुढे वाचा »

रविवार, २२ मार्च, २०२०

जग जागल्यांचे ०५ - नैतिक तंत्रभेदी: सॅमी कामकार


  • कॅथरीन बोल्कोव्हॅक « मागील भाग --- दहा वर्षांचा असताना त्याला पहिला संगणक मिळाला. इंटरनेटवर भ्रमंती चालू असताना कुणीतरी धमकी देऊन त्याचा संगणक बंद पाडला. तो हादरला. पण ’जर समोरचा हे करु शकत असेल, तर मी ही करु शकतो’ या जिद्दीने कामाला लागला. इतर कुणाचा अधिकार असलेले, मालकीचे असलेले संगणक अथवा संगणक-प्रणाली यांच्यात परस्पर बदल करणे याला संगणकाच्या भाषेत ’हॅक’ करणे म्हटले जाते. टीन-एजर असतानाच तो वेगवेगळी सॉफ्टवेअर, गेम्स ’हॅक’ करुन आपल्याला हवे तसे बदल करु लागला. असे असले तरी सुरुवातीला त्याने इतर कुणाच्या संगणकाला धक्का लावलेला नव्हता. वयाच्या विशीत पोचल्यावर त्याने गंमत म्हणून हा प्रयोग करायचे ठरवले. तरुणाई आणि सोशल मीडिया हे नाते तेव्हा मूळ धरु लागले होते. आजच्या फेसबुक’सारख्या ’मा… पुढे वाचा »

गुरुवार, १९ मार्च, २०२०

अफवांवर विश्वास ठेवू नका... म्हणे!


  • "पार्टीच्या चुकीच्या आज्ञा पाळत जाऊ नकोस." वैतागलेल्या मेयर पेपोनने आपल्या कॉम्रेडला खडसावले. ’आता चुकीची आज्ञा कुठली हे कसे ओळखायचे’ कॉम्रेड बिचारा बुचकळ्यात. जिओवानी ग्वेरेसीच्या ’डॉन कॅमिलो स्टोरीज’ मधला हा संवाद मार्मिक आहे. मुद्दा असा आहे की एकदा आपल्या प्रजेला आज्ञाधारक बनवले की त्यांना तुमच्या नावे जे येते ते निमूटपणॆ अनुसरण्याचे अंगवळणी पडून जाते. त्यांची विचारशक्ती खुंटते. आता आज्ञा देणार्‍यांवर अधिक जबाबदारी येते. अशी आज्ञा सर्व बाजूंचा विचार करुन, कमीत कमी नुकसान आणि जास्तीत जास्त अपेक्षित परिणाम अशी असावी याचे पूर्वमूल्यमापन त्यांनाच करावे लागते. त्या आज्ञेच्या अंमलबजावणीच्या बर्‍या-वाईट परिणामांची जबाबदारी पूर्णपणे त्यांना घ्यावी लागते (आपल्या महान देशात राजकारण, समाजकारणापासून सर्वच क्षेत्रात नेमके उलट आहे. ’स… पुढे वाचा »

बुधवार, १८ मार्च, २०२०

गुलामोपनिषद


  • गुलामाला मालक दोन वेळचे अपुरे जेवण देतो आणि त्याच्याकडून बेदम काम करुन घेतो. ’तुला पैसे दिले तर ती जोखीम तुला सांभाळता येणार नाही, पोटभर जेवलास तर सुस्ती येईल नि काम करता येणार नाही आणि सतत काम केले नाहीस तर तुझे आरोग्य बिघडेल.’ असे मालकाने गुलामाला पक्के पटवून दिलेले असते. कुणी गुलामाला त्याच्या गुलाम असण्याची जाणीव करुन दिली तर उलट, ’अरे उलट इथे दोनवेळच्या अन्नाची शाश्वती आहे. एरवी त्यासाठी किती वणवण’ करावी लागली असती?’ असा प्रतिप्रश्न करतो. कारण आज त्याचे जे जगणे आहे त्याहून चांगले जगणे अस्तित्वातच नाही अशी मालकाने त्याची खात्री पटवून दिलेली असते. इतरांचे स्वातंत्र्य किंवा त्याचेच गुलामीपूर्व आयुष्य हे खरे स्वातंत्र्य नाही, अध:पाताचे जिणे आहे असे त्याचे सांगणे असते आणि गुलामाला ते पुर… पुढे वाचा »

रविवार, ८ मार्च, २०२०

जग जागल्यांचे ०४ - कॅथरीन बोल्कोव्हॅक


  • जिन्हे नाज़ था हिंद पर... : सत्येंद्र दुबे « मागील भाग --- सोविएत युनियनप्रमाणेच कम्युनिस्ट राजवटीखाली असलेल्या युगोस्लाव्हिया या देशाच्या वांशिक, धार्मिक, भाषिक आधारावर विघटनास सुरुवात झाली. सात देश वेगळे झाले. यातील बोस्निया या राष्ट्रात झालेली यादवी सर्वात भयानक होती. तिथे शांतता प्रस्थापित करण्यासाठी आणि लोकशाही रुजवण्यासाठी संयुक्त राष्ट्रसंघातर्फे (UN) मिशन हाती घेण्यात आले. याचा एक भाग म्हणून आंतरराष्ट्रीय पोलिस दलाची (IPTF) स्थापना करण्यात आली. यात विविध देशांचे नागरिकांची निवड करण्यात आली. ही निवड करण्याची जबाबदारी असलेल्या ’डाईनकॉर्प’ या कंपनीतर्फे नेब्रास्का पोलिस दलाच्या नोटीस बोर्डवर लावलेली भरतीची नोटीस कॅथरीन बोल्कोव्हॅक या अधिकार्‍याच्या नजरेस पडली. भरपूर पगार, राष्ट्रसंघाच्या मिशनमध्ये काम करण्याची आणि आपल्या आजोबांच्य… पुढे वाचा »

मंगळवार, ३ मार्च, २०२०

महाराष्ट्र काँग्रेसला अटक करा…


  • राज्य सरकार मुस्लिमांसाठी ५% आरक्षण देणार अशी बातमी वाचली. तीन पायांच्या सरकारचा हा निर्णय अनेक अर्थांनी ‘बुडत्याचा पाय खोलात’ नेणारा आहे. पहिला मुद्दा आहे तो राजकीय आरोपाचा, मुस्लिम लांगुलचालनाचा. भाजपचे माथेफिरू हिंदुत्व याचा फायदा उठवणार हे तर उघड आहे. तीन पायांच्या सरकारमधली सेना आपले हिंदुत्व पुरेसे सिद्ध करून बसलेली असल्याने भाजपच्या हातात कोलित मिळाले तरी त्याची झळ सोसण्यास दोन काँग्रेस सोबत असल्याने, आणि शिक्षणखाते सेनेच्या वाट्याला आलेले नसल्याने, सहजपणे हात वर करू शकेल. राष्ट्रवादीचे धोरण ‘गंगा गए गंगादास, जमना गए जमनादास’ असे असल्याने भाजप त्यांनाही फार टोचणार नाही. पण काँग्रेस मात्र यात साऱ्याला अंगावर घेऊन आणखी खोल गर्तेत जाणार आहे. याला एकाहून अधिक कारणे आहेत. पहिले म्हणजे सध्या चालू असलेल्या सीएएविरोधी आंदोलनाच्या बाजूल… पुढे वाचा »

सोमवार, २ मार्च, २०२०

सावरकरांना भारतरत्न का मिळत नाही?


  • अलीकडच्या काळात सावरकर हा अतिशय ज्वलंत विषय होऊन राहिला आहे. कुणाच्या दृष्टीने ते स्वातंत्र्यवीर असतात, तर कुणाच्या दृष्टीने ते माफीवीर असतात. कुणाच्या दृष्टीने पन्नास वर्षे शिक्षा झालेले एकमेव स्वातंत्र्यसैनिक असतात, तर दुसर्‍यांच्या दृष्टीने ते ब्रिटिशांच्या पेन्शनवर जगणारे परजीवी असतात. या सावरकरांना भारतातील सर्वोच्च बहुमान, ’भारतरत्न’ द्यावा अशी मागणी अधूनमधून होत असते. अलीकडे हिंदुत्ववाद्यांची राजकीय घोडदौड सुरु झाल्यापासून ती अधिक जोरकसपणे मांडली जाऊ लागली आहे. हा बहुमान त्यांना द्यावा की देऊ नये यावरील वादात न पडता, "सहा वर्षे केंद्रात हिंदुत्ववादी सरकार असूनही तो का दिला जात नसावा?" या मर्यादित प्रश्नाचा वेध घेऊ . सेल्युलर जेल, अंदमान येथे पंतप्रधान मोदी सावरकरांना वंदन करताना (२०१८) फोटो… पुढे वाचा »