-
’अखंड-हिंदुस्तान’ नावाचा घोष हा अगदी लहानपणापासून ऐकत आलेला विनोद वा बागुलबुवा आहे. मुळात ’देशाची फाळणी कुणाच्या तरी लहरीखातर वा मूर्खपणामुळे झाली, एरवी तो आमचा भागच आहे’ हा दावाच खरंतर मूर्खपणाचा असतो. देश म्हणजे जमिनीचा तुकडा नव्हे. देश म्हणजे त्यातील माणसे, समाज, वारसा, इतिहास यांचा समुच्चय . ’पाकिस्तानही आमचाच आहे आणि तो परत आमच्या देशात सामील व्हावा’ म्हणताना त्यावर राहणार्या, आपल्याला नकोशा वाटणार्या माणसांचे काय करायचे? असा प्रश्न ’अखंड-हिंदुस्तान’वाल्या मुखंडांनी स्वत:ला विचारायला हवा. हा अवघड प्रश्न ते स्वत:ला विचारत नसतात, कारण उत्तर आपल्या सोयीचे येणार नाही, हे निदान त्यांतील विचारशील व्यक्तींना पक्के ठाऊक असते. कुण्या एकाचा वा कुण्या सत्तेच्या लहरीखातर फाळणी होत नसत… पुढे वाचा »
Indexes Menu_Desktop
| संपूर्ण सूची : |
सोमवार, २८ फेब्रुवारी, २०२२
अखंड-हिंदुस्तानचे स्वप्न आणि वास्तवातील प्रश्न
रविवार, २० फेब्रुवारी, २०२२
हिजाब, मेंदी आणि व्यवस्थांची वेटोळी
-
सुमारे पाच वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. एका कॉन्व्हेंट संचालित शाळेत मुलींनी मेंदी लावली म्हणून त्यांना शाळेतून घरी पाठवण्यात आले होते. (त्याहीपूर्वी अशा घटना घडत होत्याच. स्मरणात असलेली ही शेवटची. ) शाळेच्या नियमांत कोणतीही सौंदर्यप्रसाधने (लिपस्टिक, नेलपॉलिश वगैरेंसह) लावण्यास मनाई असल्याने हा शिस्तभंग आहे असे शाळेचे म्हणणे होते. शाळा कॉन्व्हेन्ट संचालित असल्याने लगेचच त्याला धार्मिक वळण मिळाले. मेंदी लावणे ही आमची हिंदू रीत आहे असे म्हणत काही संघटनांनी वादात उडी घेतली. थोडा वाद होताच शाळॆने मुलींवरची निलंबनाची कारवाई रद्द केली... गंमत अशी की तेव्हा आमच्या धार्मिक रीतींना शाळेच्या नियमाहून वरचढ मानावे म्हणणारे आज नेमकी उलट भूमिका घेत आहेत. कारण आता मुद्दा आमच्या नव्हे ’त्यांच्या… पुढे वाचा »
Labels:
‘अक्षरनामा’,
धर्मव्यवस्था,
राजकारण,
व्यवस्था,
सत्ताकारण
रविवार, १२ सप्टेंबर, २०२१
आपली महान(?) परंपरा
-
मध्यंतरी सकाळी दूध घेऊन येत असताना एका मित्राची गाठ पडली. तो गणपतीबाप्पाच्या उत्सवासाठी आवश्यक गोष्टी खरेदी करण्यासाठी बाहेर पडला होता. सोबत त्याची पत्नी गौरी आगमनाची तयारीही करताना दिसत होती. त्या घरातील आजींचे तीनेक महिन्यांपूर्वी निधन झाले आहे. त्यामुळे परंपरेनुसार वर्षभर सणवारांना फाटा देणे अपेक्षित असल्याने याचे जरा आश्चर्य वाटले. घरी पोचल्यावर आईला सांगितले, तर ती सहजपणे ’हो ती काही आपल्या घराण्यातली नसल्यामुळे तिचे वर्षभर सुतक नसते.’ मला परंपरेचा संताप तर आलाच, पण त्याहून आईने जितक्या सहजपणे हे सांगितले त्याबद्दल आला. मी स्वत: कोणतीही पूजा-अर्चा, कर्मकांड करीत नाही. तेव्हा हा माझ्या दृष्टिकोनाचा मुद्दाच नाही. मुद्दा श्रद्धेच्या परिघातच असलेल्या अन्यायाचा आहे. ती स्त्री आपले घर सोडून… पुढे वाचा »
सोमवार, ३० ऑगस्ट, २०२१
देवस्थान
-
एका प्रसिद्ध देवस्थानाने श्रद्धाळूंची स्पर्धा घेतली. त्यात एकच प्रश्न होता, ’देवस्थानातील देवाचे दर्शन कसे घेतले की अधिक पुण्य लाभते?’ एक म्हणाला, ’मनोभावे हात जोडून घरुन केलेला नमस्कारही देवाला पोचतो.’; देवस्थानच्या ’कार्यकर्त्यांनी’ त्याला घरीच गाठला, यथास्थित पूजा करून इस्पितळात पोचवला. दुसरा म्हणाला ’घरच्या प्रतिरूप मूर्तीचे दर्शन घेतले तरी देवस्थानात जाऊन दर्शन घेतल्याचे पुण्य मिळते.’ देवस्थानने स्वामित्वहक्क कायद्याखाली त्याच्या देव्हार्यातील मूर्ती जप्त करून नेली. तिसरा म्हणाला, ’रस्त्यावरुन गाडीवरुन जाताजाता एका हाताने केलेला नमस्कारही पुरेसे पुण्य देऊ शकतो.’ देवस्थानने दारासमोर भिंत बांधून बाहेरुन फुकट दर्शन घेणार्यांचा बंदोबस्त केला. चवथा म्हणाला… पुढे वाचा »
शुक्रवार, २० ऑगस्ट, २०२१
कुंपण
-
आम्हा दोघांच्या घरांमध्ये एक प्राचीन कुंपण ; कधी घातले, कुणी घातले आणि मुख्य म्हणजे का घातले... ठाऊक नाही ! पण त्याचे घर तिकडचे आणि माझे इकडचे, इतके मात्र पक्के ठाऊक. त्याला त्याचे आवार सुंदर हवे, आणि मला माझे. कुंपणाच्या माझ्या बाजूने एक एक काटा उपसून त्याच्या आवारात भिरकावला, आणि फक्त फुले शिल्लक ठेवली. त्यानेही तिकडच्या बाजूने नेमके तसेच केले असावे. आता माझ्या आवारात विविधरंगी फुलांचा सडा ! कुंपणावरुन डोकावून पाहिले तर मी फेकलेले काटे तो कुरवाळतो आहे. त्याने माझ्या हातातील फुलांकडे पाहिले, आणि हसून म्हटले, ’वेड्या, फुले सोडून काटे का कुरवाळतो आहेस.’ आता आम्ही दोघेही दिङ्मूढ. ऐतिहासिक कुंपण कुरवाळताना हे काट्या-फुलांचे गणित दोन्ही … पुढे वाचा »
मंगळवार, ३ ऑगस्ट, २०२१
फूटपट्टी
-
https://www.wonkeedonkeetools.co.uk/ येथून साभार. कुणी म्हणतं, ’हे जग माझ्या हिरव्या फूटपट्टीने मोजले तर, हवे त्याहून अधिक लांबीचे आहे, सबब ते पापी आहे.’ कुणी म्हणतं, ’हे जग माझ्या भगव्या फूटपट्टीने मोजले तर. हवे त्याहून कमी लांबीचे आहे, सबब ते पापी आहे.’ कुणी म्हणतं, ’हे जग माझ्या लाल फूटपट्टीने मोजले तर, हवे त्याहून जास्त रुंदीचे आहे, रुंद पंजाच्या माणसांना धार्जिणे आहे.’ कुणी म्हणतं, ’हे जग माझ्या निळ्या फूटपट्टीने मोजले तर, हवे त्याहून कमी रुंदीचे आहे, सामान्यांची मुस्कटदाबी करणारे आहे. कुणी म्हणालं, ’ फूटपट्टी मला सोयीची मोजमापे देत नाही. सबब ती बदलली पाहिजे.’ कुणी म्हणालं, ’मोजणी केल्याने डावं-उजवं करण्यास प्रोत्साहन मिळते. सबब फ… पुढे वाचा »
शुक्रवार, ३० जुलै, २०२१
थोरांची ओळख
-
शाळेत असताना एका वर्षी इतिहासातील महनीय व्यक्तींची चरित्रे अभ्यासाला होती. अभ्यासक्रमाच्या या पुस्तकाचे शीर्षक होते ’थोरांची ओळख’. पण अलिकडे असे ध्यानात आले की आसपास इतके थोर लोक आहेत की त्या सार्यांची ओळख करुन द्यायची तर किमान शतखंडी ग्रंथच लिहावा लागेल. हे फारच खर्चिक नि वेळखाऊ काम आहे. एरवी टोमणेबाजी करणारी मीम्स बनवू म्हटले तर नको नको म्हटले तरी लोक मदतीला येतील. पण अशा उदात्त कामात सहकारी मिळणेही अवघड... अचानक मला आई म्हणायची तो एक श्लोक आठवला. आदौ राम तपोवनादि गमनम् हत्वा मृगं कांचनम् | वैदेही हरणम् जटायू मरणम् सुग्रीव संभाषणम् || वाली निर्दालनम् समुद्र तरणम् लंकापुरी दाहनम् | पश्चात् रावण कुंभकर्ण हननम् एतद्धि रामायणम् || चार ओळीत संपूर्ण रामायण साररूपात सांगणारा हा श्लोक आठवला नि मी एकदम ’युरेका, युरेका’ म्हणत धावत … पुढे वाचा »
शुक्रवार, १६ जुलै, २०२१
ते म्हणतात...
-
तो म्हणाला, "फलाण्याबाबतीत गणपाचे वागणे बरोबर नाही" गणपा म्हणाला, "’त्या’बाबतीत गण्याला बोलत नाही, फाटते याची." तो म्हणाला, "ढेकाण्याबाबतीत गण्याचे वागणे बरोबर नाही." गण्या म्हणाला, "’त्या’बाबतीत गणपाला बोलत नाही, फाटते याची." तो म्हणाला, "अमुक मुद्द्यावर गण्याची बाजू योग्य आहे." ते म्हणाले, "हा छुपा मनुवादी आहे." तो म्हणाला, "तमुक मुद्द्यावर गणपाची बाजू बरोबर आहे." ते म्हणाले, " हा अर्बन-नक्षलवादी आहे.’ तो म्हणाला, "ढमुक मुद्द्यावर दोन्हीं बाजूंच्या दाव्यात तथ्य आहे." ते म्हणाले, "हे समाजवादी लेकाचे कायम कुंपणावर." तो म्हणाला, "टमुक मुद्द्यावर दोन्ही बाजूंची चूक दिसत… पुढे वाचा »
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पण्या (Atom)







