Vechit Marquee

सूची: अनुक्रमे ▶ वर्गीकरण ▶ लेखमाला ▶ लक्षवेधी ◼
स्त्री लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
स्त्री लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

रविवार, १२ सप्टेंबर, २०२१

आपली महान(?) परंपरा


  • मध्यंतरी सकाळी दूध घेऊन येत असताना एका मित्राची गाठ पडली. तो गणपतीबाप्पाच्या उत्सवासाठी आवश्यक गोष्टी खरेदी करण्यासाठी बाहेर पडला होता. सोबत त्याची पत्नी गौरी आगमनाची तयारीही करताना दिसत होती. त्या घरातील आजींचे तीनेक महिन्यांपूर्वी निधन झाले आहे. त्यामुळे परंपरेनुसार वर्षभर सणवारांना फाटा देणे अपेक्षित असल्याने याचे जरा आश्चर्य वाटले. घरी पोचल्यावर आईला सांगितले, तर ती सहजपणे ’हो ती काही आपल्या घराण्यातली नसल्यामुळे तिचे वर्षभर सुतक नसते.’ मला परंपरेचा संताप तर आलाच, पण त्याहून आईने जितक्या सहजपणे हे सांगितले त्याबद्दल आला. मी स्वत: कोणतीही पूजा-अर्चा, कर्मकांड करीत नाही. तेव्हा हा माझ्या दृष्टिकोनाचा मुद्दाच नाही. मुद्दा श्रद्धेच्या परिघातच असलेल्या अन्यायाचा आहे. ती स्त्री आपले घर सोडून नव्या घरी येणार. नव्या घरच्या सार्‍या तथाकथित परंपरांचे जोखड तिच्याच शिरावर. तिच्याच बळावर इष्टुर-फाकड्यांचे हे तथाकथित 'घराणे' आपली कर्मकांडे चालवणार. कितीही नालायक, बेअक्कल, छळवादी असले तरी त्या घरच्या ज्येष्ठांना बाय डिफॉल्ट आदराने वागवायल...

    पुढे वाचा »