Vechit Marquee

Indexes Menu_Desktop

संपूर्ण सूची :

रविवार, २४ जुलै, २०२२

साहित्याचे वांझ(?) अंडे


  • क्रिकेटमध्ये फलंदाजाचा दर्जा ठरवण्यासाठी त्याने आजवर केलेल्या धावांची सरासरी पाहिली जाते, तसे लेखनाच्या दर्जा किती हे ठरवण्यासाठी फेसबुकवर लाईक्सची. त्याबाबतीत माझी कामगिरी म्हणजे कधी ज्याच्या बॅटला बॉल लागला की सत्यनारायण घालावा लागतो अशा महंमद सिराज किंवा जसप्रीत बुमराहच्या दर्जाची. कधीतरी सहज म्हणून खालील परिच्छेदाची फेसबुक पोस्ट केली आणि माझ्या पोस्टना सरासरीने मिळतात त्याच्या दुप्पटीहून अधिक लाईक्स तिने मिळवले. वरील दोघांपैकी एकाने एखाद्या सामन्यात अर्धशतक करुन जावे नि पॅव्हलियनमध्ये जाऊन ’हे कसं काय बुवा झालं’ म्हणून स्वत:च विचारात पडावे तसे माझे झाले. माझी कविता समजण्यासाठी तुम्हाला माझ्या नेणिवेच्या आत डोकावून पहावे लागेल. कविता अशी हमरस्त्याने येऊन भेटत नाही, तिला आडवळणांचे हिरवे स्पर्श लागतात. अर्थांतरन्यासाच्या जाळीतून सरपटणार… पुढे वाचा »

शुक्रवार, २२ जुलै, २०२२

आता घरीच तयार करा एक किलो सोने


  • भारतीयांच्या मनात सोने या धातूच्या हव्यासाबाबत 'Why Indians are obsessed with the yellow metal' या शीर्षकाचा एक लेख मध्यंतरी पाहण्यात आला होता. (इंग्रजी भाषेत असल्याने नुसताच पाहिला, वाचू शकलो नाही.). नोटाबंदी काळात मायबाप सरकारने सोने खरेदीसाठी जुन्या नोटा वापरण्याची परवानगी दिल्यावर जणू काही सोनेच स्वस्त झाले असे समजून ज्यांच्याकडे बदलून घेण्यासाठी जुन्या नोटा नव्हत्या ते लोकही चेकबुक नि क्रेडिट कार्ड घेऊन सोने घेण्यास धावले होते. अशा माणसांच्या अडाणीपणाचे मला वाईट वाटले होते. थोडेसे पैसे खर्च करुन हवे तितके सोने ते घरच्या घरीच तयार करु शकत असताना बाजारातून विकत आणण्याचा गाढवपणा का करावा हे मला उमगले नव्हते. तेव्हाच मला विचारले असते तर ही रेसिपी त्यांना देऊन टाकली असती. असो. निदान आता ही सर्वांसाठी खुली करुन भरपूर सोने निर्माण … पुढे वाचा »

बुधवार, २० जुलै, २०२२

‘तो देव, मी त्याचा प्रेषित’ : मानवी संस्कृतीचा उदयकाळ आणि अर्वाचीन राजकारण


  • या वर्षी मे महिन्यामध्ये ’धर्मवीर’ नावाचा चित्रपट चित्रपटगृहातून प्रदर्शित झाला. विषयाचा विचार करत त्यात हिंदुत्ववादी मंडळींनी त्याला अधिक उचलून धरले हे ओघाने आलेच. त्यांच्यासह इतरांनीही सध्या आलेल्या चरित्रपटांच्या लाटेतील एक चित्रपट इतकेच महत्त्व त्याला दिले. परंतु त्या चित्रपटाचे उद्दिष्ट केवळ मनोरंजन नव्हते किंवा राष्ट्रभक्ती वा धर्मभक्तीच्या प्रचारपटांच्या सध्याच्या प्रवाहाचा तो केवळ एक भागच होता असेही नाही. त्या पलिकडे त्या चित्रपटाला आणखी मोठे उद्दिष्ट साध्य करायचे होते. त्या चित्रपटाचे निर्माते, धर्मवीर आनंद दिघे यांचे शिष्य म्हणवणार्‍या एकनाथ शिंदे यांनी या चित्रपटाद्वारे त्यांच्या नव्या राजकीय प्रवासाचा नारळ फोडला होता हे पुढे स्पष्ट झाले. एखाद्याचा वारसा सांगत आपली वाट सुकर करणे, बस्तान बसवणे याला मानवी इतिहासात खूप मोठी परंपरा… पुढे वाचा »

शनिवार, २ जुलै, २०२२

फडणवीसांची बखर - ४ : मी पुन्हा आलो पण...


  • यापूर्वीचे भाग : « फडणवीसांची बखर – १ : भाजप नेतृत्वाचा प्रवास « फडणवीसांची बखर – २ : नवा साहेब « फडणवीसांची बखर – ३ : मी पुन्हा जाईन --- डिसेंबर २०१९ मध्ये पार पडलेल्या विधानसभा निवडणुकांनंतर सत्तासंघर्ष जोरावर असताना 'द वायर-मराठी’मध्येच तीन दीर्घ भागांत ’फडणवीसांची बखर’ लिहिली होती. २००९ पूर्वी आमदारही नसलेले फडणवीस २०१४ मध्ये मोदींच्या कृपाहस्ताने थेट मुख्यमंत्रीपदावर आरुढ झाले होते. पाच वर्षे यशस्वीपणे मुख्यमंत्री पदावर राहून २०१९ मधील विधानसभा निवडणुकीला सामोरे जात असताना त्यांचा आत्मविश्वास वाढला होता. या पाच वर्षांमध्ये काँग्रेस, राष्ट्रवादी या प्रमुख विरोधी पक्षाला पुरते नामोहरम करतानाच, सहकारी पक्ष असलेल्या सेनेला त्यांच्या आमदारसंख्येच्या तुलनेत संख्येने नि महत्वाने कमी मंत्रिपदे घ्यायला भाग पाडून त्यांनी आपली पकड मजब… पुढे वाचा »

मंगळवार, २१ जून, २०२२

व्हाय गुड गर्ल्स लाईक बॅड गाइज?


  • ’व्हाय गुड गर्ल्स लाईक बॅड गाइज?’ हा प्रश्न अनेकांकडून- विशेषत: हवी ती मुलगी भाव देत नसल्यामुळे व्यथित झाल्यामुळे स्वत:ला गुड बॉईज समणार्‍यांकडून, विचारला जात असतो. परवा फेसबुकवरच कुणाच्या तरी प्रतिसादात वाचला आणि काही काळापूर्वी पाहिलेल्या एका मालिकेची आठवण झाली. www.shutterstock.com येथून साभार. स्टार्स हॉलो नावाचे एक लहानसे शहर. अशा ठिकाणी असते तसे साधारण कम्युनिटी लाईफ, शहरीकरणातून आलेल्या व्यक्तिकेंद्रित आयुष्याचा प्रवाह तितकासा बलवान झालेला नाही. इथे लोरलाय नावाची एक स्त्री आपल्या मुलीसह राहते आहे. ही रोरी १६ वर्षांची अतिशय गोड मुलगी, आसपासच्या सर्वांची आवडती. अमुक बाबतीत, अमुक व्यक्तीबाबत इतके सहानुभूतीने वागण्याची वा सक्रीय मदतीची काय गरज होती?’ या प्रश्नावर ’यू नो, इट्स र… पुढे वाचा »

सोमवार, २० जून, २०२२

बिटविन द डेव्हिल अँड द डीप सी


  • तीन-चार महिन्यांपूर्वी हिजाबचा मुद्दा तापवला जात होता, तेव्हा पुरोगामी विचारांच्या मंडळींची चांगलीच कोंडी झाली होती. ’हिजाब घालण्याचे स्वातंत्र्य’ यात स्वातंत्र्य हे मूल्य आहे म्हणून ती बाजू घ्यावी, तर हिजाबसारख्या मागास पद्धतीची भलापण केल्याचे पाप पदरी पडते. आणि हिजाब विरोधकांचे म्हणणे योग्य म्हणावे, तर एका समाजाबाहेरच्या गटाने त्या समाजावर लादलेल्या निर्णयाचे समर्थन केल्याचे ( आणि व्यक्ति-स्वातंत्र्याला विरोध केल्याचे ) पाप पदरी पडते . आज ’अग्निपथ’ योजनेच्या निमित्ताने देशभरात ज्या घडामोडी चालू आहेत, त्यांनी साधकबाधक विचार करणार्‍यांची पुन्हा एकवार कोंडी केली आहे. ’तुम्ही आमच्या बाजूचे की विरोधकांच्या?’ हा एक प्रश्न, आणि अमेरिकेचे माजी अध्यक्ष जॉर्ज डब्ल्यू. बुश यांनी सार्‍या जगालाच दिलेली ’तुम्ही आमच्या बाजूचे नसाल तर दहशतवाद्यांच्या… पुढे वाचा »

गुरुवार, २ जून, २०२२

हनुमान जन्मला गं सखे


  • अमेरिकेमध्ये जसे ’खटला जॉनी डेप जिंकेल, की त्याची भूतपूर्व पत्नी एम्बर हर्ड?’ हा सध्या राष्ट्रीय प्रश्न होऊन बसला आहे, तद्वत ’हनुमानाचे जन्मस्थान कोणते?’ हा विषय भरतभूमीमध्ये सांप्रतकाळी महत्वाचा होऊन बसला आहे. किष्किंधा, अंजनेरी यांच्या वादात आता सोलापुरातील कुगावनेही उडी घेतली आहे. तीनही ठिकाणी ’हनुमानाचा जन्म आमच्या गावी झाला’ अशी श्रद्धा असणारे अनेक लोक आहेत. ते तसे मान्य झाल्याने वाढलेल्या भक्ति-पर्यटनामध्ये त्यातील काहींचे आर्थिक हितसंबंधही गुंतलेले असतील, हे ही त्यांच्या ’श्रद्धे’चे कारण असू शकेल. पण अशा माणसांना वगळून आपण ज्यांची खरोखर तशी श्रद्धा आहे अशांचीच बाजू ध्यानात घेऊ. श्री भक्त-हनुमान मंदिर रम्बोदा, श्रीलंका. विषय एका धर्मांतर्गत असल्याने सध्या शास्त्रार्थावर न… पुढे वाचा »

शनिवार, २१ मे, २०२२

तांत्रिक आप्पा


  • आप्पा भिंगार्डे (१) एक सत्शील, पापभीरू माणूस. त्यांची बाबा आडवळणीनाथांवर नितांत श्रद्धा. देवघरात बाबांची मानसमूर्ती होती. तिची सकाळ-संध्याकाळ षोडशोपचारे पूजा होत असे. वर्षांतून दोनदा घरी बाबांचा सत्संग असे. आप्पा भिंगार्डे पिढीजात कारकून. त्यामुळे ऑफिसमधून आणलेल्या स्टेशनरीवर दररोज शंभर वेळा बाबांचा जप लिहिला जात असे. पुढे ऑफिस स्टेशनरीच्या अपहाराबद्दल मेमो मिळाले, सस्पेंड झाले, पण त्यांनी आपला नेम सोडला नाही. मागच्या चाळीतील बाबूने सायक्लोस्टाईल का काहीतरी मशीन आणले. त्यावर खते, दस्त यांच्या प्रती काढून देण्याचा व्यवसाय सुरू केला. आप्पांनी ही संधी साधली आणि बाबांच्या एकपानी चरित्राच्या प्रती काढून नाक्यावर उभे राहून येणार्‍या-जाणार्‍याला वाटून ते आपली सेवा बाबांच्या चरणी रुजू करु लागले. सामान्यांच्या पत्रसंवादाच्या सोयीसाठी सरकारन… पुढे वाचा »