Vechit Marquee

Indexes Menu_Desktop

संपूर्ण सूची :

रविवार, १४ ऑगस्ट, २०२२

तीन भूमिका (उत्तरार्ध) : वस्तुनिष्ठता - तीन उदाहरणे


  • बाजूबद्धता, तटस्थता आणि वस्तुनिष्ठता « मागील भाग --- एखादा प्रश्न किती लोकांच्या मनात निर्माण झाला याला तसे फारसे महत्त्व नाही. उलट एकाच वेळी अनेकांच्या मनात जर एखादा प्रश्न निर्माण झाला, तर तो तितकासा महत्त्वाचा नसण्याची शक्यता अधिक. कारण मोलाचा प्रश्न एखाद्याच्याच मनात निर्माण होऊ शकतो. आता तू म्हणतोस त्याप्रमाणे हा प्रश्नही अनेकांच्या मनात निर्माण होऊनही त्यांनी त्याचा उच्चार केला नाही, याचा अर्थ असा की त्या प्रश्नाचं उत्तर जन्माला घालण्याचं स्वातंत्र्यही त्यांनी स्वतःजवळ सुरक्षित ठेवलं आहे. (गौतमीपुत्र कांबळे यांच्या 'परिव्राजक' या कथेमधून) तटस्थता म्हणजे काय हे बहुसंख्येला समजते. बाजूबद्धता वा गट-बांधिलकी तर इतकी महामूर आहे की त्याबाबत अधिक भाष्य करण्याची आवश्यकता नाही. परंतु 'वस्तुनिष्ठता म्हणजे काय?' याबाबत अन… पुढे वाचा »

शुक्रवार, १२ ऑगस्ट, २०२२

तीन भूमिका (पूर्वार्ध) : बाजूबद्धता, तटस्थता आणि वस्तुनिष्ठता


  • ( वस्तुनिष्ठता हा खरंतर objective इंग्रजी शब्दाचा अपुरा अनुवाद आहे. पण आता प्रचलित झाला आहे, मराठी नि हिंदीतही. त्यामुळे इथे मी तोच वापरला आहे. ) आदिम काळात माणूस टोळ्यांच्या वा कळपांच्या स्वरूपात राहात होता. त्या काळातील मानसिकतेचा पगडा माणसाच्या मनावर अजून शिल्लक राहिलेला आहे. त्या काळी ’टोळी नसलेला माणूस’ ही संकल्पनाच माणसाला मानवत नव्हती . तसेच आजही बाजू नसलेली, तटस्थ वा वस्तुनिष्ठ विचाराची, स्वतंत्र भूमिकेची व्यक्ती अस्तित्वात असते यावर बहुसंख्येचा विश्वास नसतो. ’ती कोण आहे?’ यापेक्षा ’ती कोणत्या गटाची आहे?’ या प्रश्नाच्या उत्तराचा मागोवा घेण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. ’त्या व्यक्तीची वैय्यक्तिक ओळख काय?’ हा प्रश्नच त्यांच्यासमोर नसतो. ती कोणत्या गावाची, घराण्याची, जातीची, धर्माची आहे या प्रश्नांच्या उत्तरांतूनच समोरच्या व्यक्त… पुढे वाचा »

रविवार, ७ ऑगस्ट, २०२२

आमच्याच नळाचं पाणी जगभर गेलंय


  • सामान्यपणे दक्षिण भारताचा इतिहासही धड ठाऊक नसलेले लोक टारझनसारखे छात्या पिटून राष्ट्रभक्ती वगैरेच्या बर्‍याच बाता मारत असतात. इतिहासामधून आपल्या जातीच्या, धर्माच्या सोयीच्या घटना नि नेते शोधून त्यांच्या जयंत्या, मयंत्या, पुतळे नि देवळे उभी करुन आपल्या संस्कृतीच्या श्रेष्ठत्वाच्या ढेकरा- आय मिन डरकाळ्या फोडत असतात. प्रामुख्याने यांच्यातच ’आमच्याच नळाचं पाणी जगभर गेलंय’ या गैरसमजाला देवघरात ठेवून रोज दोन फुलं वाहण्याची पद्धत आहे. वास्तविक संस्कृती नि इतिहास या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. आपण इतिहास म्हणतो तेव्हा केवळ राजकीय इतिहास- आणि त्याला जोडून येणारा सामाजिक इतिहासच आपल्याला अभिप्रेत असतो. सांस्कृतिक नि भौतिक इतिहासाचे आपल्याला वावडे असते. शेजार्‍याच्या घराला, शेजारच्या इमारतींमधील घराला वापरलेल्या विटांची माती कशी आमच्याच परसातली होती … पुढे वाचा »

मंगळवार, २ ऑगस्ट, २०२२

इतिहास, चित्रपट नि मी


  • 'काश्मीर फाईल्स’ हा चित्रपट प्रेक्षागृहात असताना, त्यांच्याबद्दल भवती न भवती चालू असताना एका मित्राने त्याच्या फेसबुक-पोस्टबाबत मी व्यक्त व्हावे यासाठी मला टॅग केले होते. त्याला दिलेला हा प्रतिसाद. माझ्या स्वयंभू परंपरेला अनुसरून सर्वच गटांना नाराज करण्याचा आटोकाट प्रयत्न केलेला आहे. एरवी माझ्या दृष्टिने प्रासंगिकता हा आता टाकाऊ विषय आहे हे सुरुवातीलाच नोंदवून ठेवतो. एखाद्या लेझर विजेरीच्या भिरभिरत्या लाईटच्या मागे नाचणार्‍या मांजरासारखे नाचायला मला आवडत नाही. --- मुळात इतिहास हा विषय मला त्याज्य आहे. ’इतिहासातून प्रेरणा मिळते’ हे भंपक विधान आहे. इतिहासातून फक्त झेंडे आणि शस्त्रे मिळतात.'माणसे त्यातून शिकतात’ हे शेंडाबुडखा नसलेले विधान आहे. ’शालेय जीवनात इतिहास हा विषय शिकवूच नये. ज्याला खरोखर रस असेल त्याला पुरेशी समज आल्यावर… पुढे वाचा »

सोमवार, १ ऑगस्ट, २०२२

मी लक्षाधीश


  • महिनाअखेरीस मी ब्लॉगचा मेन्टेनन्स करत असतो. आधीच प्रसिद्ध केलेल्या लेखांना अनुरूप चित्रे वा व्हिडिओ सापडले असतील तर ते जोडणे, कुठे फॉरमॅटिंगचा घोळ झाला असेल तर (विशेषत: मोबाईल थीममध्ये) तो निस्तरणे, काही अप्रकाशित लेखांवर नजर टाकून ते पुरे करण्यास अधिक माहिती सापडली आहे का, त्यातील काहींना एकत्र करता येईल का? याचा धांडोळा मी घेत असतो. हे करत असताना एकुण ब्लॉगच्या वाटचालीचा अंदाज घेण्यासाठी मी ब्लॉग-स्टॅटिस्टिक्सही पाहतो. यावेळी असे लक्षात आले की जुलै महिन्यात कधीतरी ’रमताराम’ या ब्लॉगची एकुण वाचनसंख्या एक लाखांचा टप्पा पार करुन गेली आहे. सुरुवातीच्या काळात अर्थातच संथ असलेली प्रगती एकट्या जुलैमध्ये चार हजारहून अधिक वाचनांपर्यंत पोहोचली आहे. गेल्या वर्षभरातच १४ हजार वाचने झालेली दिसली. महि… पुढे वाचा »

शनिवार, ३० जुलै, २०२२

भूतकालाचा करावा थाट


  • भूतकालभोगी भारताच्या अगदी सुरुवातीच्या पिढ्यांनी जे निर्माण केले ते मुद्दल गुंतवून मधल्या पिढ्यांनी त्यावर गुजराण केली. अधिक मिळवण्यापेक्षा बचत करुन पोट भरण्याचा हा वारसा आपल्या पुढच्या पिढ्यांना दिला. शेतीकेंद्रित समाजव्यवस्थेचे चिरे निखळायला सुरुवात झाली, उद्योगांचे नि रोजगारांचे इमले उठू लागले नि माणसे अधिकच परावलंबी होत चाकरमानी झाली. त्यांची उरलीसुरली निर्मितीक्षमता लयाला जाऊन त्यांचे एककीकरण होऊ लागले. निर्मितीक्षम आणि निर्मितीशील समाज व त्यातील व्यक्तिंमध्ये असणारा आत्मविश्वास डळमळीत होऊ लागला, की माणूस उसन्या काठ्यांचे आधार घेऊ लागतो. त्यातही डोक्याला फार ताण देता, काहीही गुंतवणूक न करता फुकट मिळणार्‍या अशा काठ्या म्हणजे वारसा आणि भूतकालवैभव. मग भूतकालभोगी पुढच्या पिढ्यांनी डोके भूतकाळात खारवून, मुरवून ठेवले आणि वर्तमानात हातां… पुढे वाचा »

बुधवार, २७ जुलै, २०२२

एक अवघड गणित


  • डिस्ने पिक्चर्सच्या Moana या चित्रपटातील Te Fiti ही निसर्गदेवता. कॅलिफोर्निया ते केरळ, उत्तराखंड ते उरल निसर्गाचा प्रकोप आणि लहर पाहून प्रकृतीमातेला माणसाची दया आली. प्रकट होऊन ती माणसांना म्हणाली, "मी तुम्हाला एक सोपा प्रश्न विचारते. जर कुणीही याचे उत्तर बरोबर दिलेत, तर मी निसर्गाला लगाम घालेन. तुम्हाला अधिक सुखकर आयुष्य देईन." "मला सांगा ’एक अधिक एक किती?’" टोपी सावरत इंग्रज ऐटीत म्हणाला,’ ’We ruled all five continents; obviously the answer is five.' वाईनचा घुटका घेत फ्रेंच म्हणाला, Well, the damn world is a big zero; so zero it is. सॉक्रेटिसला स्मरून ग्रीकाने विचारले, ’Could you please explain to me, what is one?’ बौद्ध डोळे मिट… पुढे वाचा »

सोमवार, २५ जुलै, २०२२

भुभुत्कारुनी पिटवा डंका


  • मी प्रभातफेरीला जातो तो रस्ता चांगला चार-पदरी आहे. रस्त्याचा शेवटचा टप्पा एका वळणापाशी सुरु होतो नि साधारण चारशे मीटर अंतरावर स्टेडियमच्या दारात जाऊन तिथल्या वडाच्या झाडाला टेकून विश्रांती घेतो. त्यामुळे रहदारी नगण्य आणि म्हणून प्रभातफेरीला सोयीचा. सकाळी आमच्यासारखे नव-ज्येष्ठ नागरिक कानटोपी नि स्वेटर घालून, मफलर गुंडाळून काठी टेकत टेकत फिरत असतात. पण हे श्वानवंशीयांचे साम्राज्य आहे. रस्त्याच्या दोन्हीं टोकांना आणि अधेमध्ये पार्क केलेल्या चारचाकी गाड्यांच्या आधाराने यांचे टेहळणी बुरूज आपल्या राज्याचे संरक्षण करण्याचे काम डोळ्यात- आणि नाकांत- तेल घालून करत असतात. याचे उदाहरण म्हणून एक प्रसंग सांगतो. एके दिवशी माझी प्रभातफेरी चालू असताना मी रस्त्याच्या (किंवा भूमितीच्या भाषेत बिनचूकपणे सांगा… पुढे वाचा »