Vechit Marquee

Indexes Menu_Desktop

संपूर्ण सूची :

रविवार, ९ फेब्रुवारी, २०२५

परतुनि ये घरा... - २ : कांदिद, कालिदास, आणि आरती देवी


  • पेराल्टा, ऑर्फियस आणि नचिकेता « मागील भाग --- तुरुंगवारी अथवा मृत्युदर्शन हे टोकाचे नि वेदनादायक वळण आहे. आयुष्यात अपरिहार्यपणे अथवा अनाहुतपणे येणार्‍या इतर काही प्रमाथी नि आवेगी वळणांनाही, माणसे आपल्या इच्छाशक्ती, कुवत, कौशल्य नि चिकाटीने वळशामध्ये रूपांतरित करण्याचा प्रयत्न करतात. जगण्याची गाडी पुन्हा मूळ स्थानी नेऊन प्रवास सुरू करण्याचा अट्टाहास, आटापिटा करताना दिसतात. त्यांचा तो आटापिटा अनेकदा 'You can never go back home' या उक्तीचा अनुभव देऊन जात असतो. कांदिद: प्रसिद्ध विचारवंत वोल्तेअरच्या ‘ कांदिद ’ची कथा काहीशी मागील भागात सांगितलेल्या ऑर्फियस-युरिडिसीच्या वळणाची. पण त्याचे संघर्ष कैकपट व्यापक. त्याचे त्याच्या देखण्या आतेबहिणीवर– Cunégonde– प्रेम आहे. परंतु तिचे वडील बॅरन (१) म्हणजे उमराव घराण्यातील आहेत. आपल्… पुढे वाचा »

गुरुवार, ६ फेब्रुवारी, २०२५

परतुनि ये घरा... - १ : पेराल्टा, ऑर्फियस आणि नचिकेता


  • जेक पेराल्टा: काही काळापूर्वी Brooklyn Nine-Nine ही मालिका पाहात होतो. मालिकेची पार्श्वभूमी एका पोलिस ठाण्याची. पण मालिका पोलिसकथा असूनही थरारपटांच्या वर्गात न मोडणारी. कथानकांचे पेड तपासकथांपेक्षा व्यक्ति त्यांच्या नातेसंबंधांच्या विविध पैलूंभोवती विणलेले. मुख्य पात्र असलेला जेक पेराल्टा हा धडाडीचा तपास-अधिकारी ऊर्फ डिटेक्टिव्ह. एका केसच्या संदर्भात, आधीच तुरुंगात असलेल्या एका गुन्हेगाराकडून काही माहिती काढून घेण्यासाठी, तो गुन्हेगार असल्याची बतावणी करून त्याला तुरुंगात डांबले जाते. आपण ज्या गुन्हेगारांना त्यांच्या कर्माचे फळ भोगायला पाठवतो, त्यांचे ते जग त्याला आतून पाहण्याची संधी मिळते. न्यायव्यवस्थेचा(!) एक तुकडा म्हणता येईल, अशी ती ‘व्यवस्था’ वास्तवात किती अव्यवस्थित, भोंगळ, शोषक, दाहक आहे, याचा अनुभव तो घेतो. व्यवस्थेच्या ठेकेदा… पुढे वाचा »

बुधवार, १८ डिसेंबर, २०२४

‘ग्लॅड फॉर ग्लाड?’ : ग्लाड, वीरभूषण आणि मी


  • (‘थँक यू, मि. ग्लाड’ या अनिल बर्वे लिखित कादंबरी/नाटक यांबाबत विवेचन करणारे दोन लेख ‘वेचित चाललो’ वर लिहिले होते. विषयसंगतीनुसार काही तपशील वगळून हा मजकूर एकत्रितरित्या ‘तत्रैव’ नियतकालिकाच्या नोव्हेंबर-डिसेंबर-२०२४ च्या अंकात प्रसिद्ध झाला आहे.) पुस्तक : ‘थॅंक यू, मिस्टर ग्लाड’ लेखक : अनिल बर्वे प्रकाशक : पॉप्युलर प्रकाशन आवृत्ती सहावी, दुसरे पुनर्मुद्रण (२०२०) —काही झाले तरी ग्लाडसाहेबांची राजनिष्ठा मोठी कडवी होती हे खरे. प्राण गेला तरी साहेब खाल्ल्या मिठाला जागल्याशिवाय राहिला नसता. बेचाळीसच्या चळवळीत हाती सापडलेल्या सत्याग्रह्यांना कारणे शोधून शोधून ग्लाडसाहेबाने गुरासारखे बडवून काढले होते. पण युनियन जॅक उतरून तिरंगा वर चढला, तेव्हा ग्लाडसाहेबाने दु:ख आवरून एक कडक सॅल्… पुढे वाचा »

शनिवार, ७ डिसेंबर, २०२४

दोन बोक्यांनी...


  • AI-Generated Image for this article (Courtesy: deepai.org) फार फार वर्षांपूर्वीची गोष्ट आहे... एक लहानसं गाव होतं. गावाचं नाव होतं... पण ते नावाचं जाऊ द्या. ते महत्त्वाचं नाही, कुठल्याही गावासारखं ते एक गाव होतं. गावात शेत कसणारे कुणबी होते, नांगर ओतणारे लोहार होते, चपला बांधणारे चांभार होते, मडकी घडवणारे कुंभार होते, घाणा चालवणारे तेली होते... या सार्‍यांवर राज्य करणारे पाटील होते, त्यांच्या मदतीला कुलकर्णी होते. शाळा चुकवणारी पोरे होती, पारावरची पाले होती; नदीवरची धुणी होती, चोरट्या प्रेमाची कहाणी होती. कुठे कुणाचे दाजी होते, कुठे कुणाचे ‘माजी’ होते; काही काही पाजी होते, बाकी उडदामाजि होते... गावाच्या गरजा मर्यादित होत्या. अन्नाची गरज शेती व गावालगतचे जंगल यांतून भागत असे. इतर किरक… पुढे वाचा »

बुधवार, ६ नोव्हेंबर, २०२४

I. P. L. (इंडियन पोलिटिकल लीग)


  • काही वर्षांपूर्वी कुणीतरी (बहुधा अण्णा हजारे, खात्री नाही) म्हणाले होते, ‘आपल्या लोकशाहीमध्ये पक्षीय लोकशाहीला स्थान नाही. सर्व उमेदवारांनी स्वबळावर लढावे. नंतर विजयी उमेदवारांनी एकत्र येऊन सरकार स्थापन करावे.’ सध्या ‘जिकडे उमेदवारी तिकडे हरी हरी’ या उक्तीनुसार आपले बहुतेक राजकारणी वागताना दिसत आहेत. हे पाहता अशा पक्षातीत निवडणुकांची वेळ जवळ आलेली आहे असे वाटू लागले आहे. मग ‘उगाच अंदाजपंचे दाहोदरसे होण्यापेक्षा सारं काही नीट वैधानिक पातळीवरच का करु नये?’ असा विचार मी करत होतो. ‘आणि म्हणोन’, ‘या ठिकाणी’, ‘प्रभू श्रीरामांच्या कृपेने’ हा एक प्रस्ताव देतो आहे. पटतो का पाहा. नाही तर दुरुस्त्या सुचवा. सर्वप्रथम निवडणूक आयोग ही वैधानिक संस्थाच विसर्जित करुन टाकावी. तिच्या जागी नवी व्यवस्था असावी. आणि हा बदल नियोजन आयोगाकडून नीती आयोगाकडे— म्ह… पुढे वाचा »

शनिवार, २ नोव्हेंबर, २०२४

स्वबळ की दुर्बळ


  • ‘लोकसभा निवडणुकीत शिंदेसेनेचा स्ट्राईक रेट भाजपपेक्षा अधिक’ तर होताच, पण ‘एकुण कामगिरीही तोडीस तोड होती’. त्यामुळे ‘विधानसभेच्या जागा वाटपामध्ये शिंदे वरचढ असतील’... आहेत... ‘शहांचा सल्ला त्यांनी धुडकावला’... वगैरे आम्ही वाचत आहोत... दरम्यान लोकसत्तामधील आजचा लेख असे सांगतो की, भाजपाने विधानसभा निवडणुकीसाठी भाजपचे, कमळ चिन्हावर लढणारे १५२, अधिक शिंदेसेना व अजित पवारांची राष्ट्रवादी या दोन पक्षांत निर्यात करुन एकुण १७ असे एकुण १६९ उमेदवार उभे केले आहेत. गेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपाने एकुण १६४ जागा लढवल्या होत्या असे स्मरते. काँग्रेसच्या पीछेहाटीच्या अनेक कारणांमध्ये एक कारण इतर पक्षांसोबत केलेल्या आघाड्या नि घेतलेली दुय्यम भूमिका आहे हे माझे ठाम मत आहे. ते यानिमित्ताने पुन्हा अधोरेखित कर… पुढे वाचा »

मंगळवार, २४ सप्टेंबर, २०२४

दोन हजारची नोट आणि चाकावरची अ‍ॅन्टेना


  • काही वर्षांपूर्वी एका महान नेत्याच्या सरकारने दोन हजार रुपयाच्या नोटेमध्ये गुपचूप जीपीएस चिप बसवल्याची कुजबूज ऐकायला मिळाली होती. या चिपवरून ती नोट कुठे आहे हे बिनचूकपणे सांगता येते असे एका चॅनेलकाकूंनी आम्हाला डेमोसह समजावून सांगितले होते. बहुतेक काळा पैसा साठवणारे नेहमी मोठ्या दर्शनी किंमतीच्या नोटांमध्ये तो साठवत असल्याचे एका चाणाक्ष (हा शब्द `चाणक्य'वरुन आला असावा का?) नि धूर्त नेत्याने ओळखले होते. म्हणून या सर्वात मोठ्या दर्शनी किंमतीच्या नोटेची लालूच दाखवण्यात आली होती नि त्यात जीपीएस चिप दडवली होती एक दोन मूर्ख चॅनेल पत्रकारांनी हे गुपित फोडल्याने पंचाईत झाली होती. परंतु नंतर शासनाने सफाईने (हिंदीमध्ये ‘आनन फाननमें’ किंवा इंग्रजीत swiftly) सक्रीय होत त्याबद्दल अधिक माहिती जाहीर होऊ नये याची काळजी घेतली. त्यामुळे त्या चि… पुढे वाचा »