Vechit Marquee

Indexes Menu_Desktop

संपूर्ण सूची :

शुक्रवार, २२ ऑगस्ट, २०१४

आरसा दाखवणारा ‘रेगे’


  • पौगंडावस्था आणि तारुण्य या सीमारेषेवर उभा असलेला कुणी एक रेगे. त्या वयात संभ्रम कमी होत त्याची जागा प्रचंड ऊर्जा आणि ऊर्मीने घेतलेली असते. याच वयात माणसे अधिक प्रयोगशील असतात, धाडसी असतात. बेदरकारपणा, धोका पत्करण्याची तयारी याच काळात सर्वात अधिक असते. अगदी रेगेसारखा पापभीरू मध्यमवर्गीय कुटुंबातला मुलगाही त्याला अपवाद नसतो. दहीहंडी पाहायला गेलेला रेगे. योगायोगानेच तिथल्या हाणामारीत सहभागी असल्याच्या संशयाने त्याची वरात पोलिस स्टेशनात आणली जाते. त्याच्यासारख्या पार्श्वभूमीच्या तरुणाला पोलिस स्टेशनचे आतून दर्शन घडावे अशी वेळ आलेली नसतेच. त्यामुळे एकीकडे भलत्याच लफडयात अडकल्याची, परीक्षा बुडण्याची आणि मुख्य म्हणजे आई-वडील काय म्हणतील ही अगदी खास मध्यमवर्गीय भीती आहेच. पण त्याच वेळी ‘आयला, आपण पहिल… पुढे वाचा »

मंगळवार, २२ जुलै, २०१४

‘मी...ग़ालिब’ ला भेटताना...


  • मिर्ज़ा असदुल्ला ख़ान ग़ालिब! आपण अस्सल तुर्की वंशाचे आहोत असा अहंकारमिश्रित समज असलेला, नबाबाच्या घराण्यात जन्मलेला आणि त्यामुळेच जगण्यासाठी कमवावे लागते याची गंधवार्ता नसलेला. आपद्धर्म म्हणून चाकरीसाठी, उमेदवारीसाठी गोर्‍या मित्राच्या दारी जातानाही नबाबाला मिळणारा आदरसत्कार मिळावा असा अस्थानी अहंकार बाळगणारा, सांसारिक पातळीवर सुमार देहसौंदर्य नि सुमार विचारक्षमता असलेली पत्नी लाभल्याने भावनिक पातळीवर वंचित राहिल्याची अनुभूती घेणारा, दरबारी राजकारणापासून दूर राहू पाहात असतानाही त्यात ओढला जाऊन– दुर्दैवाने नेहेमीच चुकीच्या बाजूला राहणारा, आणि तरीही आज दीडशेहून अधिक वर्षे आपले अढळपद राखून असलेला प्रतिभावंत. ‘नाटक कंपनी’ च्या अधिकृत संस्थळावरुन साभार. ग़ालिबचे आयुष्य हे समकालीनांच्या तसेच अ… पुढे वाचा »

शनिवार, १७ मे, २०१४

जस्मिन क्रांती, सॅफ्रन क्रांती वगैरे वगैरे...


  • काही काळापूर्वी ट्युनिशियामधे प्रसिद्ध ‘जस्मिन क्रांती’ झाली. (आपल्या देशात येणार्‍या वादळांनाही लाडाची ‘कत्रिना’ वगैरे नावे ठेवणार्‍यांनीच हे नाव प्रचलित केले होते, यावरून तिची प्रेरणाही चटकन लक्षात यावी.) त्याला जोडूनच इजिप्तमध्येही क्रांती(?) झाली. तिला January Revolution म्हटले गेले. या दोहोंमध्ये सोशल मीडियाचा सहभाग बराच होता, म्हणून बराच गुलाल उधळला गेला. फेसबुकी क्रांतिकारक लगेचच भारावून गेले. (तसे ते नॉस्ट्राडेमसच्या भाकितानेही भारावून जातात, नि त्याच वेळी ‘फेसबुकवरच्या आपल्या प्रोफाईलबाबत काही अघटित घडेल’ अशी भीती दाखवत त्यावर सोपा उपाय सुचवणार्‍या पोस्टस् वाचून देखील. पण ते असो.) त्यांना भारतातही अशी क्रांतीबिती व्हायला हवी अशी स्वप्ने पडू लागली. असाच एक फेसबुकी क्रांतिकारक लिहिता झाला “आता असे काही आपल्याकडेही घडावे अशी जनत… पुढे वाचा »

गुरुवार, १० एप्रिल, २०१४

एक न अनुभवलेली ‘बंदिश’


  • काही महिन्यांपूर्वी डॉ. राजीव नाईक यांचे रा.श्री. जोग स्मृती व्याख्यानमालेतील ‘आजः नाटक आणि भाषा’ या विषयावरील व्याख्याने एका मित्रासोबत ऐकली होती. त्यावेळी त्यांनी आपल्या ‘बंदिश’ या आगामी नाटकाचा ओझरता उल्लेख केला होता. त्यानंतर फेब्रुवारी महिन्यात पार पडलेल्या ‘विनोद दोशी स्मृती नाट्यमहोत्सवा’त या नाटकाचा पहिला प्रयोग सादर झाला. एक दोन महिन्यांनंतर एनएसडी'च्या 'Appreciating Theatre' या शीर्षकाखाली झालेल्या कार्यशाळेत हे नाटक पुन्हा एकदा सादर झाले. तिथे नाटकानंतर नाटककार, दिग्दर्शक नि सहभागी कलाकार यांच्याशी संवाद साधण्याचा कार्यक्रम होता. नाटकासंबंधी काही पैलू इथे तपासले जातील, काही अधिक समजेल, म्हणून त्या संवाद-कार्यक्रमालाही उपस्थिती लावली होती. ‘मुक्त शब्द’च्या अंकात ‘बंदिश’ची संहिता वाचण्यात आली, नि त्या निमित्ताने त… पुढे वाचा »

मंगळवार, २५ फेब्रुवारी, २०१४

तसा मी... असा मी, आता मी


  • प्रास्ताविक: काही काळापूर्वी एक जुना मित्र भेटला. तो नि मी पूर्वी बरोबर असताना जसा ‘मी’ होतो तोच त्याच्या डोळ्यासमोर होता. माझी शारीरिक, मानसिक स्थिती, माझी रहाणी, माझ्या आवडीनिवडी, माझी राजकीय सामाजिक मते इ. बाबत आता मी बराच बदलून गेलो आहे याची जाणीव करून देणारी ती भेट होती. मग सहज विचार करू लागलो की हे जे बदल एका व्यक्तीमधे होतात, ‘तसा मी’ चा ‘असा मी’ होतो तो नक्की कसा? काय काय घटक यावर परिणाम करतात. यावर आमचे ज्येष्ठ मित्रांशी थोडे बोलणे झाले. त्यांनी याबाबत सरळ धागाच टाकावा असे सुचवले. या निमित्ताने इतरांनाही स्वतःमधे डोकावून पाहण्याची संधी मिळेल नि त्यातून आदानप्रदान होईल ज्यातून काही नवे सापडेल, आपले आपल्यालाच काही अनपेक्षित सापडून जाईल असा आमचा होरा आहे. त्याला अनुसरून लेख लिहा… पुढे वाचा »

रविवार, १६ फेब्रुवारी, २०१४

जब्याऽऽ, एऽ फँऽऽन्ड्री, पकड साला


  • एखाद्या चित्रपटाने डोके भणाणून गेले किंवा व्यापून राहिले की काहीतरी खरडण्याची माझी जुनीच खोड आहे. पण एखाद्या चित्रपटाने झोप उडवल्याने गद्याऐवजी कवितेच्या माध्यमाची निवड केली अशी ही एकच घटना. अनेक चित्रपट, चरित्रे असोत कि कथानके, त्यात एकच प्रसंग वा तुकडा असतो ज्याच्या भोवती सारा भवताल फिरतो. ‘फँड्री’मधला शेवटाकडचा विहिरीचा प्रसंग असाच. त्या भोवतीच उगवून आलेली ही कविता. डोक्यातला सारा संताप, सारं वैफल्य तिने शोषून घेतलं न मला मोकळं केलं. काल संध्याकाळी फँड्री पाहिला त्यानंतर घरी आलो ते हे तुफान डोक्यात घेऊनच. शेवटच्या डुकराच्या पाठलागात त्या डुकराच्या जागी जब्या दिसू लागला नि डोकं सुन्न झालं. त्यातच चित्रपट पाहताना आणि पाहून बाहेर पडताना असंवेदनशील प्रेक्षकांनी केलेली शेरेबाजी नि मतप्रदर्शन ऐकून डोकं आणखीनच आउट झालेलं. घरी येऊन ते डोक… पुढे वाचा »

सोमवार, ३० सप्टेंबर, २०१३

न भावलेला ‘आषाढातील एक दिवस’


  • कविकुलगुरु कालिदास हा भरतखंडातील कविश्रेष्ठांचाही मेरुमणि. त्याच्या मेघदूताने देशकालाच्या, भाषेच्या सीमा ओलांडून अनेकांना भुरळ घातली, आकर्षित केले. अनेक अभ्यासकांनी आपापल्या परीने एकेक दृष्टिकोन घेऊन त्यातील सौंदर्य, त्यातील छंदशास्त्र, त्यातील भूगोल उलगडण्याच्या यथामती प्रयत्न केला, काही कविंनी आपल्यापुरते आपले ‘मेघदूत’ लिहून काव्यक्षेत्रात आपला ठसा उमटवण्याचा प्रयत्न केला. मराठी भाषेत गदिमांनी या विरहाला चिरविरहाच्या पातळीवर नेऊन एक अजोड कविता लिहिली. अनेकांनी त्याचे आपापल्या भाषांतून कुठे स्वैर, कुठे समश्लोकी अनुवाद करून त्याला कवेत घेण्याचा प्रयत्न करून पाहिला. तर काहींनी याही पुढे जाऊन या सार्‍या अनुवादांच्या तौलनिक अभ्यासातून ‘कुणाला किती कालिदास सापडतो?’ याचे विश्लेषण करण्याचाही प्रयत्न केला. थोडक्यात सांगायचे तर भारतीय साहित्य… पुढे वाचा »

मंगळवार, ३० जुलै, २०१३

काही नि:शब्दकथा


  • ( कथा, प्रसंग आणि पात्रे काल्पनिक. परंतु तरीही कोण्या जिवंत वा मृत व्यक्तीशी, घटनांशी साधर्म्य आढळल्यास लेखकाला ताबडतोब सूचना द्यावी. जेणेकरून त्या कल्पित-वास्तवाच्या तौलनिक अभ्यासासाठी शिष्यवृत्तीची मागणी नोंदवणारा अर्ज करता येईल. ) प्राचीन: https://steemit.com/ येथून साभार. एकदा एक लांडगा नदीवर पाणी पीत होता. पाणी पिता पिता त्याच्या लक्षात आले की प्रवाहाच्या खालच्या बाजूला एक लहानसे कोकरूही पाणी पीत होते. “तू माझ्या पाण्याला तोंड लावून ते उष्टे करत आहेस.” लांडगा कोकरावर खेकसला. “असं कसं होईल वृकराज. मी तर प्रवाहाच्या खालच्या बाजूला पाणी पीत आहे, इकडून पाणी उलट तुमच्या दिशेने कसे जाईल.” “तू तर भलताच उद्धट दिसतोस, वर्षभरापूर्वीही तू माझ्याशी असेच उद्धट वर्तन केले होतेस.” ला… पुढे वाचा »