Vechit Marquee

Indexes Menu_Desktop

संपूर्ण सूची :

बुधवार, २५ सप्टेंबर, २०१९

ओझार्क: पांढरपेशांच्या Quicksand Pit ची गोष्ट - २


  • विषयसंगतीमुळे हा लेख ’ वेचित चाललो... ’ या ब्लॉगवर हलवला आहे. तो इथे वाचता येईल. - oOo - पुढे वाचा »

गुरुवार, १९ सप्टेंबर, २०१९

ओझार्क: पांढरपेशांच्या Quicksand Pit ची गोष्ट - १


  • विषयसंगतीमुळे हा लेख ’ वेचित चाललो... ’ या ब्लॉगवर हलवला आहे. तो इथे वाचता येईल. - oOo - पुढे वाचा »

बुधवार, १८ सप्टेंबर, २०१९

नॉर्मा आणि कम्मो


  • ’हे जीवघेणं गाणं आहे!... हो ना?" "हो!" "हे ऐकलं की एका मिनिटानं आयुष्य कमी होतं आणि अर्ध्या मिनिटानं वाढतं!" जगण्यात काही क्षण असे सापडतात की तिथे अचानक स्तिमित होऊन माणूस स्तब्ध होतो. ’कल और आएंगे नग्मोंकी खिलती कलियाँ चुननेवाले । मुझसे बेहतर कहनेवाले, तुमसे बेहतर सुननेवाले ॥’ म्हणत साहिरने माझ्यातल्या बुतशिकनला बुत बनवून ठेवला होता. वरची दोनच वाक्ये समोर ठेवून सासणेंनी मला पुतळाच बनवून ठेवले. काही वर्षांपूर्वी ’सनसेट बुलेवार्ड’ नावाचा एक चित्रपट पाहिला होता. सायलेंट मूवीजच्या जमान्यातील कुणी प्रसिद्ध नटी, नॉर्मा. बोलपटाच्या आगमनानंतर झालेल्या तंत्रबदलातून जी वावटळ निर्माण झाली, त्यातून चंदेरी दुनियेतून पाचोळ्यासारखी बाहेर फेकल्या गेलेल्यांपैकी एक. अत्यंत आत्मकेंद्रित, आपल्याच विश्वात जगणारी नॉर्मा, वास्… पुढे वाचा »

रविवार, १५ सप्टेंबर, २०१९

नव-चित्रकार कसे व्हावे


  • प्रथम दाढी वाढवावी. (दाढीऐवजी शेंडी चालेल का असा जातीयवादी प्रश्न विचारु नये.) आकाशात शून्यात बघून किंवा थेट जमिनीकडे पाहात तिरपे चालत जाण्याचा सराव करावा. फाटकी, विटकी जीन्स (किंवा अनेक खिशांची बर्म्युडा चालेल) वर चे गवेरा/ग्वेवेरा/ग्वेव्हाराचा अनेक वेळा धुवून विटका झालेला टी-शर्ट वापरायला सुरुवात करावी. ( त्याऐवजी वेडेवाकडे, अगम्य असे रंगांचे फटकारे असलेले चित्र ’गोंदवून’ घेतलेलाही चालेल.) कोणतेही एखादे स्वस्त अथवा फुकट असे पेंटिंगचे कंप्युटर अ‍ॅप्लिकेशन घेऊन त्यात रोज वाट्टॆल तसे फराटे मारुन बरबटलेले चित्र बनवून फेसबुकादि समाजमाध्यमांवर ’रोज एक तरी चित्र पोस्टावे’ या न्यायाने टाकून द्यावे. सोबत एक अगम्य क्याप्शन द्यावा. एक फासा टाकून रॅंड्मली एक माध्यम निवडून हे त्या माध्यमातले आहे अस… पुढे वाचा »

मंगळवार, १६ जुलै, २०१९

सुरेख सामन्याचे विध्वंसक कवित्व


  • क्रिकेटचा अंतिम सामना पार पडला आणि त्याचे कवित्व अजून चालू आहे. क्रिकेट जणू जबरदस्तीने यांच्या खिशातून पैसे काढून नेते अशा आविर्भावात आणि सरकार क्रिकेटला पैसे देत या अडाणी समजात बुडलेले ’गावंढे’ असोत की क्रिकेटचे अट्टल फॅन असोत, चर्चा थांबवायचे नाव घेत नाहीत. मग ते धर्मसेना कसा चुकला, टोफेल म्हणतात तसे सहा ऐवजी पाच धावा दिल्या असत्या तर काय झाले असते, स्टोक्सने चेंडू ढकलून चीटिंग केले का? सर्वाधिक बिचारा कोण, केन की बेन? इतर खेळाडू शँपेन उधळत असताना आपली बाटली घेऊन हळूच सटकलेल्या जोफ्रा आर्चरने ती एकट्याने गट्टम केली की कुणाला प्रेजेंट दिली? इऑन (की ऑयन) मॉर्गनने ’अल्ला आमच्या बाजूला होता’ म्हटले म्हणून त्याला इथे बसून देशद्रोही ठरवता येईल का? चौकारांच्या संख्येऐवजी षटकारांची, बळींची, वाचवलेल… पुढे वाचा »

मंगळवार, २८ मे, २०१९

एका किंग-स्लेअरची गोष्ट (एक राजकीय रूपककथा)


  • एक आटपाट नगर होतं. तिथं एक पाटलाची गढी होती. पाटील अगदी पाटलासारखा होता. कधी रयतेची काळजी घेई, कधी त्यांचं शोषण करी. पाटलाचे सगे-सोयरे, सोयरे-धायरे, जातवाले-गाववाले पाटलाच्या अधिक मर्जीतले होते, हे तर ओघानं आलंच. गावात एक तेजतर्रार फायरब्रँड तरुण तालमीत नित्य नेमानं मेहनत करत असे. त्याला पाटलाचं हे वर्चस्व मान्य नव्हतं. पाटीलकी ही शोषक व्यवस्था आहे, असं त्याचं म्हणणं होतं. त्यानं गावातच अ‍ॅंटी-पाटीलिझमची मुहूर्तमेढ रोवली. ग्रामपंचायतीची निवडणूक असो, पंचायत राजमधून मिळणारे लहान-सहान ठेके असोत की, कुठल्या-कुठल्या सरकारी योजनांमार्फत येणारी मदत असो. प्रत्येक पातळीवर तो पाटलाला नडू लागला. कालचं पोरगं आहे म्हणून पाटीलही दुर्लक्ष करत असे. गावातील लोकांना पाटलाचं वर्चस्व डाचत असलं तरी एक अपरिहार्यता म्हणून किंवा शेवटी अडीनडीला तोच कामात येतो म… पुढे वाचा »

रविवार, २६ मे, २०१९

पक्षांतराचे वारे (उत्तरार्ध) : पक्षांतर आणि सामान्य मतदार


  • नेत्यांचे वातकुक्कुट « मागील भाग --- नेता आणि कार्यकर्ता यांचे हितसंबंध या पक्षांतराशी निगडित असतात. पण सामान्य मतदार याच्याकडे कसे पाहातो. त्याला यात अनैतिक, गद्दारी दिसत नाही का? त्यासाठी सामान्य माणसाची मानसिकता समजून घेता यायला हवी. त्रात्याच्या भूमिकेत नेता सर्वसामान्य माणूस हा मुख्यत: जगण्याच्या गरजांशी जोडलेला असतो. अर्थव्यवस्था, समाजव्यवस्था, विचार यांचा खल करत बसणे त्याला परवडत नाही. हल्ली शासकीय कार्यालयात किंवा बॅंकांमध्ये जशी ’एक खिडकी योजना’ असते तशी योजना तो शोधत असतो. त्या खिडकीत गेले की त्याचे काम व्हावे अशी त्याची अपेक्षा असते. आध्यात्मिक पातळीवर देव आणि धर्म, गुंतवणूक करताना इन्शुरन्स पॉलिसी विकणारा किंवा रिकरिंगचे/पीपीएफ/भिशीचे अकाउंट चालवणारा त्याचा ब्रोकर यांच्या शिरी तो आपला भार वाहात असतो. याशिवाय मुलाने/मु… पुढे वाचा »

शनिवार, २५ मे, २०१९

बाजू-बदल खुल खुल जाए...


  • आमच्या लहानपणी दूरदर्शन नुकतेच आले होते आणि टेलिविजन ही देखील गल्ली वा वाड्यात एखाद्याकडेच असणारी वस्तू होती. त्यामुळे क्रिकेटचा सामना असला की तिथे आख्खी गल्ली गोळा होई. या गर्दीत काही नमुनेदार महाभाग हटकून असत. ते नेहमी विरोधी पक्षाच्या बाजूने असत. विशेषत: भारत हरला की यांच्या वाणीला जबरदस्त धार येई. ’बघा, सांगत होतो की नाही. तुमचा गावसकर आमच्या माल्कम मार्शल समोर झुरळ आहे. त्या मनिंदरसिंगला तर तो अमका सहज फोडून काढेल.’ आम्ही आपले पडेल चेहर्‍याने बसलो असता यांचे चेकाळून भाषण चालत असे. आणि चुकून गावसकरने शतक केले, मनिंदरसिंगने समोरच्या टीमला स्पिनवर नाचायला लावले किंवा कपिलदेवने त्यांची भंबेरी उडवली की हे गप्प होत. पण त्यांना मनातून ज्या गुदगुल्या होत असत, त्या त्यांच्या चेहर्‍यावर दिसून येत. पण सामना प्रत्यक्ष संपेपर्यंत ते फारसे बो… पुढे वाचा »