-
आपल्या देशात ‘धर्म मोठा की देश?’ हा मिलियन डॉलर नव्हे, बिलियन-ट्रिलियन डॉलर प्रश्न आहे. समाजातील काही गट हा प्रश्न आपल्या विरोधकांना वारंवार विचारत असतात, कारण तो त्यांना अडचणीचा असतो, निरुत्तर करणारा असा यांचा समज असतो. पण जे हा प्रश्न विचारतात, त्यांना स्वतःलाही अनेकदा याच प्रश्नाला सामोरे जावे लागते. अशा अडचणीच्या वेळी ते हमखास ‘त्यांनी तसे मान्य केले तर आम्ही मान्य करू’ असे म्हणत आपली शेपूट सोडवून घेताना दिसतात. पण याचाच एक अर्थ असा की आपल्या नि ‘त्यांच्या’ कृतीत गुणात्मकदृष्ट्या काहीही फरक नाही याची कबुलीच देत असतात! दोनही बाजूंनी एकमेकांच्या आड लपण्याचा कितीही प्रयत्न केला तरी, काहीवेळा श्रद्धा, काहीवेळा कुटुंब, काहीवेळा भौगोलिकदृष्ट्या जोडलेल्या (देश माझा, देशातील नागरिक माझे, इतर देशाच्या नागरिकांपेक्षा अधिक जवळचे; हाच नियम द… पुढे वाचा »
Vechit Marquee_Both
सोन्याची लंका, रामराज्य आणि समाज       उघडीप... आणि झाकोळ       कसे रुजावे बियाणे...       तो एक मित्र       ओळख       वेचताना... : उठाव       उठाव       चुंबन-चिकित्सा       पाखरा जा, त्यजुनिया...       दूरस्थ कुणी दे तुझ्या करी...      
Indexes Menu_Desktop
संपूर्ण सूची : |
शनिवार, १९ डिसेंबर, २०१५
व्यवस्थांची वर्तुळे
गुरुवार, ३ डिसेंबर, २०१५
आभासी विश्व आणि हिंसा
-
ज्याने कुणी इंटरनेटला Virtual World (याचा ‘आभासी विश्व’ असा अतिशय वाईट अनुवाद केला जातो) असा शब्द प्रथम वापरला त्याच्या कल्पनाशक्तीला दाद द्यायला हवी. ऐंशीच्या दशकाच्या अखेरीस उगवलेल्या ‘वर्ल्ड वाईड वेब’ या संकल्पनेतून केवळ एकाच भूभागावरचे नव्हे तर जगभरात पसरलेले संगणक परस्परांना जोडण्याची सोय झाली. त्यातून कल्पनांचा विस्फोट झाला आणि माणसाचे जग त्याने उलटे पालटे करून टाकले. या इंटरनेटने एका बाजूने माणसाला आजवर कधीही सापडले नव्हते असे प्रचंड व्याप्ती असलेले ‘माध्यम’ दिले तर दुसरीकडे थेट एक मानवनिर्मित, कृत्रिम असे ‘विश्व’च निर्माण केले. आज माणसाच्या जगातील माहितीशी निगडित बहुसंख्य जबाबदार्या हे माध्यम जग लीलया पेलून धरते आहे, तर हे नवे विश्व माणसाच्या अद्याप विकसितही न झालेल्या पैलूंना नवी क्षितीजे प्रदान करते आहे. या नव्या माध्यमाने… पुढे वाचा »
Labels:
‘पुरोगामी जनगर्जना’,
माहिती तंत्रज्ञान,
समाज,
हिंसा
मंगळवार, १ डिसेंबर, २०१५
काजळवाट
-
विषयसंगती ध्यानात घेऊन ही पोस्ट ‘ वेचित चाललो... ’ या ब्लॉगवर हलवली आहे. ती ‘ इथे ’वाचता येईल. - oOo - पुढे वाचा »
गुरुवार, २६ नोव्हेंबर, २०१५
अन्योक्ती २: खड्डे खणणारे हात
-
एक आटपाट मैदान होतं... त्या मैदानावर सकाळी म्हातारे कोतारे फिरायला येत असत. मैदान असलेलं ते गाव हे खरंतर लहानसं शहरच होतं. महानगरी ‘ज्येष्ठ नागरिकां’ प्रमाणे ओघळणारे पोट घट्ट दाबून बसवणारे टी शर्ट नि ट्रॅक पँट, किंवा बर्मुडा ऊर्फ पाऊण चड्डी घातलेले पुरुष इथे नसले, तरी इथले पुरुषही त्यांच्या प्रमाणेच मैदानाला एखादी फेरी मारून घाम पुसत पुसत राजकारणाच्या खेळाच्या आणि खेळातल्या राजकारणाच्या गप्पा मारत असत. हल्ली एकत्र कुटुंब पद्धती मागे पडू लागली असल्याने, सुनेच्या कागाळ्या हा म्हातार्या स्त्रियांचा हक्काचा विषय मागे पडून त्या हिंदी चित्रपटातल्या हिरो हिरोईनच्या न जुळलेल्या वा मोडू घातलेल्या लग्नाची चिंता करत असत. किंवा एखाद्या मालिकेतल्या त्या कुण्या सासुरवाशिणीला त्रास देणार्या तिच्या सासूच्या नावे बोटे मोडत, आपण तसे नाही हे स्वतःला… पुढे वाचा »
Labels:
‘प्रभात दिवाळी’,
अन्योक्ती,
कथा,
साहित्य-कला
गुरुवार, १२ नोव्हेंबर, २०१५
गो-मॅन-गो (कथा)
-
‘उठी उठी गोऽपाऽलाऽऽऽ आ... आ... अ...’ कोणीतरी केकाटू लागला. ‘तिच्यायला सकाळी सकाळी हे कोण केकाटून कुमारांच्या सुंदर गाण्याची वाट लावतंय’ असं पुटपुटत रामू अंथरुणातून धडपडत उठला नि सवयीने रिमोटकडे हात गेला. रिमोटचे बटण दाबूनही आवाज बंद होईना, हे बघून वैतागला. इतक्यात त्याला आठवले की टीवी नव्हे, तर मुख्य प्रधानाच्या आदेशाने आपल्या घरात प्रविष्ट झालेला रेडिओ कोकलतो आहे. मध्ययुगातील रेडिओ आता डिजिटल झालेला असल्याने, त्याचे बटन पिळून बंद करताना त्याचा कान पिळल्याचे दुष्ट समाधानही मिळत नाही, हे ध्यानात येऊन तो अधिकच वैतागला. धडपडत कसातरी टचस्क्रीन रेडिओ अनलॉक करून त्याने आवाज बंद केला. ‘च्यामारी या मुख्य प्रधानाच्या, गोबेल्सने रेडिओ वापरला त्याला शंभर वर्षे झाली. तंत्रज्ञान बदलले तरी, या बाबालाही रेडिओच हवा म्हणे. आणि हे कसले खूळ, तर म्हणे रोज… पुढे वाचा »
रविवार, १८ ऑक्टोबर, २०१५
विचारहीन झुंडीचे माध्यमशास्त्र
-
‘विचारवंतांवर, लेखकांवर कोणतीही बंधनं आली, की विचार मरतो. विचार मेला की संस्कृती धोक्यात येते आणि विकृती येते.’ - दुर्गा भागवत. गेल्या काही दिवसांत साहित्यिकांची पुरस्कार परत करण्याची ‘अहमहमिका’ अनेकांना टोचली आहे. माध्यमांच्या विस्फोटामुळे, आणि ते लोकांना सतत व्यक्त होण्यास भाग पाडत असल्याने, आणि या दोन्हींचा एकत्रित परिणाम म्हणजे कितीही निर्बुद्ध विधानांना कुठे ना कुठे प्रसिद्धी मिळत असल्याने, निरर्गल व्यक्त होण्याची प्रवृत्ती वाढीस लागलेली दिसते. तर्क, मूल्यमापनाची शून्य समज असलेलेही दिग्गजांवर बेमुर्वत शेरेबाजी करताना दिसतात. अख्लाकला घेरून मारणार्या जमावाचीच एक आवृत्ती सोशल मीडियांतून बस्तान बसवू लागलेली आहे. अनेक सुज्ञांना आपण अशा एका झुंडीचा भाग आहोत, हे जाणवतही नाही इतका धुरळा बुद्धिभेद करणार्यांनी उडवून दिलेला दिसतो आहे. … पुढे वाचा »
गुरुवार, २४ सप्टेंबर, २०१५
गण्या आणि मी - २: गण्याचे ग्यान
-
आमचा सातवी पास असलेला गण्या हुशार आहे. माझ्या तर्कातल्या चुका तो अचूक काढतो आणि मला जमिनीवर आणत असतो. आता हेच पहा ना, परवा कॉ. पानसरेंच्या हत्येच्या संदर्भात म्हणे ‘सनातन’च्या कुण्या कार्यकर्त्याला अटक झाली. आपला होरा बरोबर ठरला, म्हणून पुरोगामी म्हणवणारे माझ्यासारखे खुश झाले. “बघ आम्ही म्हणालो तेच बरोबर ठरले की नाही.” गण्याकडून आमची नेहेमीची, बदनामीपुरती खाण्याची पानपट्टी घेता घेता मी त्याला ऐकवले. फडक्याला हात पुसता पुसता गण्या क्षणभर थबकला, मग माझ्याकडे ढुंकूनही न पाहता समोर ठेवलेले पान उचलून त्याला चुना फासू लागला. चुना, कात वगैरे लावून झाल्यावर आवश्यक ती पंचद्रव्ये त्यात टाकून त्याने ते पान ‘शीलबंद’ केले आणि आधीच लावून ठेवलेल्या सुमारे तीसेक पानांच्या ओळीत जोडून दिले. पुन्हा एकदा फडक्याला हात पुसता पुसता तो म्हणाला, “तुम्ही पुरो… पुढे वाचा »
रविवार, २० सप्टेंबर, २०१५
‘हार्दिक’चा राजकीय तिढा
-
हार्दिक पटेल या बावीस वर्षांच्या युवकाने भारतातच नव्हे, तर जगभरात आर्थिकदृष्ट्या पुढारलेल्या पटेल-पाटीदार समाजासाठी आरक्षणाची मागणी करण्यासाठी गेले काही दिवस आंदोलन चालवले आहे. या आंदोलनामुळे नरेंद्र मोदी यांच्या सर्वशक्तिमान होऊ पाहणार्या नेतृत्वाला त्यांच्या राज्यातूनच आव्हान मिळाल्याने, त्यांच्या आणि पर्यायाने भाजप सरकारच्या पुढील वाटचालीवर काय परिणाम होतील, याबद्दलही बोलले जात आहे. आंदोलनाचा मुद्दा ‘जात’ या घटकाशी निगडित आहे आणि म्हणून त्याच्या यशापयशाचा परिणाम गुजरातमधे आणि एकुणच देशाच्या सामाजिक परिस्थितीवर कसा घडेल याचा अभ्यास अनेक समाजशास्त्रज्ञ करतीलच. पण देशाच्या राजकारणावरील दीर्घकालीन परिणामांचा विचार होताना मात्र दिसत नाही. भारतीय राजकारणावरच्या दूरगामी परिणामाचा विचार करताना द… पुढे वाचा »
शनिवार, १२ सप्टेंबर, २०१५
नासा म्हणे आता
-
या महिन्यात एक अश्मखंड पृथ्वीवर आदळून पृथ्वीवरील बरीच मानवसृष्टी नष्ट होणार आहे असं ‘नासा’च्या सूत्रांनी जाहीर केले आहे. त्यातून जे वाचतील त्यांना नोव्हेंबरमधे पंधरा दिवसांची रात्र अनुभवायला मिळणार आहे! नासाने मर्मेड्स अथवा मत्स्य-स्त्रीच्या अस्तित्वावर शिक्कामोर्तब केले आहे. चेर्नोबिलनंतरच्या किरणोत्साराचा मागोवा घेताना शेणाने सारवलेल्या एका झोपडीत शून्य किरणोत्सार असल्याचे पाहून, नासाच्या आण्विक संशोधकांनी गायीच्या अलौकिकत्वाबद्दल गौरवोद्गार काढले होते. नासाच्या उपग्रह अभ्यास केंद्राने भारत नि श्रीलंकेला जोडणारा रामसेतू आहे हे सिद्ध केले आहे. नासानेच भारतीय शिक्षणपद्धतीचा बारकाईने अभ्यास करून ती जगात सर्वात श्रेष्ठ असल्याचे प्रमाणपत्र दिले आहे. … पुढे वाचा »
मंगळवार, ८ सप्टेंबर, २०१५
‘शेष’प्रश्न
-
( हे एकटाकी लिहिलेले आहे आणि मोरेंचे लेखन वाचून बराच काळ लोटला आहे. तेव्हा तपशीलात चुका असणे अगदीच शक्य आहे. तेव्हा ते आधीच मान्य करून टाकतो. पण त्याने मूळ मुद्द्याला बाध येईल असे मात्र नाही .) सध्या शेषराव मोरे यांनी अंदमान येथे केलेल्या विधानांवरून गदारोळ उसळला आहे. त्यात ‘पुरोगामी दहशतवाद’ असा शब्द वापरून त्यांनी एक प्रकारे शासन-पुरस्कृत पुंडांच्या हाती कोलित दिले आहे. यामुळे पुरोगामी आणि ‘स्वतःला पुरोगामी म्हणवणारी’ मंडळी मोरेंवर चांगलीच नाराज झालेली आहेत. मी स्वतःदेखील या कारणासाठी मोरेंच्या भूमिकेवर तिरकसपणे टीका केलेली आहे. परंतु असे असले तरी मोरेंबद्दल माझा आक्षेप आहे, तो केवळ त्यांचा सरसकटीकरण करणार्या विधानाबद्दल आहे, आणि गुंडांच्या हिंसाचाराला अप्रत्यक्ष अधिष्ठान देण्याबाबत आहे.… पुढे वाचा »
Labels:
अनुभव,
पुरोगामित्व,
प्रासंगिक,
भूमिका,
राजकारण
याची सदस्यत्व घ्या:
पोस्ट (Atom)