Vechit Marquee

Indexes Menu_Desktop

संपूर्ण सूची :

रविवार, १२ जानेवारी, २०२०

जग जागल्यांचे ०१ - व्यवस्था आणि माणूस


  • मानवी इतिहासाच्या सुरुवातीपासून माणूस कळपांमध्ये अथवा टोळ्यांमध्ये राहात असे. त्याच्या आयुष्यातील आहार आणि निद्रा वगळता इतर सर्व कामे, जसे शिकार, अन्नवाटप, संरक्षण, अपत्य संगोपन ही दोन किंवा अधिक व्यक्तींच्या सामूहिक सहभागानेच होत असत. शिकारीसारखे काम करत असताना हाकारे घालणे, कळप उठवणे, ठार मारणे, शिकार वस्तीच्या स्थानी वाहून नेणे, तिचे वाटप करणे... ही आणि यापुढची कामे विविध व्यक्तींना वाटून दिलेली असत. एका कामाच्या पूर्तीसाठी यात श्रमविभागणीचे तत्त्व अंगिकारले जात असे. पुढे शिकारीचे एक कार्य जर छोटी छोटी उप-कार्ये साध्य केल्याने साध्य होत असेल तर व्यक्तीच्या कार्यकौशल्याच्या एकत्रीकरणाने मोठी कार्ये सिद्ध करता येतील, असा शोध माणसाला लागला. या श्रम-संमीलनाचा तत्वाचा वापर करुन माणसांनी पुढे यापू… पुढे वाचा »

दाद द्या अन् शुद्ध व्हा


  • जेमतेम सकाळ. चहा घेऊन डोळ्यातली उरली-सुरली झोप घालवण्याचा प्रयत्न तुम्ही करत असता नि फोन वाजतो. नंबर अपरिचित. सोशल मीडियाबाहेर संपूर्ण अ‍ॅंटि-सोशल असलेल्याने अपरिचित क्रमांकावरुन फोन येण्याची शक्यता जवळजव्ळ शून्य. तेव्हा बहुधा राँग नंबर असावा असे गृहित धरुन अनिच्छेनेच उचलता. बोलणारा नाव नि गाव सांगतो नि आपला तर्क बरोबर ठरणार याची खात्री होऊ लागते. पण बोलणारा अचानक परिचित विषयावर बोलू लागतो नि तुमची झोप ताबडतोब पळून जाते. फोन करणारी व्यक्ती पंढरपूर जवळच्या एका गावातील शेतमजूर असते, दलित चळवळीत सक्रीय असणारी आणि स्वत: पूर्वी 'लोकमत’सारख्या वृत्तपत्रांतून थोडेफार लेखन केलेली. पण कौटुंबिक कारणाने शहराकडून पुन्हा गावाकडे परतलेली. तुमचा लेख सकाळी वाचून तातडीने फोन करुन तो आवडल्याचे सांगतानाच त्या अनुषंगाने त्यांचे स्वत:चे विचार मांडत जाते… पुढे वाचा »

बुधवार, ८ जानेवारी, २०२०

मालवीयांची ’टुकडे टुकडे गँग’ आणि जेएनयू


  • जेएनयू म्हटले मालवीय आणि त्यांच्या टुकडे टुकडे गँगची टेप ’देशद्रोही घोषणा’ या दोन शब्दांवर अडकते. चला, क्षणभर मान्य करु की कन्हैया आणि त्याच्या काही साथीदारांनी देशद्रोही घोषणा दिल्या... चला, क्षणभर मान्य करु की जेएनयू मध्ये दरवर्षी असे देशद्रोही विद्यार्थी शिक्षण घेत असतात... Photo: Shirin Rai. ज्यांना मारहाण झाली त्यातील किती जणांनी या घोषणा दिल्या होत्या असे तुमचे म्हणणे ( तुमचे म्हणणे हं, पुरावेदेखील मागत नाही मी. ) आहे? जर त्यातील निदान काही जणांनी ( माझ्या मते एकानेही नाही, कारण जिथे मालवीय आणि त्यांची टुकडे टुकडे गँग बूच बसल्यासारखी अडकली आहे तो प्रसंग भूतकाळातला आहे. ) तरी नसावी, बरोबर ना? मग त्यांना मारहाण झाली त्याचे काय? आणि शिक्षकांचे काय? त्यांनीही त्या घोषणा दिल्या… पुढे वाचा »

रविवार, ५ जानेवारी, २०२०

संग्राम बारा वर्षांचा आहे...


  • संग्राम बारा वर्षांचा आहे... संग्रामच्या वडिलांची कार एजन्सी आहे, त्यांच्या मालकीचा एक पेट्रोल-पंप आहे, ते बिल्डर आहेत आणि मुख्य म्हणजे ते समाजसेवक आहेत. ’संग्रामराजे प्रतिष्ठान’च्या माध्यमातून त्यांचे समाजकार्य विविध क्षेत्रात चालू असते. संग्राम त्यांना बाबा, डॅड न म्हणता ’दादा’ म्हणतो, कारण आसपासचे सारेच लोक त्यांना दादा म्हणतात. त्यांचा उच्चभ्रू वस्तीमध्ये तीन हजार स्क्वेअर फुटाचा ऐसपैस बंगला आहे. दाराशी दोन एसयूव्ही आणि एक एक्सयूव्ही कार आहे. बंगल्यात दादांचा स्वत:चा बार आहे. आणि दहा बाय दहाचे प्रशस्त देवघरही. दारासमोर पोट खपाटीला गेलेला एक दरवान आहे आणि त्याच्या शेजारी दोन गलेलठ्ठ कुत्रे बांधलेले आहेत. संग्रामच्या वडिलांच्या गळ्यात पाच तोळ्यांची चेन आणि डाव्या हातात सात तोळ्यांचे सोन्याचे कडे आहे. हाताच्या दहा बोटांपैकी सहा … पुढे वाचा »

वेदांग दहा वर्षांचा आहे...


  • वेदांग दहा वर्षांचा आहे... वेदांगचे आईवडील संगणकक्षेत्रात काम करतात. दोघांचे उत्पन्न छाऽन आहे. एका उच्चभ्रू सोसायटीमध्ये त्यांचा दीड हजार स्क्वेअर फुटाचा फ्लॅट आहे. सोसायटीमध्ये लॉन आहे, क्लब हाऊस आहे. सोसायटीच्या दाराशी येणार्‍या जाणार्‍याकडे संशयाने पाहणारा दाराशी दरवान... चुकलो सिक्युरिटी मॅनेजर आहे. सोसायटीमध्ये राहणार्‍यांच्या घरी निरोप देता यावा म्हणून त्या सिक्युरिटी मॅनेजरच्या तीन-बाय-तीनच्या ’केबिन’मध्ये इंटरकॉम आहे. त्यावरुन कोणत्याही फ्लॅटमधून दुसर्‍या फ्लॅटमध्ये बोलणे शक्य असले तरी तसा वापर कुणी करत नाही. प्रत्येकाकडे मोबाईल आहे. वेदांगच्या आईबाबांकडे आयफोन आहे. त्याचे नवे व्हर्शन जूनमध्ये येणार आहे. ’ही बातमी शेअर करताना ’फीलींग एक्सायटेड’ असे स्टेटस वेदांगच्या बाबांनी... चुकलो डॅडनी टाकले आहे. वेदांगची मम्मी अजूनही … पुढे वाचा »

शनिवार, ४ जानेवारी, २०२०

‘आठवडी बाजारा’ची मुशाफिरी


  • ( राज कुलकर्णी यांच्या ’आठवडी बाजार आणि समाजजीवन’ या पुस्तकासाठी लिहिलेली प्रस्तावना ) आपल्या देशातील शिक्षणक्रमातील इतिहासाच्या अभ्यासामध्ये प्रामुख्याने राजकीय आणि प्राचीन इतिहासावर भर असतो. जगण्याशी निगडित असणाऱ्या जड वस्तूच्या, आयुधांच्या आणि माणसाच्या जीवनशैलीचा जो अतूट संबंध असतो, त्याकडे मात्र दुर्लक्ष होताना दिसते. याचे कारण ऐतिहासिक दस्तऐवजांमध्ये त्या त्या काळचे शासनकर्ते, राज्ये, साम्राज्ये आदींचा सनावळीसह काटेकोर उल्लेख असला, आणि त्याच्या अनुषंगाने सांस्कृतिक इतिहासाची काही पानेही जोडलेली असली, तरी त्या काळी प्रचलित असणाऱ्या वस्तू आणि मनोरंजनादि पैलूंचा वेध घेणाऱ्या जड वस्तूच्या इतिहासाची, विकासाची प्रामुख्याने उपेक्षाच दिसते. क्वचित कुठे असली, तरी विद्यार्थीच काय अभ्यासकांपैकी बहुसंख्य व्यक्तीदेखील त्यांना फार महत्त्व देताना… पुढे वाचा »

सोमवार, ३० डिसेंबर, २०१९

केला तुका झाला माका


  • छायाचित्र: Laurent Hamels https://www.dreamstime.com/ येथून साभार. समोर एक दगड आहे आणि तुमच्याकडे पाण्याचा लोटा आहे. दगडावर नेमाने पाण्याची धार धरुन त्याला पाघळवण्याचा, मऊ करण्याचा प्रयत्न तुम्ही करता. परिणामी... ...आसपासची बहुसंख्या तुमच्या कृतीला भक्ती समजून त्या दगडाला देवत्व देऊन त्याची पूजा करु लागते. पाण्याने दगडाला मऊपणा येत नाही, फारतर छिद्र पडू शकते. आणि ते छिद्र पाडायचे तर त्या कृतीलाही अनेक वर्षांचे सातत्य हवे हे तुम्हाला समजत नाही, आणि दगडाला देवत्व देण्यास उतावीळ असलेली आलस्यबुद्धी बहुसंख्या तुमच्या आसपास आहे हे तुम्ही समजून घेतलेले नसते. विज्ञान आणि समाजशास्त्र या दोनही विषयांत तुम्ही एकाच वेळी नापास झालेले असता! -oOo- पुढे वाचा »

शनिवार, २८ डिसेंबर, २०१९

Being Anti-social


  • A: While we are talking for last half an hour, you peeked in to your mobile at least six to seven times, even though there was no call, no notification sound... Why? B: Someone may have posted something new. on FB, Insta or some WA group that I have muted for notification. I want to be up-to-date with the latest information. A: Why? B: If not, I will feel left out when in a group people start talking about that particular point. A: Why? B: Why...? I may not be able to participate in the discusssion. A: So? B: It will project me as an outdated moron. A: Outdated or out of place... moron or otherwise. B: umm... Out of place maybe. A: And why is that bad, considering the comp… पुढे वाचा »