Vechit Marquee

Indexes Menu_Desktop

संपूर्ण सूची :

शनिवार, २५ एप्रिल, २०२०

जग जागल्यांचे ०७ - ’रुझवेल्ट’चा राखणदार: कॅ. ब्रेट क्रोझर


  • कोरोनाचा क्रूसेडर : ली वेनलियांग « मागील भाग --- नव्वदीच्या दशकात तैवानशी झालेल्या संघर्षात अमेरिकन युद्धनौकांनी पाऊल ठेवल्यामुळे मोठा संघर्ष टाळण्यासाठी चीनला माघार घ्यावी लागली होती. अमेरिकेच्या या युद्धनौका त्या भागातील सहकारी वा मित्र देशांच्या भेटींतून आपले तिथले स्थान अधोरेखित करत असतात. USS Theodore Roosevelt या युद्धनौकेची व्हिएतनाम भेट याच हेतूचा भाग होती. मार्चच्या पहिल्या आठवड्यात, उत्तरेला चीनमध्ये कोरोना व्हायरसचा कहर चालू असताना, व्हिएतनाममधील डा नांग या बंदरात ती दाखल झाली. पाच दिवसांची व्हिएतनाम-भेट उरकून परतीच्या वाटेवर असताना, तीन-चार दिवसांनी तिच्या तीन खलाशांमध्ये कोरोनाची लक्षणे दिसू लागली. दोनच दिवसांत बाधितांची पंचवीस झाली. तोवर अमेरिकेच्या संरक्षण दलातील सुमारे सहाशे जणांना कोरोनाची लागण झाली. त्यातील सुमारे सव… पुढे वाचा »

शुक्रवार, १७ एप्रिल, २०२०

भारत हा कर्मकांड-प्रधान देश आहे


  • भारत हा कर्मकांड-प्रधान देश आहे असे मी म्हणतो. ते तंतोतंत खरे करण्याचा माझ्या देशबांधवांचा प्रयत्न पाहून माझे ऊर भरून येतो. आपल्या सीएम आणि पीएम ने सांगितले की एसी वापरु नका... आता ते ही अंमळ कर्मकांडवालेच, घरच्या पर्सनल एसीला धोका नाही हे सांगितलेच नाही. मग त्यांचे थाळीबंद शागीर्द त्यांची आज्ञा पाळण्यास सरसावले. मॉल, चित्रपटगृह, मोठी औद्योगिक कार्यालये यांत ’सेंट्रलाईज्ड एअर कंडिशनिंग सिस्टम’ असते, जिथे हवा रि-सर्क्युलेट होते. जिथे एअर-व्हेंट असतात तिथे हवा आत खेचली जाऊन सेंट्रल कूलिंग युनिटकडे नेली जाते. तिथे ती थंड करुन पुन्हा परत सोडली जाते. या प्रक्रियेत कामाच्या ठिकाणी जर कोरोनाचे पुंज (ड्रॉप्लेट्स) असतील, तर ते हवेबरोबर खेचले जाऊन व्हेंटमध्ये दीर्घकाळ टिकून राहू शकतात. धोका इथे आहे! घरच्या - स्प्लिट वा विंडो - एसीमध्ये बाहेरच्… पुढे वाचा »

मंगळवार, ७ एप्रिल, २०२०

‘कोर्ट’ आणि एका ‘असंवेदनशील’ प्रेक्षकाच्या नजरेतून चित्रपट


  • १७ तारखेला (२०१५) 'कोर्ट' रिलीज झाला. पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात तो दाखवला गेला तेव्हा प्रचंड गर्दीने प्रवेश मिळाला नव्हता. त्यानंतर अनेक पुरस्कार मिळाल्यानंतर त्याबद्दल अधिकाधिक चर्चा होऊ लागली. लोक उत्सुकतेने तो रिलीज होण्याची वाट पाहू लागले होते. चित्रपट मराठी असल्याने किती काळ टिकेल हे ठाऊक नसल्याने रिलीज झाल्या-झाल्या बघून टाकण्याचे बहुतेकांनी ठरवले होते. चित्रपट रिलीज झाला. अनेकांनी फर्स्ट-डे-फर्स्ट शो पाहून घेतला. वृत्तपत्रांतून आलेल्या समीक्षेतून बहुतेकांनी त्याला उत्तम रेटिंग दिले गेले. पहिल्या एक-दोन शोमधेच असा अनुभव येऊ लागला, की सर्वसामान्य प्रेक्षकाची प्रतिक्रिया निराशेची होती. स्वयंघोषित चित्रपट रसिक/समीक्षकहा धक्का होता. त्यातून काही जणांनी प्रेक्षक 'असे कसे दगड हो?' अशी प्रतिक्रिया देऊ केली. थोड… पुढे वाचा »

अजा पुत्रो बलिं दद्यात्


  • २०१४ मध्ये अजस्र पुतळे उभारण्याची अहमहमिका चालू झाली. पुढे एकदोन वर्षांनी एका चर्चेदरम्यान एका पुतळ्यावर केलेल्या खर्चात जनहिताची काय काय कामे करता येतील याबाबत विश्लेषण करत असताना एका पुतळासमर्थकाने ’आम्ही हे ही करु नि ते ही करु.’ असा दावा केला होता. पण सरकारी मालकीच्या कंपन्या विकून सरकारला पैसा उभा करावा लागत असताना हे जास्तीचे पैसे आणणार कुठून या प्रश्नाचे उत्तर त्याच्याकडे नव्हते. काही महिन्यांपूर्वी एका कॉम्रेडशी झालेल्या चर्चेदरम्यान कम्युनिस्ट व्यवस्थेमध्ये ’सर्वांना हवे ते करता येईल, हवे ते मिळेल’ या दाव्यावर ’पुरवठा पुरेसा असेल तर हे शक्य आहे. तो अपुरा असला की प्राधान्यक्रम लावून काहींना नाराज करावेच लागेल.’असा आक्षेप नोंदवला होता. त्यावरचे अप्रत्यक्ष उत्तर ’माणसे फार गरजा वाढवून ठेवतात, त्या मर्यादित ठेवल्या की पुरवठा नेहमीच प… पुढे वाचा »

रविवार, ५ एप्रिल, २०२०

जग जागल्यांचे ०६ - कोरोनाचा क्रूसेडर: ली वेनलियांग


  • नैतिक तंत्रभेदी : सॅमी कामकार « मागील भाग --- मागील वर्षाच्या अखेरीस चीनमधील वुहान शहरातील एका रुग्णालयात फ्लू अथवा सामान्य तापावर उपचार घेत असलेल्या एका रुग्णाच्या प्रकृतीला बराच काळ उतार पडताना दिसत नव्हता. एरवी एक-दोन आठवड्यात बरा होणारा आजार दीर्घकाळ हटेना, तेव्हा त्याच्या घशातील स्रावाचे नमुने प्रयोगशाळेकडे पाठवण्यात आले. त्याचा रिपोर्ट आरोग्य सेवेच्या संचालिका असलेल्या डॉ. अई फेन यांच्या नजरेस पडला. या रिपोर्टमध्ये ’सार्स कोरोनाव्हायरस’ ची शक्यता अधोरेखित करण्यात आली होती. २००२ ते २००४ या दोन वर्षांत जगात धुमाकूळ घालून घेलेल्या आणि सुमारे आठशे बळी घेतलेल्या आजाराचे नाव पाहून अई यांनी सार्स (Severe Acute Respratory Syndrome) या शब्दाला अधोरेखित करुन वुहानमधील एका अन्य रुग्णालयातील व… पुढे वाचा »

‘प्रिन्सेस डायमंड’च्या डायरीतून ‘कोविड-१९’


  • ‘जॉन्स हॉपकिन्स युनिवर्सिटी’चा कोविड-१९ संबंधी माहिती देणारा डॅशबोर्ड पाहात होतो. कोणत्या देशांत किती रुग्ण आहेत हे पाहताना त्या यादीत अचानक ’डायमंड प्रिन्सेस’ हे नाव पाहिले की बुचकळ्यात पडलो. या देशाचे नावही कधी ऐकले नव्हते. अधिक शोध घेता हा देश नव्हे तर खासगी क्रूझ आहे असे समजले. जेमतेम एक हजारच्या आसपास कर्मचारी आणि सुमारे २७०० उतारू असलेल्या या क्रूझवर तब्बल ७१२ लोकांना लागण झालेली होती. त्यातले ५१२ विषाणूमुक्त झाले तर १० जण दगावले असे हॉपकिन्सचा डॅशबोर्ड सांगतो. इतक्या मोठ्या प्रमाणावर लागण झाल्यानेच त्या क्रूझचे नाव देशांच्या यादीत समाविष्ट करावे लागले. हा एक अनोखा अपवाद आहे. पण इतक्या मोठ्या प्रमाणावर झालेली लागण हे एकच कारण आहे असे मात्र नाही. असा अपवाद समोर असलेल्या समस्येबद्दल काही इनसाईट देऊन जातो आहे. एखाद्या मोठ्या भूभागावर … पुढे वाचा »

रविवार, २२ मार्च, २०२०

जग जागल्यांचे ०५ - नैतिक तंत्रभेदी: सॅमी कामकार


  • कॅथरीन बोल्कोव्हॅक « मागील भाग --- दहा वर्षांचा असताना त्याला पहिला संगणक मिळाला. इंटरनेटवर भ्रमंती चालू असताना कुणीतरी धमकी देऊन त्याचा संगणक बंद पाडला. तो हादरला. पण ’जर समोरचा हे करु शकत असेल, तर मी ही करु शकतो’ या जिद्दीने कामाला लागला. इतर कुणाचा अधिकार असलेले, मालकीचे असलेले संगणक अथवा संगणक-प्रणाली यांच्यात परस्पर बदल करणे याला संगणकाच्या भाषेत ’हॅक’ करणे म्हटले जाते. टीन-एजर असतानाच तो वेगवेगळी सॉफ्टवेअर, गेम्स ’हॅक’ करुन आपल्याला हवे तसे बदल करु लागला. असे असले तरी सुरुवातीला त्याने इतर कुणाच्या संगणकाला धक्का लावलेला नव्हता. वयाच्या विशीत पोचल्यावर त्याने गंमत म्हणून हा प्रयोग करायचे ठरवले. तरुणाई आणि सोशल मीडिया हे नाते तेव्हा मूळ धरु लागले होते. आजच्या फेसबुक’सारख्या ’मा… पुढे वाचा »

गुरुवार, १९ मार्च, २०२०

अफवांवर विश्वास ठेवू नका... म्हणे!


  • "पार्टीच्या चुकीच्या आज्ञा पाळत जाऊ नकोस." वैतागलेल्या मेयर पेपोनने आपल्या कॉम्रेडला खडसावले. ’आता चुकीची आज्ञा कुठली हे कसे ओळखायचे’ कॉम्रेड बिचारा बुचकळ्यात. जिओवानी ग्वेरेसीच्या ’डॉन कॅमिलो स्टोरीज’ मधला हा संवाद मार्मिक आहे. मुद्दा असा आहे की एकदा आपल्या प्रजेला आज्ञाधारक बनवले की त्यांना तुमच्या नावे जे येते ते निमूटपणॆ अनुसरण्याचे अंगवळणी पडून जाते. त्यांची विचारशक्ती खुंटते. आता आज्ञा देणार्‍यांवर अधिक जबाबदारी येते. अशी आज्ञा सर्व बाजूंचा विचार करुन, कमीत कमी नुकसान आणि जास्तीत जास्त अपेक्षित परिणाम अशी असावी याचे पूर्वमूल्यमापन त्यांनाच करावे लागते. त्या आज्ञेच्या अंमलबजावणीच्या बर्‍या-वाईट परिणामांची जबाबदारी पूर्णपणे त्यांना घ्यावी लागते (आपल्या महान देशात राजकारण, समाजकारणापासून सर्वच क्षेत्रात नेमके उलट आहे. ’स… पुढे वाचा »