Vechit Marquee

Indexes Menu_Desktop

संपूर्ण सूची :

रविवार, ११ मे, २०२५

Will He...?


  • रोममधील कॅथलिक चर्चचे सर्वोच्च धार्मिक नेते पोप फ्रान्सिस यांचे नुकतेच निधन झाले. त्यानंतर नवे पोप म्हणून चर्चच्या सर्वोच्चपदी आरूढ झालेले Robert Fancis Prevost हे गणित विषयातील पदवीधर आहेत. या संयोगवश सुचलेली ही कविता. Will He...? Pope Leo XIV Is it a new hope, if a Mathematician becomes a Pope? Will he count fractions, and not just whole numbers? Will he be rational, filter out infinite irrational? Will he prefer integration over the age-old differentiation? Will he draw a line with a color other than white? Will he connect to the point outside his circle? Will he...? पुढे वाचा »

शनिवार, २६ एप्रिल, २०२५

To Dumbo, with Love


  • फेसबुक नि त्यासारखी समाजमाध्यमे ही बव्हंशी पेंढा भरलेल्या बुजगावण्यांना आधार देऊन उभी करणारी काठी असते. नसलेल्या गुणांची जाहिरात करुन आपल्याला अपेक्षित अशी आपली ओळख वा व्यक्तिमत्त्व कृत्रिमरित्या उभे करण्यास साहाय्यभूत होणारे हे मंच. पण क्वचित हरवलेल्या संवाद नि संवेदनांच्या अभिव्यक्तीसाठी काही सुज्ञ मंडळी याचा वापर करतात तेव्हा सुखद धक्का बसतो. खाली दिलेली पोस्ट हा असाच एक सुखद धक्का होता. When Do We Lose Our Compassion? I was thinking about Dumbo the other day—the scene where they lock up Dumbo’s mom, calling her a “mad” animal just because she wanted to protect her baby. They tore them apart, and little Dumbo just wanted his mother. I remember how much t… पुढे वाचा »

बुधवार, २३ एप्रिल, २०२५

पहलगाम आणि आपण


  • काल पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर जीव गमावलेल्या देशवासियांच्या कुटुंबियांसोबत सहवेदना, संवेदना व्यक्त करण्याऐवजी, समाजमाध्यमांवर मोदी-धार्जिण्या नि मोदी-विरोधक गटांतील अनेक नीच मंडळींनी एकमेकांबद्दलच्या फसफसणार्‍या द्वेषाचे दर्शन घडवले. मोदी-धार्जिण्या मंडळींनी ‘मणिपूरवाले’ आता बोलत नाहीत असे एकतर्फी जाहीर करत त्या दंगलींच्या वेळी जो तोंड दाबून बुक्क्यांचा मार सहन करावा लागला होता त्याचे उट्टे काढले. तर यांच्या विरोधी गटातील अनेकांनी या निमित्ताने मोदींवर शरसंधान करण्याची संधी साधली; ‘मग मोदी नाही का अशा गोष्टींचं राजकारण करत?’ असा प्रश्न विचारुन एकप्रकारे मोदी-धार्जिण्यांचाच तर्क वापरला. जेणेकरुन आपल्या विरोधी गटाची नि आपली मानसिकता वेगळी नाही, केवळ बाजू वेगळी आहे हेच सिद्ध केले. अशा घटनांबाबत झालेल्या चुका, त्रुटी या… पुढे वाचा »

शनिवार, १९ एप्रिल, २०२५

हट्टमालाच्या पल्याड... ज्याचा त्याचा युटोपिया!


  • कित्येक वर्षांपूर्वी अमोल पालेकरांनी साजर्‍या केलेल्या ‘बादल सरकार महोत्सवा’च्या सीडीज मिळाल्या होत्या. त्यात ‘हट्टमालार आपोरे’ या शीर्षकाचे नाटक पाहण्यात आले होते. त्याचा तपशील इतक्या वर्षांनी विस्मरणात गेला असला तरी, ‘चलन/पैसा या संकल्पनेवर हलकेफुलके भाष्य करणारे नाटक’ आहे इतपतच ध्यानात होते. काल पुन्हा एकवार त्याचा प्रयोग पाहिला नि डोक्यात उजेड पडला. काही काळापूर्वी कॉ. दत्ता देसाईंशी तीन दिवस गप्पांचा कार्यक्रम आम्ही केला होता. त्यात मार्क्सला अपेक्षित समाजव्यवस्थेवर बोलणे झाले होते. त्याच्या मते खासगी मालमत्ता ही संकल्पना रद्दबातल केली की, माणसाला आज करावे लागते तसे ऊर फुटेतो काम करावे लागणार नाही. अन्न, वस्त्र, निवास यांची हमी व्यवस्थेनेचे घेतली, तर त्याला त्या व्यवस्थेप्रती आपल… पुढे वाचा »

बुधवार, १६ एप्रिल, २०२५

स्वप्नात पाहिले जे...


  • ‘स्वप्नं सत्यात उतरतात; पण ती उतरवावीही लागतात.’ राहीनं हे कुठं तरी वाचलं. कुठल्याशा प्रसिद्ध पुस्तकातलं वाक्य. ती विचारात पडली. त्यातून बुद्धिमत्ता असली की माणसाला प्रश्न पडतात; नसली की मग बरं असतं. ताप नाही- नि:स्वप्न निद्रा येते. इथं तसं नाही. आपण विचार करतो. प्रश्न विचारतो, स्वत:ला. आपल्याला स्वप्नं पडतात. मेंदूतल्या पेशी कशा ताणल्या जातात, एखाद्या तंबोर्‍याच्या तारेसारख्या- त्यावेळेस, स्वप्न पडत असताना. (म्हणजे हेही जाणवतं.) अंतस्थ रंग निळा-जांभळा असतो, मेंदूच्या आतल्या आत. मग ताणलेल्या पेशीपेशींमधून ते स्फुरतं- स्वप्न. एखादं गाणं स्फुरावं तसं. सहज आणि दु:खमय, अस्वस्थ. मग पडतं ते स्वप्नं वारंवार. एकच एक: आपण अथांग पोकळीत हरवून गेलो आहोत. पोकळीला अंत नाही, आरंभही नाही. म्हणजे पोकळीच कॅव्हिटी. आणि शोधतो आहोत काही तरी चाचपडत- तणावग… पुढे वाचा »

सोमवार, ७ एप्रिल, २०२५

दिशाभुलीचे गणित


  • अध्यक्षीय निवडणुकीतील प्रचारा-दरम्यान आणि निवडून आल्यानंतरही बर्‍याच देशांना ‘धडा शिकवण्या’चा मनसुभा ट्रम्प यांनी वारंवार बोलून दाखवला होता. ‘हे देश अमेरिकेकडून आयात होणार्‍या मालावर अवाच्या सवा कर आकारतात; त्या तुलनेत अमेरिकेत त्यांच्याकडून आयात मालावर बराच कमी कर आकारला जातो. यातून त्या देशांतील निर्यातदारांना अधिक फायदा होतो आहे आणि पर्यायाने अमेरिका नि त्या देशांत होणार्‍या व्यापारामध्ये अमेरिकेचे नुकसान होते आहे’ अशी त्यांची तक्रार होती. ‘मी यावर तोडगा काढेन, अमेरिकेवर अन्याय करणार्‍या या देशांना धडा शिकवेन’ असे आश्वासन ते देत होतो. सामान्य नागरिकांना ‘तुमच्यावर अन्याय होतो आहे’, ‘तुमचे हित धोक्यात आहे’, ‘याला बाहेरचे लोक जबाबदार आहेत’, ’मी हा अन्याय झटक्यात दूर करेन’ अशा घोषणा आवडतात. आपल्या दुरवस्थेला इतर कुणीतरी– विशेषत: आपल्य… पुढे वाचा »

शनिवार, २९ मार्च, २०२५

अमेझिंग अ‍ॅमेझॉन


  • (कथा, प्रसंग नि एक पात्र काल्पनिक असले तरी अनुभव वास्तव आहे.) काल घरातील ‘धुलाई निर्जंतुकीकरण द्रव्य’ (laundry disinfectant) संपले होते. ते आणायचा होते. इतरही लहान-सहान गोष्टी आणायच्या होत्या म्हणून सकाळी-सकाळी अ‍ॅमेझॉनच्या दुकानात शिरलो. आत शिरताक्षणीच तेथील प्रतिनिधीने धडाधड माझ्या मागच्या खरेदी सूचीतल्या वस्तू समोर टाकायला सुरुवात केली. मी म्हटलं, “राजा थांब जरा. मला काय हवे ते मी पाहातो.” तर तो पुन्हा आतल्या दिशेन धावला बरीचशी माहितीपत्रके घेऊन परतला नि डिस्काउंट, एकावर-एक फ्री वगैरे स्कीम्सची माहिती देऊ लागला. मी म्हटलं, “मला फक्त लॉण्ड्री डिसइन्फेक्टन्ट हवा आहे. बाकी किरकोळ गोष्टी माझ्या मी घेईन.” “ओ: शोअर सर,” दोन्ही हात कमरेजवळ एकावर एक असे ठेवत तो अदबीने म्हणाला, कंबरेत किंचित झुकून त्याने एक पाऊल मागे घेतले नि धावत जाऊन (… पुढे वाचा »

मंगळवार, १८ मार्च, २०२५

वांझ राहा रे


  • (कालच्या नागपूर दंगलीच्या निमित्ताने...) हे जे काही भयंकर घडते आहे ते ‘त्यांच्यामुळे’ यावर समस्तांचे एकमत झाले... . . ... प्रत्येकाच्या मनात ‘ते’ कोण याची व्याख्या वेगळी होती इतकंच. कुणी म्हणाले हे मुस्लिमांचे पाप (आणि रमताराम अर्बन नक्षल आहेत) कुणी म्हणाले हे हिंदुत्ववाद्यांचे पाप (आणि रमताराम छुपे संघी आहेत) कुणी म्हणाले हे बामणांचे पाप (आणि रमताराम मनुवादी आहेत) कुणी म्हणाले हे फ्रस्ट्रेटेड बहुजनांचे पाप (आणि रमताराम ब्रिगेडी आहेत) कुणी म्हणाले हे पुरोगाम्यांचे पाप (आणि रमताराम अंधभक्त आहेत) कुणी म्हणाले, हे मध्यमवर्गीयांचे पाप (आणि रमताराम वर्गद्रोही आहेत) --- रमताराम म्हणाले: Photo by Maan Limburg on Unsplash तुमच्या बीजातच विष आहे! वांझ राहा रे, वांझ रा… पुढे वाचा »