-
काही महिन्यांपूर्वी एका कार्यशाळेमध्ये आम्ही एका चित्रपटाचा शो आयोजित केला होता. मर्यादित लोकांसाठी असल्याने थिएटर नव्हते. तेव्हा सरळ लॅपटॉपवरुन प्रोजेक्टरला जोडावे असा प्लान होता. प्रोजेक्टर असो वा बाह्य मॉनिटर वा टीव्ही, वाटेल त्याला एक एचडीएमआय केबल जोडली की तो लॅपटॉप बिचारा निमूट चित्रपट वा गाण्याचा नळ सोडून पाणी वाहतं करतो असा अनुभव आमचा. पण आमचा माज साफ उतरला कारण दिग्दर्शक महाशयांचा लॅपटॉपचा धर्म वेगळा होता... साहेब आले ते अॅपल घेऊन. त्यांच्या त्या लॅपटॉपने आधी आमच्या प्रोजेक्टरकडे बघून नाक मुरडले नि ’पोरगी नकटी आहे, मी सोयरिक करणार नाही’ म्हणून जाहीर केले. मग एक यूएसबी फ्लॅशडिस्क ऊर्फ पेनड्राईव्हवर घेऊन तो प्रोजेक्टरला जोडू असे ठरले. तो प्रयोग सुरु झाला नि महाशय यूएसबीला नाके मुरडू लागले. मग दुसरा एक समंजस लॅपटॉप आणून तिला थोडा… पुढे वाचा »
Indexes Menu_Desktop
| संपूर्ण सूची : |
मंगळवार, २३ जून, २०२०
अगायायायायफोन
Labels:
अनुभव,
जिज्ञासानंद,
तंत्रज्ञान,
भांडवलशाही,
समाज
रविवार, १४ जून, २०२०
जग जागल्यांचे ०९ - मोर्देशाय वानुनू: एक चिरंतन संघर्ष
-
वर्णभेदभेदी कॅथी हॅरिस « मागील भाग --- ७ जून १९८१, इराक अण्वस्त्रांसाठी उपयुक्त इंधन तयार करत असल्याचा आरोप करत त्या देशातील ओसिरॅक अणुभट्टीवर इस्रायलने बॉम्बवर्षाव केला. आजवर इस्रायलने आंतरराष्ट्रीय समुदायासमोर आपल्या अणुकार्यक्रमाबाबत कायम ’नरो वा कुंजरो वा’ भूमिका ठेवली होती. उघड झालाच, तर तो स्वसंरक्षणार्थ आहे अशी मखलाशी यातून करणे शक्य होते. त्यांच्याच एका तंत्रज्ञाने लवकरच तो उघड केलाही. त्याचे नाव मोर्देशाय वानुनू. एका कर्मठ ज्यू घरात जन्मलेला मोर्देशाय दहा वर्षांचा असताना आपल्या भलामोठ्या कुटुंबासह इस्रायलमध्ये स्थलांतरित झाला. लष्करी अभियांत्रिकी सेवेत तीन वर्षांच्या सक्तीच्या लष्करी सेवेनंतर सैन्यात भरती होण्याचा प्रस्ताव नाकारुन त्याने पुढील शिक्षणासाठी तेल अविव विद्यापीठात प्रव… पुढे वाचा »
Labels:
‘दिव्य मराठी’,
अणुतंत्रज्ञान,
जग जागल्यांचे,
जिज्ञासानंद
अण्वस्त्रस्पर्धा आणि नग्न महासत्ता
-
इस्रायलच्या एका व्हिसलब्लोअरवर लेख लिहित होतो. जगाच्या डोळ्यात धूळ फेकून राबवलेल्या अणुकार्यक्रमांमधून इस्रायलने म्हणे १५० न्यूट्रॉन बॉम्ब बनवण्याइतके इंधन जमा केले आहे ! प्रश्न पडला... ... काय करायचे हो या १५० बॉम्ब्सचे? सांगा ना. नाही म्हणजे आमच्या डिस्नेच्या ’डकटेल्स’मधला अंकल स्क्रूज जसा आपले पैसे रोज मोजून खुश होतो तसे आहे का हे? की खरंच काही कामाचे आहेत इतके बॉम्ब? नाही, मी शांततावादी भूमिकेतूनही नाही, सध्या निव्वळ गणिती मूल्यमापनाच्या आधारे हा प्रश्न विचारतो आहे. इस्रायलची सारी शत्रू-शेजारी राष्ट्रे- अगदी सगळी इस्लामिक राष्ट्रे धरली तरी, उध्वस्त करायला असले ते पन्नास बॉम्ब्स सहज पुरतील. मग उरलेल्या शंभरेक बॉम्ब्सचे काय लोणचे घालायचे का हो ? कशासाठी निर्माण केले ते? का जमवले? उ… पुढे वाचा »
Labels:
अणुतंत्रज्ञान,
अर्थकारण,
जिज्ञासानंद,
समाज,
हिंसा
रविवार, ७ जून, २०२०
रंगार्याचा ब्रश
-
रंग लावण्याचा ब्रश हा परावलंबी असतो. भिंती(!)वर रंग लावण्याचे काम त्याचे असते खरे, पण रंग कोणता लावायचा ते डब्यात कोणता रंग आहे यावरुन ठरते. ’जा मी हा केशरी रंग लावणार नाही. लाल किंवा हिरवा आणलास तरच लावेन’ असे ब्रश कधी रंगार्याला सांगू शकत नाही. रंगार्याने निवडलेला रंग भिंतभर पसरवण्याचे काम तो इमानेइतबारे करत असतो. रंगार्याने आज लाल रंगाशी सलगी केली की ब्रश त्याचे फटकारे भिंतीवर मारतो. तो ओतून देऊन रंगार्याने ’केसरिया बालम’ निवडला की ब्रश त्या रंगाने भिंत रंगवून काढतो. थोडक्यात रंगार्याचा रंग बदलला की ब्रशचा रंग बदलतो, आणि त्याच्या "भिंती"चाही! ब्रशचा मालक असलेल्या रंगार्याच्या निष्ठा मात्र ब्रशइतक्या घनतेच्या नसतात, त्या तरल असतात. रोख पैसे मोजणार्या कुणाही घरमालकाच्या भिं… पुढे वाचा »
Labels:
अन्योक्ती,
जिज्ञासानंद,
धर्मव्यवस्था,
राजकारण,
व्यवस्था
सोमवार, १ जून, २०२०
बेगिन, बालाकोट, बुश आणि अंधारातील अधेली
-
७ जून १९८१ रोजी इस्रायलने इराकवरील ’ओसिरॅक’ अणुभट्टीवर हल्ला करुन ती उध्वस्त केल्याचे जाहीर केले. ’या अणुभट्टीमध्ये अण्वस्त्रांना आवश्यक असणारे इंधन बनवले जात आहे’ असा इस्रायलने आरोप केला होता. ’भविष्यात एक अण्वस्त्रसज्ज शेजारी निर्माण झाल्याने आमच्या राष्ट्राचे सार्वभौमत्व धोक्यात येईल. त्याविरोधात ’pre-emptive strike करण्यात आला, धोक्याला अंकुर फुटताच आम्ही तो खुडून टाकला’ असा दावा इस्रायलने केला. या हल्ल्याला ’ऑपरेशन ऑपेरा’ असे नाव देण्यात आले होते. या हल्ल्यामध्ये ही ’अणुभट्टी उध्वस्त केली’ असे इस्रायलने जाहीर केले असले, तरी प्रत्यक्षात तिचे बाह्य नुकसानच झाले होते. गाभ्याला फारसा धक्का लागला नव्हता. ती उभारणार्या फ्रेंच तंत्रज्ञांनी नंतर तिची डागडुजी करुन ती पुन्हा कार्यान्वित केली. याच धर्तीवर पुढे २००३ मध्ये असंख्य संहारक अस्त… पुढे वाचा »
Labels:
‘द वायर मराठी’,
आंतरराष्ट्रीय,
इतिहास,
जिज्ञासानंद,
राजकारण,
सत्ताकारण
सोमवार, २५ मे, २०२०
जग जागल्यांचे ०८ - वर्णभेदभेदी कॅथी हॅरिस
-
‘रुझवेल्ट’चा राखणदार: कॅ. ब्रेट क्रोझर « मागील भाग --- बराच काळ मानेवर खडा ठेवून रोजगाराचे काम केल्यानंतर तुम्ही छानशा सुटीचा बेत आखता. परदेशातील एखाद्या छानशा ठिकाणी जाऊन सुटीचा निवांत आस्वाद घेऊन ताजेतवाने होत परतीच्या वाटेवर विमानतळावरुन बाहेर पडण्यासाठी रांगेत उभे राहता. केव्हा एकदा बाहेर पडतो नि घर गाठतो असे तुम्हाला झालेले असते. पण... तुम्हाला तपासणीसाठी दीर्घकाळ अडकवून ठेवले जाते. कधी शरीराची बाह्य चाचपणी, कधी संपूर्ण विवस्त्र करुन तपासणी, कधी इंद्रियतपासणीदेखील! कधी तशा विवस्त्र स्थितीत तपासणी-खोलीत बसवून ठेवले जाते. काही वेळा शरीराअंतर्गत तपासणीसाठी एक्स-रे किंवा एन्डोस्कोपीतून जावे लागते. क्वचित सुलभ शौचाचे औषध देऊन कस्टम कर्मचार्यांच्या देखरेखीखाली उत्सर्जितांची पाहणी केली जाते. कधी हातकड्या घालून अन्य तपासण्यांसाठी हॉस्… पुढे वाचा »
Labels:
‘दिव्य मराठी’,
जग जागल्यांचे,
जिज्ञासानंद,
सीमाशुल्क विभाग
रविवार, २४ मे, २०२०
राष्ट्रवादाचा ‘तंत्र’मार्ग
-
यापूर्वीच्या निवडणुका आणि २०१४ साली झालेल्या लोकसभा निवडणुका यांत एक महत्त्वाचा फरक आहे; तो म्हणजे यांत झालेला इलेक्ट्रॉनिक माध्यमांचा वापर. इलेक्ट्रॉनिक माध्यमांमध्ये एका बाजूने वृत्तवाहिन्या येतात, तसेच इंटरनेटच्या माध्यमांतील संकेतस्थळे, फेसबुक आणि ट्विटरसारखी समाजमाध्यमे, मोबाइल व त्यावरील व्हॉट्सअॅपसारखी संवादी माध्यमे या साऱ्यांचा समावेश होतो. या सर्व माध्यमांतून मोदींच्या खऱ्या-खोटय़ा यशोगाथांचा, काँग्रेसच्या खऱ्या-खोटय़ा पापांचा प्रचार-प्रसार करण्यासाठी एक सूत्रबद्ध यंत्रणा उभी करण्यात आली होती. जी कमालीची यशस्वी ठरली. यात अधिकृत माध्यमांमधील प्रतिनिधी होते, तसेच समाजमाध्यमांमध्ये मोदींचा किल्ला लढवणारे स्वयंसेवकही. ही यंत्रणा उभी करण्यामागचे मेंदू व हात आणि त्या यंत्राचे इतर भाग यांचा आढावा रोहित चोप्रा यांनी ‘द व्हर्च्युअल हिंदू र… पुढे वाचा »
Labels:
‘लोकसत्ता’,
धर्मव्यवस्था,
पुस्तक,
माहिती तंत्रज्ञान,
राजकारण,
समाजमाध्यमे
शनिवार, २५ एप्रिल, २०२०
जग जागल्यांचे ०७ - ’रुझवेल्ट’चा राखणदार: कॅ. ब्रेट क्रोझर
-
कोरोनाचा क्रूसेडर : ली वेनलियांग « मागील भाग --- नव्वदीच्या दशकात तैवानशी झालेल्या संघर्षात अमेरिकन युद्धनौकांनी पाऊल ठेवल्यामुळे मोठा संघर्ष टाळण्यासाठी चीनला माघार घ्यावी लागली होती. अमेरिकेच्या या युद्धनौका त्या भागातील सहकारी वा मित्र देशांच्या भेटींतून आपले तिथले स्थान अधोरेखित करत असतात. USS Theodore Roosevelt या युद्धनौकेची व्हिएतनाम भेट याच हेतूचा भाग होती. मार्चच्या पहिल्या आठवड्यात, उत्तरेला चीनमध्ये कोरोना व्हायरसचा कहर चालू असताना, व्हिएतनाममधील डा नांग या बंदरात ती दाखल झाली. पाच दिवसांची व्हिएतनाम-भेट उरकून परतीच्या वाटेवर असताना, तीन-चार दिवसांनी तिच्या तीन खलाशांमध्ये कोरोनाची लक्षणे दिसू लागली. दोनच दिवसांत बाधितांची पंचवीस झाली. तोवर अमेरिकेच्या संरक्षण दलातील सुमारे सहाशे जणांना कोरोनाची लागण झाली. त्यातील सुमारे सव… पुढे वाचा »
Labels:
‘दिव्य मराठी’,
कोरोना,
जग जागल्यांचे,
जिज्ञासानंद,
संरक्षणव्यवस्था
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पण्या (Atom)







