Vechit Marquee

Indexes Menu_Desktop

संपूर्ण सूची :

सोमवार, १४ मार्च, २०२२

आनंदे न्हाती त्यात तृणांची पाती


  • चांगल्या/श्रेष्ठ कवितेचा एक गुण असा की निव्वळ शब्दांपलीकडे जाऊन न लिहिलेल्या, कदाचित अजून न घडलेल्या घटनेवरही ती समर्पक भाष्य करते. कालाच्या, भूगोलाच्या, सामाजिक पार्श्वभूमीच्या सीमा ओलांडून ती व्यापक होते... त्याच वेळी विशिष्ट व्यक्ती, घटना, गट, स्थितीशी सुसंगतही होते तेव्हा ती श्रेष्ठ कविता ठरते. कुसुमाग्रजांची अहि-नकुल या शीर्षकाची कविता आहे. अहि म्हणजे सर्प आणि नकुल म्हणजे मुंगूस या दोन हाडवैर्‍यांच्या संग्रामाचे चित्रमय शैलीत केलेले वर्णन आहे. शालेय अभ्यासक्रमातही ही कविता शिकविली जात असे, कदाचित अजूनही असेल. त्याच्या अखेरीस सर्पाचे निर्दालन करुन नकुल चालता होतो तेव्हा आम्हा शालेय विद्यार्थ्यांना आनंद होत असे. सर्प म्हणजे वाईट, दुष्ट प्रवृत्तींचे प्रतीक. त्यातच ‘शत्रू मानलेल्या देशातील, धर्मातील अर्भकालाही ठार मारावे, अन्यथा ते मोठे… पुढे वाचा »

बुधवार, २ मार्च, २०२२

... माणसाची गरज असते


  • ब्रिगेडियर तुमचा रणगाडा, एक ताकदवान वाहन आहे. लाखोंचा जीवनस्रोत असणारे जंगल आणि सहस्र माणसांना तो सहज चिरडून टाकतो. पण त्यांत एक दोष राहून गेला आहे... तो चालवण्यासाठी एका माणसाची गरज असते ! कमांडर तुमचे विमान, आकाशातून आग ओकू शकणारे, एक शक्तिशाली साधन आहे. ते एखाद्या तुफानालाही सहज मागे टाकते, नि एखाद्या हत्तीहूनही अधिक वजन सहज वाहून नेऊ शकते. पण त्यात एक दोष राहून गेला आहे... त्याला जमिनीवरून भरारी घेण्यासाठी एका माणसाची गरज असते. अ‍ॅडमिरल तुमची युद्धनौका, पाण्यावरचे मूर्तिमंत सामर्थ्य आहे. कित्येक टन विध्वंसक शस्त्रांसहितही ती पाण्यावर सहज संचार करते. पण त्यात एक दोष राहून गेला आहे... तिचे सुकाणू हाती धरण्यासाठी एका माणसाची गरज असत… पुढे वाचा »

सोमवार, २८ फेब्रुवारी, २०२२

अखंड-हिंदुस्तानचे स्वप्न आणि वास्तवातील प्रश्न


  • ’अखंड-हिंदुस्तान’ नावाचा घोष हा अगदी लहानपणापासून ऐकत आलेला विनोद वा बागुलबुवा आहे. मुळात ’देशाची फाळणी कुणाच्या तरी लहरीखातर वा मूर्खपणामुळे झाली, एरवी तो आमचा भागच आहे’ हा दावाच खरंतर मूर्खपणाचा असतो. देश म्हणजे जमिनीचा तुकडा नव्हे. देश म्हणजे त्यातील माणसे, समाज, वारसा, इतिहास यांचा समुच्चय . ’पाकिस्तानही आमचाच आहे आणि तो परत आमच्या देशात सामील व्हावा’ म्हणताना त्यावर राहणार्‍या, आपल्याला नकोशा वाटणार्‍या माणसांचे काय करायचे? असा प्रश्न ’अखंड-हिंदुस्तान’वाल्या मुखंडांनी स्वत:ला विचारायला हवा. हा अवघड प्रश्न ते स्वत:ला विचारत नसतात, कारण उत्तर आपल्या सोयीचे येणार नाही, हे निदान त्यांतील विचारशील व्यक्तींना पक्के ठाऊक असते. कुण्या एकाचा वा कुण्या सत्तेच्या लहरीखातर फाळणी होत नसत… पुढे वाचा »

रविवार, २० फेब्रुवारी, २०२२

हिजाब, मेंदी आणि व्यवस्थांची वेटोळी


  • सुमारे पाच वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. एका कॉन्व्हेंट संचालित शाळेत मुलींनी मेंदी लावली म्हणून त्यांना शाळेतून घरी पाठवण्यात आले होते. (त्याहीपूर्वी अशा घटना घडत होत्याच. स्मरणात असलेली ही शेवटची. ) शाळेच्या नियमांत कोणतीही सौंदर्यप्रसाधने (लिपस्टिक, नेलपॉलिश वगैरेंसह) लावण्यास मनाई असल्याने हा शिस्तभंग आहे असे शाळेचे म्हणणे होते. शाळा कॉन्व्हेन्ट संचालित असल्याने लगेचच त्याला धार्मिक वळण मिळाले. मेंदी लावणे ही आमची हिंदू रीत आहे असे म्हणत काही संघटनांनी वादात उडी घेतली. थोडा वाद होताच शाळॆने मुलींवरची निलंबनाची कारवाई रद्द केली... गंमत अशी की तेव्हा आमच्या धार्मिक रीतींना शाळेच्या नियमाहून वरचढ मानावे म्हणणारे आज नेमकी उलट भूमिका घेत आहेत. कारण आता मुद्दा आमच्या नव्हे ’त्यांच्या… पुढे वाचा »

रविवार, १२ सप्टेंबर, २०२१

आपली महान(?) परंपरा


  • मध्यंतरी सकाळी दूध घेऊन येत असताना एका मित्राची गाठ पडली. तो गणपतीबाप्पाच्या उत्सवासाठी आवश्यक गोष्टी खरेदी करण्यासाठी बाहेर पडला होता. सोबत त्याची पत्नी गौरी आगमनाची तयारीही करताना दिसत होती. त्या घरातील आजींचे तीनेक महिन्यांपूर्वी निधन झाले आहे. त्यामुळे परंपरेनुसार वर्षभर सणवारांना फाटा देणे अपेक्षित असल्याने याचे जरा आश्चर्य वाटले. घरी पोचल्यावर आईला सांगितले, तर ती सहजपणे ’हो ती काही आपल्या घराण्यातली नसल्यामुळे तिचे वर्षभर सुतक नसते.’ मला परंपरेचा संताप तर आलाच, पण त्याहून आईने जितक्या सहजपणे हे सांगितले त्याबद्दल आला. मी स्वत: कोणतीही पूजा-अर्चा, कर्मकांड करीत नाही. तेव्हा हा माझ्या दृष्टिकोनाचा मुद्दाच नाही. मुद्दा श्रद्धेच्या परिघातच असलेल्या अन्यायाचा आहे. ती स्त्री आपले घर सोडून… पुढे वाचा »

सोमवार, ३० ऑगस्ट, २०२१

देवस्थान


  • एका प्रसिद्ध देवस्थानाने श्रद्धाळूंची स्पर्धा घेतली. त्यात एकच प्रश्न होता, ’देवस्थानातील देवाचे दर्शन कसे घेतले की अधिक पुण्य लाभते?’ एक म्हणाला, ’मनोभावे हात जोडून घरुन केलेला नमस्कारही देवाला पोचतो.’; देवस्थानच्या ’कार्यकर्त्यांनी’ त्याला घरीच गाठला, यथास्थित पूजा करून इस्पितळात पोचवला. दुसरा म्हणाला ’घरच्या प्रतिरूप मूर्तीचे दर्शन घेतले तरी देवस्थानात जाऊन दर्शन घेतल्याचे पुण्य मिळते.’ देवस्थानने स्वामित्वहक्क कायद्याखाली त्याच्या देव्हार्‍यातील मूर्ती जप्त करून नेली. तिसरा म्हणाला, ’रस्त्यावरुन गाडीवरुन जाताजाता एका हाताने केलेला नमस्कारही पुरेसे पुण्य देऊ शकतो.’ देवस्थानने दारासमोर भिंत बांधून बाहेरुन फुकट दर्शन घेणार्‍यांचा बंदोबस्त केला. चवथा म्हणाला… पुढे वाचा »

शुक्रवार, २० ऑगस्ट, २०२१

कुंपण


  • आम्हा दोघांच्या घरांमध्ये एक प्राचीन कुंपण ; कधी घातले, कुणी घातले आणि मुख्य म्हणजे का घातले... ठाऊक नाही ! पण त्याचे घर तिकडचे आणि माझे इकडचे, इतके मात्र पक्के ठाऊक. त्याला त्याचे आवार सुंदर हवे, आणि मला माझे. कुंपणाच्या माझ्या बाजूने एक एक काटा उपसून त्याच्या आवारात भिरकावला, आणि फक्त फुले शिल्लक ठेवली. त्यानेही तिकडच्या बाजूने नेमके तसेच केले असावे. आता माझ्या आवारात विविधरंगी फुलांचा सडा ! कुंपणावरुन डोकावून पाहिले तर मी फेकलेले काटे तो कुरवाळतो आहे. त्याने माझ्या हातातील फुलांकडे पाहिले, आणि हसून म्हटले, ’वेड्या, फुले सोडून काटे का कुरवाळतो आहेस.’ आता आम्ही दोघेही दिङ्मूढ. ऐतिहासिक कुंपण कुरवाळताना हे काट्या-फुलांचे गणित दोन्ही … पुढे वाचा »

मंगळवार, ३ ऑगस्ट, २०२१

फूटपट्टी


  • https://www.wonkeedonkeetools.co.uk/ येथून साभार. कुणी म्हणतं, ’हे जग माझ्या हिरव्या फूटपट्टीने मोजले तर, हवे त्याहून अधिक लांबीचे आहे, सबब ते पापी आहे.’ कुणी म्हणतं, ’हे जग माझ्या भगव्या फूटपट्टीने मोजले तर. हवे त्याहून कमी लांबीचे आहे, सबब ते पापी आहे.’ कुणी म्हणतं, ’हे जग माझ्या लाल फूटपट्टीने मोजले तर, हवे त्याहून जास्त रुंदीचे आहे, रुंद पंजाच्या माणसांना धार्जिणे आहे.’ कुणी म्हणतं, ’हे जग माझ्या निळ्या फूटपट्टीने मोजले तर, हवे त्याहून कमी रुंदीचे आहे, सामान्यांची मुस्कटदाबी करणारे आहे. कुणी म्हणालं, ’ फूटपट्टी मला सोयीची मोजमापे देत नाही. सबब ती बदलली पाहिजे.’ कुणी म्हणालं, ’मोजणी केल्याने डावं-उजवं करण्यास प्रोत्साहन मिळते. सबब फ… पुढे वाचा »