-
मोबाईलवर आपल्या पासवर्डसची फाईल तयार करून ठेवणार एक महान सीए मला ठाऊक आहे. आपल्या नातेवाईकांचे, मित्रांचे वाढदिवस, कौटुंबिक नाती, इत्यादि सारी माहिती हौसेने फेसबुक, तसंच Google contacts मध्ये भरून, आपल्या सोबत इतरांचाही बाजार उठवणारे महाभाग अनेक आहेत. एवढं पुरेसं नाही म्हणून आपली शाळा, बँक, आता या क्षणी कुठे आहोत, वगैरे कौतुकाने शेअर करुन आपल्या पायावर धोंडा मारून घेणारे, तर वारूळातील मुंग्यांप्रमाणे अगणित आहेत. त्यांच्यासाठी हे दोन अनुभव. --- गुगलची घुसखोरी : काही महिन्यांपूर्वी ‘अमेजन फायर टीव्ही’ स्टिक आणली. अलीकडेच ‘यंग शेल्डन’ या मालिकेचा सीझन संपल्यामुळे तिच्या ऐवजी पाहण्यासाठी म्हणून ‘अमेजन प्राईम’वर एखाद्या विनोदी मालिकेचा शोध घेत होतो. त्यातून ‘सिटीजन खान’ (इंटरनॅशनल चित्रपट पा… पुढे वाचा »
Indexes Menu_Desktop
| संपूर्ण सूची : |
गुरुवार, २६ जुलै, २०१८
फुकट ते पौष्टिक...?
Labels:
अनुभव,
जिज्ञासानंद,
माहिती तंत्रज्ञान,
विश्लेषण,
समाज,
Business
गुरुवार, ५ जुलै, २०१८
...तेव्हा तुम्ही काय करता?
-
Rosario Dawson यांच्या ट्विटमधून एका देहाच्या कुडीत वास्तव्यास असणारी विविधरंगी व्यक्तिमत्वे, तिच्यावर संपूर्ण ताबा मिळवण्यासाठी झटू लागतात... ...तेव्हा तुम्ही काय करता? त्या कुडीत वास्तव्यास असलेला तत्त्वज्ञ व्यक्ती-समष्टीचे कोडे उलगडून सांगताना मध्येच थकून झोपी जातो... ...तेव्हा तुम्ही काय करता? त्या निद्रिस्त तत्त्वज्ञाची प्रतारणा करत एखाद्या वारयोषितेसारखी तुमची प्रवृत्ती तुमच्यातल्याच विदूषकाचा हात धरते... ...तेव्हा तुम्ही काय करता? अजरामर अशा ‘हॅम्लेट’च्या भूमिकेऐवजी तुमच्यातला नट, रंगमंचावरील निश्चल ठोकळ्याची भूमिका स्वीकारू इच्छितो... ...तेव्हा तुम्ही काय करता? तुमच्यातील सुरेल-सूर-मग्न संगीत-प्रेमी षड्ज-पंचमांच्या आधार स्वरांना त्याग… पुढे वाचा »
सोमवार, ७ मे, २०१८
इतिहासाची झूल पांघरलेले बैल
-
इतिहासातील व्यक्तिरेखांना खांद्यावर घेऊन ‘बाय असोसिएशन’ आपणही ग्रेट आहोत हे मिरवण्याची संधी लोक साधू इच्छितात. ती व्यक्तिरेखा आपल्या जातीची आणि/किंवा धर्माची असेल तर, तिच्यावर आपला बाय डिफॉल्ट हक्क आहे, आणि अन्य जात/धर्मीयांचा नाही, असे बजावून तिच्यावर ‘रिजर्वेशन’ टाकता येते. त्यातून सामान्यातल्या सामान्याला असामान्यतेच्या भोवती मिरवता येते. जोवर ‘सामान्य असण्यात काही गैर नाही’ हे मान्य करत नाही, उगाचच श्रेष्ठत्वाची उसनी झूल मिरवण्याचे विकृत हपापलेपण माणसाच्या मनातून जात नाही, तोवर हे असेच चालणार. पार्ट्या पाडून, टोळ्या बनवून खेळायला, खेळवायला, हिणवायला आणि माज करायला माणसाला आवडते. इतिहास उकरून काढून आपली दुकाने चालवणारे जसे धर्मवेडे आहेत, तसे जात-माथेफिरूही भरपूर आहेत. गेल्या पंधरा वीस वर्षांत घरबसल्या तथाकथित ‘खरा इतिहास’ लिहिणार्यां… पुढे वाचा »
सोमवार, ३० एप्रिल, २०१८
This, is us!
-
विषयसंगतीमुळे हा लेख ‘ वेचित चाललो... ’ वर हलवला आहे. थोडे संस्करण केलेला हा लेख 'जीवनाचे पोर्ट्रेट या शीर्षकाखाली इथे वाचता येईल. - oOo - पुढे वाचा »
मंगळवार, २४ एप्रिल, २०१८
समाजमाध्यमातले गुंड
-
सामाजिक बहिष्कार किंवा प्राकृतात ‘वाळीत टाकणे’ ही एक सामाजिक विकृती मानली जाते. केवळ या ब्रह्मास्त्रामुळे अनेक निरपराधांना जातपंचायतीच्या अन्यायकारक निर्णयांपुढे मान तुकवावी लागत असे/लागते. यातून जातपंचायत ही एक शोषक व्यवस्था म्हणून उदयाला आली. त्यामुळे न्यायव्यवस्थेच्या विकेंद्रीकरणाचे प्रारूप असलेली जातपंचायत, आज विसर्जित करण्यासाठी चळवळ करण्याची वेळ आली आहे. या जुनाट परंपरेचा आविष्कार नव्या स्वरूपात होतो आहे. जे फेसबुकवरून अमुक कंपनीची उत्पादने घेऊ नका. तमुक अभिनेता वा अभिनेत्रीचे चित्रपट पाहू नका. अमके अॅप ताबडतोब अन-इन्स्टॉल करा... असे वाळीत टाकण्याचे आदेश आपल्या ‘जाती’च्या माणसांना देत असतात. उपभोगाची, प्रचार-प्रसाराची आणि उपभोगाची साधने बदलली तरी मानसिकता तशीच मध्ययुगीन, संख्याबळावर ए… पुढे वाचा »
गुरुवार, १९ एप्रिल, २०१८
पांचामुखी...
-
( कोणतीही चौकशी, कोणताही तपास न होता, केवळ चार न्यायाधीशांच्या ‘मता’नुसार जस्टिस लोयांचा मृत्यू संशयास्पद नाही, एवढे त्या मृत्यूची चौकशी करण्यासही नकार देण्यास पुरेसे आहे, असा अनाकलनीय निर्णय सर्वोच्च न्यायालयाच्या खंडपीठाने दिला .) आपल्याकडे ‘पांचामुखी परमेश्वर’ अशी म्हण आहे. चार शहाण्या माणसांचं जसं म्हणणं पडेल, ते योग्य समजून पुढे जावे असा ढोबळ अर्थ घेऊ या. त्यातूनच मग पंचायत ही संकल्पना आली. समाजातील पाच प्रतिष्ठित नि सुज्ञ माणसे पंच म्हणून एकत्र बसत, नि समाजातील समाजातील समस्यांचा निवाडा करत. पुढे जातींचे समाज बनले आणि जातपंचायत उदयाला आली. अर्थात कुणाला सुज्ञ म्हणायचे, शहाणा म्हणायचे हा प्रश्न होताच. पण तरीही काही काळ कदाचित ही व्यवस्था परिणामकारक ठरली असेल. बरं या पंचांना निवाडा करण्यासाठी कोणत्याही वस्तुनिष्ठ पुराव्याची गरज, वा… पुढे वाचा »
शुक्रवार, १३ एप्रिल, २०१८
शेणकिड्यांचा समाज माझा
-
अनेक दिवसांनी फेसबुकवर काल थोडा वेळ घालवला नि पश्चात्ताप झाला. आपण किती क्षुद्र, नृशंस, किळसवाणे लोक आहोत याचे पुरेपूर दर्शन घडले. आपले संस्कार किडके आहेत, माणसे किडकी आहेत. आपण माणसाकडे माणूस म्हणून पाहायला शिकवत नाही. त्याच्याकडे हिंदू किंवा मुस्लिम, ब्राह्मण किंवा दलित, आमच्या ग्रेट ओसाडवाडी पेक्षा दुय्यम असलेल्या उकिरडावाडीचा माणूस, स्त्री नव्हे मादी– मग ती आठ वर्षांची असो वा सत्तर वर्षांची, असे पाहायला शिकवतो. आपल्या बिनअकली सुमारपणाचे खापर आपण अन्य गटांवर फोडून कांगावा करतो. आठ वर्षांच्या पोरीवर झालेल्या बलात्काराची बातमी ऐकूनही, आमची पहिली चिंता असते ती आमचा नेता, आमचा धर्म, आमचा दगडी देवबाप्पा वाचवण्याची. असल्या किळसवाण्या मानसिकतेला धारण करणार्या कुडीला माणूस तर सोडा, जनावर म्हणणे हा जनावराचा घोर अपमान आहे. आमची संस्कृती म… पुढे वाचा »
मंगळवार, १० एप्रिल, २०१८
सीसल आणि ससुल्या
-
तुम्ही कार्टुन्स पाहता की नाही ठाऊक नाही. ‘वॉर्नर ब्रदर्स’च्या प्रसिद्ध बग्स बनी या पात्राचा सर्वात पहिल्या एपिसोडमध्ये ससा-कासवाच्या त्या प्रसिद्ध शर्यतीची कथा सांगितली होती. ‘बग्स बनी’ला मूळ कथा आधीच माहीत असल्याने, कुठेही विश्रांती घ्यायची नाही असे ठाम ठरवून, ते साध्यही करतो. पण तरीही बिचारा ती शर्यत हरतोच ... ...त्याचे कारण असतो तो सीसल नावाचा चलाख टर्टल, ज्याच्याशी बग्सने शर्यत लावलेली असते. या सशाला दोन कासवांमध्ये काही फरक चटकन दिसत नसल्याचा फायदा घेत, शर्यतीच्या वाटेवर एकुण दहा कासवे उभी केलेली असतात. ‘कितीही वेगाने धावलो, कासवाला मागे टाकले तरी, पुढे जावे तो कासव पुन्हा आपल्या पुढेच’ पाहून बग्सला हे कसे घडते ते कळत नाही. शक्य तितका वेग वाढवत तो अंतिम रेषा पार करतो. बघतो तर सीसल … पुढे वाचा »
Labels:
आस्वाद,
चलच्चित्रे,
जिज्ञासानंद,
संस्कृती,
समाज
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पण्या (Atom)







