Vechit Marquee

सूची: अनुक्रमे ▶ वर्गीकरण ▶ लेखमाला ▶ लक्षवेधी ◼

रविवार, ९ ऑगस्ट, २०२६

‘प्लरिबस’च्या निमित्ताने... ‘सह नौ भुनक्तु’ व्यवस्थांचा मागोवा - ६ : समूह नव्हे व्यक्ती; गरज नव्हे संपत्ती


  • सहजीवन आणि अर्थकारण « मागील भाग https://www.globaltimes.cn/ येथून साभार. Operations Research या विषयातील Optimizationच्या अभ्यासामध्ये Objective function नावाची संकल्पना वापरली जाते. जगण्यातील समस्या, अडचणी सोडवत असताना आपले उद्दिष्ट (Objective) निश्चित करावे लागते. मग ते साध्य करण्याच्या दृष्टीने, आपल्या कुवतीच्या मर्यादेत अधिकाधिक परतावा देणारी नियोजन नि कृती निश्चित करता येते. मर्यादित साधने वा गुंतवणूक यांच्या मर्यादेत एकाच वेळी अनेक उद्दिष्टे साध्य करता येत नसतात, त्यातील कुणाला किती प्राधान्य द्यावे हे ठरवावे लागते. Objective function हे प्राधान्य निश्चित करत असते. व्यवसायाला सुरुवात करताना प्रथम एका लहानशा प्रमाणात सुरू करून टप्प्याटप्प्याने विस्तार करत न्यावा, की अंबानींच्या जिओप्रमाणे संपूर्ण देशभर एकाच वेळी वितरणाची महत्त्वाकांक्षा बाळगावी, हे तुमच्या खिशाच्या खोलीवर नि नियोजनाच्या कुवतीवर ठरत असते. ‘तोट्यात असलेला उद्योगव्यवसाय सावरण्यासाठी अधिक पैसा घालून अद्यतनीकरण, आधुनिकीकरण करुन नफा वाढवण्याचे नियोजन करावे, की असले...

    पुढे वाचा »

रविवार, २ ऑगस्ट, २०२६

‘प्लरिबस’च्या निमित्ताने... ‘सह नौ भुनक्तु’ व्यवस्थांचा मागोवा - ५ : सहजीवन आणि अर्थकारण


  • संग्रह ते व्यापार « मागील भाग जंगलजीवी, शिकारजीवी, शेतीजीवी मानवाचे सहजीवन अनायासे, सेंद्रिय पद्धतीने विकसित झालेले होते. पुढे टोळीविघटनाने, स्थलांतरामुळे विविध चालीरीती नि कर्मकांडाचेही स्थलांतर झाले. एक प्रकारे त्यांच्याशी निगडित टोळ्यांचे एक प्रकारे विकेंद्रीकरण झाले. भौगोलिक अंतराने दुबळे झालेले बंध दृढ करण्यासाठी म्हणा वा नव्याने टोळ्यांची मोट बांधण्यासाठी म्हणा, धर्मसंस्थेने अमूर्त नीतिनियमांच्या कल्पनांच्या आधारे विकेंद्रित टोळी, समाज बांधला. परंतु विनियम, व्यापाराने विकेंद्रीकरण होऊ लागले नि टोळ्यांचे बंध सैल होऊ लागले. आधीच उल्लेख केल्याप्रमाणे शिकार नि शेती यांनी अनायासे सहजीवी व्यवस्थांकडे वाटचाल झाली. व्यापाराचे मात्र तसे नाही. त्याच्या व्याख्येतच परस्परावलंबी नसणार्‍या दोन व्यक्ति, व्यक्तिसमूह यांनी केलेली देवाण-घेवाण अभिप्रेत आहे. त्यामुळे व्यापारप्रधान समाजात अनायासे असा सहभाव निर्माण होत नाही. तो कृत्रिमरित्या निर्माण करावा लागतो. यासाठी काहींनी जन्मदत्त टोळी वा समाज यांच्यातच अर्थकारण बांधून घालण्याचा प्रयत्न केला. याची काही उदाहरणे भारतातच पाहाता येतात. सामाज...

    पुढे वाचा »

रविवार, २६ जुलै, २०२६

‘प्लरिबस’च्या निमित्ताने... ‘सह नौ भुनक्तु’ व्यवस्थांचा मागोवा - ४ : संग्रह ते व्यापार


  • समूहाची ओळख « मागील भाग https://www.sugiproject.com/ येथून साभार. मानवी संस्कृतीच्या उदयकालात मानव हा संग्रह (gather), अपहार (steal) आणि शिकार (hunt) या तीन प्रकारांनी आपले अन्न मिळवताना दिसतो. संग्रहामध्ये प्रामुख्याने वनस्पतीजन्य आहार– जसे फळे, बिया वगैरे अंतर्भूत होतो. अपहारामध्ये मध, पक्ष्यांची अंडी, एखाद्या शिकारी प्राण्याच्या शिकारीवर डल्ला मारणे आदींचा समावेश होतो. माणूस आणि प्राणी यांच्या सहजीवनाची सुरुवात कुत्र्यांपासून झाली असं म्हटलं जातं. कॉनरॅड लोरेन्झ नावाच्या एका वर्तनवैज्ञानिकाने (ethologist) ’Man Meets Dog’ नावाच्या पुस्तकात माणूस आणि कुत्रा यांच्या सहजीवनाच्या वाटचालीची एक काल्पनिक गोष्ट लिहिली आहे. माणसाच्या टोळी मागे सोडलेल्या अतिरिक्त अन्नाच्या वाट्यावर पोसले गेलेले कोल्हे त्यांच्या कुशाग्र घ्राणेंद्रियांच्या आधारे माणसाला शिकारीस साहाय्यभूत ठरत जातात, नि यथावकाश त्या दोन टोळ्यांचे सहजीवन सुरु होते अशी त्यामागची कल्पना आहे. माणसाला शेतीचा शोध लागला तेव्हा तो भौगोलिकदृष्ट्या स्थिर झाला, नागर झाला. शिकारजीव...

    पुढे वाचा »

रविवार, १९ जुलै, २०२६

‘प्लरिबस’च्या निमित्ताने... ‘सह नौ भुनक्तु’ व्यवस्थांचा मागोवा - ३ : समूहाची ओळख


  • समूहजीवी « मागील भाग समूहजीवी समाज, मूर्त ओळख केवळ सहजीवन आणि सहभोजन यांखेरीज आचार-विचारांत सामूहिकता आली ती सामायिक कर्मकांडातून. मानवी (किंबहुना सर्वच प्राणी, पक्षी व कीटकांच्या) आयुष्यातील जन्म नि मृत्यू या दोन घटना निश्चित आहेत. त्यामुळे सर्वात प्रथम कर्मकांडे त्यांच्याभोवती उदयाला आली. जगभरातील सर्वच मानवटोळ्या नि समाज यांच्यामध्ये या दोन घटनांभोवती गुंफलेली कर्मकांडे आहेत. चित्रपटप्रेमींना डिस्नेच्या सुप्रसिद्ध ‘ द लायन किंग ’मधील सिंहराज सिम्बाच्या जन्माचा प्रसंग आठवत असेल. रफीकी हे माकड वनराज मुफासाच्या टोळीचा भगत वा पुरोहित आहे. मुफासा आणि सराबी यांच्या या पुत्राच्या– म्हणजे सिंबाच्या जन्मानंतर तो त्या ‘युवराजा’ला उचलतो नि गुहेतून बाहेर येतो. मुफासाचे जणू सिंहासनच असलेल्या त्या उंचावरील ‘प्राईड रॉक’च्या टोकाशी उभा राहातो आणि सिंबाला दोन्ही हातांनी उचलून उंच धरतो (१) — त्याच्या सर्व ‘प्रजेला’ दिसावे इतका उंच. आपल्या नव्या युवराजाला पाहून सर्व प्राणी आनंदोत्सव साजरा करतात. प्राणिजीवनात हा प्रसंग अर्थातच अतिरंजित आहे....

    पुढे वाचा »

सोमवार, १३ जुलै, २०२६

‘प्लरिबस’च्या निमित्ताने... ‘सह नौ भुनक्तु’ व्यवस्थांचा मागोवा - २ : समूहजीवी


  • प्रस्तावना « मागील भाग सजीवांतील सहजीवन निसर्गामध्ये प्रगतीच्या वाटेवर सजीवांची वाटचाल संघर्ष नि सहकार या दोन साधनांच्या आधारे होत असते. या दोन्हींचा वापर करुन संरक्षण नि आक्रमकता या दोहोंसाठी आवश्यक विविध गुणकौशल्यांचा विकास होत असतो किंवा ज्यांच्याकडे ते अधिक विकसित असतात ते जगण्याच्या वाटेवर वेगाने पुढे जाऊ शकतात. संघर्षामध्ये सजातीय प्राण्यांशी होणारे संघर्ष आणि अन्य प्रजातींशी होणारे संघर्ष असे दोन प्रकार दिसतात. पैकी अन्न (आणि त्यासाठी हद्दीचा) संघर्ष हा सजातीय नि अन्य जातीय अशा दोनही प्रकारच्या जीवांशी होतो. पण त्याखेरीज नरांचा सजातीय प्राण्यांशी जुगण्याच्या हक्कासाठीही संघर्ष होत असतो. हा प्रत्यक्ष संघर्ष प्राणिकुलांत आणि कीटकांच्या काही प्रजातींमध्ये दिसतो. पक्ष्यांमध्ये स्पर्धा असली, तरी प्रत्यक्ष संघर्ष क्वचितच दिसतो. सहकारामध्ये एकाच प्रजातीच्या सजीवांचे सहजीवन आणि भिन्न प्रजातींचे परस्पर-सहकार्य असे दोन प्रकार दिसतात. काही मुंग्या वारूळामध्ये विशिष्ट कवकाची ‘शेती’ करतात. यात त्यांना थेट न पचणारे सेंद्रीय पदार्थ ...

    पुढे वाचा »

सोमवार, ६ जुलै, २०२६

‘प्लरिबस’च्या निमित्ताने... ‘सह नौ भुनक्तु’ व्यवस्थांचा मागोवा - १ : प्रास्ताविक


  • भारतीय भाषांतील धंदेवाईक मनोरंजन माध्यमांना वावडे असणार्‍या ‘विज्ञान-काल्पनिका’ (science-fiction) अनुभवायच्या तर तुम्हाला इंग्रजीकडे वळावे लागते. त्यातही हॉलिवुडकरांच्या अंगणात गेलात, तर भूतकाळातील काही राजे-राज्यांच्या संघर्षाला भविष्यात नि अंतराळात नेऊन ठेवलेले तुम्हाला पाहावे लागते. किंवा वर्तमानातील कथा/चित्रपटांतील महानायकांचे (super-hero) अवतार तिकडे नेऊन त्याला कुण्या एलियन शत्रूशी दोन हात करायला लावलेले दिसतात. कुठलेसे ‘एम्पायर’ नि कुठलासा ‘रेझिस्टन्स’ यांच्या संघर्षाच्या कथा संगणकाच्या साहाय्याने चित्तथरारक चित्रचौकटींमधून सादर करुन ते तुमची मती गुंग करुन टाकतात. प्रत्येक वेळी आपण जणू नवेच काही कथानक पाहात आहोत अशा भ्रमात तुम्हाला ठेवून ही मंडळी आपले खिसे भरताना दिसतात. एखाद्या कथानकास विज्ञान-काल्पनिका म्हणवून घेण्यास त्यात वैज्ञानिक भविष्याचे केलेले भाकित नि वर्तमान वैज्ञानिक प्रगतीची स्थिती यांच्यात एक तर्कसंगती राखावी लागते. आजच्या काळात न दिसणारा हा वैज्ञानिक प्रगतीचा टप्पा त्या भविष्यातील समाजरचना, वैय्यक्तिक आयुष्य, राजकीय परिस्थिती यांच्यावर कसा परिणाम करतो, याची बा...

    पुढे वाचा »

शुक्रवार, ३ जुलै, २०२६

आकलनाच्या कलाने...


  • आपणाला अंतिम ज्ञान झाले असा हर्ष होतो, तो क्षण तर केवळ पूर्ण आत्मवंचनेचा तरी असतो, किंवा आपल्या लहानशा आवाक्यात जास्तीतजास्त काय आले याची अखेर कबुली असते. (जी. ए. कुलकर्णी यांच्या ‘प्रवासी’ या कथेमधून) मी नुकत्याच संपवलेल्या मालिकेचे उपशीर्षक होते ‘एक आकलन’. त्या आधीही मी एकदोनदा हा शब्द आवर्जून वापरलेला होता. ‘जे लिहिले जाते ते लेखकाचे आकलनच तर असते, मग ही पुस्ती जोडण्याचे कारण काय?’ असा प्रश्न पडू शकतो. त्याबद्दल विवेचन करण्याचा हा एक प्रयत्न आहे. त्याअर्थी हे ही आकलनाचे एक आकलन म्हणता येईल. या लेखानंतर इथे सुरू होणार्‍या दीर्घ मालिकेसाठी भूमिका स्पष्ट करणारे लेखन म्हणून याच्याकडे पाहाता येईल. अभ्यासक, अकादमिक, समीक्षणात्मक, लेखनामध्ये एक लेखनाची चौकट, व्याप्ती निश्चित करुन त्याच्या अंतर्गत लेखनाचा विस्तार करावा लागतो. ती शिस्त पाळावी लागते. विधानांचे आधार वा मुद्द्यांची मांडणी प्रस्थापित लेखनाच्या संदर्भात नि तर्कसंगत पद्धतीने करावी लागते. ललित लेखन हे पूर्णपणे लेखकाच्या अभिव्यक्तीचा आविष्कार असतो, त्याला निवडलेल्या घाट अथवा रचनाबंधापलिकडे फारशी बंधने नसतात. रसग्रह...

    पुढे वाचा »