-
जठराग्नी शमवाया भूतां « मागील भाग जीवसृष्टीतील प्रत्येक जिवाच्या अन्न आणि निवारा (संरक्षण) या दोन मूलभूत गरजा आहेत नि जुगण्याची प्रेरणा ही जीवसातत्याला चालना देणारी भावना. कोणतीही नवी सामाजिक, राजकीय व्यवस्था प्रस्थापित केली, तरी या दोन गरजांच्या पूर्तीसाठी पुरवठ्याचे व्यवस्थापन तिला करावे लागते. तरच तो समाज नि ती व्यवस्था स्थिर राहू शकते. पुरवठा नव्हे साठा ‘प्लरिबस’मधील समूहजीवी व्यवस्था सर्व सजीवांना अभय देत असल्याने आजवर शेती, नि पशुपालन या दोन मार्गाने आपले अन्न मिळवणार्या अर्वाचीन मानवाला पर्यायी मार्ग शोधण्याची गरज निर्माण झाली आहे. या व्यवस्थेमध्ये अन्नाची गरज भागवणारी जी व्यवस्था निर्माण केली गेली आहे, ती दीर्घकाळ उपयोगी ठरणारी नाही. ज्या नव्वद कोटी कलेवरांच्या पुरवठ्यावर ही व्यवस्था अवलंबून आहे, तो साठा आहे, उत्पादन-व्यवस्था नाही. एका मनुष्यप्राण्याचा दैनिक आहार ध्यानात घेतला, तर हा साठा काही दिवसांतच– निदान महिन्यांत संपून जाणार आहे. तसंच प्रत्येक कलेवराला प्रथिनामध्ये रूपांतरित करण्याच्या प्रक्रियेदरम्यानही काही घट होणार आहे. या दरम्यान त्या साठ्यामध्ये पडणारी ...
पुढे वाचा »
शुक्रवार, २५ सप्टेंबर, २०२६
‘प्लरिबस’च्या निमित्ताने... ‘सह नौ भुनक्तु’ व्यवस्थांचा मागोवा - १३ : गरजा, मागणी आणि पुरवठा
गुरुवार, १७ सप्टेंबर, २०२६
‘प्लरिबस’च्या निमित्ताने... ‘सह नौ भुनक्तु’ व्यवस्थांचा मागोवा - १२ : जठराग्नी शमवाया भूतां
-
अद्यतनीकरण (Update) « मागील भाग कुठलेही तत्त्वज्ञान, विचार माणसाला आकर्षक वाटला नि ‘आपण तो स्वीकारला आहे’ असा दावा त्याने केला, तरी त्याच्याकडून तो पूर्णांशाने आत्मसात होतोच असे नाही. त्याच्या वास्तविक, व्यावहारिक जीवनातील काही प्रिय, काही अंगवळणी पडलेल्या, काही आवश्यक गोष्टींचा त्याच्याशी संघर्ष होऊ लागला, की त्याची मनस्थिती द्विधा होते. ‘याच्यासाठी ते सोडवत नाही, की त्याच्यासाठी हे’ अशी संभ्रमित अवस्था होऊन बसते. मग यातून Best of Both असा पर्याय (वा पळवाट) काढण्याची खटपट सुरू होते. आपद्धर्माचा महामार्ग मला ओशोंनी सांगितलेली, बुद्धाशी संबंधित कथा आठवते आहे (१) . बुद्धांनी अहिंसेचा संदेश प्रसृत केल्यानंतर त्याने प्रभावित झालेले अनेक जण त्यांचे अनुयायी झाले. परंतु यात अनेक क्षत्रिय होते. मांसाहार हा त्यांच्या आहाराचा अविभाज्य भाग होता. त्यात अचानक बदल झाल्याने त्यांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम झाला. अति-उत्तरेकडील हिमाच्छादित भागात राहाणार्यांना शाकाहारापेक्षा मांसाहार अधिक सहजपणे उपलब्ध होत असे. या नि अशा कारणांनी जेरीस आलेली काही मंडळी बुद्धांकडे गेली, त्यांना आपली अडचण सां...
पुढे वाचा »
गुरुवार, १० सप्टेंबर, २०२६
‘प्लरिबस’च्या निमित्ताने... ‘सह नौ भुनक्तु’ व्यवस्थांचा मागोवा - ११ : अद्यतनीकरण (Update)
-
नव्या व्यवस्थेकडे « मागील भाग अद्यतनीकरण (Update) संगणक वा स्मार्ट फोन वापरणार्यांना ‘अद्यतनीकरण’ (Update) ही संकल्पना चांगलीच माहित झाली आहे. या दोन्ही उपकरणांवर Microsoft Office, WhatsApp, iTunes यांसारख्या विविध प्रणाली असतात. तुम्ही या दोन उपकरणांचा वापर करत असताना अनेकदा तुमचा संगणक वा फोन ‘अमक्या अॅपचा अपडेट उपलब्ध आहे’ किंवा ‘पुढचे व्हर्शन उपलब्ध आहे’ असा संदेश देत असतो. हे अद्यतनीकरण करण्यास तुम्ही संमती दिली की ती प्रक्रिया आपोआप– तुमच्या हस्तक्षेपाखेरीज पार पाडली जाते. पण हे ही जुने झाले. आता अनेक प्रणाली – विशेषत: browsers – हे तुम्हाला विचारता, तुमच्या माघारी, परस्पर अद्ययावत करून मोकळे होतात. उलट त्यांना तसे करता येऊ नते यासाठी बरेच सव्यापसव्य करावे लागते. बहुतेक वापरकर्ते (Users) हे आळशी असल्याने हे त्यांच्या पथ्यावर पडते. त्यातील धोक्याकडे दुर्लक्ष करुन ते सुखाने काम करत राहातात. https://www.eetimes.com/ येथून साभार. उपग्रह मनोरंजनाच्या (satellite television) जमान्यात तुम्हाला विविध दूरचित्रवाणी वाहिन्या पाह...
पुढे वाचा »
शुक्रवार, ४ सप्टेंबर, २०२६
‘प्लरिबस’च्या निमित्ताने... ‘सह नौ भुनक्तु’ व्यवस्थांचा मागोवा - १० : नव्या व्यवस्थेकडे
-
सर्वे सुखिन: सन्तु « मागील भाग शिकारजीवी, शेतीजीवी, आणि व्यापारजीवी असे मानवी समाजव्यवस्थांचे प्रमुख टप्पे दिसतात. यातील पहिले दोन अनायासे सहजीवी होते. शिकारजीवी, शेतीजीवी समाजांमध्ये प्रामुख्याने टोळ्यांचा परस्पर-संघर्ष वा स्पर्धा होती, तर व्यापारजीवी समाजाने त्याला आपल्यामध्ये आतच सामावून घेतले. या बदलाने सहभावनेला दुर्बल केले. त्यातून समाज शबल होत गेला. साम्यवादी व्यवस्था तर खर्या अर्थाने ‘सर्वे सुखिन: सन्तु’ स्वरूपाची म्हणता येईल, समूह-हिताच्या हेतूने पाहिले तर तिच्यामध्ये न्यून दिसत नाही. तरीही व्यावहारिक पातळीवर तिचा पहिला– श्रमजीवींच्या एकाधिकारशाहीचा– टप्पाही मूळ हेतू साध्य करण्यात यशस्वी झालेला दिसत नाही. शेती नि पशुपालन या दोहोंमार्फत आपले अन्न मिळवू लागलेला मनुष्यप्राण्याला – अगदी मोजक्या वन्यजीवी जमाती सोडल्या तर – शिकारजीवी राहण्याची गरज उरलेली नाही. मानवी इतिहासाच्या प्राचीन अध्यायामध्ये प्रबळ असलेले संग्रह (gather), अपहार (steal) आणि शिकार (hunt) हे तीन जीवनाधार आज अदखलपात्र वा संदर्भानुसार गुन्हेही ठरत आहेत. उत्पादन आणि विनिमयप्रधान समाजामध्ये शेती आणि पशुपालन ...
पुढे वाचा »
शनिवार, २९ ऑगस्ट, २०२६
‘प्लरिबस’च्या निमित्ताने... ‘सह नौ भुनक्तु’ व्यवस्थांचा मागोवा - ९ : सर्वे सुखिन: सन्तु
-
धर्म आणि सहजीवन « मागील भाग साम्यवादी व्यवस्था आर्थिक विषमता दूर करण्यासाठी नि विध्वंसक विकासाला निसर्गानुकूल अशा एका वाजवी पातळीवर स्थिर करण्यासाठी पुन्हा एकवार सामूहिकतेचा अंगीकार करण्याची आवश्यकता प्रतिपादित केली जाऊ लागली. ही प्राचीन व्यवस्था जणू ‘सर्वे सुखिन: सन्तु’ प्रकारची होती– निदान सर्वसमावेशक होती, असे यामागचे गृहितक होते. बदलत्या मानवी जीवनशैलीस अनुसरून यासाठी विविध सामाजिक प्रारूपे (models or systems) समोर आली. त्यातील सर्वात व्यापक, सर्वसमावेशी प्रारूप होते साम्यवादी व्यवस्थेचे. स्पर्धा/संघर्ष आणि सहकार हे उत्क्रांतीचे दोन प्रमुख आधार गणले जातात. भांडवलशाहीने त्यातील केवळ स्पर्धा हे एकच अनुषंग उचलून आपले प्रारूप मांडले. याउलट साम्यवादाने त्यातील केवळ सहकाराच्या आधारे सर्वकल्याणकारी व्यवस्थेची कल्पना मांडली. हे ‘समूह-मालकी’चे किंवा सामूहिक व्यवस्थापनाचे सामाजिक प्रारुप आहे. यामध्ये धर्माधिष्ठित समाजव्यवस्थेमध्ये असणारे पंथ, जात, वर्ग वगैरे ‘उपटोळ्या’ मोडून काढून विश्वव्यापी बंधुभावनेच्या, सहकाराच्या आधारे जगणार्या विशाल मानवीसमूहाची कल्पना मांडली गेली आहे. अशा...
पुढे वाचा »
गुरुवार, २७ ऑगस्ट, २०२६
सण गेले विरुनी
-
9 YEar Old Sings 'Carol of the Bells' (Aurelien Froissart's Channel) ख्रिसमसच्या काळात ‘Spreading the Christmas Spirit' नावाचा प्रकार असे, अजूनही असावा. सणांचा आनंद द्विगुणित करण्यासाठी काही परिचित एकत्र येऊन घरोघरी– अगदी अपरिचित घरासमोरही– जाऊन ख्रिसमसची गाणी (Carol) म्हणतात. हे गट केवळ मुलांचेच नसतात तर मोठ्यांचेही असू शकतात. हे लोक घरोघरी जाऊन ही गाणी म्हणत असताना, एखादा त्या घरचा अथवा बाहेरचाही त्यात सामील होतो नि पुढच्या घरी तो ही गाणी म्हणतो. अशा हृद्य परंपरा हेच सणांचे बलस्थान असते. त्यातील हे गाणं सकाळी-सकाळी ऐकवून या पोरीने या उमेदवार-म्हातार्याकडून उरले-सुरले आयुष्य मागून घेतले. Village Cooking channel नावाचे तमिळ मंडळींचे एक चॅनेल मी यू-ट्युबवर फॉलो करतो. हे पाच-सहा जण मिळून निसर्गाच्या सान्निध्यात पारंपरिक पद्धतीने विविध पाककृती रांधतात, त्या ही घाऊक प्रमाणात. एखाद्या उपग्रह वाहिनीवरचे नटवे ‘कुकिंग शो’ (ज्याच्या नावातच शेफ टाकले की त्याला आपोआप वजन येते असे निर्मात...
पुढे वाचा »
शनिवार, २२ ऑगस्ट, २०२६
‘प्लरिबस’च्या निमित्ताने... ‘सह नौ भुनक्तु’ व्यवस्थांचा मागोवा - ८ : धर्म आणि सहजीवन
-
वैय्यक्तिक संपत्ती नि विषमता « मागील भाग यापूर्वी उल्लेख केल्याप्रमाणे पोटामागे विस्थापित झालेल्या, विखंडित झालेल्या टोळ्या विखुरल्या. विविध भूभागांवर पसरलेल्या या गटांचा वारसा समान होता, कर्मकांडांत साम्य होते. पुढे धर्मसंस्थांनी अमूर्त अशा नीतिकल्पनांच्या आधारे भौगोलिकदृष्ट्या विखुरलेल्या गटांनाही बांधिलकीचा वसा देऊन नवी टोळी बांधली. पुढे धर्माने राजकीय व्यवस्थांना ताब्यात घेण्यासाठी स्वत:ची सैन्ये उभारली, काही वेळा आपले धर्मदूत पाठवून टोळीत नसलेल्यांना टोळीत सामील करुन घेण्याचा प्रयत्न केला नि त्यायोगे बहुसंख्या प्रस्थापित करुन राजकीय सत्ता ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला. धर्माधिष्ठित सत्ता प्रस्थापित करण्यासाठी ख्रिस्ती, ज्यू नि मुस्लिम सत्तालोलुपांच्या रक्तरंजित संघर्षाने - ज्यांना ‘क्रूसेड्स’ (crusades) असे म्हटले जाते - इतिहासाचे एक पर्व लालभडक झालेले आहे. अगदी मोजक्याच उदाहरणांमध्ये उलट दिशेने एका धर्माचे वा एकाच वर्तन-विचाराचे लोक एकत्र येत त्यांनी एका भूभागावर सहजीवनाची मेढ रोवली आहे. आमीश समाज How 400,000 A...
पुढे वाचा »
शनिवार, १५ ऑगस्ट, २०२६
‘प्लरिबस’च्या निमित्ताने... ‘सह नौ भुनक्तु’ व्यवस्थांचा मागोवा - ७ : वैय्यक्तिक संपत्ती नि विषमता
-
समूह नव्हे व्यक्ती; गरज नव्हे संपत्ती « मागील भाग रोजगार आणि बेरोजगारी मागील भागात म्हटल्याप्रमाणे चलनामुळे विनिमयाची देवाण नि घेवाण ही दोन अनुषंगे सुटी होऊन खरेदी नि विक्री हे व्यवहार स्वतंत्र झाले. एक बाजू चलन सांभाळू लागले. त्याचबरोबर केवळ चलनच देऊ करणारे ‘रोजगार’-क्षेत्र उदयाला आले . ज्यातून आधी केवळ चलन-संचय करून, प्रत्यक्ष गरजांचा विचार त्यानंतर– त्या संचयाच्या परिघात करण्याचे नवे बंधन निर्माण झाले. व्यापाराप्रमाणेच हा रोजगार टोळी वा समाजाच्या परिघातून मुक्त झाला . अन्य समाजातील व्यक्ती वा व्यक्तिगटांसोबत व्यवहार, रोजगार करूनही चलन मिळवणे शक्य झाले. विनिमयाने सैल केलेली सामाजिक वीण चलनाने पुरी उसवून टाकली. इतके झाल्यावर अर्वाचीन महानागरी समाजामध्ये जोडीदाराची निवडही समाजाचे बंधन उल्लंघून होऊ लागली. जन्माने बांधलेल्या माणसांच्या सहजीवनाची संकल्पना पुरी मोडीत निघाली . ‘अन्न दीर्घकाळ साठवून ठेवण्यास मर्यादा होत्या, पण चलनाची साठवण-क्षमता अमर्याद आहे’ हे ध्यानात आल्यावर काहींनी भविष्याची, भावी पिढ्यांचीही तरतूद म्हणून अधिकाधिक चलन जमवून ठेवण्याच्या युक्त्या-प्रयुक्त्या योजाय...
पुढे वाचा »
याची सदस्यत्व घ्या:
पोस्ट (Atom)







