Vechit Marquee

सूची: अनुक्रमे ▶ वर्गीकरण ▶ लेखमाला ▶ लक्षवेधी ◼

मंगळवार, २५ सप्टेंबर, २०१२

‘रोश विरुद्ध अॅडम्स’च्या निमित्ताने - ८: सुपर पॉयजन


  • खटले आणि निकालांची बारी   << मागील भाग रोशच्या व्यावसायिक नीतीला उघडं पाडणारी आणखी एक घटना याच सुमारास घडली (१० जुलै १९७६). उत्तर इटलीमधे ‘सेवेसो’ नावाच्या छोट्या गावात असलेल्या ‘इक्मेसा’(Industrie Chimiche Meda Società Azionaria) नावाच्या कॉस्मेटिक्स उत्पादक कंपनीत एक भीषण स्फोट झाला. काही क्षणापूर्वी नितळ निळं असलेलं आकाश पांढर्‍या धुराच्या ढगांनी भरून गेलं. या ढगात ‘डायॉक्सिन’ नावाच्या विषारी द्रव्याचं प्रमाण अतिशय जास्त होतं. हे डायॉक्सिन सायनाईडपेक्षा सुमारे १०,००० पट अधिक विषारी द्रव्य आहे [10] . (हे प्रमाण अ‍ॅडम्सचा दाव्यानुसार ७०००० पट एवढे होते.) सेवेसोच्या परिसरातील वनस्पती कोमेजून, कोळपून गेल्या; ढगाच्या संपर्कात आलेले पक्षी उडता उडता बाण लागल्यागत टपकन पडून मेले. कित्येक घरट्यांखाली असे मेलेले पक्षी पडलेले दिसून आले. सेवेसोच्या आसपास गवतावर चरणारे अनेक ससे मृतावस्थेत सापडले. त्यांच्या तोंडातून, कानातून आणि आतड्यातून रक्तस्त्राव झालेला आढळला. पाळीव कुत्री नि मांजरे झिंगल्यासारखी स्वतःभोवती गरगर फिरत पडली ती उठलीच नाहीत. तेथील रहिवाशांना अनेक प्रकारचे त्रास ...

    पुढे वाचा »

शनिवार, २२ सप्टेंबर, २०१२

‘रोश विरुद्ध अॅडम्स’च्या निमित्ताने - ७: खटले आणि निकालांची बारी


  • (दीर्घकाळ प्रलंबित असलेल्या मालिकेचा पुढील भाग ) काही टिपणे   << मागील भाग अॅडम्सला अटक झाल्याचे ई.ई.सी.ला समजणे शक्यच नव्हते. मेरिलिन जिवंत असती तर तिने कदाचित त्यांना कळवलेही असते. तुरूंगाच्या आतून काहीही हालचाल करणे अॅडम्सला शक्यच नव्हते. यासाठी अॅडम्सने तुरुंगातील आपल्या सेलमधे असलेल्या इतर गुन्हेगारांचा वापर करून घेतला. त्या सर्वांना किरकोळ गुन्ह्याखाली तुरूंगवासाची शिक्षा झालेली असल्याने ते लवकरच बाहेर पडणार होते. त्यांच्याकरवी ई.ई.सी.पर्यंत ही बातमी अॅडम्सने पोचवली. ‘ला स्टांपा’ तुरूंगात अॅडम्सची नव्याने चौकशी सुरू झाली. ही चौकशी करणारे पोलिस आयुक्त वर्नर विर्क अॅडम्सला जवळजवळ रोजच विविध प्रश्न विचारत, त्याची अॅडम्स उत्तरे देई. त्या उत्तरांवरून आणखी खोलवर माहिती काढण्याच्या दृष्टीने आवश्यक असे प्रश्न विर्क दुसर्‍या दिवशी घेऊन येत. हा प्रकार काही दिवस चालल्यानंतर दुसर्‍या दिवशीच्या प्रश्नांतून दिसणारा तांत्रिक नेमकेपणा पाहून, आदल्या दिवशीची उत्तरे घेऊन विर्कसाहेब कोणाकडे तरी नेत असावेत, नि तेथून त्यावर अधिक नेमके प्रश्न घेऊन येत असावेत हे अॅडम्सच्या लक्षात आले. ...

    पुढे वाचा »

शनिवार, २५ ऑगस्ट, २०१२

(आपले) स्वातंत्र्य, (इतरांचे) चारित्र्य आणि (तथाकथित) संस्कृती


  • परवाच फेसबुकवर एका ग्रुपवर नटनट्यांच्या शिर्डीप्रेमाचा विषय निघाला होता. गप्पा तशा खेळीमेळीत चालू असताना अचानक एक नवा सदस्य अवतीर्ण झाला नि त्याने काही स्टेटस् टाकले ते वाचून अख्खा ग्रुप हादरला. एक-दोघांनी त्याला समजावण्याचा प्रयत्न केला, स्त्री सदस्यांनी त्याच्या विधानाला तीव्र आक्षेप घेतला. परंतु महाराज अजिबात बधले नाहीत. एकामागून एक अशी तिरस्करणीय विधाने करणे चालू होते. यात त्यावर आक्षेप घेणार्‍या सदस्यांवर वैयक्तिक शेरेबाजीही चालू होती. सारा रोख स्त्रियांच्या – चित्रपटात काम करणार्‍या अभिनेत्रींच्या – चारित्राबद्दल होता. त्यांची विधाने आठवली तरी अंगावर शहारे येतात. ‘असल्या स्त्रिया जवळून जरी गेल्या तरी इतकी घाण येते, म्हणून तर त्या इतक्या मेकअप करतात नि सेंट लावतात.’ हे त्यांचे सर्वात सभ्य विधान. यावरून इतर विधानांचा तर्क तुम्ही करू शकाल... खरंतर करू नकाच असे म्हणेन मी. हा प्राणी आहे तरी कोण म्हणून त्यांचे प्रोफाईल पाहता बसलेला धक्का अजूनच तीव्र होता. हे महाराज भारत सरकारच्या न्यायव्यवस्थेमधे न्यायाधीश म्हणून निवृत्त झालेले होते. म्हटलं वा काय निवड आहे. एकुणच ‘आपलं ठेवायचं झाकू...

    पुढे वाचा »

गुरुवार, २६ जुलै, २०१२

काऽऽय रेऽऽ देवाऽऽ...


  • (कवि संदीप खरे यांची क्षमा मागून...) आता पुन्हा उपोषण होणार मग देश ढवळून निघणार मग बेदींना कंठ फुटणार मग मध्येच मोदी बोलणार मग जुनाच खेळ चालू होणार... काऽऽय रेऽऽ देवाऽऽ... मग जुन्या खेळात जुने खेळाडू पुन्हा एन्ट्री घेणार... मग सारीपाट मांडणार... मग मांडलेला सारीपाट काहींना पसंत नसणार... मग ते कुणीतरी ओरडणार मग अण्णा-मित्र असतील तर रडणार रामदेव बाबा असतील तर चिडणार मग ‘नसतोच खेळलो तर बरं’ असं वाटणार आणि या सगळ्याशी आता प्रणवदांना काहीच घेण-देणं नसणार... काय रेऽऽ देऽऽवा मग त्याचवेळी लोकपाल विधेयकावर चर्चा चालू असणार... मग त्यात बेदी, केजरीवाल नि काँग्रेसचं कुणी असणार... मग त्याला अण्णांनी आपली संमती दिलेली असणार... मग ते केजरीवालांनी लिहिलेलं असणार मग ते अण्णांनी अप्रूव केलेलं असणार मग रामदेवबाबांची मागणी नक्की काय असावी असा प्रश्न सार्‍यांना पडणार मग उगाच डोक्यात किडा वळवळणार मग ना घेणं ना देणं पण गांधी टोपी घालणार.... काय रेऽऽ देऽऽवा मग च्यानेलवाले उत्साहात सगळीकडे धावणार मग केजरीवाल त्यांना स...

    पुढे वाचा »

गुरुवार, १४ जून, २०१२

शोध तुकारामाचा


  • तुकाराम बोल्होबा आंबिले हे नाव – निदान विशी उलटलेल्या – मराठी माणसाला नवीन नाही. लिखित माध्यम असो, ध्वनि माध्यम असो वा चित्रपट माध्यम असो, यातील कोणतंही माध्यम असं नाही ज्यातून आपण तुकोबाला पाहिलं, अनुभवलं नाही. तुकोबाचे आपले भावबंध इतके अलवार आहेत, की तुकोबाचे नाव घेतले की आपण हळवे होतो. त्यामुळे तुकोबाच्या जीवनचरित्राशी आपण अगदी बांधले गेलेले आहोत. पण या भक्तिभावाची परिणती ही की तुकोबाचे चार निवडक अभंग, त्याची ‘कर्कशा’ पत्नी आवली, त्याचा प्रस्थापित ब्राह्मणी व्यवस्थेशी झालेला संघर्ष, इंद्रायणीतून पुन्हा वर आलेली त्याची गाथा नि त्याच्या सदेह वैकुंठागमनाचे गूढ एवढ्यात तुकोबारायाबद्दलची आपली माहिती – नि रुचीही – संपते. एखाद्या व्यक्तिमत्त्वाचा विकास त्याची जडणघडण यावर प्रभाव पाडणारे अनेक घटक असतात. मानसशास्त्रात माणसाच्या व्यक्तिमत्त्वाचा अभ्यास हा बहुधा त्याच्या बालपणाच्या परिस्थितीपासून सुरू होतो. संस्कारक्षम वयात त्या व्यक्तीने जगलेले आयुष्य, त्याला मिळालेले कौटुंबिक संस्कार, सामाजिक वारसा, त्याच्या वाट्याला आलेला काळाचा नि भूगोलाचा तुकडा, इ. अनेक घटक त्याच्या व्यक्तिमत्त्वाला ...

    पुढे वाचा »

रविवार, १० जून, २०१२

पराभूत थोरवीच्या शोधात


  • कालच पं. विजय कोपरकरांनी या तथाकथित आयडॉल वगैरे स्पर्धांबाबत एक मार्मिक प्रश्न विचारला होता. ‘हे सगळे महागायक वगैरे लोक दुसर्‍याचे गाणे चोख कॉपी करतात, पण स्वतःची काही भर ते घालू शकतात?’ एका वैतागलेल्या संगीतकारांने त्यांना सांगितले होते, की एका महागायक वगैरे ठरलेल्या गायकाकडून अतिशय साध्या चालीचे गाणे बसवून घेताना त्यांना घाम फुटला होता. त्या संगीतकाराची टिपण्णी अतिशय मार्मिक होती. ते म्हणाले ‘ हे गाणं जर बाबूंजींनी आधीच गाऊन ठेवलं असतं ना तर हा महाभाग लगेच उचलून गायला असता. ’ महागायक झालेल्या या महाभागांचे पुढे काय होते? कदाचित तेच होते जे बहुतेक सार्‍या शालांत परिक्षेत बोर्डात आलेल्यांचे होते. जी गत गायकांची तीच गायनप्रेमींची. गाण समजून-उमजून ऐकायला वेळ कोणाला आहे? आम्ही पैसे देतो, तुम्ही गा, आम्ही वा:, जै हो. अनेक तथाकथित गायनप्रेमी मंडळी केवळ रोटरी किंवा तत्सम संस्थांच्या इव्हेंट मॅनेजमेंटमधून आयोजित केलेल्या कार्यक्रमालाच – तिकिट पाचेकशे पासून तीन हजारपर्यंत फक्त – हजेरी लावतात. आमच्या गरवारेमधे वट्ट पन्नास रुपये तिकिटात अगदी पं. भीमसेन जोशी, पं जसराज, पं. उल्हास कशाळकरांपर्...

    पुढे वाचा »

सोमवार, २१ मे, २०१२

काकस्पर्श: अस्फुट नात्याची कथा


  • सात-आठ वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. शाहरुखचा नवा ‘देवदास’ आला होता. आमच्या ऑफिसमधे जेवणाच्या टेबलवर गप्पाटप्पांमधे अपेक्षेनुसार त्याचा विषय निघालाच. नेहमीप्रमाणे मतमतांतरे होतीच पण चित्रपट न आवडलेल्यांची संख्या अधिक होती. का आवडला, का आवडला नाही, वगैरे मते हिरिरीने मांडली जात होती.‘पण मला तर आवडला बुवा’ एक कन्या म्हणाली. ‘काय आवडले तुला?’ असा प्रश्न विचारताच,‘कॉस्चुम्स काय भारी आहेत नै.’ कन्या उत्तर देती झाली. हे ऐकून त्या टेबलवर आपसात चर्चा करणारे वेगवेगळे गट आपले सारे मुद्दे विसरून अवाक् झाले. काही सेकंद भयाण शांतता होती नि पुन्हा कल्लोळ सुरू झाला. अर्थातच केंद्रस्थानी आता ती कन्या होती. एखादा चित्रपट का आवडावा, का आवडू नये, याचे ज्याचे त्याचे गणित असते, त्याबाबत आक्षेप असायचे काही कारण नाही. जशी आवड कारणमीमांसा घेऊन यायला हवी असे बंधन नाही तसेच नावडही. परंतु जेव्हा एखाद्या चित्रपटाचे किंवा कलाकृतीचे मूल्यमापन आपण करतो असा दावा केला जातो, गुणात्मक श्रेणीवर त्याचे स्थान कुठे याचा विचार केला जातो, तेव्हा त्या कलाकृतीचे अवकाश, मूल्यमापनाचे निकष, त्या निकषांची सार्थकता याचा विचार करायला ...

    पुढे वाचा »