-
विषयसंगतीमुळे हा लेख ‘ वेचित चाललो... ’ वर हलवला आहे. तो इथे वाचता येईल. - oOo -
पुढे वाचा »
सोमवार, ५ मार्च, २०१८
प्रेम कुणावरही करावं
शनिवार, ३ मार्च, २०१८
परवा आमचा पोपट वारला
-
‘परवा आमचा पोपट वारला’ असा निरोप अतुल पेठेंकडून मिळाला होता. म्हणून रीतीप्रमाणे चार जणांना सोबत घेऊन काल त्यांना भेटायला गेलो. आता चार लोक औपचारिक प्रश्न विचारतात तसे आम्ही विचारु म्हटलं नि थोडावेळ बसून निघू असा प्लान होता. पण कसलं काय. एक तासाहून अधिक काळ पार धरुन अख्खी ष्टोरीच ऐकवलीन् या माणसानं. नतद्रष्ट तर इतका की तासभर हसवत ठेवलं आणि. बरं दिसतं का सांगा बरं हे? प्रसंग काय नि आपण वागतो काय. पेठेंसारख्या ‘सुलझा हुआ’ आदमी असं वागेल अशी अग्गदी कल्पना नव्हती होऽ. पोपट झाला म्हणून काय झालं, शेवटी एक फ्यामिली मेंम्बरच तो, शिवाय नावाने थेट जुन्या राज्यकर्त्यांच्या वंशावळीशी नाते सांगणारा, साधासुधा नव्हे. मऽग? अगदीच ताळतंत्र सोडलन् हो या माणसानं. शिट्या काय वाजवतो, त्यावर गाणी काय म्हणतो, आणि कुठली कुठली पात्र आणून समोर उभी करतो. या एका माणसाच्या अंगी नाना कळा आहेत हे ठाऊक होतेच, पण म्हणून काय सभ्य माणसांची नक्कल करायची, आं? पण त्यांच्या पोपटाच्या अंगीही नाना कळा! कोणत्या ते मी का सांगू, जा आणि विचारा पेठेंनाच. एक तासाभराचा वेळ मात्र...
पुढे वाचा »
शुक्रवार, २ मार्च, २०१८
खरा इतिहास, खोटा इतिहास
-
अमका इतिहास हा ‘खोटा इतिहास’ आहे नि अमका इतिहास ‘खरा इतिहास’ आहे हे अनेक लोक छातीठोकपणे सांगतात, तेव्हा मला प्रचंड न्यूनगंड येतो. मुद्रित माध्यमांचा शोध लागून दस्तऐवजीकरण चालू झालेल्या काळातील, किंवा एका दिवसांतच एका देशातून दुसर्या दूरवरच्या देशात पोचता येईल इतकी अत्याधुनिक विमानसेवा सुरु झालेल्या काळातील; काही घटना, उक्ती/उद्धृते यांच्याबद्दल ठामपणे सांगणे मला अवघड जाते. तिथे प्राचीन इतिहास, मध्ययुगीन इतिहास यांच्याबाबत ठामपणे खरे-खोटे करणारे लोक त्यांच्या त्यांच्या धर्माच्या प्रेषिताहून महान असतात, असे माझे नम्र मत आहे. आता हेच बघाना, एका विज्ञानविषयक वीडिओ बघत असताना एकदम ठेच लागली. त्यात एक खगोलशास्त्रज्ञ असं म्हणाली, "Albert Einstein had said, 'Not only is the universe stranger than we imagine, it is stranger than we can imagine." अनेकदा माणसं उद्धृत करण्याच्या ओघात मूळ माणसाची वाक्यरचना – हेतुत: वा अनवधानाने – बदलून टाकतात, त्या भरात त्याचा अर्थही अनेकदा छटा बदलतो. उदा. उत्क्रांती अथवा डीएनएबाबत बोलताना अनेक वैज्ञानिक अथवा माहितीपटाचे अभिवाचक ‘नर आपला डीएनए जि...
पुढे वाचा »
गुरुवार, १ मार्च, २०१८
ठणाठणा वाजे बीन
-
‘एखाद्या कामाची पद्धतशीरपणे लहान लहान कामांत विभागणी करुन ते पार पाडणे, वा एखाद्या प्रश्नाचे विश्लेषण करुन त्याचे उत्तर शोधणे हे आपले कौशल्य आहे’ हा माज उतरवायचा असेल तर एक करा. घरी एक ‘बीनबॅग’ आणा! नाही, माझे डोके पूर्ण ताळ्यावर ठेवूनच मी लिहिले आहे हे. --- बॅग येते. तुम्ही बीन्स स्वतंत्रपणे मागवता. ‘बीन्स भरताना दारे खिडक्या घट्ट लावून घे’ अशी अनुभवजन्य ताकीद मित्राने तुम्हाला दिलेली असते. तुम्ही तो सल्ला तंतोतंत पाळता. थोड्या चुकार बीन्स वगळता – त्यांच्यावर बारीक नजर ठेवून तुम्ही लगेचच ताब्यात घेता – अगदी व्यवस्थितपणॆ बॅगमध्ये त्या भरता. अजिबात गोंधळ न होता काम पार पाडल्याबद्दल खुश होऊन, स्वत:लाच शाबासकी देता. काही दिवस जातात... सफाईसाठी तुम्ही बॅग उचलता, तर पाठीमागे एक दोन बीन्स इकडे तिकडे पळताना दिसतात. अख्खी बॅग उलथीपालथी करुन एक एक वीण तपासून कुठे फट दिसते का ते पाहता. काही सापडत नाही. ‘असतील भरताना बॅगला बाहेरुन चिकटून राहिलेल्या’ म्हणून तुम्ही दुर्लक्ष करता. असे तीनचार दिवस जातात. मग पुन्हा दोन चार बीन्स कुठेतरी...
पुढे वाचा »
गुरुवार, ८ फेब्रुवारी, २०१८
नेहरु आणि पटेल: बाता आणि वास्तव
-
१. भारताला स्वातंत्र्य मिळाले तेव्हा सरदार पटेल ७२ वर्षांचे होते. २. त्यावेळी ते तीव्र मधुमेहाने आजारी होते. ३. डिसेंबर १९५० मध्ये त्यांच्या त्यांचा मृत्यू झाला. तेव्हा... ३अ. भारत स्वतंत्र होऊन तेव्हा जेमतेम तीन वर्षे झाली होती. म्हणजे तेव्हा पुन्हा ‘भारताचा शाप’(!) असलेले नेहरु पंतप्रधान झालेच असते. ३ब. अजून भारतातील पहिल्या निवडणुकाही पार पडल्या नव्हत्या. ४. ते स्वतंत्र भारताचे पहिले गृहमंत्री आणि भारतीय सेनेचे पहिले ‘कमांडर-इन-चीफ’ होते. आणि ज्या अर्थी संस्थानांचे विलीनीकरण करण्याचा निर्णय ते ‘एकट्याने’ घेऊ शकत होते, आणि तो ‘एकट्याने’ अंमलातही आणू शकत होते त्या अर्थी त्यांना शासनात भरपूर निर्णयस्वातंत्र्य नि अधिकार होते असे म्हणावे लागेल. ज्या अर्थी नेहरुंनी त्यांना यात स्वातंत्र्य दिले... (मध्यांतर: पटेलढापूसेना: एक मिनिट. नेहरु कोण स्वातंत्र्य देणारे? पटेल स्वयंभू होते. आम्ही: बरं बुवा, तुम्ही म्हणाल तसं.) ... जेणेकरुन ते अन्य संस्थांनाच्या बाबत निर्णय घेऊ शकले. पण त्याच वेळी आपल्या स्वत:च्या मातृ-राज्य असलेल्या काश्मीरम...
पुढे वाचा »
मंगळवार, २३ जानेवारी, २०१८
काही भारतीय माझे बांधव नाहीत
-
डार्विनची थिअरी सिद्ध झालेली नाही... आणि म्हणून आमचे ‘वेदवाक्य’च बरोबर आहे असे सत्यपालसिंग म्हणतात. एखादा कम्युनिस्ट हातभर लेख लिहून समाजवाद्यांचे पसाभर दोष दाखवतो... आणि म्हणून आमची मार्क्सची पोथी स्वीकारा म्हणतो. एखादा वाचाळ नेता प्रतिस्पर्धी पक्षाचे खरे खोटे दोष सातत्याने उगाळत बसतो... आणि मी असा नाही म्हणून मला निवडा म्हणतो. एखादा सरकारपुरस्कृत व्यवसाय करणारा प्रतिस्पर्धी उत्पादनांत ‘हानिकारक केमिकल’ आहेत असे सांगत बसतो... आणि म्हणून आमची उत्पादने खरेदी करा म्हणतो. एखादा धर्माभिमानी ज्या धर्मावर दांत धरुन असतो त्या धर्मातील खर्या खोट्या दोषांची सतत उजळणी करत बसतो... आणि म्हणून आमचा धर्म श्रेष्ठ आहे म्हणतो. एखादा जात्याभिमानी अन्य जातींच्या स्वार्थीपणाचे, लायकीहून अधिक मिळवत असल्याच्या तक्रारी करत बसतो... आणि म्हणून आता आमच्या जातीला प्राधान्य मिळण्याची गरज आहे असे प्रतिपादन करतो. एखादा पांडू अमुक गाव अख्खेच्या अख्खे मूर्ख आहे, ओवररेटेड आहे... म्हणून आमचे गाव लै भारी आहे अशा फुशारक्या मारतो. --- माझ्या दृष्टीने हे सार...
पुढे वाचा »
गुरुवार, १८ जानेवारी, २०१८
कोटीच्या कोटी उड्डाणे*...
-
(‘अ.भा. छद्मविज्ञान काँग्रेस’च्या एक हजार आठशे तेराव्या वार्षिक अधिवेशनात सादर केलेला शोधनिबंध) जर्मनीत अठराव्या शतकात जन्मलेला सॅम्युअल हनिमान भारतीय वंशातला होता. हनिमान हे त्याचे कुलनाम ‘हनुमान’ याचे जर्मन रूप. हा रामायणकालीन हनुमानाचा वंशज होता. आफ्रिकेत जसे प्रत्येक वंशाचे जमातीचे एक झाड असते. तो वंश त्या झाडाच्या नावे ओळखला जातो. तसे भारतात मूळ पुरुषाच्या नावाने हे तर जगजाहीर आहेच. (त्यातून पुढे गोत्र संकल्पना आली.) खरा इतिहास हा की हनुमान हा वन्यज होता, पण तो वानर नव्हता. हिंदू नि हिंदुस्तानद्वेष्ट्या पाश्चात्त्य लोकांनी रामायणात प्रक्षेप करुन तसे लिहिले नि त्याचे महत्व कमी केले. पण हे करतानाच त्याचे कार्य, त्याचे ग्रंथ चोरुन नेऊन त्यातील ज्ञान, शोध, माहिती आपल्या नावावर खपवली. दुसरा एक ‘खरा इतिहास’ असा आहे की वैदिकांनी आपल्या रामाचे महत्व वाढवण्यासाठी द्रविड वंशीय, मूलनिवासी हनुमानाला वानर बनवले, आणि त्याला केवळ रामाचा दुय्यम सहकारी बनवून टाकले. राम-रावण युद्धाचे वेळी त्याने आपल्या वनौषधीवर आधारित उपचारपद्धतीचा वापर करुन, आद...
पुढे वाचा »
Labels:
आरोग्यव्यवस्था,
जिज्ञासानंद,
मनोरंजन,
ललित,
वक्रोक्ती
रविवार, १४ जानेवारी, २०१८
आयुर्वेदाच्या नावे गोरखधंदा
-
‘आयुर्वेद ही स्वदेशी चिकित्सापद्धती आहे’ या एकाच मुद्द्याला धरून, तिला राष्ट्रप्रेमाशी जोडून घेऊन आणि ‘त्यातील औषधांचे साईड इफेक्ट्स नसतात’ या भंपक दाव्याची पुंगी सदोदित वाजवत अनेक तथाकथित औषधे ‘आयुर्वेदिक आहेत’ – खरंतर आयुर्वेदिय म्हणायला हवे– असा दावा करत खपवली जातात. ज्यांची ना कुठली क्लिनिकल ट्रायल होते ना कुठला अभ्यास. पुन्हा काही साईड इफेक्ट्स दिसून आलेच तर ‘हे आयुर्वेदिक आहे, साईड इफेक्ट्स नसतात. तुमचे ते त्रास दुसर्याच कशामुळे झाले असणार’ असे म्हणत हात वर करता येतात. अलीकडे राष्ट्रभक्तीच्या पेहरावात नटून थटून वावरणारी आयुर्वेदाची ही नवी ब्रँच आरोग्याशी – अर्थात अडाणी रुग्णांच्या – खेळत असते. एका क्लिनिकल ट्रायलला किती काळ लागतो, किती पैसा लागतो, किती अद्ययावत यंत्रणा लागते याची कणभरदेखील कल्पना आपल्याला नसते. प्रथम एखादे संयुग हे औषध म्हणून तपासण्यासाठी त्याच्या भौतिक-रासायनिक गुणांआधारे प्रस्ताव उभा करावा लागतो, त्यातून मग प्राण्यांवरचे प्रयोग, मग घातक परिणाम तपासण्याचा टप्पा, त्यानंतर धडधाकट स्वयंसेवकांवरचे प्रयोग, त्यानंत...
पुढे वाचा »
याची सदस्यत्व घ्या:
पोस्ट (Atom)







