Vechit Marquee

सूची: अनुक्रमे ▶ वर्गीकरण ▶ लेखमाला ▶ लक्षवेधी ◼

शुक्रवार, २९ ऑगस्ट, २०१४

नॉस्ट्याल्जिआ ऊर्फ आमचाही गणेशोत्सव


  • पुण्यात शुक्रवार पेठेत मंडईजवळ एका रहात असताना आम्हा पोराटोरांनीही आमचे स्वतःचे एक गणेशोत्सव मंडळ स्थापन केले होते. सार्‍या गल्लीत तेवढे एकच मुलांचे गणेशोत्सव मंडळ होते. (पाच-सहा वर्षांनंतर आणखी एका वाड्यात तसा प्रयत्न झाला, पण तो फसला. ‘फाटाफूट नि आम्ही लै भारी’ हे तेव्हाही अनुभवत होतो. :) ) सार्‍या गल्लीभर फिरून वर्गणी जमा केली जाई. त्या परिसरात ‘अखिल मंडई मंडळा’सह एकुण आठ(!) मंडळे होती/आहेत. मंडईचे मंडळ जरी वर्गणी गोळा करत नसले, तरी उरलेल्या मंडळांना वर्गणी द्यावीच लागे. आजच्याप्रमाणे मंडळे थेट राजकारणी गुंडांच्या ताब्यात गेली नसली, तरी स्थानिक पुंडांच्या ताब्यात होतीच. तेव्हा तिथल्या लोकांना गणेशोत्सव म्हटले की पोटात गोळाच येत असणार. (अर्थातच आम्हा चिल्ल्यापिल्ल्यांना ते समजावं हे वय नव्हतं.). तरीही एखाद-दुसरा खवट म्हातारा वगळला, तर बहुतेक ठिकाणी पोरांच्या गणेशोत्सवाला वर्गणी देण्यास खळखळ केली जात नसे. छे: पण मी फारच पुढे गेलो. म्हणजे, वर्गणी गोळा करणे हे फार पुढचे झाले. त्या आधी श्रावणात गणेशोत्सवाचे वेध लागत. मग एक दिवस पहिली ‘मीटिंग’ बोलावण्यात येई. त्यावेळी मंडळाचे सार...

    पुढे वाचा »

गुरुवार, २८ ऑगस्ट, २०१४

एक बिम्म नि दोन बब्बी


  • सुटणारे पोट नि वाढणारा रक्तदाब या नव्या सुखवस्तू जगाच्या देणग्यांपासून सुरक्षित अंतरावर राहण्यासाठी हल्ली दिवसाचा एक तास फिरण्यासाठी राखून ठेवला आहे. सामान्यपणे वर्दळ कमी असते अशा वेळी ही एक तासाची फेरी घडते. काही दिवसांपूर्वीची गोष्ट आहे. निम्मी फेरी संपवून परतीच्या वाटेवर होतो. रस्त्यात एके ठिकाणी कचराकुंडी आहे. त्याच्या आसपास बर्‍याच अंतरापर्यंत कचरा लोकशाही पद्धतीने ऐसपैस पसरलेला असतो. त्यामुळे श्वानपंथीय देखील वहिवाटीच्या हक्काने तिथे वावरत असतात. यातच एका कुत्रीची दोन पिले - एक पांढरे नि एक कबरे - तिथे लुडबुडत असतात. पिले तशी धीट नि चटपटीत. आज तिथे दहा-बारा वर्षांच्या दोन शाळकरी मुली थांबल्या होत्या. शाळेच्या वेशात नसल्या तरी पाठीवर सॅक ऊर्फ दप्तर असल्याने बहुधा क्लासच्या वाटेवर असाव्यात. त्या दोन पिलांना पाहून त्या थांबल्या. सायकलला सरळ कुलूप घातले. नि बाहेरपर्यंत लुडबुडत आलेल्या पिलाला यू यू करून बोलावू लागल्या. पिलाची पहिली प्रतिक्रिया अर्थातच आतल्या दिशेने धूम ठोकण्याचीच झाली. पण त्या मुलींनी चिकाटी सोडली नाही. यू यू करत अजूनही त्या तिथेच थांबल्या होत्या. मी काही पावले चा...

    पुढे वाचा »

शुक्रवार, २२ ऑगस्ट, २०१४

आरसा दाखवणारा ‘रेगे’


  • पौगंडावस्था आणि तारुण्य या सीमारेषेवर उभा असलेला कुणी एक रेगे. त्या वयात संभ्रम कमी होत त्याची जागा प्रचंड ऊर्जा आणि ऊर्मीने घेतलेली असते. याच वयात माणसे अधिक प्रयोगशील असतात, धाडसी असतात. बेदरकारपणा, धोका पत्करण्याची तयारी याच काळात सर्वात अधिक असते. अगदी रेगेसारखा पापभीरू मध्यमवर्गीय कुटुंबातला मुलगाही त्याला अपवाद नसतो. दहीहंडी पाहायला गेलेला रेगे. योगायोगानेच तिथल्या हाणामारीत सहभागी असल्याच्या संशयाने त्याची वरात पोलिस स्टेशनात आणली जाते. त्याच्यासारख्या पार्श्वभूमीच्या तरुणाला पोलिस स्टेशनचे आतून दर्शन घडावे अशी वेळ आलेली नसतेच. त्यामुळे एकीकडे भलत्याच लफडयात अडकल्याची, परीक्षा बुडण्याची आणि मुख्य म्हणजे आई-वडील काय म्हणतील ही अगदी खास मध्यमवर्गीय भीती आहेच. पण त्याच वेळी ‘आयला, आपण पहिल्यांदाच पोलिस स्टेशन मध्ये आलो ते ही अरेस्ट होऊन’ या विचाराने त्याला ‘सॉलिड थ्रिल’ वगैरे वाटते. इथेच त्याला ‘एम भाय’ चे पहिले दर्शन घडते. ‘भाय’ला सलाम करणारे, त्याच्या शब्दाखातर रेगेला सरळ सोडून देणारे पोलीस बघून हा भाय एकदम भारी माणूस आहे असे त्याल...

    पुढे वाचा »

मंगळवार, २२ जुलै, २०१४

‘मी...ग़ालिब’ ला भेटताना...


  • मिर्ज़ा असदुल्ला ख़ान ग़ालिब! आपण अस्सल तुर्की वंशाचे आहोत असा अहंकारमिश्रित समज असलेला, नबाबाच्या घराण्यात जन्मलेला आणि त्यामुळेच जगण्यासाठी कमवावे लागते याची गंधवार्ता नसलेला. आपद्धर्म म्हणून चाकरीसाठी, उमेदवारीसाठी गोर्‍या मित्राच्या दारी जातानाही नबाबाला मिळणारा आदरसत्कार मिळावा असा अस्थानी अहंकार बाळगणारा, सांसारिक पातळीवर सुमार देहसौंदर्य नि सुमार विचारक्षमता असलेली पत्नी लाभल्याने भावनिक पातळीवर वंचित राहिल्याची अनुभूती घेणारा, दरबारी राजकारणापासून दूर राहू पाहात असतानाही त्यात ओढला जाऊन– दुर्दैवाने नेहेमीच चुकीच्या बाजूला राहणारा, आणि तरीही आज दीडशेहून अधिक वर्षे आपले अढळपद राखून असलेला प्रतिभावंत. ‘नाटक कंपनी’ च्या अधिकृत संस्थळावरुन साभार. ग़ालिबचे आयुष्य हे समकालीनांच्या तसेच अर्वाचीन अभ्यासकांच्या, शायरांच्या दृष्टीने एकाच वेळी तीव्र असूयेचा, अभिमानाचा आणि क्वचित तिरस्काराचाही विषय होऊन राहिले आहे. त्याचे अतिरेकी मद्यपान, त्यापायी कर्जबाजारी होणे हे व्यावहारिक आयुष्यातील अपयश तर उघड आहेच. त्याखेरीज ढासळत्या व्यवस्थेला सावर...

    पुढे वाचा »

शनिवार, १७ मे, २०१४

जस्मिन क्रांती, सॅफ्रन क्रांती वगैरे वगैरे...


  • काही काळापूर्वी ट्युनिशियामधे प्रसिद्ध ‘जस्मिन क्रांती’ झाली. (आपल्या देशात येणार्‍या वादळांनाही लाडाची ‘कत्रिना’ वगैरे नावे ठेवणार्‍यांनीच हे नाव प्रचलित केले होते, यावरून तिची प्रेरणाही चटकन लक्षात यावी.) त्याला जोडूनच इजिप्तमध्येही क्रांती(?) झाली. तिला January Revolution म्हटले गेले. या दोहोंमध्ये सोशल मीडियाचा सहभाग बराच होता, म्हणून बराच गुलाल उधळला गेला. फेसबुकी क्रांतिकारक लगेचच भारावून गेले. (तसे ते नॉस्ट्राडेमसच्या भाकितानेही भारावून जातात, नि त्याच वेळी ‘फेसबुकवरच्या आपल्या प्रोफाईलबाबत काही अघटित घडेल’ अशी भीती दाखवत त्यावर सोपा उपाय सुचवणार्‍या पोस्टस् वाचून देखील. पण ते असो.) त्यांना भारतातही अशी क्रांतीबिती व्हायला हवी अशी स्वप्ने पडू लागली. असाच एक फेसबुकी क्रांतिकारक लिहिता झाला “आता असे काही आपल्याकडेही घडावे अशी जनतेची इच्छा आहे.” ( आता जनतेची इच्छा या फेसबुककोंबड्याला* कशी समजली असे विचारायचा मोह मी टाळला .) पण त्याला प्रतिसाद म्हणून लिहिलेले इथे देतो आहे. --- ‘असे’ म्हणजे काय घडायला हवे आहे? लोकशाही इथे आधीच आह...

    पुढे वाचा »

गुरुवार, १० एप्रिल, २०१४

एक न अनुभवलेली ‘बंदिश’


  • काही महिन्यांपूर्वी डॉ. राजीव नाईक यांचे रा.श्री. जोग स्मृती व्याख्यानमालेतील ‘आजः नाटक आणि भाषा’ या विषयावरील व्याख्याने एका मित्रासोबत ऐकली होती. त्यावेळी त्यांनी आपल्या ‘बंदिश’ या आगामी नाटकाचा ओझरता उल्लेख केला होता. त्यानंतर फेब्रुवारी महिन्यात पार पडलेल्या ‘विनोद दोशी स्मृती नाट्यमहोत्सवा’त या नाटकाचा पहिला प्रयोग सादर झाला. एक दोन महिन्यांनंतर एनएसडी'च्या 'Appreciating Theatre' या शीर्षकाखाली झालेल्या कार्यशाळेत हे नाटक पुन्हा एकदा सादर झाले. तिथे नाटकानंतर नाटककार, दिग्दर्शक नि सहभागी कलाकार यांच्याशी संवाद साधण्याचा कार्यक्रम होता. नाटकासंबंधी काही पैलू इथे तपासले जातील, काही अधिक समजेल, म्हणून त्या संवाद-कार्यक्रमालाही उपस्थिती लावली होती. ‘मुक्त शब्द’च्या अंकात ‘बंदिश’ची संहिता वाचण्यात आली, नि त्या निमित्ताने त्या नाटकाबाबतच्या विचारांची पुन्हा एकवार उजळणी झाली. या तीन अनुभवातून सुटेसुटे वा एकत्रितपणे नक्की काय हाती लागले, याचा थोडा वेध घेताना ‘त्यातून निश्चित काही हाती लागले का?’ याबाबत मी साशंक आहे. कदाचित काही अनाम, अपारंपरिक स्वतंत्रपणे नात्यांची वेगव...

    पुढे वाचा »

मंगळवार, २५ फेब्रुवारी, २०१४

तसा मी... असा मी, आता मी


  • प्रास्ताविक: काही काळापूर्वी एक जुना मित्र भेटला. तो नि मी पूर्वी बरोबर असताना जसा ‘मी’ होतो तोच त्याच्या डोळ्यासमोर होता. माझी शारीरिक, मानसिक स्थिती, माझी रहाणी, माझ्या आवडीनिवडी, माझी राजकीय सामाजिक मते इ. बाबत आता मी बराच बदलून गेलो आहे याची जाणीव करून देणारी ती भेट होती. मग सहज विचार करू लागलो की हे जे बदल एका व्यक्तीमधे होतात, ‘तसा मी’ चा ‘असा मी’ होतो तो नक्की कसा? काय काय घटक यावर परिणाम करतात. यावर आमचे ज्येष्ठ मित्रांशी थोडे बोलणे झाले. त्यांनी याबाबत सरळ धागाच टाकावा असे सुचवले. या निमित्ताने इतरांनाही स्वतःमधे डोकावून पाहण्याची संधी मिळेल नि त्यातून आदानप्रदान होईल ज्यातून काही नवे सापडेल, आपले आपल्यालाच काही अनपेक्षित सापडून जाईल असा आमचा होरा आहे. त्याला अनुसरून लेख लिहायला बसलो तर तो हा असा अस्ताव्यस्त पसरला. म्हणून मग एक एक मुद्द्यासाठी वेगळा धागा करतो आहे. एक महत्त्वाचा मुद्दा आवर्जून ध्यानात ठेवायचा; तो असा की त्यात व्यक्त केलेली माझी मते महत्त्वाची नाहीत, त्या मतांपर्यंत होणारा प्रवास, ती कारणमीमांसा महत्त्वाच...

    पुढे वाचा »

रविवार, १६ फेब्रुवारी, २०१४

जब्याऽऽ, एऽ फँऽऽन्ड्री, पकड साला


  • एखाद्या चित्रपटाने डोके भणाणून गेले किंवा व्यापून राहिले की काहीतरी खरडण्याची माझी जुनीच खोड आहे. पण एखाद्या चित्रपटाने झोप उडवल्याने गद्याऐवजी कवितेच्या माध्यमाची निवड केली अशी ही एकच घटना. अनेक चित्रपट, चरित्रे असोत कि कथानके, त्यात एकच प्रसंग वा तुकडा असतो ज्याच्या भोवती सारा भवताल फिरतो. ‘फँड्री’मधला शेवटाकडचा विहिरीचा प्रसंग असाच. त्या भोवतीच उगवून आलेली ही कविता. डोक्यातला सारा संताप, सारं वैफल्य तिने शोषून घेतलं न मला मोकळं केलं. काल संध्याकाळी फँड्री पाहिला त्यानंतर घरी आलो ते हे तुफान डोक्यात घेऊनच. शेवटच्या डुकराच्या पाठलागात त्या डुकराच्या जागी जब्या दिसू लागला नि डोकं सुन्न झालं. त्यातच चित्रपट पाहताना आणि पाहून बाहेर पडताना असंवेदनशील प्रेक्षकांनी केलेली शेरेबाजी नि मतप्रदर्शन ऐकून डोकं आणखीनच आउट झालेलं. घरी येऊन ते डोक्यातलं सारं तुफान कागदावर उतरवलं. सतत भानावर असणार्‍या, भावनेपेक्षा विचारांच्या आधारे वाटचाल करणार्‍या एखाद्यालाही कविता अचानक भेटते ती अशी. मी मरुद्गणांनी दिलेल्या वेदनेतून वेदांतील ऋचा रचणारा श्यावाश्व नसेन किंवा व्याधाच्या बाणाने विद्ध झालेल्...

    पुढे वाचा »